महत्वाच्या बातम्या
-
इतिहास बदलला! लोकमान्य टिळक व गोपाळकृष्ण गोखलेंची जन्मभूमी कोकण, तर मोदी म्हणतात पुणे
याआधी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुकीचे दाखले देत इतिहास थेट भाषणातून मांडला आहे. परंतु, त्यांनी अजून सुद्धा ती परंपरा कायम ठेवल्याचं काँग्रेसचे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी म्हणाले. पुण्यातील भाषणात मोदींनी भाषणाची सुरुवात करताना ‘पुणे ही लोकमान्य टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले यांची कर्मभूमी असताना, मोदींनी जन्मभूमी असल्याचा उल्लेख केला आणि त्यावरून मोदींचं इतिहासाबद्दलचे अज्ञान पुन्हा जाहीर पणे प्रकट केले आहे,’ अशा शब्दात मोदींवर बोचरी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुकीआधी भाजप मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांमार्फत पोलीस अधिकाऱ्यांच्या खुलेआम बदल्या?
सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना भाजपकडून मर्जीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लागण्याची शक्यता आहे. त्यातील पहिले उदाहरण म्हणजे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचं जे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले समजले जातात. त्यांनी थेट मुंबईतील पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या रिक्त जागी कोणाला नियुक्त करावे, यासाठी गिरीश महाजनांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे प्रशस्ती पत्र पाठविण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना सरकारसमोर हवालदिल झालेले कांदा उत्पादक शेतकरी राज ठाकरेंच्या भेटीला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांनी नाशिक ग्रामीणकडे मोर्चा वळवल्याचे निदर्शनास येते आहे. त्यानिमित्त दिंडोरीत त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्याचे समजते. दरम्यान कळवणमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज कळवणमध्ये भेट घेऊन सर्व अडचणी मांडल्या.
6 वर्षांपूर्वी -
नाशिक'मध्ये राज ठाकरेंना भेटायला तुफान गर्दी, शेतकऱ्यांसोबत सुद्धा संवाद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांनी नाशिक ग्रामीणकडे मोर्चा वळवल्याचे निदर्शनास येते आहे. त्यानिमित्त दिंडोरीत त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्याचे समजते. सत्ताकाळात नाशिक’मध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची आणि मूलभूत सुविधांची कामं करून सुद्धा पक्षाला महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत अपयश आलं होतं. त्याच मूळ कारण होतं ते, मुख्यमंत्र्यानी नाशिकच्या जनतेला दाखवलेलं विकासाचं स्वप्नं आणि केंद्रात, राज्यात तसेच महापालिकेत भाजपचं सरकार असेल तर विकास खूप जलद होईल असा दिलेला विश्वास.
6 वर्षांपूर्वी -
कल्याणमधल्या मोदींच्या सभेत चर्चा रंगली ती रिकाम्या खुर्च्यांचीच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल कल्याणमध्ये मेट्रोच्या भूमिपूजनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. मोदींच्या सभेचा प्रचंड गर्दी होईल या अपेक्षेने भाजपाचा अपेक्षा भंग झाला आहे. कारण कंटाळलेल्या स्थानिकांनी मोदींच्या सभेकडे अक्षरशः पाठ फिरवली आणि निम्याहून अधिक खुर्च्या रिकाम्याच राहिल्याचे कटाक्ष टाकताच दिसत होते.
6 वर्षांपूर्वी -
भाजपनेच पुण्यातील मोदींच्या कार्यक्रमापासून खासदार काकडेंना दूर ठेवले?
पुण्यातील शिवाजीनगर- हिंजवडी या मेट्रोच्या तिस-या टप्प्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल मोठ्या थाटात पार पडले. परंतु, या सोहळ्याकडे भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पाठ फिरवल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, खासदार संजय काकडे यांचा भाजपनेच या भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून पत्ता कट केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच त्यांनी रागाने या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
कल्याण-डोंबिवलीवर घाणेरडं शहर असा शिक्का मारणाऱ्या पक्षाने मोदींसाठी डंपिंग ग्राउंडवर परफ्यूम मारलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. आगामी निवडणुकीच्या निमित्ताने ते विविध कामाचे भूमिपूजन करणार आहेत. त्यातील एक कार्यक्रम कल्याण-डोंबिवलीत सुद्धा आयोजित करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेनं रस्त्यावरील सर्व गतिरोधक हटवले आहेत. तसेच कल्याण-भिवंडी बायपासवरील वाहनांच्या धुरानं काळेकुट्ट झालेले दुभाजक महापालिकेनं टँकरच्या पाण्यानं धुऊन एकदम स्वच्छ केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
'ते' विसरले यांना 'आठवले'? मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करणार, RBI'शी बोलणी सुरु
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक धक्कादायक आणि मोदी सरकारला पुन्हा गोत्यात आणणारं वक्तव्य केलं आहे. ज्या विषयावरून आधीच मोदी सरकारवर प्रचंड टीका झाली असताना, रामदास आठवलेंच्या या विधानाने मोदी आणि भाजप पुन्हा टीकेचे धनी होण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यात उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही
आगामी लोकसभा निवडणुका अगदी ३-४ महिन्यांवर येऊन ठेपल्याने भाजपने निवडणुकीचे उदघाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केले आहेत. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते कल्याण तसेच पुण्यात मेट्रो ट्रेनचे भूमिपूजन पार पडणार आहेत. विशेष म्हणजे हा कार्यक्रमाला भाजपचा मित्र पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही.
6 वर्षांपूर्वी -
कल्याणकरांना दुसरं गाजर? ६५०० कोटीच्या प्रतीक्षेत असताना, निविदाच काढल्या नसलेल्या मेट्रो-कामाचे निवडणूक पूर्व भूमिपूजन?
२०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली शहराला तब्बल ६,५०० कोटींचं गाजर दाखवलं होतं. तेच आश्वासन अजून प्रत्यक्षात पूर्ण झालं नसताना आणि पुन्हा निवडणुका लागताच इथल्या सामान्य लोकांना तोंड तरी कसं दाखवणार या भीतीने भाजपने पुन्हा २०१९ मधील निवडणुका ४-५ महिन्यांवर आल्या असताना इथल्या सामान्यांना पुन्हा निवडणुकीचं गाजर दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा आढावा: कल्याणमध्ये सेनेच्या शिंदे'शाहीला मनसेच्या पाटील'शाहीकडून सुरुंग लागू शकतो?
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेने एकत्रित निवडणुका लढवल्याने मोदी लाटेचा थेट फायदा श्रीकांत शिंदे यांना झाला होता. त्यावेळी प्रचारात एकनाथ शिंदे यांनी मोदी लाट असल्याने मोदींच्या सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुखांकडे हट्ट लावून धरला होता आणि प्रचाराच्या शेवटच्या क्षणी नरेंद्र मोदी यांना कल्याणमध्ये प्रचारासाठी आणून त्यांच्यानावाने मतांचा जोगवा मागितला गेला. परिणामी शिवसेना आणि भाजपची एकत्रित मतं श्रीकांत शिंदे यांच्या खात्यात पडली होती.
6 वर्षांपूर्वी -
जेवणाचे बुरे दिन! सामान्यांच्या ताटातील भाकरी महागली
सध्या महागाईने हैराण झालेल्या सामान्य माणसाच्या ताटातील भाकरी सुद्धा महागली आहे. उत्पादनात घट झाल्याने मुंबईत ज्वारी आणि बाजरीचे दर दाम दुप्पट झाले आहेत. तसेच खानावळीत सुद्धा तयार भाकरीच्या दरात जवळपास ४ ते ५ रुपयांची वाढ झाल्याने मुंबईकरांच्या खिशाला भगदाड पडणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
रसायनीतल्या एचओसी कंपनीत प्रचंड वायुगळती, शेकडो माकडं आणि पक्षी मृत्युमुखी
रसायनी इथल्या पाताळगंगा परिसरात असलेल्या हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल कंपनीतून प्रचंड प्रमाणात वायुगळती झाल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्री ९.४५ च्या सुमारास सदर घडना घडल्याचे समजते. दरम्यान, या वायुगळतीमुळे शेकडो जनावरं आणि पक्षी मृत्युमुखी पडल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
आरबीआय गव्हर्नरपदी दास यांची नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात : उद्धव ठाकरे
आरबीआय’च्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नेमणूक करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. मोदी सरकारला कोणत्याही विषयात सत्य समोर ठेवणारे लोक नको असून केवळ हो ला हो बोलणारे होयबा हवेत अशी खरमरीत शब्दांत टीका केली आहे. दरम्यान, शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी नेमणूक त्याच उद्देशाने झाली असेल तर ही येऊ घातलेल्या आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे, असं मत सामनाच्या अग्रलेखातून आज व्यक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे मोदी सरकार अर्थव्यवस्थेशी खेळत असल्याचे सामनातून म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंचा पाळलेला कुत्रा: नितेश राणे
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी काल खासदार नारायण राणे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, हा डाग धुतल्याशिवाय राहणार नाही’. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी रामदास कदमांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
कंत्राटी महाभरतीमुळे भाजप-शिवसेना बेरोजगारांना भविष्यात महा-बेरोजगारीकडे ढकलतील? सविस्तर
महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना सरकार आगामी निवडणुकीच्या तोंडावर कंत्राटी महाभरतीचा खेळ करत आहे खरा, परंतु कंत्राटी नोकरी प्राप्त करणारे हेच उमेदवार भविष्यात बेरोजगार महाबेरोजगार ठरण्याची शक्यता अभ्यासाअंती समोर येते आहे. कारण विविध विभागांतील आणि क्षेत्रीय कार्यालयांतील रिक्त जागांपैकी ७० टक्के पदे बाहेरील यंत्रणेमार्फत आणि कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मनसेवर मतं फोडाफोडीचे आरोप करणारी शिवसेना देशभर भाजपची मत फोडण्यात व्यस्त?
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव आणि ३ हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार शिवसेना उमेदवारांचे या हिंदी भाषिक राज्यांमध्ये डिपॉझिट जरी जप्त झाले असले तरी, याच तीन राज्यांमधील भाजपचे ५ आमदार शिवसेनेने घेतलेल्या मतांमुळे पराभूत झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस
निवडणूक प्रतिज्ञापत्रात २ खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. सतीश ऊके यांनी न्यायालयात फडणवीसांविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्यात आली. तसेच सदर प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्यांची बाजू मांडण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
तो पराभव मोदींचाच! सामनातून उद्धव ठाकरेंची टीका
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला आलेल्या अपयशावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सामनातून टीका बोचरी टीका केली आहे. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नम्रपणाची स्तुती करताना मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व जनतेने स्वीकारले : शरद पवार
५ राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे जाहीर अभिनंदन केले. जनतेने कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व स्वीकारले असे सुद्धा ते म्हणाले, तसेच नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा