महत्वाच्या बातम्या
-
राज्यातील सर्व प्रश्न संपले; भाजपसारखा आत्मविश्वास कोणाकडेच नाही: उद्धव ठाकरेंचा टोला
‘राज्यात पूर्ण बहुमतानं भाजपचंच सरकार येणार, हे भाजपाध्यक्ष अमित शहा यांचं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलंच खटकलं आहे. शहांच्या या वक्तव्याचा उद्धव यांनी अप्रत्यक्षपणे समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका ही केवळ औपचारिकताच उरली आहे. लोकांनी फक्त बटण दाबायचे आहे, दुसरे काय?,’ असं उद्धव यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
वृत्त वाहिन्यांवरील ओपिनियन पोल विरुद्ध मतदाराचा रोष का वाढतो आहे? सविस्तर
लोकसभा निवडणुकीपूर्वी कोब्रा पोस्टने ‘ऑपरेशन १३६’ राबवून अनेक टीव्ही वृत्तवाहिन्यांची ऑन रेकॉर्ड पोलोखोल केल्याचं प्रकरण जास्त जुनं नाही. प्रख्यात वृत्तवाहिन्या देखील कसे भरमसाठ पैसे घेऊन सत्ताधाऱ्यांसाठी पोषक आणि विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवण्यासाठी निरनिराळ्या विषयातून अभियानं राबवतात ते उघड केलं होतं. दरम्यान, मागील काही वर्षांपासून ओपिनियन पोलने देखील लोकशाहीला घातक असा प्रकार सुरु केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात बहुमताने भाजप सरकार येणार: अमित शाह
भाजप-शिवसेना युतीवर भाष्य करणे टाळत, ‘राज्यात पूर्ण बहुमताने पुन्हा भारतीय जनता पक्षाचेच सरकार येणार’, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार नसल्याचे संकेत दिले. या बरोबरच ‘देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील’, अशी घोषणा करत शहा यांनी पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित सभेद्वारे शहा यांनी राज्यातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यावेळी त्यांनी कलम ३७० वर पक्ष आणि केंद्र सरकारची भूमिका मांडली.
5 वर्षांपूर्वी -
राणे म्हणतात वाघाची शेळी-मेंढी झाली; तर धनंजय मुंडे म्हणतात ही कुत्र्यासारखी अवस्था
विधानसभा निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राजकीत आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झडताना दिसत आहे. आता तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. राजकारणात शिवसेनेची अवस्था ही कुत्र्या सारखी झाली आहे, एक गोष्ट सांगून धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मतदान आणि मतमोजणीत ३ दिवसांचं अंतर गडबड करण्यासाठी का? भुजबळ
शनिवारी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. एकिकडे निवडणूक आयोगाच्या वतीने या महत्त्वाच्या घोषणा केल्या जात असतानाच देशातील राजकीय पटलावर मोठ्या हालचाली आणि प्रतिक्रियांची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं.
5 वर्षांपूर्वी -
व्यंगचित्र: भाजपकडून पुन्हा राज यांना डिवचण्याचा प्रयत्न; प्रचाराआधी मनसेचीच धास्ती?
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपाची प्रचारात चांगलीच दमछाक केल्याचं पाहायला मिळालं. प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी असणारे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका घेणार त्यावरून भाजपात आधीच धाकधूक वाढल्याचं हे लक्षण म्हणावं लागेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाची व्यंगचित्रकार टीमचं बनवून रोज राज ठाकरे यांना लक्ष करण्याचा सपाटा लावला होता.
5 वर्षांपूर्वी -
आमदारांची कुंडली २०१४: तुमच्या मतदारसंघातील आमदाराची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
२०१४ मध्ये झालेली विधानसभा निवडणुक राज्यातील राजकारणात एक ऐतिहासिक घटना होती. भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे सर्वच सहकारी पक्ष युती आघाड्या विसरून स्वबळावर निवडणूक लढले होते. त्यात तब्बल २५ वर्षं टिकलेली भाजप शिवसेना युती त्या निवडणुकीआधी तुटली होती.
5 वर्षांपूर्वी -
उदयनराजेंना धक्का! देशभरातील ६४ मतदारसंघात पोटनिवडणूक; साताऱ्याबाबत घोषणा नाही
महाराष्ट्र, हरयाणातील विधानसभा निवडणुकांसह देशभरातील ६४ मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. यासाठीदेखील २१ ऑक्टोबर रोजी मतदान घेतले जाईल आणि २४ ऑक्टोबर रोजी मतदान होईल. भाजपात प्रवेश करताना उदयनराजे भोसले यांनी काही अटी ठेवल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानुसार लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभेसोबत घेण्यात यावी अशीही अट होती.
5 वर्षांपूर्वी -
निवडणुकांच बिगुल वाजलं, महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला निकाल
संपूर्ण देशाला उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा अखेर झाली आहे. त्यानुसार महाराष्ट्र आणि हरयाणा दोन्ही विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ ऑक्टोबर (गुरूवार) रोजी जाहीर होणार असून दिवाळीपूर्वी नवं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! फडणवीस सरकारच्या काळात राज्यात जातीय तणाव वाढला: पोलीस खात्याचा अहवाल
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जातीय तणावाचा धक्कादायक अहवाल पोलीसांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे फडणवीस सरकारची गोची झाल्याचं म्हटलं जातं आहे आणि विशेष म्हणजे स्वतः फडणवीस यांच्याकडेच गृहखातं असल्यामुळे अडचणीत अधिकच भर पडली आहे. दरम्यान पोलिसांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या अहवालात फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील जातीय तणाव वाढलं असल्याच समोर आलं आहे. त्यानुसार हिंदु-मुस्लिम तणावाची जागा मागील ५ वर्षात सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणावाने घेतली असल्याचं दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
मी देखील संरक्षणमंत्री होतो; पाकिस्तान-चीन काय आहेत हे मला ही माहिती आहे: शरद पवार
पाकिस्तानातील सत्ताधारी आणि लष्करी अधिकारी स्वपक्षाकडे सत्ता राहावी म्हणून भारताविरुद्ध बोलत असतात, हे माझे वक्तव्य पाकिस्तानची स्तुती करणारे आहे काय, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करण्यापूर्वी अधिक माहिती घेतली असती तर बरे झाले असते, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांना शुक्रवारी दिले.
5 वर्षांपूर्वी -
सीमेवर पुलवामासारखं काही घडलं नाही तर राज्यात सत्तांतर निश्चित होईल: शरद पवार
पाकिस्तानातील सत्ताधारी आणि लष्करी अधिकारी स्वपक्षाकडे सत्ता राहावी म्हणून भारताविरुद्ध बोलत असतात, हे माझे वक्तव्य पाकिस्तानची स्तुती करणारे आहे काय, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करण्यापूर्वी अधिक माहिती घेतली असती तर बरे झाले असते, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांना शुक्रवारी दिले.
5 वर्षांपूर्वी -
पलटी! मोदी म्हणत असतील तर आम्ही राम मंदिरासाठी थांबायला तयार: उद्धव ठाकरे
लोकसभेच्या वेळीच विधानसभेचा फॉर्म्युला ठरला असून लवकरात लवकर तो जाहीर करु अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. शिवेसना भवनात नेत्यांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. १३५-१३५ चा फॉर्म्युला मीडियानेच पसरवला असल्याचंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं. तसंच लवकरात लवकर आपण उमेदवारांची घोषणा करु असंही त्यांनी सांगितलं आहे. यावेळी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव म्हणाले युतीचा फॉर्मुला लोकसभेलाच ठरला; चंद्रकांत दादा म्हणतात कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही
युतीचा फॉर्मुला लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळीच ठरलेला आहे. युतीमध्ये कुठलाही तिढा नाही. येत्या एक ते दोन दिवसांत युतीची घोषणा होईल,’ अशी माहिती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भाजपवर नाराज असलेले विदर्भातील शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
5 वर्षांपूर्वी -
मनसे शंभरच्या आसपास जागा लढणार; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला
महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी निवडणुकीत मनसे १०० जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विभाग प्रमुखांची आज ‘कृष्णकुंज’ इथे बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरेंनी नेत्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची मनसे नेत्यांसोबत राजगडवर बैठक; त्यानंतर विभागाध्यक्षांशी; लवकरच निर्णय जाहीर होणार?
निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक तारखांची घोषणा करणार आहे. निवडणूक तोंडावर असतानाच राज ठाकरे यांची मनसे मात्र ही निवडणूक लढवायची की नाही, याच संभ्रमात आहेत. मात्र आज बोलावण्यात आलेल्या बैठकीत मनसेचे पदाधिकारी निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
हिंदी-गुजराती मतांसाठी सेना झुकणार; भाजप देईल तेवढ्या जागा घेत युतीस तयार? सविस्तर
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक तारखांची लवकरच घोषणा होणार होणार आहे. त्याआधी शिवसेना-भाजपने जागावाटपाच्या नव्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केलेल्या चर्चेनंतर हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या फॉर्म्युल्याला हिरवा कंदील दाखवला, अशी माहिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींचा पाकिस्तान द्वेष मतांसाठी; नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कसा चालतो? - धनंजय मुंडे
नाशिमध्ये झालेल्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पाकिस्तानची स्तुती करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार हरकत घेतलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पवारांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढत असल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आधीच दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
५ वर्ष उद्योगमंत्री सेनेचेच; मग आदित्य यांनी बेरोजगारी कमी का केली नाही? डॉ. अमोल कोल्हे
मी पुन्हा मुख्यमंत्री होणार असे म्हणत जनादेश यात्रा काढणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिले आहेत. पाच वर्ष कामे केली असती तर हि वेळ आली नसती. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रदुषण मुख्य महाराष्ट्र करण्याची भाषा करत आहेत. मग पर्यावरण मंत्री रामदास कदम काय करत होते. पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेली १५ कामे दाखवा असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना भाजपवर निशाणा साधला. ते कर्जत येथे शिवस्वराज्य यात्रे दरम्यान आयोजीत सभेत बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
तेव्हा कांद्याचे भाव वाढल्याने भाजपवाले गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले होते: शरद पवार
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. नांदेडमध्ये शरद पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.याच पार्श्वभूमीवर यावेळी शरद पवार म्हणाले, ‘आमच्या काळात जगात सर्वाधिक कृषी मालाची निर्यात करणारा देश भारत झाला होता. मी कृषीमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले म्हणून भाजपवाले गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले होते. भाव वाढले म्हणजे शेतकऱ्याला फायदा होतो, म्हणून यांना पोटशूळ उठला होता, असे यावेळी शरद पवार म्हणाले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा