महत्वाच्या बातम्या
-
राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांचा आज शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश
मागील ३ वर्षे पक्षाच्या सर्वच जाहीर कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवणारे एनसीपीएचे मराठवाड्यातील दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज मुंबईतील मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जयदत्त क्षीरसागर भेट घेणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे त्यांना शिवबंधन बांधतील. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय सुट्यानिमित्त परदेश दौऱ्यावर असल्याने हा प्रवेश लांबला होता.
6 वर्षांपूर्वी -
एक्झिट पोलच्या विजयाचा जल्लोष संपला असेल तर दुष्काळाकडे वळा आता : धनंजय मुंडे
काल शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले आणि सर्वच टीव्ही वृत्त वाहिन्यांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले असून त्यात पुन्हा भाजपचं सत्तेत येईल असं म्हटलं आहे. त्यांनतर भाजप आणि भाजप समर्थक निवडणूक जिंकल्यासारखा जल्लोष करण्यात मग्न आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते मंडळी देखील संतापली आहेत असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
ग्रामीण भागातील भीषण दुष्काळासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली महसूल मंत्र्यांची भेट
राज्यातील ग्रामीण भागात यंदा ऐतिहासिक दुष्काळ पडला असून अनेक गावांमध्ये हंडाभर पाण्यासाठी कडक उन्हात वणवण भटकत आहेत. राज्यातील सत्ताधारी नेतेमंडळी अजून लोकसभा निवडणुकांच्या वातावरणातच अडकून आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी अनेक वृत्त वाहिन्यांवर एक्झिट पोलच्या गप्पा मारण्यासाठी तासंतास स्टुडियोमध्ये वेळ देत आहेत. मात्र सत्तेत असून देखील त्यांच्याकडे दुष्काळ दौऱ्यासाठी वेळ नसल्याचे दिसते.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा निवडणुकीत मनसे गाठणार आमदारांचा दुहेरी आकडा
लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात न उतरताही राजकीय वातावरण ढवळून काढणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसणार असून मनसेचे दोन अंकी आमदार आगामी विधानसभा निवडणूकीत निवडून येतील’ असे भाकित ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मराटकर यांनी वर्तवले. नाशिक येथे चालू असलेल्या ज्योतिष संमेलनदरम्यान मराटकर यांनी हा अंदाज वर्तवला.
6 वर्षांपूर्वी -
वैद्यकीय प्रवेश: खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची आज राजभवनासमोर निदर्शने
राज्यात मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा तिढा सुटण्याची काहीच चिन्हं दिसत नाहीत. दरम्यान पदवीधर मेडिकल प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढल्यानंतर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. राज्यपालांनी राज्य सरकारच्या अध्यादेशावर अध्यादेशावर स्वाक्षरी करू नये यासाठी मराठा विद्यार्थी आणि पालक राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
लातूरमध्ये दुष्काळामुळे गावकऱ्यांवर शरिराला हानिकारक पाणी पिण्याची वेळ
मराठवाड्यात दुष्काळाने अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास येते आहे. त्यात लातूरमध्ये परिस्थिती अत्यंत भीषण असल्याचं वृत्त आहे. पिण्याच्या पाण्याचा अनेक गावांमध्ये तुटवडा जाणवत असल्याने अनेक गावातील महिलांची वणवण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी शरीराला अपायकारक असलं तरी ते अशुद्ध पाणी पिण्याची वेळ अनेकांवर आल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
आजवर मोदी व शहांनी दादागिरीच केली, मग ममतांनी केली तर बिघडले कुठे? राज ठाकरे
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे करत आहेत ते योग्यच आहे. मात्र आजवर या दोघांनी म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी इतरांसोबत दादागिरीच केली आहे. मग ममतांनी केली तर त्यात बिघडले कुठे? अमित शाहांना कळू दे दादागिरी काय असते ते. कोलकात्यातील रॅली अर्धी सोडून अमित शहा पळून आले. यांच्या बाबतीत हेच पाहिजे होते, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदींच्या पहिल्या पत्रकार परिषदेत ‘मौन की बात’! राज ठाकरेंचं ट्विट
नरेंद्र मोदींनी काल पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. परंतु त्यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. मोदींना विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी उत्तरं दिली. यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह सर्वच विरोधकांनी मोदींवर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे. आमच्या देशाचा पंतप्रधान पत्रकारांना सामोरा जायला घाबरतो, अशी टीका महिन्याभरापूर्वी करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मोदींवर नेमक्या शब्दांत शरसंधान साधलं.
6 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांना जी धमक वाघिणीने दाखवली, ती धमक वाघ हयातीत दाखवणार नाही?
सध्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराअंती पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असले तरी, ममता बॅनर्जींच्या बेधडकपणाची चर्चा देशभर रंगली आहे. अमित शहांच्या प्रचार रॅलीनंतर पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. संपूर्ण भाजपने पश्चिम बंगालमधील वातावरण शेवटच्या टप्प्यात दूषित करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न केला जो ममता बॅनर्जी यांनी धर्याने परतवून लावला.
6 वर्षांपूर्वी -
दुष्काळ: ग्रामीण जनतेची गोड्या पाण्यासाठी वणवण तर सत्ताधारी खाऱ्या पाण्यात तरंगत आहेत
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपून सत्ताधारी सध्या कुटुंबासोबत सुट्टीची मजा घेत आहेत. कुटुंबासोबत सुट्टीवर जाणं गैर नसलं तरी, ते कधी याचं किमान जनतेने निवडून दिलेल्या सत्ताधाऱ्यांना तरी भान ठेवणं गरजेचं आहे. भर उन्हाळ्यात राज्यात ऐतिहासिक दुष्काळ पडलेला असताना सत्ताधारी नेते मात्र स्वतःच्या उन्हाळी सुट्ट्या देशाबाहेर घालवून, पुन्हा पावसाळ्याचा आनंद लुटायला स्वगृही परततील.
6 वर्षांपूर्वी -
भर पावसाच्या काळात सर्वच पक्ष विधानसभेच्या तयारीला लागणार
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तोफा थंडावल्या आणि मतदान देखील पार पडलं आहे. दरम्यान, देशातील आता शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया येत्या दोन दिवसात संपेल आणि प्रतीक्षा असेल ती २३ तारखेला लागणाऱ्या लोकसभा निकालाची. मात्र लोकसभेचा निकाल लागल्यानंतर लगेचच १०-१२ दिवसांनी पावसाळा सुरु होणार आहे. साधारण ४ महिन्यांचा पावसाळ्याचा सीझन संपताच साधारणपणे ऑक्टोबरच्या आसपास राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
बिंग फुटलं? राज्यात भाजपच्या मदतीसाठीच वंचित बहुजन आघाडीची स्थापना: प्रवक्ते मिलिंद पखाले
भारतीय जनता पक्षाला निवडून आणण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीची स्थापना, करण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते मिलिंद पखाले यांनी केला असून पूर्व विदर्भातील पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या भारिप’ला सोडचिट्ठी देत असल्याचे जाहीर केले.
6 वर्षांपूर्वी -
आधार मनसे टॅंकरचा, उद्धव ठाकरे परदेशात तर मुख्यमंत्र्यांचं मोबाईलवर दुष्काळ निवारण
सध्या ग्रामीण महाराष्ट्रात ऐतिहासिक दुष्काळ पडला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील दुष्काळ दौऱ्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तर राज ठाकरे यांची मनसे अनेक गावांमध्ये पाण्याच्या समस्येतून सुटका करण्यासाठी गावकऱ्यांना शक्य ती मदत करत आहेत. वाढलेली उष्णता आणि दुष्काळाला तोंड देत आसलेल्या उस्मानाबादची तहान मनसेचा टॅंकर भागवताना दिसतोय.शहरातील पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या लोकांना या टॅंकरचा चांगलाच आधार होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
शुक्रवारी मनसेचा ठाण्यात शेतक-यांसाठी महामोर्चा, राज्यभरातून शेतकरी घेणार सहभाग
ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये आंब्याच्या स्टॉलवरून मोठा राडा झाला होता. त्यात कोकणातील सामान्य शेतकऱ्याचा आंब्याचा स्टॉल हटवण्यासाठी आलेल्या भाजपच्या ठाणे जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवकाला चोप देण्यात आला होता. त्यात काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे महाराष्ट्रातील मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी देखील सदर विषयाला अनुसरून प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जर फायदा थेट शेतकऱ्यांना होत असेल तर मुळात पक्षीय मतभेद येतातच कसे असा प्रतिप्रश्न उपस्थित करत भाजपच्या त्या विरोधाला प्रतिउत्तर दिलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
राज्य होरपळतंय दुष्काळात आणि लोकसभेत भाषणं ठोकून उद्धव ठाकरे परदेशात?
सध्या महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ लोटला आहे. विशेष म्हणजे दुष्काळाची तीव्रता ही ऐतिहासिक असल्याचं म्हटलं जात आहे. लोकसभेच्या प्रचारात मोठं मोठी भाषणं ठोकून सत्तेत असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब परदेश दौऱ्यावर गेले असले तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वतः राज्यातील दुष्काळाचा आढावा घेताना दिसत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणतंही सत्ताकेंद्र स्वतःकडे नसताना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकाराने ग्रामीण भागात शक्य इथे टँकरने पाणी पोहोचवत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना नगरसेवक गोरख जाधव यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल
स्वतःच्या विभागात काम सुरु ठेवण्यासाठी ठेकेदाराकडे टक्केवारीची मागणी केल्याच्या आरोपाखाली शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात शिवसेनेवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. गोरख जंगलीराम जाधव (२६) असे या त्या नगरसेवकाचे नाव असून, तो कल्याण-कसारा मार्गावरील आंबिवली रेल्वे स्टेशन नजीकच्या अटाळी गावात राहणारा आहे.
6 वर्षांपूर्वी -
राधाकृष्ण विखेंच्या विविध संस्थांमधील घोटाळ्याप्रकरणी भावाचे उपोषण?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सध्या भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विरोधात त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. अशोक विखे हे उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, विखे-पाटील कुटुंबियांच्या अधिपत्याखालील विविध संस्थांमधील अनेक प्रकरणांच्या चौकशीची मागणी डॉ. अशोक विखे यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन पाठवून येत्या २० मे रोजी लोणी प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुतळ्यासमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ठाणे: भलं शेतकऱ्यांचं होतंय, मग यात पक्षीय राजकारण कसलं आणताय? राज ठाकरे
मागील काही दिवसांपासून ठाण्यात आंबा स्टॉलवरुन झालेल्या राड्याचा राज्यभरात चांगलाच गाजावाजा झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या राड्यावर भाष्य करत भारतीय जनता पक्षालाच प्रतिप्रश्न केला आहे. कॅनडाचे नागरिक अक्षय कुमार यांनी पंतप्रधानांना एक प्रश्न विचारला होता. आंबा कापून खायचा की चोखून खायचा? यावर आमच्या लोकांनी तो चोपून खाल्ला असा चिमटा यावेळी भाजपाला काढला आहे. ठाण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
अजित पवारांनी आझाद मैदानात घेतली आंदोलक मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांची भेट
राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात जोरदार आंदोलन छेडलं आहे. एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद केलेल्या मराठा समाजाच्या २५० विद्यार्थ्यांचं भविष्य सध्या सरकारच्या गलथान कारभारामुळे अंधारात आहे. या विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळण्याचा हक्क फडणवीस सरकारला कोणी दिला? असा सवाल रोखठोक अजित पवार यांनी प्रसार माध्यमांकडे उपस्थित केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
'मोदी देशात दुफळी निर्माण करणारे नेते' या बातमीवर रावसाहेबांनी ट्विट केलं 'पूर्ण जगात मोदी साहेबांचा डंका'
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले होते. परंतु यावेळी नरेंद्र मोदींचा मुखपृष्ठावरील फोटो हा सकारात्मक लेखासंदर्भात नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘टाइम’ने थेट दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता असा केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी हिंदुत्वावर आधारित राजकारण करत असल्याने देशात ध्रुवीकरण झाल्याचा आरोप मोदींसंदर्भात लेख लिहिणाऱ्या आतिश तासीर यांनी प्रसिद्ध केला होता.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा