महत्वाच्या बातम्या
-
आघाडीच्या नेत्यांना राजू शेट्टींचा अल्टिमेटम; ३ जागा द्या नाहीतर..
आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावटपासाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काँग्रेस-एनसीपी’च्या नेत्यांना अल्टिमेटम दिला आहे. लोकसभेच्या हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या ३ जागांसाठी स्वाभिमानी पक्ष आग्रही आहे. आघाडीच्या नेत्यांनी २ दिवसांत याबाबत निर्णय न कळवल्यास स्वाभिमानी पंधरा जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवेल, असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अगोदरच भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला महाआघाडीत सामील होण्याविषयी झुलवत ठेवले आहे. त्यांची महाआघाडीत येण्याची शक्यता कमीच दिसत आहे. अशात राजू शेट्टी यांनीही वेगळा मार्ग निवडल्यास महाआघाडीचे स्वप्न भंग पावेल. मात्र, स्वत: काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेच महाआघाडीविषयी पुरते गंभीर नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुकी दरम्यान पुलवामासारखा हल्ला पुन्हा घडवला जाईल : राज ठाकरे
भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करेल, हे आधीच सांगितल्याची आठवण करून देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राइकवर संशय व्यक्त केला. निवडणुकांआधी आणखी एक हल्ला होण्याची शंका देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. मनसेच्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
१३वा वर्धापनदिन: मनसे आगामी लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर? सविस्तर
मागील सगळ्याच मोठय़ा निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा देत आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी स्वबळावर लढण्याच्या विचारात असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. असं असलं तरी मनसे किती आणि कोणत्या जागा लढवेल, हे अजून स्पष्ट समजू शकलेलं नाही, पण महाराष्ट्र सैनिकांचा ‘जोश’ आणि मनसेच्या मतदारांचा उत्साह विधानसभेपर्यंत कायम ठेवण्यासाठी रिंगणात उतरण्याची तयारी ‘कृष्णकुंज’वर सुरू झाली आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा आज मनसेच्या १३ व्या वर्धापनदिनी स्वत: राज ठाकरेच करतील असे समजते. तर ते महाराष्ट्रात काही जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बाहेरून पाठिंबा देण्याची देखील शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणूक: राज ठाकरेंचा निर्णय विचाराअंती झाला तरी काय असतील परिणाम? सविस्तर
सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षातील वातावरण तापू लागलं आहे. अनेक पक्षांमधील वाटाघाटी पूर्णत्वाला येऊन ठेपल्या आहेत, त्यात अनेकांनी उमेदवार देखील घोषित करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, मनसे किव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष आगामी निवडणुकीत नक्की काय भूमिका घेणार यावर माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. वास्तविक प्रसार माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांना स्वतः राज ठाकरे, अधिकृत प्रवक्ते आणि वरिष्ठ नेत्यांकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही आणि त्यामुळे जर तरच्या चर्चांना काहीच अर्थ उरत नाही.
6 वर्षांपूर्वी -
सेना - भाजप षटकार मारण्याच्या तयारीत? लोकसभा - विधानसभा एकत्रित?
लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका देखिल लोकसभे सोबत घेण्यात येतील अशी माहिती काही सूत्रांनी दिली असून शुक्रवारी विधानसभा बरखास्तीचा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आणला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेने युतीच्या वेळेस भाजपला काही अटी सांगितल्या होत्या आणि त्यातली एक अट म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्या जाव्यात.
6 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे यांनी १०६ कोंटींचा मोबाईल घोटाळा केला: धनंजय मुंडे
ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी सेविकांच्या केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या स्मार्टफोन मोबाईलमध्ये तब्बल १०६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे चिक्की घोटाळ्यानंतर पुन्हा एकदा पंकजा यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप लागले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकार साखर सम्राटांवर मेहेरबान: सविस्तर
राज्यातील आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या राज्यातील एकूण १५ सहकारी साखर कारखान्यांना राजगोपाल देवरा समितीच्या शिफारशींचा विचार करून मदत करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा निर्णय राजकीय हेतूने घेतल्याचा आरोप अनेक विरोधकांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
गोकुळ दूध संघावर आयकर विभागाचे छापे
गोकुळ दूध संघाच्या कोल्हापुरातील मुखालयात प्राप्तिकर विभागाने धाडसत्र सुरु केलं आहे. दूध संघाची तब्बल ४ तासांहून अधिक काळ आर्थिक कागदपत्रांसह गोपनीय चौकशी सुरु होती. कर चुकवल्याप्रकरणी ही धाड टाकण्यात आल्याचे प्रसार माध्यमांच्या सुत्रांकडून कळते.
6 वर्षांपूर्वी -
अमोल कोल्हे राष्ट्रवादीत जाताच बिथरलेली सेना स्थानिक मनसे आमदाराला फोडण्याच्या तयारीत?
अभिनेते अमोल कोल्हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत जाताच आढळराव पाटलांच्या जय पराजयाच्या बातम्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने आत्तापासूनच जमवाजमव सुरु करण्यास सुरुवात केली आहे. त्यात मनसेचे आमदार शरद सोनावणे यांचा जुन्नर विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभेत येत असल्याने सेनेकडून त्यांना फोडण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
6 वर्षांपूर्वी -
तर ती प्रकाश आंबेडकर यांची पहिली व शेवटची राजकीय चूक ठरेल? सविस्तर
महाराष्ट्रासारख्या राज्यात भीमा-कोरेगाव सारखी दुर्दैवी घटना घडणे ही खरंच लाजिरवाणी गोष्ट होती. दोन समाज आणि त्यांची मन त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीने दुभंगली होती. त्यात समाज माध्यमांवरील अफवा आणि विकृत प्रचाराने सीमा ओलांडल्याने परिस्थिती अनेक महिने नाजूक होती. त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भाजप आणि शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांबद्दल वंचित बहुजन समाजात मोठी चीड निर्माण झाली. परंतु, या संपूर्ण घडामोडीत काही ठराविक भागा पुरतं मर्यादित असलेलं प्रकाश आंबेडकर यांचं नैतृत्व राज्यपातळीवर पोहोचलं.
6 वर्षांपूर्वी -
अमोल कोल्हेंना शिरूर लोकसभेची आज उमेदवारी जाहीर होणार?
शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी येथे आज सायंकाळी एनसीपीच्या पक्षाचा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात शिवसेनेतून राष्ट्रवादीतून आलेल्या अमोल कोल्हे यांची शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात पक्षाचे मेळावे घेऊन जोरदार वातावरण निर्मिती करण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या संभाव्य उमेदवारीने पक्षातील आणखी एक इच्छुक विलास लांडे यांच्या समर्थकांत अस्वस्था पसरली आहे. त्यामुळे कोल्हे यांची उमेदवारी आजच जाहीर होणार की लांडे यांची समजूत काढून उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार हे आज स्पष्ट होईल.
6 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेनेने टोप्या लावल्या...शिक्षक भरतीत मराठा समाजाला डावलले
लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी आणि निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करण्याआधी हवा निर्मितीसाठी मोठा गाजावाजा करत शिक्षक भरतीची घोषणा केली. परंतु त्यात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे आणि मराठा समाजासाठी म्हणजे ‘सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गासाठी’ संतापजनक बातमी आहे. कारण राज्यातील तब्बल १७ जिल्हा परिषदांमध्ये मराठा समाजाला एकही जागा राखीव नसल्याचे समोर आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
नाणारवासियांच्या व विरोधकांच्या लढ्याला यश, रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द
विरोधी पक्ष आणि स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कोकणातून जोरदार विरोध होत असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची आज अधिकृत घोषणा केली आहे. तसेच या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आलीये, बच्चू कडू संतापले
रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आली आहे आणि आपण काय बोलतो आहोत हे त्यांना कळत नाही, अशा कठोर शब्दात आमदार बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कसे आहेत? तेच मला कळत नाही. त्यांना या निवडणुकीत आपण उत्तर जरूर देणार…, असं कडू म्हणाले. शेतकऱ्यांसाठी चुकीची भाषा वापरूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आपण काय बोलावं याचं भान असलं पाहिजे, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे म्हणाले होते निवडणुकीआधी असं काहीतरी घडेल - शरद पवार
२४ फेब्रुवारी रोजी “महाहिट २४ मराठी” या नवीन वृत्तवाहिनीच्या उदघाटन समारंभाला राज ठाकरे उपस्थित होते. कोल्हापूर येथे झालेल्या या वाहिनीच्या उदघाटन समारंभात राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित करताना सध्याचं सरकार काय गैरप्रकार करत आहे याची उजळणी करून दिली. आणि या बातमीचा दाखला देत पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले “राज ठाकरे म्हणाले होते निवडणुकीआधी असं काहीतरी घडेल” आणि आता तसंच काहीसं घडलं आहे म्हणून त्यांनी केलेलं भाकित गंभीरतेने घ्यायला हवं.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: तुलसी जोशींचा दणका; शिवसैनिकाचे पैसे बिल्डरने परत केले, शिवसैनिकाने मानले राज ठाकरेंचे आभार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघरचे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक तुलसी जोशी हे शक्य असलेल्या मदतीसाठी सामान्य मराठी माणसाला कधीच नाही बोलप्रत्येक त नाहीत, याची अनेक उदाहरणं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिली आहेत. परंतु विषय आर्थिक अडचणीत सापडलेल्या शिवसैनिक आणि त्यांच्या सामान्य कुटुंबियांशी संबंधित असल्याने विषयाला वेगळेच महत्व प्राप्त होते.
6 वर्षांपूर्वी -
पश्चिम रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवर हाय अलर्ट; दहशदवादी हल्ल्याची भीती
मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर आगामी ३ महिन्यांत दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिला आहे. त्या धर्तीवर रेल्वेने सुरक्षाव्यवस्थेत वाढ करत अतिदक्षेचा इशारा जारी केला आहे. लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी अरबी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची विश्वसनीय माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती आली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह संबंध महाराष्ट्रात हाय अलर्ट असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क आहेत.
6 वर्षांपूर्वी -
वीरपत्नींनी केली फेसबुक - व्हॉट्सअँप योध्यांची कानउघडणी
वीरपत्नींनी केली फेसबुक – व्हॉट्सअँप योध्यांची कानउघडणी
6 वर्षांपूर्वी -
माध्यमांशी संवाद साधतांना शहीद निनाद यांच्या पत्नी विजेता मांडवगणे
माध्यमांशी संवाद साधतांना शहीद निनाद यांच्या पत्नी विजेता मांडवगणे
6 वर्षांपूर्वी -
पवारांच्या गाडीच्या मागे धावणारे आज पवारांच्या ताफ्यात सामील, शिवबंधन तोडले
“स्वराज्य रक्षक संभाजी महाराज” फेम आणि जुने “छत्रपती शिवाजी महाराज” म्हणून माहित असलेले अमोल कोल्हे राष्ट्रवादीत दाखल. आज त्यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते, आणि आता शिवसेनेच्या दुटप्पी धोरणांना कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL