महत्वाच्या बातम्या
-
गर्व आहे मोदीजी आम्हाला! सत्ता जाण्यापूर्वी अशी कबुली देणारे भारताचे पहिले पंतप्रधान तुम्हीच
देशातील विरोधकांनी नेहमीच नरेंद्र मोदींवर देशातील महत्वाच्या मोठ्या संस्था उध्वस्थ केल्याचा आरोप केला आहे. अर्थात मोदींनी ते कधीच मान्य केलं नसलं तरी त्यांच्या पंतप्रधान कार्यालयाने ते एका ट्वीटमध्ये मान्य केल्याचे म्हणावे लागेल. कारण याट्विटमध्ये मोदी स्वत:वरच आरोप करताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
काय स्टाईलमध्ये! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यांची निवेदन स्वीकारण्याची नवी संस्कृती
राज्याच्या जवाबदार मंत्र्यांची अनेक असंस्कृत प्रकरणं समोर आल्याचे पहिले आहे. परंतु, विषय तेव्हाच गंभीर होतं जेव्हा राज्याचे सांस्कृतिक मंत्री स्वतःच्या असंस्कृत वागण्याचं सार्वजनिकरित्या प्रदर्शन मांडतात. सामान्य माणूस देखील एखाद्याची हात मिळवताना सुद्धा उभा राहून सभ्यतेचे दर्शन घडवतो.
6 वर्षांपूर्वी -
यंदा मनसे कार्यकर्त्यांचे तात्या हडपसर मतदारसंघात विरोधकांना कात्रजचा घाट दाखवणार बहुतेक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सध्या प्रसार माध्यमं गृहीत धरत असली, तरी अनेक मतदारसंघातील त्यांची तगडी फिल्डिंग लागल्याचे प्रथम दर्शनी दिसते. त्यातीलच एक म्हणजे, मनसेचे पुण्यातील विद्यमान नगरसेवक वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांचे लाडके तात्या हडपसर विधानसभा मतदारसंघात मोठी फिल्डिंग लावून आहेत. त्यांची मागील काही महिन्यांपासूनची तयारी पाहता स्वतः राज ठाकरेंनी तयारीला लाग असे आदेश आधीच दिले आहेत, असच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
राम मंदिराचा विषय हिंदुत्ववाद्यांनीच गुंडाळून ठेवला: शिवसेना
अयोध्येत राम मंदिराबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून होत असलेला वेळकाडूपणा आणि RSS आणि विहिंपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बदलेल्या भूमिकेवर शिवसेनेने सामनामधून टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राम मंदिराचे काय ते पाहू, असे बोलणे म्हणजे शरयू नदीत बलिदान देणाऱ्यांचा अपमान असल्याचं सामनात म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेच अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करणार: अशोक चव्हाण
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सध्या सत्ताधाऱ्यांच्या गोटात सुरू आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे २८ फेब्रुवारी रोजी राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने जोरदारपणे तयारीला लागा असे आदेश अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लावून फिरतील सुद्धा: निलेश राणे
भारतातील निवडणूक रणनीतीकार आणि जेडीयू’चे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट काल मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पोस्टमन कर्मचारी सुद्धा अडचणी घेऊन कृष्णकुंज'वर, सत्तेत भाजप-शिवसेना की मनसे?
भारतीय टपाल विभागाचे कर्मचारी म्हणजे सर्वांना माहित असलेले पोस्टमन कर्मचारी उद्या कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध अडचणी त्यांच्या समोर मांडणार असल्याचे वृत्त आहे. भारतीय पोस्ट खात्यातील GPO मध्ये काम करणा-या अनेक पोस्टमन कर्मचा-यांची वेतनवाढ झालेली नाही. त्यात इतर राज्यात त्याच कामासाठी किमान भत्ता ५९३ रूपये असताना आम्हाला त्यापेक्षा कमी भत्ता का? असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्या २५० गावांतील १५०० बेरोजगार झालेले कंत्राटी कर्मचारी कृष्णकुंज'वर
लोकसभा निवडणुकीचे वारे देशभर वाहू लागले आहेत आणि मोदी सरकार रोजगाराच्या मोठ्या मोठ्या घोषणा करत असलं तरी अनेक तरुण असलेला रोजगार सुद्धा गमावत आहेत असं चित्र आहे. कारण महाराष्ट्रातील मुळशी, मावळ, भिरा, खोपोली मधील तब्बल २५० गावांमधील सुमारे १५०० कर्मचाऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या कृष्णकुंजवर भेट घेणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मिलिंद देवरा यांची संजय निरुपम यांच्यावर टीका, मुंबई काँग्रेसमध्ये दुफळी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई कॉग्रेसससुद्धा कामाला लागली असताना अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरुपम यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या अनेक माजी खासदार आणि आमदारांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंसारखा सर्वात हाय टीआरपी असलेला अध्यक्ष मनसेकडे, मग चुकतंय कुठे? सविस्तर
स्वरराज श्रीकांत ठाकरे अर्थात महाराष्ट्राला आणि देशाला माहित असलेले राजकीय नेते म्हणजे राज ठाकरे. केवळ मनसेची स्थापना झाल्यापासूनच नव्हे तर शिवसेनेत असताना देखील स्वर्गीय. बाळासाहेबानंतर राज्यातील शिवसैनिकांना सुद्धा पक्षाच्या सभेसाठी तसेच प्रचारासाठी हवा असणारा त्यावेळचा सर्वात तरुण चेहरा. सध्या राज्याच्या राजकारणात राज ठाकरे म्हणजे हाय टीआरपी असलेले राजकीय नेते हे नाकारून चालणार नाही. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन करून जवळपास १३ वर्ष झाली आहेत. परंतु, राज ठाकरेंसारखा प्रघल्भ, सामाजिक – राजकीय ज्ञान आणि भान असलेलं अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच हृदयाला भिडणारी भाषण शैली, असे सर्व सद्गुण असलेला अध्यक्ष मनसेला लाभला आहे. तरी आज सुद्धा पक्ष अस्तित्वासाठीच का झटतो आहे? याचा आम्ही मागोवा घेण्याचा एक प्रयत्न करत आहोत. कारण, प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारणं असतात आणि त्याचा सखोल शोध घेणे सुद्धा त्या नेत्याचे कर्तव्य असते, जो ते करतही असतील… तरी आमच्या टीमने केलेली बारीक निरीक्षणं आज सविस्तर मांडत आहोत.
6 वर्षांपूर्वी -
मोदींचे २०१४ मधील सोशल मीडिया 'चाणक्या'नीतीचे तज्ज्ञ प्रशांत किशोर मातोश्रीवर
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या यशात समाज माध्यमांच्या आधारे नियोजनबद्ध वापर करून केंद्रात भाजपची सत्ता स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावणारे राजकीय पंडित आणि जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ग्राम परिवर्तन; यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल, कार्यक्षम जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखांची कामगिरी: सविस्तर
ग्रामीण भागात विकास साध्य करायचा म्हटलं की आधी तिथल्या सामान्य लोकांप्रती प्रामाणिक आस्था आणि तिथे भेडसावणाऱ्या मूळ समस्यांचा अभ्यास करणे सुद्धा तितकेच गरजेचे असते. परंतु, लोकाभिमुख विकास साधायचा म्हटल्यावर विषय जिल्ह्यातील प्रशासकीय सेवेवर येऊन थांबतो, असा साहजिकच विचार प्रत्येकाच्या मनात येतो. मात्र, देशभरात मोजकेच प्रामाणिक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत जे प्रशासनातील अधिकारांचा अभ्यासपूर्ण वापर करतात आणि ग्रामीण भागातील लोकाभिमुख विकास तसेच विविध योजना सत्यात उतरवताना दिसतात. त्यातीलच एक नाव म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ज्यांच्यामुळे ग्राम परिवर्तनात यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपसोबत युती नको, उद्धव ठाकरेंना भावना कळवल्या
केवळ आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार न करता पक्षाचा दूरदृष्टीने विचार करून भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडावी, अशा तीव्र भावना शिवसनेच्या प्रत्येक जिल्ह्यांतून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे कालच्या बैठकीत व्यक्त केल्या. परंतु, यावर पक्षप्रमुखांनी सध्या कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, सर्वांशी पूर्ण चर्चा करूनच आपण अखेरचा निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितल्याची वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
सरकारच्या प्रतिनिधींकडून माध्यमांना खोटी माहिती, जनतेची दीशाभूल करत आहेत
मागील तब्बल आठवड्याभरापासून अण्णा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी सरकारविरुद्ध उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, सरकारतर्फे भेटण्यास येणारे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट झाल्यावर प्रसार माध्यमांना खोटी माहिती देत असल्याचा आरोप करत अण्णांनी कालच्या पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: फडणवीस साहेब! गेले ते 'शेर'चे दिवस, ही असेल २०१९ मध्ये 'शेर'ची अवस्था
काल मुंबईमध्ये पार पडलेल्या एका पक्षाच्या कार्यक्रमात मुंबई मुख्यमंत्री फडणवीस उपस्थितांना संबोधित करताना विरोधकांवर शेलक्या भाषेत तुटून पडले. त्यावेळी देशभरातील विरोधकांबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘मोदीजी जंगल का शेर है, बाकी अपने अपने गली मे कुत्ते-बिल्ली है’. हा शेर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या दांडय़ा उडविल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर विरोधकांवर चोर, कोल्हे, जनावरे, अशा शेलक्या शब्दांत टीकेची झोड उठविली.
6 वर्षांपूर्वी -
ते महागठबंधन नाही 'महाठगबंधन' आहे, तर शरद पवार हे शकुनी मामा: पूनम महाजन
नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत आणि विरोधकांकडे तर पंतप्रधानपदाचा उमेदवारच नाही. विरोधकांनो तुमचा पंतप्रधान कोण, असे विचारल्यानंतर सोमवारपासून शनिवापर्यंत मायावती, अखिलेश, स्टॅलिन, चंद्राबाबू, ममता हे नेते एक एक दिवस पंतप्रधान होतील आणि रविवारी सुट्टीच्या दिवसाचे पंतप्रधान शरद पवार असतील, अशी खासदार पूनम महाजन यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.
6 वर्षांपूर्वी -
अण्णांच्या त्यावेळच्या जन आंदोलनामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान : राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन, त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. दरम्यान, अण्णांनी राज ठाकरे यांच्याशी बंद दरवाज्याआड चर्चा सुद्धा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अण्णांच्या उपोषणाला मनसेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
6 वर्षांपूर्वी -
मोदीजी जंगल के शेर है, बाकी अपने अपने गली मे कुत्ते-बिल्ली: फडणवीस
सारी जनावरे एकत्र येऊन कळप केला, तरी ते वाघाला पराभूत करू शकत नाहीत, मोदी वाघ आहेत, शेर तो जंगलका शेर है, बाकी अपने अपने गली मे कुत्ते-बिल्ली होते है, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी देशभरातील विरोधी पक्षांवर विखारी टीका केली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या दांडय़ा उडविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे राळेगणसिद्धीत अण्णांची भेट घेऊन विचारपूस करणार
जनलोकपाल, लोकायुक्त, शेतक-यांचे प्रश्न या अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात सलग ५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा ७वा दिवस असून त्यांच्या वयाचा विचार करता, त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी तपासणी अंती सांगितले.
6 वर्षांपूर्वी -
अण्णांनी आमरण उपोषणकरून प्राणत्याग करण्यापेक्षा रस्त्यावर उतरुन लढा द्यावा: उद्धव ठाकरे
जनलोकपाल, लोकायुक्त, शेतक-यांचे प्रश्न या अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात सगळं ५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा ५वा दिवस असून त्यांच्या वयाचा विचार करता, त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी तपासणी अंती सांगितले. दरम्यान, अण्णा उपोषणाला शिवसेनेने पाठिंबा देत काही चांगल्या आणि वाईट गोष्टी सुद्धा सांगितल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा