महत्वाच्या बातम्या
-
गृहनिर्माण मंत्र्यांची गिरणी कामगारांना मुंबईबाहेर धाडण्याची भाषा, सत्ताधारी सेना मूग गिळून शांत
मुंबईचे पूर्वीचे मालक आणि राबणारे हात म्हणजे तत्कालीन गिरणी कामगार, मात्र सध्या राज्याचे नवनियुक्त गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हाडाच्या बैठकीत केल्याने विधानाने गिरणी कामगारांमध्ये संतापाची भावना आहे. बैठकी दरम्यान राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की म्हाडाने मुंबईबाहेर घरे बांधावीत, अशी सूचना करणाऱ्या गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट गिरणी कामगारांच्या घरांबाबत देखील धक्कादायक सल्ला दिला आहे. गिरणी कामगारांना सुद्धा बेलापूर, उरणमध्ये घरे द्यावीत, असे म्हाडाच्या बैठकीत विखे कोणताही मागचा पुढचा विचार न करता म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
कोण काय छापतं? मुख्यमंत्रिपदाची जागा पुढील ५ वर्षांसाठी रिकामी नाही: अवधूत वाघ
लोकसभा संपून भाजप सरकार बहुमताने सत्तेत आले आणि मंत्रिमंडळ वाटप पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातत्याने मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येतो आहे. एका बाजूला विधानसभेत दोन्ही बाजूचे वरिष्ठ नेते युतीसाठी प्रयत्न करत असताना काही नेत्यांकडून आग लावण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आगामी काळात या विषयावरून भाजप सेनेमध्ये पुन्हा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
गॅंगस्टर सुरेश पुजारी'कडून मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठार मारण्याची धमकी
कुख्यात गॅंगस्टर सुरेश पुजारी टोळीकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सदर प्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुंबईतून संदेश शेट्टी याला अटक केली, तर पुजारी टोळीतील इतर आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचं वृत्त आहे. नवी मुंबईतील एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकावणाऱ्या पुजारी टोळीच्या शेट्टी याला जाधव यांनी विनंती केली. तेव्हा, संबंधित प्रकरणात पडू नको अन्यथा ठार मारण्याच्या धमकीचा फोन पुजारीने परदेशातून केला होता असं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्ताधाऱ्यांकडून रामराजें विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी हालचाली?
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी चालवली आहे, तर फडणवीस सरकारला अधिवेशनातच कोंडीत पकडण्यासाठी एनसीपीने जोरदार हालचाली सुरू केल्या असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आज दिवसभरात विधिमंडळात जोरदार राजकीय घडामोडी पाहायला मिळतील.
6 वर्षांपूर्वी -
BSNLने सिंधुदुर्गला ४-जी सेवेतून वगळले; अपयशी ठरताच विनायक राऊतांकडून भलतीच अफवा
आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. स्वतःच्या अडाणीपणामुळे कुप्रसिद्ध असलेले रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी आपला अडाणीपणा मागील पानावरुन पुढे चालू केल्याचे समोर आले आहे. संपूर्ण राज्यात सुरु असलेली BSNLची ४ जी सेवा सिंधुदुर्गात आणण्यात अपयशी ठरल्यानंतर आता राऊत यांनी आपल्या नसलेल्या अकलेचे तारे तोड्ड्ण्यास सुरुवात केली आहे. ही सेवा सुरु झाल्यास नागरिकांचे जुने मोबाईल फोन निकामी होतील व त्यांना नवीन फोन विकत घ्यावे लागतील, अशी अजब कारणं पुढे रेटली आहेत. त्यांच्या या “थोर” विचारांमुळे कोकणात युवापिढी राऊत यांना लाखोल्या वाहत आहे.
6 वर्षांपूर्वी -
बदल पहिलीपासूनच, गणिताच्या पुस्तकामध्ये सोपे ते स्वीकारले
इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये संख्या वाचनात केलेल्या बदलावरून वाद निर्माण झाला आहे. समाज माध्यमांवर यावरून मोठं मोठे विनोद होण्यास सुरुवात झाली आहे. काही शिक्षणतज्ज्ञ, लेखक, राजकीय नेत्यांनी हा बदल मराठी भाषेला अत्यंत मारक असल्याचे उघडपणे सांगितले आहे. दरम्यान संबंधित बदल करताना इंग्रजी भाषेचे अनुकरण केल्याचा थेट आरोप केला जात आहे. एकवीसला वीस एक म्हटल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील गोंधळ निर्माण होईल, असा दावा देखील अनेकांनी केला आहे. मात्र बालभारतीच्या गणित विषयतज्ज्ञ समितीच्या अध्यक्ष डॉ. मंगला नारळीकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संपुर्ण वादावर विस्तृतपणे मांडणी करून सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे ठामपणे सांगितले. त्यामुळे हा बदल नवीन नाही असं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
जागावाटपात स्वबळावर बार्गेनिंगसाठी? पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच : उद्धव ठाकरे
आगामी विधानसभा निवडणुकीत आपला मुख्यमंत्री करायचाच असा ठाम निर्धार शिवसेनेने केला असून भारतीय जनता पक्षाशी जरी युती असली तरी शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना असून आगामी विधानसभा भगवी करुन टाकू, त्यासाठी शिवसैनिकांनी सर्व शक्तीनिशी कामाला लागावे अशा शब्दांत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा सूचक इशारा दिला आहे. आज शिवसेनेचा ५४वा वर्धापन दिन असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा २०१९: आपल्या निधीसाठी ‘आपला दवाखाना’च्या नावाने १६० कोटींचा घोटाळा? सविस्तर
दिल्लीतील मोहल्ला क्लिनीकच्या धर्तीवर शिवसेनेने ठाणे महापालिका हद्दीत ‘आपला दवाखाना’ नावाची संकल्पना सुरू करणार असून त्यासाठी सर्वप्रथम किसननगर आणि कळवा येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली ही योजना पूर्णतः फोल ठरली आहे आणि लोकं तेथे फिरकत सुद्धा नाहीत अशी माहिती आहे, तसेच ठाणे शहरातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत तब्बल २६ आरोग्य केंद्रांची गरज असताना केवळ पक्षाच्या प्रचाराच्या हेतूने आणि आरोग्याच्या नावाखाली या संकल्पनेसाठी तब्बल १६० कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचा दावा महापालिका विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे मेडिकल ऑन गो प्रायव्हेट लिमिटेडला हा ठेका देऊन त्याद्वारे विधानसभा निवडणुकीसाठी पैसा गोळा करण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: हेल्मेट सक्तीतून पुणेकरांकडून मोठा दंड वसूल केल्यावर मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
यावर्षी १ जानेवारीपासून पुण्यात पोलिसांकडून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली. त्यानंतर अनेक ठिकाणी निदर्शनं आणो कोर्टकचेऱ्या देखील झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या कालावधीत पुणे वाहतूक पोलिसांनी पूणेकरांकडून रग्गड दंड देखील वसूल केला. मात्र विधानसभा निवडणूक केवळ ३-४ महिन्यांवर आल्याने या विषयाला अनुसरून पुणेरकरांचा रोष सहन करावा लागू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी अखेर हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प
महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. सदर अहवालात राज्याची अर्थव्यवस्था देशाच्या ६.८ टक्के विकास दरापेक्षा अधिक वेगाने म्हणजे ७.५ टक्के दराने विकसित होत असून राज्याने आधीच्या ४ वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही प्रगतीची घोडदौड निरंतर राखण्यात यश प्राप्त झाले असल्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे मुनगंटीवार आज दुपारी १.४५ वाजता राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.
6 वर्षांपूर्वी -
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; दुष्काळावर विशेष चर्चा
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर काल रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या कामकाजाच्या रुपरेषेची माहिती देण्यासाठी जाहीर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये नवी आणि प्रलंबित अशी एकूण २८ विधेयकं मांडली जाणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
6 वर्षांपूर्वी -
इतर पक्षातील आयात नेते आणि विधानपरिषदेवरील आमदारांची सेनेत चांदी
लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवबंधन बांधत शिवसेनेत दाखल झालेले राज्याचे माजी मंत्री आणि बीडचे राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर आणि विधान परिषदेचे पहिल्यांदाच सदस्य झालेले तसेच ‘महाराष्ट्राला भिकेला लावेन’ असं वादग्रस्त वक्तव्य करणारे तानाजी सावंत यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागल्याने शिवसेनेच्या विशेषत: जमिनीवर पक्ष वाढवणाऱ्या विधानसभा सदस्यांमध्ये प्रचंड नाराजीची भावना दिसून आली. विधानसभा परिषदेचे आमदार तानाजी सावंत हे देखील करोडपती व्यक्तिमत्व असल्याने आयत्यावेळी काही मोठी आर्थिक देवाणघेवाण झाली का अशी चर्चा देखील दबक्या आवाजात होऊ लागली आहे.
6 वर्षांपूर्वी -
एसआरए घोटाळ्यामुळे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांना मंत्रिमंडळातून डच्चू?
अखेर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल सकाळी अकरा वाजता पार पडला. यात एकूण तेरा आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. १३ मंत्र्यांना सामावून घेताना फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील आधीच्या एकूण ६ मंत्र्यांना डच्चू दिला आहे. विशेष म्हणजे हे सहाही मंत्री भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातील आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या १०, शिवसेनेच्या २ नेत्यांना तर आरपीआय आठवले गटाच्या अविनाश महातेकर यांना मंत्रिपपदाची शपथ देण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसमुक्तीच्या नावाखाली भाजप-सेनाच काँग्रेस-राष्ट्रवादीयुक्त होत आहे?
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आयात केलेल्या २ नेत्यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेल्या जुने कट्टर काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटलांना सर्वप्रथम मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी देण्यात आली तर एनसीपीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी विखेंनंतर शपथ घेतली. भाजप-सेनाच काँग्रेस-राष्ट्र्वादीयुक्त होत आहे का अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: महाराष्ट्राला भिकारी बनवण्याचे भाष्य करणा-या तानाजी सावंतांना उद्धव ठाकरेंकडून मंत्रिपद
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात १३ युतीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार तानाजी सावंत यांना मिळालेल्या मंत्रीपदावरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करणारा व्यक्ती मंत्री होत असेल तर यापेक्षा राज्याचे दुर्दैव काय असेल? असे निलेश राणे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
मालेगावात सत्तेसाठी धर्म विसरून MIM सोबत सेटलमेंट, तर औरंगाबादमध्ये घरात घुसून मारण्याची सेनेकडून धमकी
महानगरपालिकेत खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेदरम्यान गोंधळ घातला होता. तर काही नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर महापौरांनी एमआयएमच्या काही नगरसेवकांचे एका दिवसासाठी निलंबन केले होते. याच प्रकरणावरून शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातील संपादकीयमधून एमआयएमवर निशाणा साधला आहे. लोकसभेत शिवसेनेच्या झालेल्या निसटत्या पराभवामुळे संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनला नाही. ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सगळ्यासाठीच हा इशारा असल्याचे सांगत शिवसेनेने एमआयएमवर हल्लाबोल केला.
6 वर्षांपूर्वी -
धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून २ दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील हाय कोर्टाने दिलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर आज पहाटे दाखल केलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्याला देखील स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधीच धनंजय मुंडे यांना गजाआड टाकण्याची सत्ताधारी पक्षांची खेळी फासल्याची चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
...नाहीतर सर्वांचेच आरक्षण काढून टाका : खासदार उदयनराजे
धनगर, लिंंगायत, मराठा, मुस्लिम समाजातील नागरिकांना आरक्षण लागू करा, नाहीतर सरसकट सर्वांचेच आरक्षण रद्द करा. आरक्षणामुळे सर्वच जाती धर्मात भांडणे लागली आहेत. त्यामुळे प्रत्येक धर्मातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व्यक्तींना सरकारने आरक्षण लागू करा, अशी मागणी एनसीपीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सोलापुरात केली. सोलापूर येथील सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे म्हणाले, आरक्षणामुळे एकूण लोकशाहीच संपुष्टात येत आहे. त्यामुळे सरसकट सर्वांचेच आरक्षण रद्द करून टाका. उगाच शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सर्वधर्म समभावाची शिकवण देत बसू नका, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
6 वर्षांपूर्वी -
वरिष्ठांना वेटिंग लिस्टवर ठेवून 'आदित्य महाराष्ट्र तुझी वाट पाहत आहे' अभियान सुरु
देशभरात लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि भाजप सरकार बहुमताने सत्तेत विराजमान झाले. मोदी त्सुनामीत शिवसेनेची सुद्धा लॉटरी लागली, मात्र भाजप बहुमताने सत्तेत विराजमान झाल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पावर जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे केंद्रात भविष्यात देखील काहीच हाताला लागणार नाही याचा पक्ष नैतृत्वाला मनातून का होईना साक्षात्कार झाला असणार.
6 वर्षांपूर्वी -
तीच तारीख -तोच महिना! राज यांच्या व्यंगचित्रातला मोदींचा 'तो' खासगी 'प्लॅन' सत्य ठरला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १३ जून २०१८ मध्ये एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं होतं. त्यात राज ठाकरे यांनी यूपीएससी परीक्षा अथक मेहनतीने उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत उच्च पदावर विराजमान होणाऱ्या अधिकाऱ्यांचे भवितव्य आणि UPSCच्या संभाव्य विद्यार्थ्यांच्या डोकावर मोदी खाजगी क्षेत्रातील उच्च पदावरील अधिकाऱ्यांची नेमणूक करतील असा ठोकताळा मांडला होता. मात्र आज त्याच तारखेला आणि त्याच महिन्यात म्हणजे १३ जून २०१९ रोजी राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मांडलेला तो राजकीय ‘ठोकताळा’ सत्यात उतरला आहे, असंच मान्य करावं लागेल.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा