महत्वाच्या बातम्या
-
भाजपात जाणं धोक्याचं ठरू शकतं, राष्ट्रवादीतच राहण्याची कार्यकर्त्यांची उदयनराजेंना विनंती
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामध्ये नवा ट्विस्ट निर्माणा झाला आहे. भाजपमध्ये जायचं की राष्ट्रवादीत राहायचं, यासाठी उदयनराजेंनी आज पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर उदयनराजे यू-टर्न घेत राष्ट्रवादीतच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेससोबत आघाडी करणार नाही; विधानसभा स्वबळावर: प्रकाश आंबेडकर
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत युती करणार नाही. काँग्रेससोबत चर्चेची दारे आता बंद झाली आहेत,’ असं ‘वंचित’चे नेते ऍडव्होकेट. प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केलं. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष दीपक महेश्वरींवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल; महिला शिववाहूक सेनेची सदस्य
शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष दीपक महेश्वरी यांच्यावर एका महिला सहकारी महिलेने लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक आरोप केला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आरसीएफ पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष दीपक महेश्वरी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असला तरी त्यांना अद्याप अटक झाली नसल्याचे वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई मेट्रो प्रकल्प शिळेवर मराठी डावलून हिंदीला स्थान; स्टॅच्यू ऑफ युनिटी बाबतीत? सविस्तर
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मोदी यांनी अनेक घोषणा केल्या. वांद्रे-कुर्ला संकुलातील कन्व्हेन्शन सेंटर येथील कार्यक्रमात मोदी यांनी गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो मार्ग १०, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो मार्ग ११ आणि कल्याण ते तळोजा मेट्रो मार्ग १२ या तीन नवीन मार्गाचे भूमिपूजन केले. या तीन नवीन मार्गामुळे मेट्रोच्या जाळ्यात ४२ किमीची वाढ होईल.
5 वर्षांपूर्वी -
गडकिल्ल्यांना हात लावाल तर परिणाम दिसतील: राज ठाकरे
राज्यातील गढ किल्यांवर खासगी विकसकांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळाडून ३ सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. त्यामुळे आता एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकते. यावर अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे माझे लहान भाऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या मुंबईत असून त्यांनी मुंबई मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगत कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत. यावेळी पंतप्रधानांनी स्वदेशी मेट्रो कोच आणि नव्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटनही केले. हा स्वदेशी मेट्रो कोच मेक इन इंडीया अंतर्गत बनवला आहे. पंतप्रधान मोदींनी मेट्रो रेल्वेचे व्हिजन डॉक्यूमेंटही सादर केले.
5 वर्षांपूर्वी -
मोदी यांच्या रूपाने देशाला नेता सापडला आहे: उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या मुंबईत असून त्यांनी मुंबई मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगत कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत. यावेळी पंतप्रधानांनी स्वदेशी मेट्रो कोच आणि नव्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटनही केले. हा स्वदेशी मेट्रो कोच मेक इन इंडीया अंतर्गत बनवला आहे. पंतप्रधान मोदींनी मेट्रो रेल्वेचे व्हिजन डॉक्यूमेंटही सादर केले.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा निवडणूक: मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो मार्ग आणि मेट्रो भवनाचे भूमिपूजन
महामुंबईचे संपर्कजाळे वाढविणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. यावेळी तीन नवीन मेट्रो मार्ग आणि मेट्रो भवनाचे भूमिपूजन तसेच पहिल्या कोचचे आणि बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटनदेखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
एमआयएम-वंचितमध्ये फूट, एमआयएम विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमध्ये अखेर फूट पडली असून एमआयएमकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना ही घोषणा केली. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी आमचा मान राखला नसल्याची खंत व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी -
खासदार सुप्रिया सुळे यांची यावर्षी देखील ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून निवड
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून निवड करण्यात आली आहे. सतराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून सुळेंची निवड करम्यात आली आहे. २०१९ मध्ये झालेल्या १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधून विजय मिळवला होता. संसदेच्या पहिल्या सत्रांमध्ये सुप्रिया सुळे यांनी ३४ चर्चासत्रात भाग घेतला. चार खासगी विधेयकं मांडली. १४७ प्रश्न उपस्थित केले आहेत. पहिल्या सत्रांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेतील उपस्थिती १०० टक्के राहिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जे औरंगजेबाला जमलं नाही ते महाराष्ट्र सरकारनं करून दाखवलं: डॉ. अमोल कोल्हे
राज्यातील सत्ताधारी कुठून पैसे कमावण्याची शक्कल लढवतील याची शास्वती देता येणार नाही. तसाच काहीसा धक्कादायक प्रकार हा भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने घेतलेल्या निर्णयातून पाहायला मिळत आहे. अनेक शिवप्रेमी संघटना रक्ताचं पाणी करत स्वतःच्या पैशातून आणि समाज सेवी संघटनांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्यांवर स्वच्छता मोहीम तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. सरकारला गडकिल्ल्यांचे संवर्धन’सारख्या विषयवार अजिबात गांभीर्य नाही असा इतिहास आहे.
5 वर्षांपूर्वी -
फक्त पैसा! शिवकालीन किल्ल्यांवर रिसॉर्ट व हेरिटेज हॉटेल्स, युती सरकारचा प्रताप
राज्यातील सत्ताधारी कुठून पैसे कमावण्याची शक्कल लढवतील याची शास्वती देता येणार नाही. तसाच काहीसा धक्कादायक प्रकार हा भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने घेतलेल्या निर्णयातून पाहायला मिळत आहे. अनेक शिवप्रेमी संघटना रक्ताचं पाणी करत स्वतःच्या पैशातून आणि समाज सेवी संघटनांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्यांवर स्वच्छता मोहीम तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. सरकारला गडकिल्ल्यांचे संवर्धन’सारख्या विषयवार अजिबात गांभीर्य नाही असा इतिहास आहे.
5 वर्षांपूर्वी -
यू. पी. एस. मदान राज्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त
राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मदान यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. ज. स. सहारिया यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: बनावट नोटा प्रकरणातील आरोपी छबू नागरेचा शिवसेनेत प्रवेश
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांचा त्यात सर्वात मोठा समावेश आहे. दिग्गज नेत्यांना थेट मातोश्री आणि वर्षा निवासवर प्रवेश दिले जाती आहेत. त्यात अनेक ठिकाणी कोणतीही तत्व आणि पार्श्वभूमी न पाहता केवळ निवडणूक जिंकायच्याच या उद्देशाने प्रवेश देणं सुरु आहे.
5 वर्षांपूर्वी -
मित्रपक्ष: भाजपने मेटेंचं राजकीय अस्तित्व संपवलं; चौथा समर्थक जिल्हा परिषद सदस्य सुद्धा भाजपात
बीड जिल्ह्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्यातील सख्य संपूर्ण राज्याला माहित आहे. जिल्हा परिषदेतील कारभाराच्या तक्रारींवरुन मेटेंनी मुख्यमंत्र्यांचे दार ठोठावले आणि पुन्हा मेटे-मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाला. आता हाच राजकीय दुरावा बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा पुढचा अंक ठरवणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसेत संभ्रम वाढला; औरंगाबाद मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण वंचित आघाडीच्या वाटेवर
मागील लोकसभा निवडणुकीत शेवटपर्यंत लोकसभा निवडणूक लढविणार की नाही याचा पदाधिकाऱ्यांना सुगावा लागला नव्हता आणि कार्यकर्ते व पदाधिकारी तयारीला लागलेले असताना अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचं जाहीर केलं. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यात देखील पक्षाध्यक्षांच्या निर्णयाला मान देत निर्णय मान्य केला आणि आदेशाप्रमाणे कामाला देखील लागले.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र पोलीस दलात मोठी भरती; मात्र पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार
महाराष्ट्रातील शहर आणि प्रत्येक गावामधून तरुण-तरुणी वाट पाहत महाराष्ट्र पोलीस दलातील मेगा भरतीची तारीख जाहीर झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी ही भरती होणार आहे. दरवर्षी या पोलीस भरतीसाठी प्रत्येक गावातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. सध्या शहरांपासून ते गावांपर्यंत खाजगी नोकऱ्यांची भीषण परिस्थिती असल्याने या भरतीसाठी सर्वचजण तुटून पडणार असल्यास बोललं जातं आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवारांच्या राजकारण आणि समाजकारणास मोदींनी मान्यता दिली आहे; उद्धव यांचा अमित शहांना टोला
महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचे योगदान आहेच व ते नाकारता येणार नाही. हे योगदान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत येऊन मान्य केले. पवार हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी हातचे न राखता अनेकदा सांगितले. त्यामुळे पवारांचे इतक्या वर्षांचे राजकारण, समाजकारणास मोदी यांनी मान्यता दिली आहे असं सांगत शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना टोला लगावला आहे. सोलापूरच्या महाजनादेश सभेत बोलताना अमित शहा यांनी पवारांवर टीका करत ५० वर्षात त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा प्रश्न विचारला होता. त्यावर शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
रोहित पवार यांनी अमित शहांना विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत: उद्धव ठाकरे
महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचे योगदान आहेच व ते नाकारता येणार नाही. हे योगदान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत येऊन मान्य केले. पवार हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी हातचे न राखता अनेकदा सांगितले. त्यामुळे पवारांचे इतक्या वर्षांचे राजकारण, समाजकारणास मोदी यांनी मान्यता दिली आहे असं सांगत शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना टोला लगावला आहे. सोलापूरच्या महाजनादेश सभेत बोलताना अमित शहा यांनी पवारांवर टीका करत ५० वर्षात त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा प्रश्न विचारला होता. त्यावर शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
समाज माध्यमांवरील ९० टक्के प्रतिक्रिया भाजपविरोधात; तरी अंतर्गत सर्व्हेत २२९ जागा ही रणनीती? सविस्तर
लोकसभा निवडणुकीत विराट विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतही बाजी मारण्यासाठी भाजप-शिवसेना युतीचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय वर्तुळातील काही घडामोडींमुळे युती होणार की नाही, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र असं असलं तरीही विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत महायुती करून लढल्यास किती जागा मिळतील, याचा सर्व्हेदेखील भाजपने केला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा