महत्वाच्या बातम्या
-
तर...पंतप्रधानपदासाठी शिवसेना गडकरींना पाठिंबा देईल
लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण कठीण होणार आहे. अशा राजकीय पेच निर्माण करणाऱ्या परिस्थितीत जर पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरींचं यांचं नाव पुढे आल्यास शिवसेना त्यांना जाहीर पाठिंबा देईल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
कोकण: पावसमधील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश
माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे पावस जिल्हा परिषद गट टाकलेवाडी तसेच रत्नागिरी शहरातील वॉर्ड क्रमांक २८ मधील राजीवडा मधील अनेक पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला.
6 वर्षांपूर्वी -
मुलाच्या प्रचारासाठी रामदास कदम ब्लँकेट व छत्र्या वाटून मतदारांना मूर्ख बनवत आहेत
दापोली, मंडणगड आणि खेड तिनही तालुक्यात पाणीप्रश्न, रस्ते आणि बेरोजगारीसोबतच इतर अनेक मोठ्या समस्या स्थानिकांना भेडसावत असताना असताना केवळ ब्लँकेट, छत्री आणि फराळ वाटून मतदारांना आमिष आणि भुलवण्याचे काम राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम करत असल्याची खरमरीत टीका एनसीपीचे आमदार संजय कदम यांनी केली.
6 वर्षांपूर्वी -
मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये ISIS चे ९ हस्तक ATSच्या ताब्यात
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य ATS ने मुंबईलगतच्या मुंब्रा तसेच औरंगाबादमध्ये धडक कारवाई करत ISISच्या तब्बल ९ हस्तकांना ताब्यात घेतलं आहे. महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडून संशयास्पद साहित्य सुद्धा आढळले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, चाचपणी सुरू : सविस्तर
महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसे उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी मनसेकडून आकड्यांची चाचपणी सुरु झाली आहे. त्यानुसार २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे मोदी लाटेत सुद्धा पक्षाला मतदाराने ज्या लोकसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद दिला होता, त्याची आकडेवारी समोर ठेऊन मतदारसंघ निश्चिती होणार आहेत. त्यामुळे मोदी लाटेत मिळालेला प्रतिसाद, मतदारसंघ आणि उमेदवार या सगळ्याचा अभ्यास आधीच युद्धपातळीवर सुरु होता असे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्वाचे निर्णय
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयाने शिवसेनेला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पुणेकरांना सुद्धा विशेष शैक्षणिक भेट दिली आहे. कारण आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय निश्चित करण्यात आले.
6 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणूक - शिवसेनेचं 'जय उत्तर प्रदेश', यूपीत लढवणार लोकसभेच्या २५ जागा
दिल्ली ते गल्ली भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सामील असलेली शिवसेना भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रस्थानी असतात. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं देशातलं सर्वात मोठं तसेच अत्यंत महत्त्वाचं राज्य असलेल्या यूपीत इतर स्थानिक मित्र पक्षांसह लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केल्याचे वृत्त प्रसार माध्यमांच्या कानावर आलं आहे. त्यासंबंधित लवकरच अधिकृत घोषणा शिवसेनेकडून केली जाण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपा नेते गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा: धनंजय मुंडे
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत EVM हॅक करण्यात आल्याची माहिती असल्यानंच भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा दावा एका सायबर तज्ज्ञानं केला आहे. या धक्कादायक दाव्यामुळे देशातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. त्यामुळे सदर प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने त्याची चौकशी रॉ किंवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडून करण्यात यावी, अशी मागणी एनसीपीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
दुर्दैव! हवेतल्या नेत्यांचे जमिनीवर भव्य इमले, तर जमिनीवरील नेत्याचे भूमिगत स्मारक?
स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आणि त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे २३ जानेवारीला शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानी गणेशपूजन होणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, हा समारंभ लहान स्वरूपात होणार असल्याने दिल्लीतुन कोणालाही निमंत्रण आणेल. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभास विशेष उपस्थित राहतील, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं कर्तव्यावरील पोलिसाला चिरडलं
जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं थेट कर्तव्यावरील पोलीस शिपायाला चिरडून मारल्याची धक्कादायक घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावर घडली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी २ व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. रात्री उशिरा म्हणजे ११ च्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे राज्यात तस्करांच्या वाढत्या मुजोरीचं वास्तव समोर आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
विशेष रिपोर्ट- प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं ही सेम असतं! सर्वकाही ठरवून?
आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आला आहे. परंतु, भाजप आणि शिवसेनेतील सर्व घडामोडींवर बारीक नजर टाकल्यास सर्वकाही २०१४ मधील लोकसभा निवडणुकीप्रमाणे ठरवून सुरु आहे. त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे याच २०१४ मधील राजकीय रणनीतीप्रमाणे भाजप आणि शिवसेनेने निवडणुका लढवल्या होत्या आणि प्रसार माध्यमांना एकप्रकारे स्वतःवर केंद्रित करून अप्रत्यक्षरीत्या गंडवले होते, असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई मॅरेथॉनने नाकारलं, त्याच ज्युनिअर मिल्खासिंग साईश्वर या मराठी धावपटूला देशभरातील मॅरेथॉनमध्ये वाईल्ड-कार्डने आमंत्रण
वयाच्या सातव्या वर्षीच देशातील अनेक मॅरेथॉन स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून केवळ देशातच नव्हे तर परदेशी स्पर्धकांवर सुद्धा साईश्वरने छाप पाडली आहे. अल्पावधीतच साईश्वर गुंटूक’ला लोकं ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ या नावाने ओळखू लागले. मूळचा सोलापूरचा असलेला साईश्वर केशव गुंटूकचे सातव्या वर्षातील विक्रम बघितल्यावर थक्क व्हाल असच त्याच कर्तृत्व आहे. एकदा सहज म्हणून फिरायला कोल्हापूरला आला आणि धावण्याची हौस म्हणून पहिल्यांदा त्याने कोल्हापूर येथील मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा त्याने सहज खिशात टाकली. परंतु तिथेच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्यानंतर त्याने मध्य प्रदेशातील हिल मॅरेथॉन ही अवघड स्पर्धा जिंकली.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेत माझ्यावर अन्याय, मनसेने आवाहन केलं होतं, पण निर्णय योग्य वेळी : केदार दिघे
सध्या रत्नागिरीचे माजी खासदार निलेश राणे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर केदार दिघेंकडे प्रसार माध्यमांचे कॅमेरे फिरले आहेत. केदार दिघे यांचं वय सध्या ३८ वर्ष असून आनंद दिघेंचे पुतणे या नात्याने त्यांनी वयाच्या १९व्या वर्षी आनंद दिघेंना अग्नी दिला होता. सध्या ते ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेमार्फत ठाणेकरांशी जोडले गेले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मंत्रालयात वेटरची १३ पद आणि ७००० अर्ज, राज्यातील बेरोजगारीचं भीषण चित्र
भाजप सरकार कितीही रोजगार निर्मितीचे मोठं मोठे दावे करत असलं तरी मंत्रालयातील वेटर या पदासाठी सुरु झालेल्या भरती प्रक्रियेवरून बेरोजगारीचे भीषण वास्तव उघड होत आहे. अगदी चौथी पास पात्रता असलेल्या १३ जागांसाठी तब्बल ७००० अर्ज आले असून, त्यात धक्कादायक म्हणजे सुशिक्षित पदवीधर उमेदवारांची संख्या त्यात सर्वाधिक आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा: उत्तर पश्चिम मुंबईतून इच्छुक संजय निरुपम यांना स्थानिक कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध?
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी मुंबई काँग्रेसमध्ये सुद्धा जोरदार हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात आता उत्तर पश्चिम मुंबईतून संजय निरुपम सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे वृत्त आहे. संजय निरुपम यांच्या जुन्या लोकसभा मतदारसंघातून लढविण्यापेक्षा ते स्वतःसाठी नवख्या आणि काही प्रमाणात भरवशाच्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून समजते.
6 वर्षांपूर्वी -
मंत्री गिरीश बापट यांच्याकडून कर्तव्यात कसूर आणि मंत्रीपदाचा गैरवापर: न्यायालय
राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याचे ताशेरे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं ओढले आहेत. सेवाप्रदान करताना दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य पुरवठादाराला परवाना बहाल केल्याप्रकरणी कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. २०१६च्या मधील एका प्रकरणात तत्कालीन तहसीलदार आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी काही स्वस्त धान्यांच्या दुकानांची चौकशी करुन देखील मोठ्या प्रमाणावर सरकारी नियमांची पायमल्ली केल्याचा ठपका ठेवला होता.
6 वर्षांपूर्वी -
मनसे दणका, तुलसी जोशींनी आर्थिक फसवणूक झालेल्या महिलेचा प्रश्न सोडवला
मनसे दणका, तुलसी जोशींनी आर्थिक फसवणूक झालेल्या महिलेचा प्रश्न सोडवला
6 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्याने पैसे घेऊन सुद्धा नोकरी न दिल्याने तरुणाची अखेर आत्महत्या
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि लोकविकास सहकारी बॅंकेचे संस्थापक जे.के. उर्फ जगन्नाथ खंडेराव जाधव यांच्या विरोधात तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा ऊर्फ किशोर रतन चिलघर या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी सदर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत तरुण हा जाधव यांच्याकडे चालक म्हणून तात्पुरत्या कामाला होता.
6 वर्षांपूर्वी -
आता डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खूश असेल: नीलेश राणे
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी मुंबई नाइट लाइफची मागणी देवाकडे इतकी मनापासून केली की डान्स बार पुन्हा चालू झाले, अशी बोचरी टीका करत माजी खासदार निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका: उद्धव ठाकरे
इतरवेळी राज्य सरकार राजकीय निर्णय प्रचंड वेगाने घेतात, परंतु राज्यातील बहुचर्चित शिवस्मारकाबद्दल हलगर्जीपणाच आहे. भारतीय जनता पक्षाला आडवे येतील त्यांना ‘पटकून’ टाकू अशी भाषा वापरणाऱ्यांचे राज्य सध्या महाराष्ट्रात आहे. तसं असेल तर मग शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांना सुद्धा पटकून टाका, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा