महत्वाच्या बातम्या
-
VIDEO: मोदी'लाटे पुर्वी विधानपरिषदेसाठी कृष्णकुंजचे उंबरठे झिजवले, आज आव्हान?
रंग शारदामध्ये नेहमी नाटकाचे प्रयोग होतात तसाच १ नाटकाचा प्रयोग काल झाला आणि तो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेला पदाधिकारी मेळावा अशी टीका राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. पुढे ते असेही म्हणाले मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंचा उल्लेख बारामतीचा पोपट असा केला होता आणि ते अधोरेखित करणारे त्यांचे आजचे भाषण होते.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हटवण्यासाठी प्रचार करा, असे आदेश काल दिल्यानंतर आज लगेचच मनसेप्रमुखराज ठाकरे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. राज ठाकरे यांनी पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. राज ठाकरे आणि शरद पवार यांची गेल्या काही महिन्यांपासूनची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
तब्बल २६ वर्षानंतर अनिल गोटे-शरद पवार भेट
भारतीय जनता पक्षाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्बल २६ वर्षांनंतर भेट घेतली आहे. एकमेकांचे कायम टीकाकार राहिलेल्या गोटे-पवार भेटीने राजकीय वर्तुळात मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सुभाष भामरेंचा पराभव करण्यासाठी आपण शरद पवार यांची भेट घेतली आहे, अशी प्रतिक्रिया अनिल गोटे यांनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातील ७ उमेदवार जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. या यादीत यात महाराष्ट्रातील एकूण ७ उमेदवारांचा समावेश आहे. दक्षिण मध्य मुंबईत एकनाथ गायकवाड तर यवतमाळमधून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना संधी देण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सोलापुरात मोहित पाटील पिता-पुत्र भाजपच्या वाटेवर?
लोकसभा मतदारसंघ माढा इथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली. परंतु, त्यातदेखील माढ्याच्या जागेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. माढ्याची उमेदवारी जाहीर केली नसल्यामुळे मोहिते पाटील प्रचंड नाराज आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशींसह त्यांच्या कुटुंबियांच्या २ मालमत्ता जप्त
तीन मोठ्या सरकारी बँकांचे तब्बल ६८ कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवल्याने लोकसभेचे माजी अध्यक्ष, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे व्यवसायाने विकासक असलेले चिरंजीव उन्मेष जोशींसह त्यांच्या कुटुंबियांची कुर्ला आणि लोणावळ्याची मालमत्ता बँकांनी जप्त केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ईशान्य मुंबई: उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक आरोप करणाऱ्या किरीट सोमैयांची उमेदवारी अडचणीत?
लोकसभा निवडणूक घोषित झाल्या आणि ईशान्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. तसेच त्यांच्या नावासोबत आणखी एका नावाची शिफारस करण्याची सूचना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना केल्याने सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
त्यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार का? रामदास आठवले
प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीची स्थापना केली असून त्यांच्या सभांना जनतेकडून मोठा प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे. परंतु, सभेत होणाऱ्या या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार का, असा गंभीर प्रश्न उपस्थित करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपचे चौकीदार मंगेश सांगळेंकडून १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग, गंभीर गुन्हा दाखल
माजी आमदार मंगेश सांगळे यांच्या विरोधात नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा गंभीर असल्याने अटक होण्याच्या भीतीने मंगेश सांगळे हे बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भाजपने नाही, शिवसेनेने एनसीपीच्या शरद पवारांना प्रवेश दिला होता, ते पुन्हा नगरसेवकही झाले नाहीत
अमरावती येथील युतीच्या मेळाव्यात भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पक्ष होत असल्याचा धागा पकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे कटाक्ष टाकत, निदान आता शरद पवार यांनाच भाजपमध्ये प्रवेश देऊन नका टोला लगावला होता.
6 वर्षांपूर्वी -
त्या बैठकीला मोदीच गैरहजर होते, त्यामुळे मी पुलावामाचा बदला घेण्यासाठी जवानांनाच आदेश द्या असं सुचवलं
पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात भारताचे तब्बल चाळीस जवान शहीद झाले होते. देशातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. त्यानंतर काही दिवसातच या हल्ल्याचा बदला एअर स्ट्राईकद्वारे घेण्यात आला. यात ३०० पेक्षा अधिक दहशतवादी मारल्याचा दावा सरकारने केला आहे. परंतु, ही कारवाई आमच्या सल्ल्यानेच झाल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. ते चाकण येथे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी अजित पवार, जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे आदी नेते उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांनी मला नेहमीच गोरगरीबांच्या मुलांची काळजी घ्यायला शिकवलं: उद्धव ठाकरे
युतीपूर्वी आमच्यात मतभेद होते, त्यावेळी आम्ही भारतीय जनता पक्षावर जाहीर टीका केली. परंतु हे मतभेद शिवसेनेने कधीही राज्याच्या विकासाच्या आड येऊ दिले नाहीत. आम्ही एकमेकांमध्ये कधीही तंगड घातलं नाही, असा एकतरी मुद्दा दाखवा, असे स्पष्टीकरण देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवरही टीका केली. आघाडी करताना हातात हात घालून त्यांनी तंगड्यात तंगडं घातलं आहे, त्यामुळे ते नक्कीच पडणार असा टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.
6 वर्षांपूर्वी -
अमरावती लोकसभा: नवनीत कौर राणा काँग्रेस आघाडीत सामील
मागील लोकसभा निवडणुकीत अमरावतीच्या युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढल्या होत्या. यंदाही रवी राणा यांनी काँग्रेस आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही, मनसेकडून पत्रकं प्रसिद्ध
अनेक दिवसांपासून मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत चर्चेला उधाण आलं होतं. नेमकं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे कार्यकर्त्यांसह सामान्यांचे देखील लक्ष लागून राहिलं होतं. अखेर या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आगामी लोकसभा निवडणूक २०१९ ही मनसे लढवणार नाही असं पत्रकं मनसेकडून काढण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतल्याचे स्पष्ट झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
नारळाच्या झाडातून हळदीचं पिक, भाजप IT सेल चा जावई शोध
सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकांचा रणसंग्राम चालू आहे त्यातच जवळजवळ सगळ्याच पक्षांनी सध्या सोशल मीडियाला चांगलंच मनावर घेतलेलं दिसतंय. याचाच प्रत्यय आला तो भाजपच्या एका फेसबुक पोस्ट वरून. नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेलं भाजपचं IT सेल सध्या जरा गोंधळलेलं दिसतंय.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचं ठरलं, या दिवशी होणार लोकसभेचा निर्णय जाहीर
मुंबई : भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि त्या बरोबर सर्वच पक्षांची लगबग सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर आपल्या उमेदवारांच्या २ याद्या जाहीर देखील केल्या. परंतु १३ व्या वर्धापनदिनी राज ठाकरे मनसेचा लोकसभेबाबतचा निर्णय जाहीर करतील याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्यात राज ठाकरे आघाडी सोबत जाणार कि स्वबळावर लढणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. परंतु मनसेला अपेक्षित असलेल्या ईशान्य मुंबई आणि कल्याणच्या जागेवर राष्ट्रवादीने आपले उमेदवार घोषित केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
युतीचे उद्योग म्हणजे लहानपणी पाहिलेला सर्कशीचा खेळ - रोहित पवार
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भाजप – सेना युतीवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या मते आजचे युतीचे उद्योग म्हणजे मी लहानपणी पाहिलेलं सर्कसच. “कधीकाळी बाळासाहेब भाजपचा उल्लेख कमळाबाई म्हणून करायचे आणि भाजप शिवसेनेचा उल्लेख थोरला भाऊ म्हणून करत. इतकेच नाही तर राजकारणाच्या मैदानात जंगलातल्या ढाण्या वाघप्रमाणे ते लढायचे, सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता”, अशा शब्दात रोहित पवारांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.
6 वर्षांपूर्वी -
पूल दुर्घटनेला मुंबईकरच जबाबदार, उद्धव ठाकरेंची सामानातून सर्वसामान्यांवर टीका
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला लागून असलेला हिमालय पादचारी पूल दुर्घटनेत ६ लोकांनी आपला जीव गमावला असून ३० पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. पुलाची पूर्ण जबाबदारी दिवसभराच्या टोलवाटोलवी नंतर मुंबई महानगर पालिकेने स्वीकारली आणि पालिकेत शिवसेनेची सत्ता असताना त्यांनी मृतांची तसेच जखमींची साधी चौकशी देखील केली नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची जबाबदारी स्वीकारलेली असतानाच उद्धव ठाकरेंनी जखमींची विचारपूस करणं गरजेचं होतं.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ द्यायला नको होती - नितीन गडकरी
आज ए.बी.पी. माझाला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत बोलताना नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंबद्दल १ खंत व्यक्त केली. या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या मुद्द्यावर भाष्य केलं. मी ज्यांच्याशि मैत्री करतो त्यांचा हात कधीच सोडत नाही, राज ठाकरेंचे विचार अगदी सुस्पष्ट होते. माझे त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सुजयला निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वतः स्विकारायला तयार होतो - अजित पवार
काल पुण्यामध्ये बोलताना अजित पवार यांनी सुजय विखे पाटलांवर सनसनाटी आरोप केला. सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादीचे तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वतः स्विकारायला तयार होतो, परंतु सुजय विखे यांनीच या प्रस्तावाला नकार दिला. सुजयला आता माझ्या समोर आणा, हे जर खोटं असेल तर म्हणाल ते करायची माझी तयारी आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा