महत्वाच्या बातम्या
-
भाजपा पेक्षा शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांची कामगिरी चांगली: प्रजा फाउंडेशन अहवाल
राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रासंदर्भात काम करणाऱ्या मुंबईतल्या प्रजा फाउंडेशन मुंबईमधील आमदारांच्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे. प्रजाने केलेल्या सर्वेक्षणामधून समोर आलेल्या अहवालामध्ये मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांपेक्षा शिवसेनेच्या आमदारांची कामगिरी सरस असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे पहिल्या ३ आमदारांच्या यादीत भारतीय जनता पक्षाच्या एकाही आमदाराच्या नावाचा समावेश नाही. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे हे सर्वोत्तम कामगिरी करणारे आमदार असल्याचे प्रजाने आपल्या अहवालात म्हटले आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मुंबादेवी मतदारसंघाचे काँग्रेसचे अमीन अमीर अली पटेल असून तिसऱ्या स्थानी मालाडचे आमदार अस्लम रमझान अली शेख यांचा समावेश प्रजाने आपल्या अहवालात केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राणेंचा भाजपप्रवेश हे युती 'न' होण्याचं निमित्त ठरणार?
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. दरम्यान, मागील राज्यसभा निवडणुकीच्या वेळी नारायण राणे जर भाजपमध्ये गेले तर युती अवघड असल्याचा सांगणारी शिवसेना नेमका कोणता निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र पोलीस मेगा भरती; ३ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज; गावागावातून रेकॉर्डब्रेक अर्ज येण्याची शक्यता
महाराष्ट्रातील शहर आणि प्रत्येक गावामधून तरुण-तरुणी वाट पाहत महाराष्ट्र पोलीस दलातील मेगा भरतीची तारीख जाहीर झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी ही भरती होणार आहे. दरवर्षी या पोलीस भरतीसाठी प्रत्येक गावातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. सध्या शहरांपासून ते गावांपर्यंत खाजगी नोकऱ्यांची भीषण परिस्थिती असल्याने या भरतीसाठी सर्वचजण तुटून पडणार असल्यास बोललं जातं आहे.
5 वर्षांपूर्वी -
नेत्यांचं खाणं-पिणं उत्तम सुरु; पण कुपोषणामुळे २ वर्षांत तब्बल ३५ हजार बालमृत्यू
कुपोषणमुक्तीसाठी सरकारच्या सर्व यंत्रणा संयुक्तरित्या प्रयत्न करत असून आता ही समस्या नियंत्रणात आल्याचा दावा सातत्याने सरकार करत असली तरीही तो दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. जानेवारी २०१७ ते मार्च २०१९ या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये शून्य ते ५ वर्षे वयोगटातील ३५ हजार १८७ बालमृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यात शून्य ते एक वर्ष वयोगटातील २७ हजार ०९४ तर १ ते पाच वयोगटातील ८ हजार ०९३ मुलांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसने आम्हाला १४४ जागा आणि मुख्यमंत्रिपद द्यावं: प्रकाश आंबेडकर
राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर येवून ठेपल्या आहेत. वेगवेगळ्या पक्षाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज अकोल्यात ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषेद घेतली. या पत्रकार परिषेद ते बोलताना म्हणाले, विधानसभा निवडणुकीत १४४ जागा आणि मुख्यमंत्रिपद द्यावे, असा प्रस्ताव वंचित बहूजन आघाडीने काँग्रेसला दिला आहे. निर्णयासाठी वंचितने ऑगस्ट अखेरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे असे ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
आमच्याकडील गुजरातच्या निरमा पावडरने आम्ही नेत्यांना पक्षात घेताना धुवून घेतो: दानवे
भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना डागाळलेले नेते कसे चालतात. त्यांना कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जाते, असा प्रश्न एनसीपी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाला केला होता. सुळे यांच्या आरोपाला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले आहे. आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे. नेत्यांना पक्षात घेताना या पावडरने धुवून घेतो, असे दानवे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आणि भाजप पसरवत असलेला EVM चा अर्थ वेगवेगळा कसा?
ईव्हीएम मशीनवरील आक्षेपावरून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सुनावले आहे . २००४ ते २०१४ दहा वर्ष राज्यात पार्लमेंट ते पंचायत तुमची सत्ता होती. तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? बारामतीत सुप्रिया सुळे निवडूण आल्या, तिथे ईव्हीएम चांगले आणि जालन्यात रावसाहेब दानवे विजयी झाले तर तिथे ईव्हीएम खराब कसे? असा सवाल करतांनाच ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असा आहे आणि तो जनतेने ठरवला आहे असे फडणवीस यांनी ठणकावले. दरम्यान, ईव्हीएम बाबत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलताना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असाच केला होता हा योगायोग.
5 वर्षांपूर्वी -
योगी आदित्यनाथांनंतर फडणवीसांचं विधान; ईव्हीएमचा अर्थ 'एव्हरी वोट फॉर मोदी'
ईव्हीएम मशीनवरील आक्षेपावरून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सुनावले आहे . २००४ ते २०१४ दहा वर्ष राज्यात पार्लमेंट ते पंचायत तुमची सत्ता होती. तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? बारामतीत सुप्रिया सुळे निवडूण आल्या, तिथे ईव्हीएम चांगले आणि जालन्यात रावसाहेब दानवे विजयी झाले तर तिथे ईव्हीएम खराब कसे? असा सवाल करतांनाच ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असा आहे आणि तो जनतेने ठरवला आहे असे फडणवीस यांनी ठणकावले. दरम्यान, ईव्हीएम बाबत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलताना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असाच केला होता हा योगायोग.
5 वर्षांपूर्वी -
२००४ ते २०१४ दहा वर्ष तुमची सत्ता होती; तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? फडणवीस
ईव्हीएम मशीनवरील आक्षेपावरून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सुनावले आहे . २००४ ते २०१४ दहा वर्ष राज्यात पार्लमेंट ते पंचायत तुमची सत्ता होती. तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? बारामतीत सुप्रिया सुळे निवडूण आल्या, तिथे ईव्हीएम चांगले आणि जालन्यात रावसाहेब दानवे विजयी झाले तर तिथे ईव्हीएम खराब कसे? असा सवाल करतांनाच ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असा आहे आणि तो जनतेने ठरवला आहे असे फडणवीस यांनी ठणकावले.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचं सेनेविरुद्ध षढयंत्र; १२३ मतदारसंघ वगळता उर्वरित १६५ जागांवर उमेदवारांची यादी तयार
विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात शिवसेनेला जेमतेम १०० ते ११५ जागा देऊन इतर जागा भारतीय जनता पक्षाने आणि मित्रपक्षांच्या पदरात अलगद पडतील अशी रणनिती तर भाजपने आखली आहेच. शिवाय एवढ्या कमी जागा घ्यायला शिवसेना तयार न झाल्यास विधानसभेच्या सर्व जागा शिवसेनेशिवाय लढविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षांशी बोलणीही सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मित्रपक्षांना खूष करण्यासाठी त्यांना द्यावयाच्या काही जागांमध्ये ग्रामीण भागांबरोबरच मुंबईतील जागांचाही समावेश असल्याचे कळते.
5 वर्षांपूर्वी -
निवडणूक कर्जमुक्ती, पीक विमा, महिलांचे प्रश्न, दुष्काळमुक्त महाराष्ट्र मुद्यांवर लढणार: आदित्य ठाकरे
विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. युवा सेनाप्रमुख आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसैनिकांची भावना आहे. यावर सूचक मौन पाळत आदित्य मैदानात उतरले आहेत. आदित्य यांनी १८ जुलैपासून जळगावमधून जन आशीर्वाद यात्रा सुरू केली होती. या यात्रेद्वारे ते महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. सध्या या यात्रेचा तिसरा टप्पा सुरू असून ती नागपुरात पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
खरा हिंदू मी, हनुमान चालिसा, वेद-पुराण सर्व येतं; हिंदू आदित्य ठाकरेंना सांगा बोलायला
राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या राज्यभर शिवस्वराज्य यात्रा जोरदारपणे सुरु आहे. आमदार-खासदारांच्या फुटीकडे दुर्लक्ष करत पक्षाने संपूर्ण ग्रामीण भाग पिंजून काढला आहे. त्याचाच भाग म्हणजे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा इंदापूरमध्ये सुरु होती, त्याला स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यात विशेष गाजलं ते अमोल मिटकरी यांचं तडाखेबंद भाषण, ज्यामध्ये त्यांनी भाजप शिवसेनेची पिसं काढली.
5 वर्षांपूर्वी -
सत्ता असो वा नसो टीव्ही चॅनेलच्या हेडलाइन्समध्ये फक्त राष्ट्रवादी आणि मनसे: सुप्रिया सुळे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेअ अध्यक्ष राज ठाकरे यांची मागील महिन्यांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जवळीक वाढल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात न उतरता राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजप विरोधात आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला पोषक वातावरण त्यांच्या सभांमधून निर्माण केलं. मात्र त्याचा स्वतःला फायदा करून घेण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची टीम कमी पडली होती.
5 वर्षांपूर्वी -
हडपसर: जेटलींचा श्रद्धांजली कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचा फोटो रस्त्यावर पडून
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याचे अनेक कार्यक्रम देशभर भारतीय जनता पक्षाने आयोजित केले होते. त्यावेळी अनेक ठिकाणी सेल्फी तसेच पदाधिकारी आणि भाजप मंत्र्यांनी त्याच ठिकाणी हास्य विनोदाची जत्रा भरवल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी देखील अनेकांनी भाजपच्या त्या वागणुकीवर संताप व्यक्त केला होता.
5 वर्षांपूर्वी -
सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार? उद्धव ठाकरेंचा सवाल
संजय दत्त जानकरांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर शाहरुख खान, अक्षय कुमार हे रामदास आठवले यांच्या पक्षात प्रवेश करतील आणि सलमान खान वैगेरे मंडळी आंबेडकर-ओवेसींच्या वंचित आघाडीत प्रवेश करण्यासाठी अर्ज देतील. सगळाच विनोद आहे. विनोदाची टवाळी होऊ नये इतकेच. जानकर असेही म्हणाले की, त्यांचा पक्ष कमळ चिन्हावर लढणार नाही. ते सगळे ठीक असले तरी गेली 5 वर्षे त्यांच्या पक्षाचा भुंगा हा कमळ फुलाभोवती पिंगा घालत आहे. मात्र तरीही जानकर बोलले आता हा देखील सौम्य विनोद आहे असे कोणी समजू नये असा टोला शिवसेनेने महादेव जानकारांना लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे -सोलापूर रोडवर अपघात झाला. या अपघातात आनंद शिंदे थोडक्यात बचावले. यात आनंद शिंदे यांच्यासह ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे -सोलापूर रोडवरील वरकुटे फाटा येथे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला.
5 वर्षांपूर्वी -
उस्मानाबाद: पवार कुटुंबीय देखील शिवसेनेच्या वाटेवर?
एनसीपीला एकामागून एक धक्के बसत असून या पक्षातील बडे नेते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जाण्याचे सत्र सुरुच आहे. एनसीपीच्या संस्थापकांपैकी एक असलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आ. राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीची राज्यव्यापी शिवस्वराज्य यात्रा त्यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यात आली असता यात्रेत सहभागी झाले नाहीत. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही: देवेंद्र फडणवीस
दोन्ही काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरीही त्यांची माजोरी व मुजोरी जनतेला माहीत असल्याने मतदार त्यांना थारा देणार नाहीत, असं सांगत, ‘पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केलं. महाजानदेश यात्रेनिमित्त बाजार समितीच्या आवारात आयोजित सभेत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
जयदत्त क्षीरसागर यांनी ५० कोटी रूपयात मंत्रिपद घेतले
जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रीपद घेण्यासाठी ५० कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप करत येवढे पैसे मतदार संघात खर्च केले असते तर विकास झाला असता असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांनी केले. सामाजिक व्यासपीठावर भाषणे केली तर कपडे फाडू असा इशाराही त्यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना दिला.
5 वर्षांपूर्वी -
काहीच वाच्यता न करता भाजपने अप्रत्यक्षरीत्या काही सहकारी पक्ष नेत्यांसकट हॅक केले? सविस्तर
भारतीय जनता पक्ष सहकारी पक्षांना संपवतो असा आरोप त्यांच्यावर नेहमीच करण्यात आला आहे. वास्तविक त्यात तथ्य असलं तरी सत्तेतील सहकारी पक्षातील नेते आणि त्यांच्या पक्षाला देखील भाजपने राज्यात अप्रत्यक्षरीत्या हॅक केले आहेत, असंच म्हणावं लागेल. महादेव जाणकारांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना, रामदास आठवले यांचा आरपीआय आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष अप्रत्यक्षरीत्या का होईना, पण त्यातीलच म्हणावे लागतील.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा