महत्वाच्या बातम्या
-
भिडेगुरूजी व शिवप्रतिष्ठानला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्यास पोलिसांकडून बंदी
संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. पालखी सोहळा समितीच्या वतीने पुणे पोलिसांना पत्र देण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. पालखी सोहळ्यात कुणी देखील घुसू नये आणि शिस्तीचं पालन व्हावं अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोरून चालण्यास यावेळी परवानगी देण्यात आलेली नाही. पुणे पोलिसांनी ही परवानगी स्पष्ट नाकारली आहे. पालखीच्या पाठीमागून संभाजी भिडे किंवा शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते चालू शकतात असंही पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र समोरून चालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शेतकऱ्यांचा पुळका: राजू शेट्टी
मागील तब्बल ५ वर्षे राज्यातील शेतकरी दारिद्र्यातच खितपत पडले आहेत. बळीराजाचे अनेक प्रश्न गंभीर रूप धारण करत आहेत. त्यात भर म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत, उलट त्यामध्ये प्रचंड वाढ होत गेली आहे. अशा अनेक शेतकरी प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कधीच कडक शब्दात बोललेले ऐकीवात नाही. मग शेतकऱ्यांचा आत्ताच कसा तुम्हाला पुळका आला? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेला केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पोटनिवडणुक: कडावल ग्रामपंचायत प्रभाग ३ मधून मनसेचे बाळकृष्ण ठाकुर विजयी
आज राज्यातील अनेक नगरपरिषदेतील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. दरम्यान कडावल ग्रामपंचायत प्रभाग ३ मधून मनसेचे बाळकृष्ण ठाकुर विजयी झाले आहेत. सदर निवडणूक अत्यंत अटीतटीची झाल्याचं पाहायल मिळालं, अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत केवळ ६ मतांच्या फरकाने मनसेचे उमेदवार बाळकृष्ण शंकर ठाकुर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर विजय प्राप्त केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आमचा कॅप्टन ठरलाय! मुख्यमंत्रीपदावरून सदाभाऊंकडून उद्धव ठाकरेंची खिल्ली
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता भाजपचे सहकारी पक्ष देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावरून लक्ष करू लागले आहेत. त्याचच भाग म्हणजे मुख्यमंत्रीपदावरून मंत्री सदाभाऊ खोत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे. विधानसभेसाठी ‘आमचा कॅप्टन ठरलाय’ असं विधान करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री विचार सोडून द्यावा असंच अप्रत्यक्ष म्हटलं आहे. याआधी भाजपातील गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी देखील उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. मात्र आता भाजपचे सहकारी पक्ष देखील उद्धव ठाकरेंना लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
सेनेचा मुख्यमंत्र्यांना शह? जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याची जलसंधारण मंत्र्यांची कबुली
सध्या राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आजच्या एका धक्कादायक कबुलीने शिवसेनेने अप्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शह दिल्याचं म्हटलं जात आहे. कारण राज्यातील महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना ही मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून देखील शिवसेनेने म्हणजे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहाला दिलेल्या कबुलीने खळबळ माजली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पोटनिवडणूक: चंद्रपूर नगरपरिषदेत काँग्रेसचा भाजपाला दणका; पुण्यात भाजपचा आयात उमेदवार विजयी
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. मूल नगर परिषद पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार शिल्पा रामटेके यांचा काँग्रेस उमेदवार ललिता फुलझेले यांनी एकूण १७६ मतांनी पराभव केला आहे. वॉर्ड क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अपात्र झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
तर युतीमध्ये पुण्यात शिवसेनाला एकही जागा नाही, दानवेंच्या वक्तव्याने सेनेत संताप
लोकसभेत युती केल्यानंतर आगामी विधानसभेसाठी देखील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडून एकत्र लढण्याचे निश्चित झाले आहे, परंतु विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरून आत्ताच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदावरून सुरु असणाऱ्या वादामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जागा वाटपा संदर्भात केलेल्या वक्तव्याने शिवसेना नेत्यांची चिंता वाढणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
५ वर्ष पिकविमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत, शिवसेनेला फसवणूक-लूट विधानसभा आल्यावर दिसली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल औरंगाबाद आणि नाशिकच्या दुष्काळी दौऱ्यावर होते. दरम्यान शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेकडून पीकविमा निवारण केंद्राची उभारणी करण्यात आली. यावेळी आयोजित छोटेखानी सभेत शेतकऱ्यांना नडाल तर तुमची मुंबईतील कार्यालये बंद करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला होता.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांची रथयात्रा हे आंध्र प्रदेशातील 'वायएसआर' तंत्र महाराष्ट्रात? सेने विरुद्ध मोठं षडयंत्र?
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत रथयात्रा काढणार आहेत. या रथयात्रेसाठी “फिर एक बार शिवशाही सरकार” आणि ”अब कि बार २२० पार” अशी घोषवाक्ये तयार करण्यात आली आहेत. ऑगस्ट महिन्यात ही रथयात्रा निघणार आहे. मात्र हेच तंत्र आंध्र प्रदेशात ऐतिहासिक विजय मिळवत सत्तेत आलेल्या वायएसआर काँग्रेसने तेथिल विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने २-३ महिन्यापूर्वी राबविले होते. यावेळी भाजपने शिवसेनेच्या मतदारसंघातून देखील ही रथयात्रा काढण्याची रणनीती आखली आहे असे वृत्त आहे. त्यामुळे शेवटच्या शनी स्वतःच्या बाजूने वातावरण निर्मिती करून शिवसेनेला शह दिला जाऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभेसाठी आता शरद पवारचं मैदानात, मुंबईत महत्वाची बैठक
लोकसभा निवडणुकीत पराभव सहन करावा लागल्याने एनसीपीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे, लोकसभेतील पराभव झटकून टाकत नव्या दमाने कामाला सुरुवात करण्यासाठी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना नडाल तर तुमची दुकानं बंद करून टाकू: उद्धव ठाकरे
राज्यात शिवसेनेचा जन्मच शेतकऱ्यांच्या सेवेसाठीच झाला आहे. सत्तेमध्ये सामील असून देखील शिवसेना विरोधकांसारखी वागते अशी टीका आमच्यावर विरोधकांकडून केली जाते. आम्ही सत्तेमध्ये जरूर सामील आहोत, परंतु आम्ही सामन्य माणसाचा आवाज म्हणून सत्तेत आहोत, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. जर आम्ही शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आमच्यात आणि आघाडीमध्ये नेमका फरक काय राहिला? असा देखील प्रश्न उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. शेतकऱ्यांना नडाल तर तुमची दुकानं बंद करून टाकू असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
राम्या पोरी पळव, पंकु चिक्की घे, दाजी साल्या म्हण; राष्ट्रवादीचं फडणवीसांना प्रतिउत्तर
बालभारती पुस्तकातील संख्यावाचनाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि एनसीपी’माहे चांगलाच कलगीतुरा रंगल्याच पाहायला मिळत आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला उत्तर देताना एनसीपी’च्या नेत्यांना लक्ष केलं होतं. त्यानंतर पुन्हा एनसीपीने भारतीय जनता पक्षाला जोरदार प्रतिऊत्तर देत ‘राम्या पोरी पळव, पंकु चिक्की घे, दाजी साल्या म्हण, नितीन टोल भर, विनोद जोक मार, असं म्हणत एनसीपीने भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया ही बॅलेट पेपरपेक्षा महाग; मग ईव्हीएमचा हट्ट का?
जगातील अनेक प्रगत देशांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सामान्यांच्या खिशातून टॅक्सच्या माध्यमाने जाणाऱ्या पैशांचा ईव्हीएमसाठी अपव्यय चालला आहे. एक हजार मतदानासाठी बॅलेट पेपरसाठी एक हजार ३००, तर ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी ३३ हजार रुपयांचा खर्च येतो. या निवडणुकीतच ४५०० कोटींपेक्षा जास्त खर्च ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही मानवनिर्मित गोष्ट बनविणाऱ्याला त्यातील त्रुटी माहित असतात, त्यामध्ये कसे बदल करायचे हे माहित असते. अगदी कायद्यात देखील किती पळवाटा आहेत असेही उदयनराजेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मी खासदारकीचा राजीनामा देतो, साताऱ्यात फेरनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या
पुढे काय व्हायचं ते होऊद्या मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देतो, सातारा लोकसभा मतदारसंघातली फेरनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर घ्यावी अशी जाहीर मागणी एनसीपीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीत अनेक मतदारसंघातल्या मतांमध्ये मोठा फरक असल्याच्या तक्रारी मोठ्याप्रमामांवर आल्या होत्या. ज्यानंतर समाज माध्यमांवर एक फेसबुक पोस्ट लिहून उदयनराजे भोसले यांनी ही जाहीर मागणी केली.
5 वर्षांपूर्वी -
आज उद्धव ठाकरे यांचा नाशिक व औरंगाबाद दौरा; शेतकऱ्यांशी संवाद साधणार
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागलेले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील जोरदार तयारीला लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे हे पीक विमा केंद्रांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यात अजूनपर्यंत मान्सूनचं आगमन न झाल्याने परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट उभं राहिलं आहे. या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा दौरा असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
बदलत्या राजकारणाचं आधुनिक तंत्र सेनेने स्वीकारलं; पण राज ठाकरे ते स्वीकारतील का? सविस्तर
सध्या देशातील राजकीय तंत्र झपाट्याने बदलण्यास सुरुवात आली आहे. अगदी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत हे तंत्र भाजपने यशस्वीपणे राबवलं आणि ऐतिहासिक विजय प्राप्त केला होता. कालांतराने राजकारणातील ते गणित समजून घेण्याचा आणि यशस्वी होण्याचं तंत्र देशातील इतर प्रमुख पक्षांनी देखील समजून घेऊन अमलात आणण्याचा प्रयत्न केला. आजच्या घडीला ज्या पक्षांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच ३-४ महिने चिकाटीने आणि योजनाबद्धपणे राबवलं तेच देश व राज्यात निवडून आले किंवा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले. राजकारणातील हे औटसोर्सिंगच हे तंत्र जो पक्ष अमलात आणेल तोच भविष्यात स्वतःचं अस्तित्व टिकवेल अशीच परिस्थिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य; मनसेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
महाराष्ट्रात मराठी सक्तीचीच आहे हे महाराष्ट्राला सांगितल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आणि आभार, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत. राज्यातील एसएससी, आयसीएसई आणि सीबीएसई अशा सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. यावरच अनिल शिदोरे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचं पानिपत झालं म्हणून आमच्याबरोबर बसायला तयार आहात का? प्रकाश आंबेडकर
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाचं देशभर पानिपत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर हाती आलेल्या आकडेवारीनंतर काँग्रेसच्या अनेक जागा बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे पडलायचं दिसलं आणि काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांसोबत जुळवून घेण्याच्या गोष्टी करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काँग्रेसचं पानिपत झालं आहे म्हणून आमच्याबरोबर बसायला तयार आहात का?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! राज्यात ३ महिन्यात ६१० शेतकऱ्यांच्या आत्महत्या
यावर्षीच्या जानेवारी ते मार्च ३ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सहकार आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे. यामधली १९२ प्रकरणं जिल्हास्तरीय समितीत पात्र ठरवण्यात आली आहेत. ज्यापैकी १८२ प्रकरणी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून मदत देण्यात आली आहे. दरम्यान एकूण ९६ प्रकरणं निकषात न बसल्याने अपात्र ठरवण्यात आली. तर ३२३ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत अशी देखील माहिती देशमुख यांनी सभागृहाला दिली. सदर विषयाला अनुसरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंयज मुंडे यांनी लक्ष वेधले होते ज्यावर देशमुख यांनी सभागृहाला हे उत्तर दिले.
5 वर्षांपूर्वी -
गृहनिर्माण मंत्र्यांची गिरणी कामगारांना मुंबईबाहेर धाडण्याची भाषा, सत्ताधारी सेना मूग गिळून शांत
मुंबईचे पूर्वीचे मालक आणि राबणारे हात म्हणजे तत्कालीन गिरणी कामगार, मात्र सध्या राज्याचे नवनियुक्त गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हाडाच्या बैठकीत केल्याने विधानाने गिरणी कामगारांमध्ये संतापाची भावना आहे. बैठकी दरम्यान राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की म्हाडाने मुंबईबाहेर घरे बांधावीत, अशी सूचना करणाऱ्या गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट गिरणी कामगारांच्या घरांबाबत देखील धक्कादायक सल्ला दिला आहे. गिरणी कामगारांना सुद्धा बेलापूर, उरणमध्ये घरे द्यावीत, असे म्हाडाच्या बैठकीत विखे कोणताही मागचा पुढचा विचार न करता म्हणाले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News