महत्वाच्या बातम्या
-
अजब! स्वतःच राज्य सोडून गुवाहटीला पळाले | आता म्हणतात उद्धव ठाकरेंनी आम्हाला सोडलं
शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्रता ठरवण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी या प्रकरणी नोटीसही बजावली आहे. या नोटिशीविरोधात शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 11 जुलै रोजी आहे. तर, दुसरीकडे विधानसभा उपाध्यक्षांनी बजावलेल्याा नोटिशीविरोधात आपलं म्हणणं मांडण्यासाठी 12 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेत अपात्रतेला आव्हान देण्यासह पक्ष विधीमंडळ गटनेता आणि प्रतोदाला मान्यता देण्याचा मुद्दा आहे. तत्पूर्वी दोन्ही बाजूने राजकीय टीकास्त्र सोडलं जातं आहे.
3 वर्षांपूर्वी -
बहुमत सिद्ध करण्याचे आदेश | शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात संध्याकाळी ५ वाजता सुनावणी
राज्यपाल याच दिवसाचा विचार करत होते. ही कायदेशीर कारवाई आहे. १६ आमदारांच्या निलंबनाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात . ११ तारखेपर्यंत पेंडिंग असल्याने कोणताही निर्णय होऊ शकत नाही. या काळात काही बेकायदेशीर काम झालं तर आमच्याकडे या, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. राज्यपाल भवन आणि भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहेत. आमचे लोक सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मागतील, आजही आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेकडून याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
राज्यपाल याच दिवसाचा विचार करत होते. ही कायदेशीर कारवाई आहे. १६ आमदारांच्या निलंबनाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात . ११ तारखेपर्यंत पेंडिंग असल्याने कोणताही निर्णय होऊ शकत नाही. या काळात काही बेकायदेशीर काम झालं तर आमच्याकडे या, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. राज्यपाल भवन आणि भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहेत. आमचे लोक सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मागतील, आजही आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करा | राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना आदेश जारी | आता पुढे काय?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत मोठी बातमी आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकार यांनी बहुमत गमावले, असे मानले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (गुरुवारी) बहुमत सिद्ध करा, असे निर्देश राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला दिले आहेत. त्यामुळे गुरुवारचा दिवस ठाकरे सरकारसाठी निर्णायक ठरणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
कायदेतज्ञांचा सल्ला आणि अनेकांच्या आमदारकी जाण्याची भीती | लवकर फ्लोअर टेस्टच्या मागणीसाठी फडणवीस राजभवनावर
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वीच राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहचले आहेत. उद्धव ठाकरे सरकारविरोधात त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी बंड पुकारलं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या ५१ आमदारांनी बंड पुकारलं आहे तसंच आम्ही पाठिंबा काढणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीसच ईडी कारवायांच्या याद्या दिल्लीत देतात | विरोधकांना त्रास देण्यासाठी तेच ईडी ऑपरेट करतात
दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या राजकीय कारस्थानाचे सूत्रधार हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. फडणवीस दर दोन दिवसांआड दिल्लीत येतात, अमित शाहा आणि जे पी नड्डा यांची भेट घेतात. इथे पुढची रणनीती आखतात. ईडीचं कायरायचं, ईडीच्या याद्या देतात. कुणावर काय कारवाी करायची, कुणावर कसा दबाव टाकायचा, हे ठरवतात. मग साधनसामुग्रीची व्यवस्था करतात. दर दोन दिवसांनी ते हे करतात, त्यामुळे तेच याचे सूत्रधार आहेत, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. याच मालिकेत आज बैठका झाल्या असतील, उद्या परवा पुन्हा बैठका होतील, असेही चव्हाण म्हणालेत.
3 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंनी प्रचार-मेळाव्यातून टीकेचा सपाटा लावताच शिंदेंचा जळफळाट? | पहिल्यांदाच दिलं प्रतिउत्तर
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सामना अत्यंत रंगतदार आहे. महाराष्ट्रात सतनाटय़ाचा हा आठवा दिवस आहे. महाविकास आघाडी सरकारचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक क्षणाला नवनव्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आपण राजीनामा देणार नाही, यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्याला मंत्रिमंडळाचाही पाठिंबा आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला?
गुवाहाटीत आलेले कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत ते सांगावं. कारण असं काहीही नाही. आम्ही सगळे एक आहोत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आज रॅडिसन ब्लू हॉटेलच्या बाहेर पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. जर उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात कुणी असेल तर त्यांनी नावं सांगावीत असं थेट आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात
एकनाथ शिंदे हे गेल्या सात दिवसांपासून गुवाहाटी येथे वास्तव्यास आहेत. आज सातवा दिवस असून, भाजपच्या गटाने जोर धरला आहे. दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. मुंबईहून एक खासगी विमान दिल्लीकडे रवाना झालं आहे. महाराष्ट्रातील सत्तेच्या नाट्यावर नवी दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हं आहेत. विशेषत: सर्वोच्च न्यायालयाचे वकील महेश जेठमलानी हे फडणवीस यांच्यासोबत आहेत. महेश जेठमलानी हे राम जेठमलानी यांचे पुत्र आहेत.
3 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदे गट कायदा आणि घटनात्मक चौकटीत फसतोय | शिंदे भाजप नेत्यांसोबत बैठकीसाठी दिल्लीत
एकनाथ शिंदे गट सध्या गुवाहाटीमध्ये आहे. त्यांचा मुक्कामही जुलै महिन्यापर्यंत वाढवण्यात आला आहे. शिंदे गट आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीत तळ ठोकून आहे. एकीकडे तज्ज्ञांनी दावा केल्याप्रमाणे शिंदे गट भाजप किंवा प्रहार संघटनेत सामील होऊ शकत नाही. तर दुसरीकडे शिंदे गटाला स्वतंत्र मान्यता मिळू न शकल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांना या 'गेम प्लॅन' पासून ठेवलंय अंधारात | शिंदे आणि भाजपचा गेम प्लॅन बाहेर येतोय
विधान परिषदेच्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २१ जून रोजी एकनाथ शिंदे यांनी बंड केले. या बंडखोरीमुळे राज्यात आणि महाविकास आघाडीत प्रचंड उलथापालथ झाली आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहोत, असे सांगून एकनाथ शिंदे गट बाहेर पडला असल्याने सरकार तसेच शिवसेना पक्ष वाचवण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. हिंदुत्वासाठी आम्ही पुढे आलो आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | सत्तेसाठी जिवलगांचीही चिंता नाही? | पत्नीला इस्पितळात सोडून संजय राठोड गुवाहाटी गेले
शिवसेनेविरोधात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय अराजक निर्माण झालं आहे. शिंदे यांनी तब्बल ३५ पेक्षा अधिक शिवसेनेचे आमदार फोडल्यानं आता ठाकरे सरकार कोसळणार ही शक्यता दाट झाली आहे. एकनाथ शिंदे यांची आवश्यक असलेल्या आमदारांची बेरीज जवळपास जुळली असल्याचं दिसत असून आता मुख्यमंत्री काय करणार याकडेच महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
ईडी कारवायांमध्ये अडकलेल्या नेत्यांसोबत भाजपची मतांसाठी सेटलमेंट | भाजपाचा चेहरा उघड होतोय?
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषद निवडणुकीचं वारं वाहत आहे. येत्या २० तारखेला १० जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात मताची जुळवाजुळव सुरु आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याच विधान परिषद निवडणुकीवरुन विरोधकांवरती गंभीर आरोप केले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Recruitment 2022 | एमपीएससी'मध्ये 1085 पदांची भरती | याच पदांच्या भरतीसाठी तरुण वाट पाहतात
एमपीएससी’कडून १०८५ विविध पदांसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 17 जून 2022 रोजी किंवा त्यापूर्वी एमपीएससी भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता, प्रवर्गनिहाय पदांचा तपशील, भरती प्रक्रिया यासारख्या पात्रतेचा तपशील आवश्यक आहे आणि आणखी बरीच माहिती खालील लिंकवर दिली गेली आहे जी पदाच्या तळाशी ठेवली गेली आहे आणि एमपीएससी भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा.
3 वर्षांपूर्वी -
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडून ईडी कारवायांचा वापर? | बविआ भाजपला मतदान करणार? | विवा ग्रुपवरील ती कारवाई
राज्यसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडीने निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले. प्रस्ताव, चर्चा, बैठका यांचं सत्र शुक्रवारी (३ जून) दिवसभर रंगलं. मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत काहीही ठोस पर्याय निघाला नाही. त्यामुळे निवडणूक होणारच हे स्पष्ट झालं. मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांनी खरंच देवेंद्र फडणवीस यांच्यावर कधीही विश्वास ठेवावा का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कारण फडणवीसांचं ‘स्क्रिप्टेड राजकारण’ महाविकास आघाडी विरोधात आधीच ठरलेलं असतं आणि तीच फडणवीस नीती ते भाजपमधील अनेकांचं महत्त्व संपुष्टात आणण्यासाठी ‘गुप्तपणे’ वापरतात. पंकजा मुंडे हे त्याचंच उदाहरण म्हणावं लागेल.
3 वर्षांपूर्वी -
अंबाबाई देवी आणि श्री हनुमान आशीर्वाद महाविकास आघाडीच्या उमेदवाराला | भाजपच्या धार्मिक प्रचाराला कोल्हापुरात धक्का
कोल्हापूर उत्तरेच्या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपच्या उमेदवाराला निकालामध्ये धोबीपछाड दिल्याचं आकडेवारीतून सिद्ध झालं आहे. भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांचा महाविकास आघाडीने दणदणीत पराभव घडवून आणताना भाजपच्या धार्मिक प्रचाराला मोठा धक्का दिला आहे. इथल्या मतदाराने मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीच्या उमेदवारावरील विश्वास मतपेटीतून व्यक्त केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोदींसाठी पुण्यात भाजपचे इव्हेंट मार्केटिंग | विद्यार्थी रविवारी सुद्धा युनिफॉर्ममध्ये शाळेत | नेटिझन्सकडून टीका
आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन झालं आहे. सुरुवातीला पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण झालं. त्यानंतर MIT कॉलेजमध्ये मोदींची सभा पार पडली.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra School Reopening GR | राज्यात 1 डिसेंबरपासूनच शाळा सुरु होणार | राज्य सरकारचा GR
ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा नेमक्या कधी सुरु होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता राज्यातील शाळा येत्या 1 डिसेंबरपासूनच सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा शासन निर्णय जारी (Maharashtra School Reopening GR) करण्यात आलाय
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra School Reopen | इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत सर्व शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार
1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीच्या शाळाही सुरू होणार आहेत. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टरांच्या टास्क फोर्सने यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय आज कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. लवकरच शाळा सुरू केल्या जातील असे संकेत राजेश टोपे यांनी दिले होते. आता त्याच प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भातली नियमावली लवकरच जाहीर (Maharashtra School Reopen) केली जाणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra School Reopen | इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार | आरोग्य विभागाची परवानगी
राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाची कोणतीही अडचण नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय होईल. येत्या 10 दिवसात याबाबत निर्णय होईल, असही (Maharashtra School Reopen) राजेश टोपे म्हणाले.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL