महत्वाच्या बातम्या
-
मोदीजींच्या राज्यात शेतकरी चिंतेत आणि उद्योगपती मजेत - राहुल गांधी
उद्योगपतींचं साडेपाच लाख कोटींचं कर्ज माफ झालं. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का? मोदी, शहा मूळ प्रश्नांवरून जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीसाठी औसामधील पहिल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी जोरदार भाषण करत महाराष्ट्रातील काँग्रेसमधील मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात काँग्रेसची पाळमुळं रुजली आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या विषयांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपचा काश्मीर केंद्रित प्रचार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात आज पहिली सभा झाली आहे. जळगाव तसंच भंडारा जिल्ह्यातील नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात साकोली विधानसभेत मोदींच्या पहिल्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून विरोधकांवर जोरदार टीका करण्यात आली. तर यावेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात काम करणाऱ्यांना निवडून द्या असं आवाहनही मोदींनी यावेळी जनतेला केलं. दरम्यान, याहीवेळेस मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस-मोदी काश्मीरवर भाषण ठोकत आहेत आणि बाजूच्या गावात शेतकऱ्याची आत्महत्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आज बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा वरवट बकाल व खामगाव येथे आयोजित केली आहे. या सभेपूर्वी शेगाव तालुक्यातील खातखेड येथील राजू नामदेव तलवारे या युवकाने पुन्हा आणूया आपले सरकार हे टी-शर्ट घालून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीस आली. जळगाव जामोद तालुक्यातील वरवट बकाल येथे काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होत आहे. यापूर्वीच खातखेड येथील या युवकाने आत्महत्या केली.
5 वर्षांपूर्वी -
आम्ही काही नटरंग नाही, त्यामुळे आम्ही हातवारे करत नाही: फडणवीसांचं पवारांना उत्तर
लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही असं उत्तर देत आणि आक्षेपार्ह हातवारे करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बार्शी या ठिकाणी झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. पवारांच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. मुख्यमंत्री म्हणाले,”आम्ही नटरंगसारखं काम केलं नाही, आम्हाला हातवारे करता येत नाही. उत्तर आम्हालाही देता येईल, पण आम्ही देणार नाही,” असं सांगत फडणवीस यांनी पवारांना टोला लगावला.
5 वर्षांपूर्वी -
सत्ताधाऱ्यांच्या भाषणातून बेरोजगारी, मंदी, महागाई आणि शेतकरी आत्महत्या मुद्दे गायब
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात आज पहिली सभा झाली आहे. जळगाव तसंच भंडारा जिल्ह्यातील नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात साकोली विधानसभेत मोदींच्या पहिल्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून विरोधकांवर जोरदार टीका करण्यात आली. तर यावेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात काम करणाऱ्यांना निवडून द्या असं आवाहनही मोदींनी यावेळी जनतेला केलं. दरम्यान, याहीवेळेस मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच देखील कलम ३७०चं तुणतुणं; बेरोजगारी, मंदी, महागाई, शेतकरी आत्महत्यांवर चिडीचूप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात आज पहिली सभा झाली आहे. जळगाव तसंच भंडारा जिल्ह्यातील नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात साकोली विधानसभेत मोदींच्या पहिल्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून विरोधकांवर जोरदार टीका करण्यात आली. तर यावेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात काम करणाऱ्यांना निवडून द्या असं आवाहनही मोदींनी यावेळी जनतेला केलं. दरम्यान, याहीवेळेस मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली.
5 वर्षांपूर्वी -
१० रु. थाळी मग राज्य विचारतं आहे, झुणका भाकर आणि शिववड्याचं काय झालं? अमोल कोल्हे
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून लोकांना १० रुपयात सकस जेवण देऊ असं वचननाम्यात जाहीर करण्यात आलं आहे. त्यावरुन विरोधकांनी शिवसेनेवर टीका सुरु केली आहे. १० रुपये थाळी देणार असं शिवसेना म्हणते मग १२ कोटी महाराष्ट्राचं विचारतो, झुणका भाकरचं काय झालं? शिववडा त्याचं काय झालं? तरीही म्हणत असतील तर गेल्या 5 वर्षात तुम्ही काय केलं? याची उत्तर द्या असं राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: सेनेच्या वचननाम्यातील विजेच्या मुद्द्यावरून मतदाराला २००९ पासून टोप्या; २०१४मध्ये सत्तेत तरी तेच
“वचननाम्यात वचनं विचार करून देण्यात आली आहे. शिवसेना जे बोलते ते करते. राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल याचा विचार करूनच हा वचननामा तयार करण्यात आला आहे. १० रूपयांमध्ये अन्न देण्याचा घेतलेल्या निर्णयात आम्ही बचतगटांची मदत घेणार आहोत. तिजोरीवर कितीवर भार पडेल हा विचार करून आम्ही जेवण १० रूपयांनी देण्याचा निर्णय घेतला आहे. समतोल ढळणार नाही याचा विचार करून वचननामा तयार केला आहे. यातलं एकही मत खोटं ठरणारं नाही,” असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई यांच्या उपस्थिती आज हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेच्या या वचननाम्यात आश्वासनांची खैरात वाटण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाकाला; पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला
राज्यात सत्ता आल्यावर अवघ्या दहा रुपयांमध्ये भरपेट जेवण देऊ, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टोला लगावला आहे. तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असा खोचक सवाल त्यांनी विचारला. ते शनिवारी बार्शी येथील प्रचारसभेत बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
१ रुपयात झुणका भाकर योजनेचे तीनतेरा; आता १० रुपयात 'जेवण थाळी'
एप्रिल २०१५ मध्ये मुंबईतील झुणका भाकर केंद्र तोडण्याच्या नोटिसा महापालिकेने बजावल्या होत्या. ही केंद्रे गोरगरीब जनतेला स्वस्त जेवण पुरवणारी असून, अनेकांना रोजगार देणारी होती. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली होती.
5 वर्षांपूर्वी -
दुष्काळी जतमध्ये अमित शहांकडून काश्मीरच्या ३७० कलमाचा प्रचार
देशाचे गृहमंत्री अमित शहांनी जतपासून राजकीय प्रचाराची सुरुवात आज केली. आजच्या प्रचारसभेत अमित शहा म्हणाले की, विलास जगतापना विजयी करा असे आवाहन करण्यासाठी मी आलो आहे. सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जतवासियांपुढे अमित शहांनी सर्जिकल स्ट्राईक, कलम ३७०, राष्ट्रहित यावरच भर देत पुढे प्रत्येक नेता देतो तशी आश्वासन देत म्हणाले की, टेंभू म्हैसाळ सिंचन योजनेला निधी दिला. कर्जमाफी, शौचालय, वीज पुरवठा, प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या खात्यात थेट सात हजार रुपये दिले. त्यानंतर अमित शहांनी विविध योजनांसाठी दिलेल्या निधींची आंकडेवारी सांगत भाषण संपविले.
5 वर्षांपूर्वी -
पाऊस लांबला! रस्त्यावर सभा घेण्याची संमती द्या, मनसेचं निवडणूक आयोगाला पत्र
पुण्यात परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे. मैदानांवर अगदी चिखलाचं साम्राज्य तयार झालं आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांच्या प्रचारात अडचण तयार झाली आहे. पुण्यातील मुसळधार पावसाने राज ठाकरेंची बुधवारी (9 ऑक्टोबर) होणारी पहिला प्रचारसभा देखील रद्द करावी लागली. त्यामुळे अखेर मनसेनं निवडणूक आयोगाकडं रस्त्यावर सभा घेऊ द्या, अशी मागणी केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबत मनसेची भूमिका स्पष्ट केली.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या मागे जाणारे मतदारच नालायक: प्रकाश आंबेडकर
भारतीय जनता पक्षाच्या मागे जाणाऱ्या मतदारांना नालायक नाही तर काय म्हणायचे, असे खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते बुधवारी अकोला क्रिकेट मैदानावर भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मतदान करणाऱ्या नागरिकांविषयी संताप व्यक्त केला. मतदार नालायक वागतो म्हणून शासन बेफाम वागते, असे त्यांनी म्हटले.
5 वर्षांपूर्वी -
लोकसभेत भावनिक मुद्यांवरून मतदाराला मूर्ख बनवणारे राजकारणी आता कलम ३७० घेऊन सज्ज
अमित शहांच्या बीडमधील पहिल्या भाषणातील मुख्य रोख हा काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या मुद्द्यावर होता. तसेच भाषणात त्यांनी मराठवाडा आणि बीडमधील महत्वाच्या विषयांना आणि सामान्य मतदाराच्या दैनंदिन आयुष्यातील मुख्य मुद्यांना पूर्णपणे बगल दिल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे भाजपने संपूर्ण मराठवाड्यात आणि बीडमध्ये सत्ताकाळात नेमका काय विकास केला यावर चकार शब्द न काढता, काश्मीर, भगवान बाबा आणि भारत माता की जय अशा घोषणा देत केवळ भावनिक वातावरण निर्मिती करण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसत होते.
5 वर्षांपूर्वी -
बेरोजगारांना संधी कशी देता येईल याच्यासाठी शिवसेना काम करत आहे: उद्धव ठाकरे
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एकाच व्यासपीठावर दिसतील, अशी भविष्यवाणी सुशीलकुमार शिंदे यांनी केली होती. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे. ‘शिंदे म्हणाले की दोन्ही काँग्रेस पक्ष थकले आहेत, कदाचित खाऊन-खाऊन थकले असतील, अशी मिश्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. संगमनेरमध्ये भाजप-शिवसेनेच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
सेना-भाजपाला तब्बल ३० जागांवर बंडखोरांचा फटका बसण्याची शक्यता
राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी मैदानात उतरलेल्या शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीची बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली आहे. राज्यातील एकूण ३० विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांनी बंडखोरी केल्याने या तीसही जागांवर महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत बंड शमवण्यात महायुतीला यश आले नाही. काही नेत्यांनी आपली तलवार म्यान केली. मात्र, काही नेत्यांनी बंडाचा झेंडा उचलला. या बंडखोरीमुळे शिवसेना-भारतीय जनता पक्षाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो, भाजपला दारात सुद्धा उभं करू नका: शरद पवारांचं आवाहन
भाजप सरकारला शेतीबाबत आस्था नाही. यांच्या राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली की यांनी कांदा निर्यातबंदी करून टाकली. या सरकारनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. त्यांना मतदानासाठी दारातही उभे करू नका,’ असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांना केलं.
5 वर्षांपूर्वी -
बीडच्या समस्या राहिल्या दूर; घरोघरी जाऊन कलम ३७०बद्दल सांगण्याची शहांची अजब सूचना
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाजपने मराठवाड्यातील परळी मतदारसंघातून केला आहे. परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. त्यानिमित्त आज दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह परळीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले.
5 वर्षांपूर्वी -
शहांकडून 'बोला भारत माता की जय' आडून बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या विषयांना बगल
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाजपने मराठवाड्यातील परळी मतदारसंघातून केला आहे. परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. त्यानिमित्त आज दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह परळीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र विधानसभा: अमित शहांचा अजब प्रचार; सभा बीड'मध्ये आणि तुणतुणं काश्मीरचं
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाजपने मराठवाड्यातील परळी मतदारसंघातून केला आहे. परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. त्यानिमित्त आज दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह परळीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा