महत्वाच्या बातम्या
-
विधानसभा निवडणुकीत वंचित व मनसेला सोबत घेणार: बाळासाहेब थोरात
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर थेट राहुल गांधींपासून अनेकांनी स्वतःच्या पदाचे एकावर एक असे राजीनामा सत्र सुरु केले. त्यानंतर महाराष्ट्रात देखील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था दयनीय झाल्याने आणि पक्षाचा केवळ एकच खासदार निवडून आला जो आयत्यावेळी शिवसेनेतून आयात करण्यात आला होता.
6 वर्षांपूर्वी -
आधी विहिरी गायब आता 'ती' करोडो झाडं गायब? केंद्राच्या समृद्ध जंगलाच्या यादीत राज्याचं नाव नाही
भारत सरकारच्या केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागामार्फत समृद्ध जंगल असणाऱ्या टॉप ८ राज्यांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार या यादीत सिक्कीम, मिझोराम सारख्या छोट्या राज्यांनी अव्वल क्रमांक प्राप्त झाला आहे. परंतु, या यादीत महाराष्ट्राला कोणतेही स्थान मिळालेले नसल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसने फेसबुकच्या माध्यमातून केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसेकडून ठाण्यात ‘सीड बॉम्बचे’ वाटप
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना बॉंब वाटप करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सांगितल्याप्रमाणे ठाण्यात बॉंब’चे वाटप केले. तत्पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणते बॉंब वाटप करणार याची उत्सुकता सर्वांना होती आणि अखेर महाराष्ट्र निर्माण सेनेकडून ठाण्यात सीड बॉम्बचे वाटप करण्यात केले.
6 वर्षांपूर्वी -
धरणक्षेत्रातील खेकड्यांसंबंधित अहवाल मागवला; विधानसभेपूर्वी नव्या 'टेंडरला' तोंड फुटण्याची शक्यता
चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्यामुळे २० पेक्षा अधिक जणांना दुर्दैवाने जीव गमवावा लागला होता. त्यानंतर संबधित घटना खेकड्यांमुळे फुटल्याचे विधान जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी केल्यांनतर त्यांच्यावर सर्वबाजूने जोरदार टीका झाली होती. विरोधकांनी सावंत यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेत त्यांच्या निवासस्थानी खेकडे सोडले होते. सदर घटना जरी चिपळूण येथील तिवरे धरणाच्या फुटाण्यासंबंधित असली तरी राज्यातील अनेक धरणाची अवस्था ही अत्यंत भयानक आहे. दरम्यान जलसंपदा खात्याकडे स्थानिक अनेक तक्रारी देखील देत असतात.
6 वर्षांपूर्वी -
औरंगाबादेत चोरट्यांनी चक्क एटीएम लंपास केलं
बीड : चोरटे नेमकं काय चोरी करतील याचा नेम नाही. यापूर्वी अनेकांनी एटीएम फोडून पैसे लुटण्याचे प्रकार केले आहेत. मात्र आता चोरट्यांनी कळसच गाठल्याचे दिसत आहे. हा प्रकार घडला आहे चक्क सर्वाधिक वर्दळीच्या बीड बायपासच्या दोन्ही बाजूने मोठी नागरी वसाहत आणि व्यापारी संकुल तसेच मंगल कार्यालय असलेल्या ठिकाणी.
6 वर्षांपूर्वी -
आ. नीतेश राणे यांच्या आंदोलनाचा दणका; रस्त्याच्या कामाला जोरात सुरुवात
रस्त्यांवर खड्डे असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्याच्या अंगावर बादली भरून चिखल ओतल्याप्रकरणी आमदार नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान २-३ दिवसातील नाट्यमय घडामोडीनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला देखील आक्रमक आंदोलनावरून अप्रत्यक्ष टोला लगावला होता.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होईल : नीलम गोऱ्हे
विधानसभा निवडणूक जस जशा जवळ येत आहेत तसतशी शिवसेनेतील नेत्यांची रोज निरनिराळी वक्तव्य समोर येत आहेत. अनेकांनी यापूर्वी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याबाबतर अनेक वक्तव्य केली आहेत. सामान्य मतदार निवडणुकीत कौल कुणाच्या बाजूने देणार आणि पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. अशातच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यास आपल्याला आनंदच होईल अस वक्तव्य केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
रेट्रॉस्पेक्टीव म्हणजे हा कायदा पूर्वलक्षीप्रभावाने लागू होणार नाही: वकिल गुणरत्न सदावर्ते
मराठा आरक्षणासंदर्भातील सुप्रीम कोर्टाने केलेली सुनावणी हा महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का असल्याचे मराठा आरक्षणाविरोधातील याचिकाकर्ते वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकार आणि प्रतिवादींना नोटीस जारी केली आहे. कोर्टाने सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्हाला मोठा दिलासा दिला. हा कायदा रेट्रॉस्पेक्टीव्ह जाणार नाही, आणि पुढील दोन आठवड्यात सुनावणी होईल, असे देखील न्यायालयाकडून सांगण्यात आल्याचे वकील सदावर्ते प्रसार माध्यमांना म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
पांडुरंग पावला! स्थगिती नाहीच!! : खासदार संभाजीराजे
सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुनावणी पार पडली. दरम्यान महाराष्ट्रात सरकारला सदर प्रकरणी पुढील २ आठवड्यात उत्तर देण्याचे थेट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले असून मराठा आरक्षणाला तूर्तास तरी स्थगिती देण्यात अली नसल्याने संपूर्ण मराठा समाजाचा आणि महाराष्ट्र सरकारचा जीव भांड्यात पडला आहे.
6 वर्षांपूर्वी -
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
विठूरायाच्या भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून गेलेल्या वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठूनामाचा गजर सुरू केला आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लातूरचे वारकरी शेतकरी दांपत्याच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे पार पडली. मागील वर्षीच्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा विरोध झाल्याने मुख्यमंत्र्यांना मुंबईतील वर्ष या निवासस्थानीच विठ्ठलाची पूजा करण्याची वेळ आली होती.
6 वर्षांपूर्वी -
पुण्यात माथेफिरूंकडून पुन्हा ७ दुचाकी गाड्या पेटवून देण्याचा प्रकार घडला आहे
रात्री अपरात्री गाड्या पेटवण्याचे प्रकार हे पुणेकरांना नित्त्याचे अनुभव झाले आहेत. यापूर्वी देखील असेच प्रकार काही गावगुंडांनी आणि माथेफिरूंनी केला आहेत, ज्यामध्ये पुणेकरांच्या मालमत्तेचे नाहक नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात पोलिसांना देखील अशा अनेक प्रकरणात कोणताही सुगावा लागत नसल्याने पुणेकर देखील हवालदिल झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब ठाकरेंना ‘चिखलफेक’ आंदोलन नक्कीच आवडलं असतं: आ. नितेश राणे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यावर चिखलफेक आंदोलन केल्याबद्दल माझ्यावर प्रचंड टीका होते आहे. मात्र हे आंदोलन कुणाला आवडो किंवा न आवडो पण बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांना हे आंदोलन नक्कीच आवडलं असतं असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे. रस्त्यांवर खड्डे असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्याच्या अंगावर बादली भरून चिखल ओतल्याप्रकरणी आमदार नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान २-३ दिवसातील नाट्यमय घडामोडीनंतर त्यांची जामिनावर काल सुटका करण्यात आली. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आमदार नितेश राणे यांनी हे विधान करत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे ३८७ कोटी कधी मिळणार? - जयंत पाटील
कांदा अनुदानावरून एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात सरकारवर पुन्हा लक्ष केले आहे. अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले कांदा अनुदान ४ महिने १५ दिवस उलटून देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेले नाहीत, असे जयंत पाटील यांनी ट्विट करून म्हंटले आहे. राज्यातील कांदा उत्पादक अत्यंत हलाकीच्या आणि अडचणींचा सामना करत असताना देखील राज्य सरकारकडून कोणत्याही हालचाली पाहायला मिळत नसल्याने आमदार जयंत पाटील यांनी युती सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबादचे एकमेव खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएम पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली असल्याचे समोर आले आहे. इम्तियाज जलील औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मंत्री सदाभाऊ खोत यांच्या भाषणावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
मंत्री सदाभाऊ खोत आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचं विळा-भोपळ्याचं नातं महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मंत्री सदाभाऊ खोत यांना शहं देण्याचे प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केले जातात. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आयोजित केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजना आढावा बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
6 वर्षांपूर्वी -
खेड: नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना अटक; जगबुडी नदीवरील नवीन पुलावर इंजिनिअर्सना बांधलं होतं
मुंबई गोवा हायवे संबंधित कामचुकारपणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यावर चिखलफेक प्रकरणी आमदार नितेश राणे यांना आजच जमीन मंजूर झाला आहे. मात्र आता खेडमधील जगबुडी नदीवरील नवीन पुलावर आर.के. बामणे आणि प्रकाश गायकवाड या इंजिनिअर्सना पुलाच्या रेलिंगला बांधल्याप्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
जुन्नरमध्ये उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड; आशा बुचके समर्थक शिवसैनिकांचे सामुहिक राजीनामे
पुणे जिल्हात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर यांच्या टीमने दिलेल्या अहवालानंतर आणि शिवाजी आढळराव-पाटील यांच्या दबावाखाली शिवसेनेतील आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेडपी सदस्य आशा बुचके यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. जुन्नर विधानसभा क्षेत्रात अमोल कोल्हे यांना तब्बल ४० हजार मतांची आघाडी मिळाली होती तसेच विद्यमान आमदार शरद सोनावणे दे कुचकामी ठरले होते. परिणामी शिवसेनेतील दिग्गज खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांचा मानहानीकारक पराभव झाला होता.
6 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंकडे 'जन आशीर्वाद' यात्रेसाठी वेळ; पण तिवरे धरणातील बाधितांना भेटण्यास वेळ नाही?
चिपळूण येथील तिवरे धरण २ दिवसांपूर्वी रात्री ९ च्या सुमारास फुटलं. त्या दुर्घटनेत एका वाडीतील तब्बल २४ जण वाहून गेले. दरम्यान आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह शोधपथकाच्या हाती लागले असून नशिबाने एकजण जिवंत आढळला आहे. मात्र अनेकांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. धरण फुटल्यामुळे एकूण १३ घरं वाहून गेल्यानं अनेक कुटुंबाची मोठी आर्थिक हानी देखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव केवळ लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता आला असता. तसेच, धरणाला पडलेल्या भगदाडीच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असती, तर आज १८ गावकऱ्यांचा जीव वाचला असता. मात्र सत्तेत विराजमान असून आणि स्वतःला कोकणचे कैवारी समजणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येथे फिरकलेच नाहीत.
6 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंची 'जन आशीर्वाद' यात्रा फडणवीसांना शहं देण्यासाठीच, भाजपात चर्चा रंगली
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदित्य ठाकरे यांना शिवसेनेकडून थेट सत्तेत महत्वाच्या पदावर विराजमान करण्याच्या हालचाली जोरदारपणे सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. त्याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच शहं देण्यासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे वृत्त आहे. आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून ‘जन आशीर्वाद यात्रे’ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या यात्रेला सुरुवात होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांची ही यात्रा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून एकप्रकारे आदित्य ठाकरे यांना थेट मंत्रालयात सत्तेत विराजमान करण्याच्या योजना शिवसेनेने आखल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
उर्मिला धर्मवेड्या भाजप-सेनेची निवड करणार की हिंदू-मुस्लिम अशी फूट न पाडणाऱ्या मनसेची?
लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना भारतीय जनता पक्ष, शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पक्षप्रवेशाची ऑफर मिळाल्याचे वृत्त आहे. मागील काही दिवसांपासून उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसच्या अंतर्गत गटबाजीवरून प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा