महत्वाच्या बातम्या
-
मराठा विद्यार्थ्यांचे खच्चीकरण थांबवा: आमदार नितेश राणे
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत यंदा मराठा आरक्षण लागू होणार नाही, यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. या निर्णयानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाने वैद्यकीय प्रवेशात मराठा विद्यार्थ्यांचे खच्चीकरण थांबवा, अन्यथा मराठा समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशारा मराठा महासंघाने पत्रकाद्वारे दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पनवेल: मनसे कार्यकर्त्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना अटक
पनवेल मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी त्यांच्या ७ ते ८ गुंड साथीदारांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने ३ आरोपींना अटक केली आहे. मयूर चिपळेकर, किरण सोलंकर, तेजस म्हात्रे अशी त्यांची नावे आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण: निवडणुकीपूर्वी लाडू भरवणारे हेच ते नेते वैद्यकीय प्रवेश गोंधळानंतर गायब
निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणावर मार्केटिंग करून श्रेय घेणारे आणि एकमेकांना केमेऱ्यासमोर लाडू भरवत स्वतःची पाठ थोपटून घेणारे हे भाजप आणि शिवसेनेचे मंत्री आणि आमदार सध्या मराठा समाजातील मुलांच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेपासून लांब आहेत. सध्या मराठा समाजातील विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत प्रचंड अडचणींचा सामना करत आहेत आणि सत्ताधाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेल्फ डिफेन्सचे धडे घेताघेता शिवसेनाच अक्षयच्या डिफेन्समध्ये, त्याची कॅनडीयन नागरिकत्व तांत्रिक बाब
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर भाष्य करतानाच अभिनेता अक्षय कुमारचे नागरिकत्वाच्या मुद्दावरुनही समर्थन केले आहे. अक्षय कुमार हा अस्सल हिंदुस्थानी आहे. त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वाचा विषय ही एक तांत्रिक बाब आहे.
6 वर्षांपूर्वी -
अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली आहे. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा कायदेशीर आणि प्रशासकीय अडसर दूर झाला. पुढील तीन दिवसांत अजोय मेहता अधिकृतपणे पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. येत्या सप्टेंबरमध्ये अजोय मेहता निवृत्त होणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा मतमोजणीच्या दिवशी मोबाईल टॉवर बंद करा अन्यथा जॅमर बसवा; मनसेची मागणी
व्हीव्हीपॅटच्या मोजणीसंदर्भात विरोधी पक्षांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. याची विरोधी पक्षांकडून प्रचंड नाराजी वर्तवली जात आहे. दरम्यान लोकसभा मतमोजणी प्रक्रिया ही पारदर्शी व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने देखील सरसावली आहे. लोकसभा मत मोजणीच्या दिवशी ठाण्यातील मोबाईल टॉवर बंद ठेवावेत अन्यथा मतमोजणी केंद्रामध्ये जॅमर बसवावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे जिल्ह्यातील निवडणूक आयोगाच्या जिल्हाधिका-यांना पत्राद्वारे केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
#सेव-फार्मर्स-फ्रॉम-फडणवीस : शेतक-यांसाठी नेटकरी मुख्यमंत्र्यांविरोधात एकवटले
दुष्काळाने महाराष्ट्र होरपळून निघत आहे, हंडाभर पाण्यासाठी गावकरी जीवाचे रान करत आहेत, अशा परिस्थितीसमोर हतबल होऊन अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. दरम्यान, महाराष्ट्रात युती सरकारच्या काळात सर्वाधीक शेतक-यांनी आत्महत्या केल्या असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला. त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी व्हावी तसेच शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी नेटकरी एकवटले असून समाज माध्यमांवर SaveFarmersFromFadnavis ही हॅशटॅग मोहिम राबवण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण; वैद्यकीय शिक्षण प्रवेशाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला ‘एसईबीसी’ प्रवर्गातर्गत दिलेले आरक्षण रद्द करण्याबाबत काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पदव्युत्तर वैद्यकीयचे आतापर्यंत किती प्रवेश झाले याची सविस्तर आकडेवारीची माहिती सादर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आज गुरुवारी होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंनी मला एकत्रित काम करण्याची ऑफर दिली होती, नारायण राणेंचा गौप्य्स्फोट
मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष, माझी शिवसैनिक नारायण राणे यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले असून त्यातून वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. खुलासे म्हणण्यापेक्षा विवादित खुलासे म्हणायला काही हरकत नाही, त्यास कारण देखील तसेच आहे. त्यांच्या आत्मचरित्रातून बराचसा इतिहास उलगडला आहे, हा इतिहास फार कमी लोकांना माहित आहे.
6 वर्षांपूर्वी -
उमरेड नगरपरिषदेतील भाजप नगरसेवक मनोज बावनगडे यांचा मनसेत प्रवेश
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच भाजपाला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक महानगरपालिका, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदांवर भाजपचे वर्चस्व असून देखील नगरसेवकांनी पक्षाला रामराम करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे उमरेड नागरपरिषदेतील भाजपचे विद्यमान नगरसेवक मनोज बावनगडे यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह मनसेत जाहीर प्रवेश केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अनधिकृत बांधकाम; शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक
एका स्थानिक घराची बेकायदा उंची वाढवण्याच्या कामाची तक्रार करु नये म्हणून तक्रारदाराकडे २५,००० रुपयांची मागणी स्थानिक शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर याने केली होती. अखेर 10 हजारांवर तडजोड झाली आणि ती रक्कम मध्यस्थामार्फत घेतल्याप्रकरणी त्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यस्थासकट अटक केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
दुष्काळी उपाययोजनांसाठी निवडणूक आयोगाकडून आचारसंहीता शिथिल
महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली होती. सदर मागणी निवडणूक आयोगाने विषयाचे गांभीर्य लक्षात मान्य केली आहे. दुष्काळी उपाययोजनांसाठी महाराष्ट्रातील आचारसंहीता शिथील करण्यात आली असल्याचे निवडणूक आयोगाने आज दुपारी जाहिर केले.
6 वर्षांपूर्वी -
मोबाईल टॉवरद्वारे EVM टेम्परिंग होऊ शकतं, जॅमर बसवा: अशोक चव्हाण
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मोबाईल टॉवरद्वारे ईव्हीएम टेम्परिंग होण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे. तसेच भारतीय निवडणूक आयोगाने या क्षेत्रात मोबाईल जॅमर बसवावे, अशीही मागणी त्यांनी केली. याबाबत त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
6 वर्षांपूर्वी -
व्यंगचित्रकार जुलमी राजवट उलथवून लावू शकतो : राज ठाकरे
जागतिक स्तरावर आज व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जात आहे. व्यंगचित्रातून विरोधकांचा समाचार घेणारं परिचित राजकीय व्यक्तिमत्व असलेले राज ठाकरे यांनी आपल्या खास ठाकरे शैलीत व्यंगचित्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात भावना व्यक्त करताना, व्यंगचित्रकारात एखादी जुलमी राजवट उलथवून लावण्याची क्षमता असते अशी प्रतिक्रिया व्यक्त करत विद्यमान सरकारला टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
आनंदराज आंबेडकर यांचं काँग्रेसप्रवेशाचं वृत्त चुकीचं; ट्विट'करून खुलासा
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. दरम्यान, आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं वृत्त काही इंग्रजी प्रसार माध्यमांनी दिलं होतं. परंतु अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही.
6 वर्षांपूर्वी -
पुरावे! मनसेने नाही तर गंभीरने ते फोटो अर्धवट माहितीवर ट्विट करून अफवा पसरवल्या होत्या
सध्या मनसे आणि भाजपमध्ये पुन्हा ट्विटर वॉर सुरु झाले आहे. भावनिक विषयांना पुढे करून राजकारण करणारी भाजप स्वतःच्या अर्धवट ज्ञानातून पून्हा तोंडघशी पडली आहे असंच म्हणावं लागेल. त्यात भर म्हणजे काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या लाव रे व्हिडिओ मोहिमेला प्रतीउत्तर देताना अनवेरिफाईड अकाउंटचा आसरा घेत स्वतःचा बचाव केला होता आणि राज ठाकरे यांनी भाजपच्या अधिकृत अकाउंटचा पुरावा द्यायला हवा होता असं म्हटलं होत.
6 वर्षांपूर्वी -
मनसेच्या काळातील बोटॅनिकल गार्डनमुळे पालिकेला मिळतो ३ महिन्याला ४० लाखाचा महसूल
सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक महापालिकेतील सत्ताकाळातील महत्व नाशिकरांना देखील जाणवत असेल असं चित्र आहे. मधील २-३ वर्षांपासून भाजपचा सत्ताकाळ अनुभवणाऱ्या नाशीकरांना ते महत्व पटणे सुद्धा महत्वाचे आहे. दरम्यान, राज ठाकरे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने दिलेली आश्वासने आणि मोदी-शहांची वक्तव्ये यांचा स्क्रीन वर लेखाजोखा मांडत होते आणि भाजप तोंडघशी पडत होती. सध्या नाशिकच्या न केलेल्या विकासाचा व्हिडीओ” अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत आणि भाजप वारंवार तोंडघशी पडत आहे आणि नाशिक दत्तक घेणारे फडणवीस लोकसभेच्या प्रचारात भाषणबाजी करून पुन्हा दिसेनासे झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
फायदा भाजपला होणार मग तो खर्च भाजपच्या नावावर टाका, नेटिझन्सची तावडेंवर टोलेबाजी
राज ठाकरेंनी घेतलेल्या सभांचा आम्हाला फायदा झाला, असे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. त्यामुळे राज्यातील ४८ पैकी ३७ ते ४० जागा आम्ही जिंकू असा दावा तावडे यांनी केला होता.
6 वर्षांपूर्वी -
शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले, मुंबईत आमदारांची बैठक बोलावली
लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपल्यानंतर आता एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं वृत्त आहे. शरद पवार यांनी ४ मे रोजी मुंबईमध्ये पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच वरून राजाचं आगमन होणार असून, त्या काळात पक्ष विस्ताराची कामं हाती घेणं कठीण काम असतं. त्यात पावसाचा ३-४ महिन्याचा कालावधी संपताच लगेचच विधानसभा निवडणूक लागणार असल्याने सर्वच पक्ष आतापासूनच तयारीला लागतील असं म्हटलं जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
'ते' दत्तक गाव मुख्यमंत्र्यांच, तर दुष्काळात मदतीची जवाबदारी स्वीकारली मनसेने
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील दत्तक घेतलेल्या त्रंबकेश्वर येथील बर्डेवाडी (खोडाला तालुका) येथील दुष्काळामुळे ओढवलेलं वास्तव लाव रे तो व्हिडिओ म्हणत जनतेसमोर मांडलं होतं. दरम्यान या गावातील महिला चक्क खोलवर विहिरीत उतरून हंडाभर पाण्यासाठी जीव मुठीत टाकत असल्याचं वास्तव अनेक वृत्त वाहिन्यांच्या विशेष वृत्तात समोर आलं होतं.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL