महत्वाच्या बातम्या
-
राज ठाकरेंची आज संध्याकाळी अमरावतीत प्रकट मुलाखत; भव्य नियोजन
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कालपासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यासाठी रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांनी शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते. दरम्यान आज ७:३० वाजता पंचवटी चौकातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे उद्यापासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यावर
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यासाठी रवाना होणार आहेत. आज सायंकाळी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अमरावती एक्सप्रेसने रवाना होणार आहते. राज ठाकरे यांनी शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
राज्यावर दुष्काळाचं सावट तर मोदींच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्यासाठी २ कोटी खर्च
सध्या राज्यावर दुष्काळाचं सावट आहे आणि राज्याच्या तिजोरीत सुद्धा खडखडाट असताना केवळ गर्दी जमविण्यासाठी आणि प्रोमोशनसाठी राज्य सरकारकडून मोदींच्या शिर्डीमधील कार्यक्रमावर तब्बल २ कोटीची उधळपट्टी करण्यात आल्याचे समजते. नियोजित ठिकाणी २० हजार घरकुल लाभार्थी कुटुंबीयांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असून, जवळपास ४० हजार लोक उपस्थित राहण्याचे आयोजन सरकारकडून करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; खोट्या विहिरींची राज ठाकरेंकडून पोलखोल
सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे आणि ग्रामीण भागावर सप्टेंबरच्या सुरुवातीलाच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने जलयुक्त शिवार आणि १ लाख २५ हजार विहिरी बांधल्याचा दावा सुद्धा त्यामुळे फसवा ठरल्याने राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फडणवीसांना लक्ष केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्य दुष्काळाच्या छायेत? मराठवाडा भयाण स्थितीकडे, केवळ २७.७९ टक्के पाणीसाठा
राज्यातील तब्बल २०० तालुक्यांत ७५ टक्के पेक्षा सुद्धा कमी पाऊस झाला असल्याचे वृत्त आहे. राज्याच्या अनेक भागात सरासरीपेक्षा सुद्धा कमी पाऊस पडल्यामुळे महाराष्ट्रातील तब्बल १४ जिल्ह्यामध्ये दुष्काळाची स्थिती ओढवली आहे. सप्टेबर महिन्या अखेर राज्यात सरासरीच्या ७७ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील धरणांमधील आजचा एकूण पाणीसाठा २६,७३६ दशलक्ष घनमीटर असून तो प्रकल्पीय पाणी साठय़ाच्या ६५.४८ टक्के इतका आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार 'पी-तू' मोहीम राबविणार...आता दारु सुद्धा घरपोच मिळणार?
दारूच्या शौकिनांसाठी राज्य सरकार आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र सरकार आता एक नवीन धोरण अंमलात आणण्याच्या विचाराधीन आहे, ज्याअंतर्गत दारुची डिलिव्हरी सुद्धा थेट तुमच्या घरपोच दिली जाईल. ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ केसचं प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा सरकारचा मानस आहे असं समजत. त्यामुळे दारू घरपोच देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरू शकत.
6 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये भरधाव वाहनाने सात लहान मुलांना उडवलं, एकाचा जागीच मृत्यू
वडाळागावात राहणारी ७ लहान मुलं आज सकाळी ३ वाजण्याच्या सुमारास कालिका देवीच्या दर्शनाला घरातून निघाली होती. दरम्यान, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ येताच एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिल्याने सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
आम्हाला मोदी भक्त म्हटलं जातं अंध भक्त नाही: भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ
भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी नवा जावई शोध लावला आहे. त्यांच्या महान अध्यात्म ज्ञानानुसार नरेंद्र मोदी म्हणजे भगवान विष्णूचा ११ वा अवतार असल्याचं वादग्रस्त ट्विट त्यांनी केलं आहे. भारताच्या हिंदू संस्कृतीत ३३ कोटी देव आहेत, पंचमहाभुतं आहेत, तसेच भारतमातेला आपण देव मानतो. पंतप्रधान हे देशाचे प्रधानसेवक असून ते भारतमातेची सेवा ज्याप्रमाणे करत आहेत त्याचा विचार करता आमच्यासाठी ते देवासमानच आहेत, असे वाघ यांनी म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदेंकडे आयआरबीच्या उपकंपनीची कार - टोल माफी हा जुमला?
एकनाथ शिंदेंकडे आयआरबीच्या उपकंपनीची कार – टोल माफी हा जुमला?
6 वर्षांपूर्वी -
संघ आधुनिक शस्त्रसाठा करून प्रतिसैन्य उभारत आहे का? प्रकाश आंबेडकर
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे असलेल्या एके 47 रायफलचा संदर्भ देत ती यांच्याकडे कशी आली असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच एके ४७ रायफल बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपचा गोपनीय सर्वेक्षण अहवाल, जवळपास ५० आमदारांचा निवडणुकीत सुपडा साफ होणार?
भाजपने केलेल्या पक्षाच्या अंतर्गत अहवालात जवळपास ६ खासदारांचा आणि तब्बल ५० च्या आसपास आमदारांचा आगामी निवडणुकीत सुपडा साफ होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त अंतर्गत गोटातून समजले आहे. त्यामुळे ते बंद लिफाफ्यात भाजपच्या आमदारांना तसेच खासदारांना देण्यात आले आहेत. भाजप सरकारने दिल्लीतील ‘चाणक्य’ या संस्थेकडून गुप्तपणे सर्वेक्षण करुन घेतले होते. त्यात हा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढले की तेच वेडे झालेत..मी आता अधिकृत बोलतोय! - औरंगाबाद
एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढले की तेच वेडे झालेत..मी आता अधिकृत बोलतोय! – औरंगाबाद
6 वर्षांपूर्वी -
वाजपेयी ते मोदी....पवारांचं योगदान केवळ लातूर-किल्लारी पुरता मर्यादित नव्हतं, ते गुजरातच्या भुज भूकंपात सुद्धा होत
वाजपेयी ते मोदी….पवारांचं योगदान केवळ लातूर-किल्लारी पुरता मर्यादित नव्हतं, ते गुजरातच्या भुज भूकंपात सुद्धा होत
6 वर्षांपूर्वी -
शासनाच्या चुकीमुळं एका रात्रीत उपनिरीक्षकांवर पुन्हा पोलीस कॉन्स्टेबल बनण्याची वेळ
ज्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्तीचं पत्र मिळालं त्याच दिवशी न्याधिकरणाचा आदेश देत सर्व नियुक्ती रद्दीचं पत्र प्रशिक्षणार्थींच्या हाती आलं आणि होत्याचं नव्हतं झालं असच म्हणावं लागेल. महाराष्ट्र सरकारी यंत्रणेतला सावळा गोंधळ असच काहीस चित्र आहे. विशेष म्हणजे नऊ महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर पोलीस उपनिरीक्षक नियुक्ती पत्राऐवजी नियुक्ती रद्दीचं पत्र प्रशिक्षणार्थींच्या हाती आलं आणि अनेकांना धक्का बसला.
6 वर्षांपूर्वी -
शारदीय नवरात्रौत्सवात आज पहिली माळ, 'आजचा रंग निळा'
यंदाच्या नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. नवरात्रींच्या ९ दिवस नऊ रंग आणि ९ रुप घेऊन दुर्गा माता अवतरणार आहे. आज घटस्थापनेचा दिवस असल्याने आजच पहिली माळ घालण्यात येते. त्यामुळे आज पहाटेपासूनच राज्यभरात देवींच्या मंदिरात भाविक भक्तांनी अलोट गर्दी केली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भक्तांची तुफान गर्दी दिसून येत आहे. या दोन्ही मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवरील हल्ल्यामागे संजय निरुपम यांच्याच पक्षाचा हात?
स्वतःला महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांचे कैवारी समजणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम सध्या गुजरातमधील उत्तर भारतीयांच्या हल्ल्यामागील प्रकरणावरून बॅकफूटवर गेले आहेत. कारण निरुपम यांच्या पक्षाचाच हात गुजरातमधील उत्तर भारतीयांवरील हल्ल्यामागे असण्याची प्राथमिक माहिती गुजरात मधील प्रकरणावरून समोर येत आहे. त्यामुळे संजय निरुपम या विषयावर पडद्याआड गेले असून त्यांना राज्य काँग्रेसकडून सुद्धा तंबी देण्यात आल्याचे वृत्त आहे. कारण, आता गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवरील हल्ल्यामागे काँग्रेसचे स्थानिक आमदार अल्पेश ठाकोर असल्याचे एका व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये समोर येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्याचा वैचारिक दुष्काळ; राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलं व्यंगचित्र
रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर दौऱ्यावर होते. दरम्यान, विकासकामांसाठी लातूरकरांनी निधीची अजिबात चिंता करु नये, कारण पुढच्यावेळी सुद्धा मीच राज्याचा मुख्यमंत्री असेन, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांच्या त्याच विधानाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर अचूक निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
नाहीतर भाजपचे 'रामनाम सत्य' होईल: उद्धव ठाकरे
भारतीय जनता पक्षाने लवकरात लवकर अयोध्येतील राम मंदिर उभारावे नाहीतर हिंदू समाज त्यांचे ‘राम नाम सत्य’ केल्याशिवाय राहणार नाही असा थेट गर्भित इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला दिला आहे. तसेच राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपने हिंदू जनतेचा भ्रमनिरास केल्याचा आरोपही शिवसेनेने मुखपत्रातून केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
म्हणे महाराष्ट्र बंद करू, महाराष्ट्र सैनिकाचा फोन येताच मोबाईल बंद
म्हणे महाराष्ट्र बंद करू, महाराष्ट्र सैनिकाचा फोन येताच मोबाईल बंद
6 वर्षांपूर्वी -
ठाण्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला मनसेने भर पत्रकार परिषदेत तुडवलं
ठाण्यात एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी भर पत्रकार परिषदेत तुडवून पोलिसांच्या हवाली केले आहे. गुजरातमध्ये जे झालं त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको. पण किती दिवस या असल्या लोकांना सहन करायचे ?. जर हे असले विकृत प्रकार थांबवले नाही तर उत्तर भारतीयांना मारुन मारुन इथून बाहेर काढू, असा थेट इशाराच मनसेने दिला आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमधूनच मुंबईत रोज घाण येते आहे, अशा शब्दात मनसेने उत्तर भारतीयांवर टीका केली.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL