महत्वाच्या बातम्या
-
शिखर बँकेत भाजपचे संचालक आहेत हे भाजपने जनतेपासून का लपवलं: अजित पवार
राज्य सहकारी बँके प्रकरणांत शरद पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव नाहक गोवण्यात आले. महत्वाच्या पदांवर शरद पवारांमुळे मी पोहचलो होतो. माझ्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पाहून अस्वस्थ झालो. त्यातून राजीनामा दिला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार भावूक झाले.
6 वर्षांपूर्वी -
येवले चहावरील कारवाई; मनसे मराठी उद्योजकांच्या पाठिशी खंबीरपणे उभी
पुण्यातील प्रसिद्ध येवले चहाच्या चहा पावडर आणि चहा मसाल्याच्या उत्पादनावर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली असून, अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ही कारवाई केली आहे. येवलेंच्या चहा पावडर, टी-मसाला आणि साखरेच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे माहितीपर लेबल नसल्याचे आढळले. तसेच, अन्य काही त्रुटीही आढळल्याने ही कारवाई करण्यात आली असून, सहा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.
6 वर्षांपूर्वी -
माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ: शरद पवार
माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रचंड खळबळ उडवली. त्यांचा मोबाइल ‘स्विच्ड ऑफ’ असल्याने गूढ वाढले आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका साखर कारखाना स्थळी असल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले.
6 वर्षांपूर्वी -
केंद्राला सरकारी नोकरीत मराठी तरुण नको असल्याने हिंदीची सक्ती; खपवून घेणार नाही: नांदगावकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा त्यांचा मराठी बाणा दाखवला आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी एलआयसी भरती परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हिंदीची सक्ती करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तीव्र विरोध केला आहे. ‘इतरांची भाषा, संस्कृती डावलण्याचा उत्तर भारतीयांचा डाव आहे. पण महाराष्ट्रात आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. त्यानंतरही महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिकांची भरती झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे होतील,’ असा गर्भित इशारा मनसेनं केंद्र सरकारला दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुणेकरांनी चंद्रकांत पाटलांवर रोष व्यक्त करताच पालकमंत्र्यांनी काढता पाय घेतला
अरणेश्वर येथील टांगेवाले वसाहत येथे संतप्त नागरिकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेधाच्या घोषणा देत ते केवळ या ठिकाणी फोटो काढण्यासाठी आले आहेत, असा आरोप केला. टांगेवाले वसाहत येथे आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे भिंत पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
‘तेल लावलेला पैलवान’ हाताला लागलाच नाही; राज यांचं ते भाषण आज खरं ठरलं
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार होते. मात्र, चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच होती. या सगळ्या घडामोडींमुळं मुंबईत तणावाची परिस्थिती होती.
6 वर्षांपूर्वी -
सहकारी-विरोधक एकवटले? आम्हाला साथ देणाऱ्या सर्व पक्षांचे आभार मानतो: शरद पवार
बँक घोटाळ्याच्या प्रकरणात चौकशीसाठी स्वत:हून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तूर्त रद्द केला आहे. मुंबई व महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे, असं खुद्द पवार यांनी आज स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब : शरद पवार
बँक घोटाळ्याच्या प्रकरणात चौकशीसाठी स्वत:हून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तूर्त रद्द केला आहे. मुंबई व महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे, असं खुद्द पवार यांनी आज स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
ईडीच्या कार्यालयात न जाण्याची पोलीस आयुक्तांची विनंती
ईडीच्या ईमेलनंतरही शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयाला भेट देण्याचा पवित्रा घएतसा आगे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी पुन्हा एकदा त्यांची भेट घेण्यास त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. सकाळपासून दुसऱ्यांदा पोलीस त्यांच्या घरी त्यांची समजूत घालण्यासाठी पोहोचले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ईडी चौकशी: युतीच्या यात्रांची चर्चा संपली; ग्रामीण भागात पवारांची चर्चा आणि भावनिक किनार: सविस्तर
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार आहेत. मात्र, चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. या सगळ्या घडामोडींमुळं मुंबईत तणावाची परिस्थिती आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज शरद पवार ईडी कार्यालयात; परिसरात मोठ्या पोलीस बंदोबस्तासह कलम १४४ लागू
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार आहेत. मात्र, चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. या सगळ्या घडामोडींमुळं मुंबईत तणावाची परिस्थिती आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिखर बँक: अण्णा हजारेंकडून शरद पवारांना क्लीन चीट
शिखर सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजपा-शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांचा समावेश आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी यांनी सदर विषयाला अनुसरून शरद पवारांना क्लीन चिट दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
PMC बँक: बँकेचं संचालक मंडळ आणि त्याचं भाजप कनेक्शन समोर आलं
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. २३ सप्टेंबर पासून हे निर्बंध लागू झाले. बँकेची सद्यस्थिती पाहून नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणल्याचं रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात नमूद केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
आधी पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या; जागावाटप बाजूला राहू द्या: छगन भुजबळ
मागील ३ दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी रात्री शहरात झालेल्या पावसाने उच्चांक गाठला. रात्री 8 च्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. शहरातील सर्वच भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरात अतिवृष्टी होत असल्याने तसेच आपत्कालीन परिस्तिथी निर्माण झाली असल्याने पुणे जिह्यातील 5 तालुक्यांच्या शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
युतीचा निर्णय काही असो; तिकीट कापलं जाण्याच्या भीतीने सेना-भाजप इच्छुक मनसेच्या संपर्कात
एकेकाळी राज्यात शिवसेना मोठा भाऊ होता. त्यामुळे १७०-१८०च्या घरात जागा शिवसेना लढवत होती. आता मात्र, चित्र बरोबर उलट झाल्यामुळे शिवसेनेला अपेक्षित असलेल्या जागा भाजप सोडायला तयार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जागांवरून चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, तरीदेखील त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप शिवसेनेला १२३ जागा सोडायला तयार आहे, मात्र शिवसेनेला त्याहून जास्त जागा हव्या आहेत. त्यामुळे ही दिरंगाई होत असून आज १२ वाजता अमित शहांसोबत मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या बैठकीमध्ये यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: शिवसेनेच्या या मंत्र्यांचा सांगली पदाधिकारी मेळाव्यात पुन्हा स्वबळाचा नारा
युतीचे गाडे अडलेले असतानाच, बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे बुधवारी नवी मुंबईत एकत्र आले होते. यामध्ये दोघांनीही ‘पुढील सरकार युतीचेच’ असा विश्वास व्यक्त केल्याने युतीचे संकेत मिळत आहेत. जागांचा तिढा सोडवण्यासाठी बुधवारी रात्री मुख्यमंत्री व उद्धव यांची भेट निश्चित झाली होती. त्यानंतरच मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीतील नेत्यांची भेट घेण्यासाठी रवाना होणार आहेत. ‘बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर येऊ शकतात अथवा उद्धव ठाकरे ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू शकतात’, अशी माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने प्रसार माध्यमांना दिली होती.
6 वर्षांपूर्वी -
घोटाळा २५ हजार कोटींचा मग बँकेचा नफा ३०० कोटींपर्यंत कसा? - अजित पवार
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) कर्जांचे वितरण करताना २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांसह ७० जणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी गुन्हा दाखल केला. या सर्वांवर पैशांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
दिल्लीच्या तख्तापुढं झुकणं आम्हाला माहित नाही', 'ईडी'चा पाहुणचार स्वीकारणार
शिखर बँक घोटाळाप्रकरणी ईडीनं माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. निवडणूक प्रचारासाठी मुंबईच्या बाहेर असेल, त्यामुळं मी स्वतः २७ सप्टेंबरला मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर होईल. त्यांचा पाहुणचार स्वीकारण्याची तयारी आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं.
6 वर्षांपूर्वी -
पुणे: राष्ट्रवादीची पोलीस चौकीसमोरच 'देवेंद्र-नरेंद्र चोर है' घोषणाबाजी
महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांसह एकूण ७० नेत्यांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. ईडीने केलेल्या कारवाईविरोधात बारामतीकरांनी बारामती बंदची हाक दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
PMC बँक: महाराष्ट्र सैनिकांचे रम्यालाच डोस; आम्ही बुवा ऍक्सिस बँकेत ठेवतो; वाहिनीसाहेब आहेत ना
महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे समजताच भारतीय जनता पक्षाच्या रम्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भयंकर चिंता सतावत असल्याचं दिसत आहे. राज्यात आणि देशात महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांनी तोंड वर काढलेलं असताना रम्या सरकारला डोस देण्याऐवजी राज ठाकरे यांच्या नावाचाच जाप करत असल्याचं दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS