महत्वाच्या बातम्या
-
देशात मोदी विरोधी लाट होती; ईव्हीएम'ने सत्ता मिळवण्यापेक्षा निवडणुकाच घ्यायचा नव्हत्या
काल देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशभरात मोदी त्सुनामी आल्याचे दिसले. त्यात अनेकांनी या निकालावर आश्चर्य व्यक्त करत वेगळीच शंका व्यक्त केली होती. दरम्यान अनेकांनी देशात मोदी लाट नक्कीच नव्हती असं जाहीर पणे म्हटलं आणि अनेक भाजप नेत्यांनी देखील ते पडद्याआड मान्य केलं. विशेष म्हणजे मुस्लिम बहुबल भागात देखील भाजपच्या उमेदवारांना भरभरून मतं पडल्याने त्यात शंका अधिक दुणावल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
...तर अडसूळ आजोबांचे निश्चितच आशिर्वाद घेऊ: नवनीत राणा-कौर
बुजुर्गांनी लोकसभा निवडणूक लढवायला नको असा सल्ला निवडणुकीपूर्वी देणाऱ्या अमरावतीतून जिंकलेल्या नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचे नक्कीच आशिर्वाद देखील घेऊ असे सांगितले. एका खासजी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे भाष्य केलं आहे, कारण आनंदराव अडसूळ माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या तर नक्कीच मी नक्कीच स्वीकारेन आणि मोठ्या मनाने अडसूळ आजोबांचे आशिर्वाद घ्यायला त्यांच्या घरी जाईन.
6 वर्षांपूर्वी -
सेनेचे सर्व मंत्री बिनकामाचे असा आरोप करणाऱ्या सेना आमदाराने राज्य काँग्रेसमुक्त होऊ दिलं नाही
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीची पुरती धूळदाण झाली आहे. राष्ट्रवादीने ५ तरी जागा जिंकल्या आहेत, मात्र काँग्रेस पक्ष केवळ एका जागेवर शिल्लक राहिला आहे आणि ती जागा आहे चंद्रपूरची जिथे भाजपचे हंसराज अहिर पराभूत झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होण्यापासून थोडक्यात वाचला आहे.
6 वर्षांपूर्वी -
दक्षिण मुंबईत काँग्रेसला धक्का! मिलिंद देवरा पराभूत: सेनेचे अरविंद सावंत विजयी
काँग्रेसला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून जोरदार धक्का मिळाला आहे. कारण इथून मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी पराभव केला आहे. या मतदारसंघातून मिलिंद देवरा निवडून येतील आणि ही लोकसभेची जागा काँग्रेसच्या भरोशाची मानली जात होती. काहीसा उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू समाजातील लोकांचा मतदारसंघ म्हणून सर्वांना परिचित असलेला हा मतदारसंघ समजला जातो.
6 वर्षांपूर्वी -
हातकणंगले: शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी; स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी पराभूत
लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शिवसेनेकडून पहिल्यांदा उमेदवारी घेणारे धैर्यशील माने आता पुढील ५ वर्ष या मतदारसंघाचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
उत्तर मुंबईत: भाजपचे गोपाळ शेट्टी विजयी; काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा पराभव
लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांना अगदी सहज झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपकडून दुसऱ्यांदा उमेदवारी घेणारे गोपाळ शेट्टी आता पुढील ५ वर्ष या मतदारसंघाचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
नागपूर लोकसभा: नितीन गडकरी विजयी; काँग्रेसच्या नाना पटोलेंचा दारुण पराभव
लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपच्या नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांना अगदी सहज झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपकडून दुसऱ्यांदा उमेदवारी घेणारे नितीन गडकरी आता पुढील ५ वर्ष या मतदारसंघाचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
नांदेड: काँग्रेसचे अशोक चव्हाण पराभूत; भाजपचे चिखलीकर विजयी
लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांनी काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपकडून पहिल्यांदा उमेदवारी घेणारे प्रतापराव चिखलीकर आता पुढील ५ वर्ष या मतदारसंघाचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पराभवाचं मूळ कारण ठरलं आहे ते वंचित आघाडीच्या उमेदवाराने घेतलेली मतं असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे ठरले जाईंट किलर! सेनेच्या आढळराव पाटलांचा पराभव
शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मोठ्या प्रतिष्ठेचा केला होता. त्यात राष्ट्र्वादीने आयत्यावेळी अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांच्या विजयाचा निर्धार केला होता. विद्यमान खासदार आढळराव पाटील हे शिवसेनेतील दिग्गज नेते म्हणून परिचित असल्याने शिवसेनेने येथे प्रतिष्ठा पणाला लावल्याचे पाहायला मिळालं. या मतदारसंघात आढळराव पाटलांची स्वतःची अशी मोठी यंत्रणा असून त्यांना पराभूत करणे म्हणजे मोठं आव्हान असल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
मावळ: पार्थ पवारांचा पदार्पणातच पराभव; शिवसेनेच्या श्रीरंग बाराणेंकडून धोबीपछाड!
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार थेट लोकसभेच्या आखाड्यात उतरल्याने या मतदार संघात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना तगडी स्पर्धा होती. त्यात विरोधी उमेदवार थेट पवार घराण्यातील असल्याने मावळ लोकसभा मतदासंघ प्रसार माध्यमांसाठी मोठा चर्चेचा विषय झाला होता.
6 वर्षांपूर्वी -
कल्याण: शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी; तर राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील पराभूत
कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे १ टर्म शिवसेनेकडून खासदारकी उपभोगणारे श्रीकांत शिंदे आता पुढील ५ वर्ष पुन्हा कल्याणचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
ठाणे लोकसभा: शिवसेनेचे राजन विचारे यांचा विजय; राष्ट्रवादीचे आनंद परांजपे पराभूत
ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांना कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे २ टर्म शिवसेनेकडून खासदारकी उपभोगणारे राजन विचारे आता पुढील ५ वर्ष पुन्हा ठाण्याचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
रायगड: कोकणी मतदाराने शिवसेनेच्या अनंत गितेंना नाकारलं; राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी
शिवसेनेचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना यंदाची लोकसभा काहीशी अवघड असल्याचं आधीच म्हटलं जात होतं. त्यात राष्ट्रवादीने माजी मंत्री सुनील तटकरे यांच्यासारखा तगडा उमेदवार दिल्याने शिवसेनेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं. अनंत गीतेनी या मतदारसंघाकडे काहीस दुलक्ष केल्याचा आरोप स्थानिक लोकांना अनेकवेळा केला होता आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध रोष पाहायला मिळत होता.
6 वर्षांपूर्वी -
बारामतीत भाजप मातीत; सुप्रिया सुळे विजयी तर कांचल कुल यांचा पराभव
बारामती लोकसभा मतदारसंघावर विजय प्राप्त करण्याचं भाजप नेत्यांचं स्वप्न भंगलं असून या मतदारसंघात केवळ पवार कुटुंबीयच राज्य करतात हे पुन्हा सिद्ध झालं आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी मोठं मोठ्या रणनीती आखात होते आणि त्यावर लक्ष देखील ठेऊन होते.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात काँग्रेसचा सुपडा साफ होण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीचे कल जसजसे समोर येत आहेत त्यातून विरोधकांची दयनीय स्थिती समोर येते आहे. त्यातून महाराष्ट्रातील काँग्रेसचा राज्यातून सुपडा साफ होण्याची शक्यता आहे. देशातील मोठी पारंपरिक मतदार असलेला काँग्रेस पक्ष केवळ देशात नव्हे तर राज्यात देखील शेवटच्या घटका मोजत आहे अशी परिस्थिती आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप स्वबळावर सत्तेत आल्यास शिवसेनेची अवस्था पुन्हा रडकुंडीची होणार?
सत्तेत येण्यासाठी भाजपने मित्र पक्षांना जवळ केलं खरं आणि शिवसेनेने देखील भाजपाला आपल्याशिवाय गत्यंतर नाही असं वातावरण निर्माण केल्याचे चित्र होते. २०१४च्या निकालानंतर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेनेची अवस्था सत्तेत असून देखील नसल्यासारखीच असल्याचे पाहायला मिळाले. मात्र सध्या सुरु असलेले निकालाचे कल पाहता भाजप बहुमताने पुन्हा सत्तेत येईल अशी अशी चिन्हं आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार पराभवाच्या छायेत
प्राथमिक फेरीनंतरच मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे मोठ्या फरकाने पुढे आहेत. त्यानुसार पार्थ पवार जवळपास ४० हजार मतांच्या फरकाने पिछाडीवर आहेत. त्यामुळे हा अजित पवार आणि पवार कुटुंबियांना मोठा धक्का लागू शकतो असं चित्र सध्या तरी दिसत आहे. दरम्यान मतांमधील फरक वाढतच असून त्यातून राष्ट्रवादीमध्ये चिंतेच वातावरण आहे.
6 वर्षांपूर्वी -
अनेक ठिकाणी युतीचे उमेदवार केवळ २०० ते २००० मतांनी आघाडीवर; कल कधीही बदलू शकतात
सध्याच्या प्राथमिक फेरीत जरी युतीचे उमेदवार आघाडीवर असले तरी त्यांच्या आघाडीत केवळ २०० ते २००० मतांचा फरक आहे. त्यामुळे सध्या प्राथमिक फेरीत दिसणारे कल शेवटच्या क्षणी बदलू शकतात असं चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे.
6 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: एमआयएम'चे इम्तियाझ जलील आघाडीवर तर सेनेचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या स्थानावर
लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार आहे. प्रथामिक कलांमध्ये एमआयएम’चे इम्तियाझ जलील आघाडीवर तर शिवसेनेचे चंद्रकांत खैरे थेट तिसऱ्या स्थानावर आहेत. तर हर्षवर्धन जाधव दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं सध्या प्राथमिक फेरीत चित्र.
6 वर्षांपूर्वी -
शिरूर लोकसभा: राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे सुरुवातीपासून आघाडीवर
लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार आहे. प्रथामिक कलांमध्ये एनसीपीएचे अमोल कोल्हेंनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. अमोल कोल्हेंविरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असली तरी पुण्यामध्ये एनसीपीने शक्तीप्रदर्शन सुरु केले आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमबाहेर अमोल कोल्हेंचा भावी खासदार असा उल्लेख असणारे बॅनर झळकले आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा