महत्वाच्या बातम्या
-
नागपूर भाजप: खून प्रकरणात जन्मठेप झालेल्या गुन्हेगाराला उपाध्यक्ष पद बहाल
एका हत्या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयातून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नरेंद्र सिंह दिगवा उर्फ डल्लू सरदार याला भाजपाने उत्तर नागपूर मंडळाचा झोपडपट्टी आघाडीचा उपाध्यक्ष पद बहाल केले आहे . विशेष म्हणजे शहरभर त्याच्या समर्थकांनी अभिनंदनाचे फलक झळकावले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणूकीवर डोळा? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारीत ७ वा वेतन आयोग लागू?
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून ७वा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. दरम्यान, त्याच तारखेपासून महाराष्ट्रात ७व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी राज्य कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी मोठं आंदोलन केलं होतं. तसेच ७व्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर सखोल अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल या महिन्याच्या शेवटी राज्य सरकारला प्राप्त होण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
तब्बल ५५ वर्षानंतर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तब्बल ५५ वर्षानंतर मुंबईत होणार आहे. तत्पूर्वी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिली ३ वर्षे म्हणजे १९६१ ते १९६३ या कालावधीत मुंबईत झाले होते. परंतु, त्यानंतर आता थेट २०१८ साली हे अधिवेशन मुंबईत होत आहे. असे असले तरी हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार की नागपूरका याबाबत शेवटपर्यंत संभ्रम कायम होता. अखेर सोमवारपासून ते मुंबईतच सुरू होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरेंचा आज ६ वा स्मृतिदिन, मनसे तसेच दिग्गजांकडून आदरांजली
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज ६ वा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून हजारो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी दादर शिवाजी पार्क इथल्या शिवतीर्थावर एकत्र आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
झोपडपट्टीतील लोक सोबत असतात, तेव्हा जिंकण्याची खात्री....पण बुद्धिवादी लोकं?
झोपडपट्यांमध्ये राहणारी लोकं सोबत असतात, त्यामुळे जिंकण्याची निश्चित खात्री असते. पण बुद्धिवादी लोकं सोबत असली तर मात्र जिंकण्याची खात्री नसते असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केले. हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दी आयडिया ऑफ न्यू इंडिया’ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. दरम्यान, या कार्यक्रमाला उद्योजक श्रीराम दांडेकर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. भारतकुमार राऊत, शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह सुरेश देवळे, हिंदू नववर्ष स्वागत समितीचे कार्याध्यक्ष भूषण मर्दे, उपाध्यक्ष वीरभद्र दुलानी, कार्यवाह रमेश देवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
सत्ताधारी कर्जाने पुतळे बांधण्यात व्यस्त, तर बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकरी महिलेची स्वत:ची चिता रचून आत्महत्या
बुलडाण्याच्या चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील आशा इंगळे या शेतकरी महिलेने स्वत:च्याच शेतात स्वत:ची चिता रचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नापिकी तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी जीव दिल्याचे वृत्त आहे. आशा इंगळे या ५५ वर्षांच्या होत्या. विशेष म्हणजे त्या गावच्या माजी सरपंच सुद्धा होत्या. त्यांच्याकडे साडेतीन एकर शेती होती. परंतु, नातेवाईक आणि इतर लोकांकडून घेतलेली कर्ज फेडता येत नसल्याने त्या प्रचंड तणावाखाली होत्या असं समजतं.
6 वर्षांपूर्वी -
चंद्रपूर: जंगलातूनच रेल्वे रूळ टाकल्याने रोज अनमोल प्राणी मरत आहेत
आधीच देशभरात वाघांची संख्या झपाट्याने घटत आहे आणि त्यात अशा घटनांनी असलेले वाघ तसेच इतर प्राणी सुद्धा रोज प्राण गमावत आहेत. काही दिवसांपूर्वी अवनी वाघिणीला नरभक्षक घोषित करून विशेष मोहीम राबविण्यात आली आणि ठार करण्यात आले. परंतु मनुष्य प्राणी त्यांच्या अस्तित्वावर घाला घालत आहे यावर पूर्णपणे डोळेझाक केली जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिक्षण व रोजगार हक्कांसाठी पुणे- मुंबई लाँग मार्च, २१ ला मंत्रालयावर धडकणार
प्रत्येकासाठी महत्वाचा विषय असलेल्या शिक्षण तसेच रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यातून पुणे- मुंबई लाँग मार्चला काढण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदवला आहे. पायी निघालेला हा मोर्चा ५- ६ दिवस रस्त्यांवरच मुक्काम ठोकत आणि येत्या २१ नोव्हेंबरला थेट मंत्रालयावर धडकेल असं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
अवनी वाघिणीचे बछडे सुखरूप, जंगलात रस्ता ओलांडताना दर्शन
यवतमाळच्या जंगलात ३ नोव्हेंबर रोजी अवनी वाघिणीला शार्प शुटर असगर याने गोळ्या घालून ठार मारले होते. परंतु, अवनीच्या मृत्यूनंतर तिच्या २ बछड्याचे दर्शन अनेक दिवसांपासून झाले नव्हते. दरम्यान, अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर जंगलात बेपत्ता आणि भुकेल्या असलेल्या तिच्या २ बछड्यांचे अखेर गुरुवारी यवतमाळमधील जंगलात रस्ता ओलांडताना दर्शन झाले.
6 वर्षांपूर्वी -
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मनसेचा औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चा, नंतर राज्यव्यापी स्वरूप
महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागात मोठा दुष्काळ पडला आहे. परंतु, राज्यातील युती सरकार शेतक-यांच्या सर्व प्रश्नांकडे पूणर्पणे दुर्लक्ष करत आहे. त्यासाठी आता राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आणण्याची गरज असल्याने हातात दंडुका घ्यायला लागणार असल्याचा आक्रमक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या पत्रकार देण्यात आला आहे. फडणवीस सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना २७ नोव्हेंबरला औरंगाबादमध्ये प्रचंड मोठा दंडुका मोर्चा काढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर या मोर्चाला राज्यव्यापी स्वरूप येईल, अशी माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी प्रसार माध्यमांना दिली.
6 वर्षांपूर्वी -
भाजपच्या 'कार्टून' व्यंगचित्रकारांनी मनसे कार्यकर्ते सोडून शिवसैनिक दाखवले?
भाजपने काल “साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब?” या शीर्षकाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडविण्याचा नादात भाजपचे कॉपीकॅट व्यंगचित्रकार भलतीच ‘कार्टूनगिरी’ करून बसले आहेत. कारण, राज ठाकरेंच्या पाठीमागे ‘मनसे कार्यकर्ते’ दाखविण्याच्या नादात खांद्यावर ‘भगवा गळपट्टा’ परिधान केलेले अनेक वरिष्ठ कार्यकर्ते, ज्यामध्ये अनेकांच्या डोक्यावर केसं कमी टक्कल अधिक असलेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे ते मनसे कार्यकर्त्यांपेक्षा शिवसैनिक असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण: ओबीसीत समावेश करण्यासाठी मागासवर्ग आयोग अनुकूल
मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक तसेच आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झालेल्या निष्कर्षामुळे, या समाजाचा समावेश हा इतर मागास प्रवर्गात (OBC) करावा, नागराज खटल्यानुसार मागास प्रवर्गाची लोकसंख्या ५० टक्क्यांहुन जास्त असेल, तर अशा परिस्थितीत आरक्षणाची मर्यादा अधिक वाढविता येऊ शकते. या सर्व गोष्टींचा विचार करून OBC आरक्षणाचा एकूण कोटा वाढवून मराठा समाजाला योग्य त्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, अशी शिफारस महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग फडणवीस सरकारला करणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना प्राप्त झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्योग मंत्रिपद शिवसेनेकडे; तरी राज्याच्या औद्योगिक घसरणीवरून सरकारवर टीका
औद्योगिक गुंतवणुकीच्या बाबतीत देशात सतत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची आता अधोगती सुरु असताना शिवसेनेने सामना या मुखपत्रातून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. वास्तविक राज्याचं कॅबिनेट उद्योगमंत्री पद हे शिवसेनेच्या सुभाष देसाई यांच्याकडे असताना शिवसेनेने ही टीका केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नाणार’मधील टीकेनंतर आणि फसलेल्या उद्योगनीतीनंतर ५ वर्ष मंत्रिपद स्वतःकडे ठेऊन सर्व दोष भाजपाच्या माथी मारण्याचे प्रकार सुरु असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात दुष्काळ असताना सत्ताधारी राम मंदिरावरून वातावरण दूषित करत आहेत
सध्या राज्यात दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी तसेच शेती व्यवसाय संकटात आहे आणि त्यामुळे आत्महत्या सुद्धा वाढत आहेत. परंतु केंद्रातील व राज्यातील सत्ताधाऱ्यांना त्याबद्दल जराही आस्था राहिलेली नाही. कारण राज्यातील दुष्काळावर चर्चा सुरु असताना सत्ताधारी पक्ष केवळ राम मंदिराचा मुद्दा काढून समाजात जाणीवपूर्वक दुषित वातावारण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात भर म्हणजे घटनात्मक संस्थांवर हल्ले करुन त्या सर्व बाजूनी दुबळ्या करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया, असा थेट हल्लाबोल एनसीपीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी सरकावर केला.
6 वर्षांपूर्वी -
भव्य सभेत आरोप; सध्याच्या शिवसेनेने धंदेवाईक राजकारण सुरु केले आहे: नारायण राणे
कोकणात सध्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचे चित्र असून, त्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. स्वतः खासदार नारायण राणे यांनी पक्ष विस्तारावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. त्याच अनुषंगाने काल वैभववाडी येथे पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
6 वर्षांपूर्वी -
धुळे: आमदार अनिल गोटेंचं भाजप विरुद्ध बंड; स्वतःच 'महापौर' पदाचे उमेदवार
धुळे शहरातील राजकीय वातावरण सध्या आमदार अनिल गोटेंच्या भाजप विरोधातील बंडामुळे तापलं आहे. धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार अनिल गोटे यांनी आपल्याच पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली होती. त्यांच्या या आक्रमक शैलीचे पडसाद भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत सुद्धा सर्वांना पाहायला मिळाले. त्यामुळेच आमदार गोटे यांच्या रविवारी रात्री झालेल्या सभेकडे संपूर्ण धुळे शहराचं लक्ष होतं.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे रोखठोक पणे मराठीची व्याख्या थेट उत्तर भारतीयांच्या मंचावर मांडणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तर भारतीय महापंचायतने १२ ऑक्टोबर रोजी भेट घेऊन कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. दरम्यान, ते निमंत्रण त्यांनी स्वीकारल्याची अधिकृत माहिती पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करून दिली आहे. त्यामुळे २ डिसेंबर रोजी कांदिवलीच्या भुराभाई हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला स्वतः राज ठाकरे संबोधित करून पक्षाची भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
२५ नोव्हेंबरलाच सेनेचं ‘चलो अयोध्या’ आणि RSS'ची सभा? देशात धार्मिक तेढ वाढवण्यासाठी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर देशात धार्मिक तेढ वाढविण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न सुरु झाले आहेत का अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. कारण हिंदुत्व आणि राम मंदिराचा मुद्दा हाती घेत शिवसेनेने ‘२५ नोव्हेंबरला चलो अयोध्या’ चा कार्यक्रम आखला आहे आणि त्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा म्हणजे २५ नोव्हेंबरला राम मंदिराच्या मागणीसाठी प्रचंड सभा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्याचे वनमंत्री शिकारी माफियासोबत पैसे कमवत आहेत: संजय निरुपम
कांग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी अवनी वाघिणीच्या शिकारीनंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वनमंत्री सुधीर मुंगंटीवार हे शिकारी माफियांसोबत पैसे कमवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
हिंदूंनो! पुतळ्याचे लॉलीपॉप दाखवणाऱ्यांपासून सावधान: शिवसेना
जसजशी लोकसभा निवडणुक जवळ येत आहे, तसा राम मंदिराचा विषय अधिक गडद करण्याचा प्रयत्नं सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात श्री. रामचा भव्य पुतळा उभारण्याचे संकेत दिले होते. त्याला अनुसरूनच मित्र पक्ष शिवसेनेने सामना या मुखपत्रातून मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा