महत्वाच्या बातम्या
-
तावडेंनी हे का लपवलं? स्वतःवरील घोटाळ्याच्या आरोपासंबंधित बातम्या त्या पाकिस्तानी वेबसाईटवर आहेत
भारतीय जनता पक्ष समर्थकांनी एका फेसबूक पेजवर चिले कुटुंबियांचा फोटो त्यांना न विचारताच वापरत मोदी सरकारचे लाभार्थी म्हणून झळकवले असल्याची पोलखोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. मात्र या सगळ्याबाबत प्रतिक्रीया देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे, चिले कुटुंबियांचा पाकिस्तानशी थेट संबंधच जोडला.
6 वर्षांपूर्वी -
पालघर लोकसभा: बहुजन विकास आघाडीच्या जाहिरातीत विकासाच्या मुद्यांवर भर
पालघर लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराचे केवळ २ दिवस शिल्लक राहिले आहेत. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वात मोठा फटका बहुजन विकास आघाडीला बसला तो आयत्यावेळी विरोधकांनी पक्ष चिन्हावरून केलेलं राजकारण असंच म्हणावं लागेल. मात्र संपूर्ण पट्ट्यात कार्यकर्त्यांचं उत्तम जाळं असल्याने त्याचा फारसा परिणाम होणार नाही असं प्रथम दर्शनी दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज राज ठाकरेंची तोफ नाशकात धडाडणार, दत्तक नाशिकची पोलखोल होणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नाशिक शहरात जाहीर सभा होत आहे. शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर सभा होणार असून राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या सभेनंतर दुसर्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची सभा होत असल्याने राज ठाकरे जहरी शब्दात टीका करतात की, नरमाईची भूमिका घेतात याविषयीची उलट-सुलट चर्चा शहरात सुरू आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात आज प्रचाराचा धडाका, मोदी मुंबईत तर राहुल गांधींची संगमनेरमध्ये सभा
लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता शनिवारी होणार आहे. त्याआधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ मुंबईत धडाडेल. तर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची शिर्डी मतदारसंघातील संगमनेरमध्ये सभा होणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेले काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील मोदींच्या मुंबईतील सभेत उपस्थित राहतात का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: राज यांचं पाकिस्तानशी नातं काय विचारणारे तावडे तुलसी जोशींच्या उत्तराने तोंडघशी
काल मुंबई भांडुप येथे राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी देखील राज ठाकरे यांनी मोदींना विशेष लक्ष केलं. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेत पुन्हा तेच भाजप समर्थकांच्या फेसबुक पेजवरील जाहिरातीतील कुटुंब पुन्हा समोर आणण्यात आलं आणि त्यांनी अधिक खुलासा देखील केला.
6 वर्षांपूर्वी -
सेनेचे डझनभर मंत्री कुचकामी, आता उद्धव ठाकरेंकडून शहिदांच्या नावाने मतांचा जोगवा
यापूर्वी भाजपचे नेते आणि विशेष करून मोदी आणि अमित शहा शहीद जवानांच्या नावाने मतं मागत होते. आता सत्तेत डझनभर मंत्री असताना देखील सामान्य जनतेसाठी कुचकामी ठरल्याने हबल होऊन उद्धव ठाकरे देखील भर सभांमधून शहीद जवानांच्या नावाने मतं मागत आहेत. महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ कल्याण येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सैनिकांच्या नावे मताचा जोगवा मागितला आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनी ईडीला घाबरुन औरंगजेबास मुजरा घातला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम्ही ग्रामपंचायतीचे-जिल्हापरिषदचे सदस्य नाहीत, आमदार-खासदार-मंत्री काहीच नाही मग तुमच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून? ईडीला घाबरुन तुम्ही औरंगजेबास मुजरा घातला. अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना केला. ईडीची पिडा टाळण्यासाठीच तुम्ही औरंगजेबास मुजरा केला. इतकंच नाही तर जय गुजरातही म्हणून आले अशी टीकाही मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या लोकांना भाजप सरकार त्रास देत आहे? मनसेचा आरोप
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सभा महाराष्ट्रभर नाही तर देशभर गाजत आहेत. एक वेगळ्याच प्रकारे व्हिडिओ प्रेझेंटेशन देऊन राज ठाकरे सध्या भाजप सरकार तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहांची पोलखोल करत आहेत. या पोलखोल दरम्यान राज ठाकरेंनी बरेचसे व्हिडिओ दाखवले आहेत आणि या व्हिडिओ मधून बरेचसे चेहरे महाराष्ट्राला नव्याने कळले.
6 वर्षांपूर्वी -
जालन्यातील टाकळी अंबड येथे दीड तासापासून मतदान यंत्र बंद, मतदार निघून गेले
महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण १४ मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. दुपारी उन्हाचा ताप टाळण्यासाठी सकाळी-सकाळी मतदान केंद्रावर गेलेल्या मतदारांना अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिन्स बंद पडल्याने ताटकळत रांगेत उभे रहावे लागले. यामुळे अनेकजण मतदान न करताच घरी निघून गेले गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
पालघर: नारायण सावरा यांचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा, स्वतः प्रचारात उतरणार
लोकसभा निवडणुका जाहीर होताच पालघरमध्ये सुद्धा स्वतःच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ सर्वच पक्षांमध्ये जोरदार रस्सी खेच सुरु झाली आहे. त्यासाठी निरनिराळा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि सामाजिक प्रस्त म्हणून संबंधित समाजात विशेष स्थान असलेल्या व्यक्तींना स्वतःकडे खेचण्याचा सर्वच पक्षाच्या नेत्यांचा प्रयत्न असतो. संपूर्ण पालघर जिल्ह्यात कातकरी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि हा समाज निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावतो.
6 वर्षांपूर्वी -
अल्बम मध्ये नाचणा-यांनी मला सांगू नये; राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरुन एकमेकांची खिल्ली उडवण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार न उभे करता मोदींना आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात प्रचाराचं जोरदार रणशिंग फुंकलं आहे. त्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर बोचऱ्या भाषेत टीका करताना बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणून राज यांची खिल्ली उडवली होती. परंतु फडणवीसांच्या या टीकेची राज ठाकरे यांनी त्याहीपेक्षा बोचरी टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
२०१४ ला भाजपने माझ्या सभांचा खर्च केला होता का? राज यांचा भाजप नेत्यांना सवाल
मुंबई: नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीला भारतीय राजकारणाच्या पटलावरून घालवण्यासाठी राज ठाकरेंनी महाराष्ट्रात सभांचा झंझावात सुरु केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचा एकही उमेदवार उभा नाही तरीही राज ठाकरे महाराष्ट्रात प्रमुख शहरांमध्ये सभा घेऊन भाजपच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
नोटाबंदीचे श्राद्ध घालणारी शिवसेना आज मोदींच्या एवढ्या प्रेमात का? सोशल व्हायरल
८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केली होती. नोटबंदी जाहीर झाल्यानंतर भारतातील सामान्य माणूस थोडा आनंदी आणि थोडा त्रासलेला दिसला. आनंदी यासाठी कि भारतातला श्रीमंतांकडे असलेला काळा पैसा बाहेर येईल असं त्यांना वाटलं होतं, आणि त्रास यासाठी कि लोकांना तासंतास फक्त २००० रुपयांसाठी रांगेत उभे रहावे लागले.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या सभेत सापांची भीती, कांद्याचा पाऊस नाही पडला म्हणजे मिळवलं
नाशिक: आज दिनांक २२ एप्रिल रोजी नरेंद्र मोदींची दिंडोरी नाशिक येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा आहे. मोदींची सभा ज्या मैदानावर होणार आहे ते मैदान ६०० एकरवर पसरलेले आहे. संपूर्ण मैदान जरी सभेसाठी वापरले जाणार नसले तरी मैदानाचा बराचसा भाग मात्र वापरला जाणार आहे. या मैदानाची पुरेपूर स्वच्छता करण्यात येईल अशी माहिती आहे.
6 वर्षांपूर्वी -
काय उखडायची ती उखडा! शरद पवारांचे अमित शहांना आक्रमक उत्तर
बारामती येथील सभेत शरद पवार म्हणाले, मला पद्मविभूषण देणारे, माझं बोट धरून राजकारणात आलोय असं म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांनी काय केले म्हणून विचारतात हे हस्यास्पद आहे. हे सरकार सैन्याच्या शौर्याचे श्रेय स्वत: घेत आहेत. अभिनंदनची सुटका माझ्यामुळे झाली असं सांगत पंतप्रधान मोदी ५६ इंचाची छाती दाखवतात पण मग आपला कुलभूषण जाधव कित्येक वर्ष पाकिस्तानात का आहे. त्याला सोडवताना मात्र याच पंतप्रधानांची छाती एकदम १२ इंचाची कशी काय होते?
6 वर्षांपूर्वी -
शिवाजी कर्डिलेंचे कार्यकर्ते जावईबुवा जगतापांच्या पाठिशी
नगर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. काँगे्रसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील हे भाजपामधून उभे आहेत. मात्र त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप हे भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत.
6 वर्षांपूर्वी -
'माऊ' म्हणजे मांजर नाही तर 'माननीय उद्धव ठाकरे': हितेंद्र ठाकूर
पालघर पोटनिवडणुकी दरम्यानच्या स्वपक्षीय तसेच मित्रपक्षांच्या कार्यपद्धतीवर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्याच्यासमोरच शाळा घेत खंत व्यक्त केली. तसेच त्यांच्यासमोरच तुम्ही विकले गेला होतात की नाही असा रोखठोक प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, जर मित्रपक्षांची लायकी होती तर मतं कमी पडली असा प्रश्न देखील त्यांच्यासमोरच विचारला.
6 वर्षांपूर्वी -
२३ तारखेला कोणाच्या चड्डी उतरतील ते समजणार आहे; पवारांना मुख्यमंत्र्यांचा टोला
पराभव समोर दिसत असल्यामुळेच एनसीपीचे अध्यक्ष शरद पवारांचा तोल सुटत चालला आहे. शरद पवार म्हणाले होते, भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यामुळे आता चड्या घालून मांड्या दाखवू नका. पण, इथे तर फुल पॅन्ट आहे. तुम्हीच या चड्डीवाल्यांच्या सपोर्टवर मुख्यमंत्री झाला होता, हे मात्र विसरू नका. कारण, येथे २३ तारखेला कोणाच्या चड्डी उतरतील ते समजणार आहे, असे टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या सभेत विनोद-थट्टा होते, मुद्द्यांमध्ये काही दम नसतो: पियुष गोयल
महाराष्ट्रात लोकसभेच्या अनुषंगाने विविध भागांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीर सभा होत असून याचा संपूर्ण खर्च काँग्रेस आणि अंशी[एनसीपीच्या प्रचारखर्चात टाकायला हवा, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन्ही पक्षांसाठी सरोगेटेड प्रचार करत आहे, अशी खरमरीत टीका देखील त्यांनी केली. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका करताना महाराष्ट्रात ४० ते ४२ जागा भारतीय जनता पक्षाला मिळतील, असा दावा देखील केला.
6 वर्षांपूर्वी -
प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला पुणेकरांचा अल्पप्रतिसाद
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्वपक्षीय नेत्यांचा सभांचा धडाका सुरु असून वंचित बहुजन आघाडीचा देखील प्रचार जोमात सुरु आहे. परंतु, पुण्यात शनिवारी सकाळी प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला लोकच जमली नाहीत. यासभेला फारशी गर्दी झाली नव्हती. मैदानातील खुर्च्या मोठ्या प्रमाणावर रिकाम्याच होत्या. संध्याकाळी याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी सभा होणार असून या सभेला तरी पुणेकर येतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON