महत्वाच्या बातम्या
-
आगामी निवडणुकांसाठी भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम'ची युती, काँग्रेसची डोकेदुखी वाढणार
राज्यातील आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांसाठी भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमने युती केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन औवेसी यांनी आघाडी केल्याने राज्यात इतर पक्षांसमोर आणि विशेष करून काँग्रेस व राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत. या दोन्ही पक्षांनी दलित-मुस्लिम ऐक्याचा नारा दिली आहे. विशेष म्हणजे औरंगाबादमध्ये २ ऑक्टोबरला हे दोन्ही पक्षांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येऊ नये, त्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडे जावं
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे’, असं विधान केल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
नैतृत्वावर आरोप करत घनसावंगी विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
शिवसेनेमध्ये निष्ठावंतांना डावलून पैशाच्या मोबदल्यात उपऱ्यांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप करत घनसावंगी विधानसभेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणीपूरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या निमित्ताने सेनेला घनसावंगी विधानसभा मतदासंघात फटका बसण्याची शक्यता.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका, मालमत्तेवर टाच
एनसीपी’चे नेते तसेच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे भलतेच अडचणीत आले आहेत. बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने धनंजय मुंडेंच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे धनंजय मुंडे स्वतःच न्यायालयीन कचाट्यात अडकले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
लाडक्या बाप्पाचं वाजतगाजत आगमन ! सर्वत्र ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष
आज सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं वाजतगाजत घरोघरी आगमन झालं. अवघा महाराष्ट्र भक्तीरसात चिंब नाहून निघाल्याचे चित्र आहे. सकाळपासूनच सर्वत्र ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करत घरोघरी गणरायाचं आगमन झालं. तसेच मुंबई, पुणे, नाशिक आणि राज्यातील विविध शहरांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आल्याने सर्वत्र प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोकण; अतिउत्साही शिवसेना नेत्यांकडून 'बाप्पाला' बॉक्समधून लगेज'ने चिपी विमानतळावर आणून प्राणप्रतिष्ठा
आज कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळावर विमान उतरविण्यासाठी लागणा-या ६२ परवान्यांपैकी केवळ २५ टक्केच परवाने मिळाले असताना घाईघाईने एचडीएल कंपनीचे खासगी विमान उतरविण्याचा अतिउत्साहीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे गणेश चतुर्थीच्या तोंडावर गणरायाचं प्राणप्रतिष्ठा करण्याचं ठरवलं, परंतु त्याच गणरायाला लगेज’मध्ये बॉक्समधून भरून आणण्यात आलं. सार्वजानिक असो वा घरगुती ‘बाप्पाची’ प्रतिष्ठापना करतांना त्याला ‘सीलबंद’ करून आणण्यात येत नाही.
6 वर्षांपूर्वी -
नागराज, आर्ची-परशाचा मनसे चित्रपट सेनेत प्रवेश
सैराट चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेले नागराज मंजुळे, आर्ची आणि परशा’ने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेत प्रवेश केला असून, त्यांनी रीतसर प्राथमिक सदस्यत्व सुद्धा स्वीकारलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या ‘सैराट’ टीमचा ग्रामीण भागात प्रोमोशनसाठी उपयोग होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आर्ची आणि परशा’चा ग्रामीण महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग असल्याने त्याचा फायदा पक्षाला आणि मनसेच्या चित्रपट श्रुष्टीतील दबदब्याचा फायदा या तिघांना सुद्धा भविष्यात होऊ शकतो अशी चर्चा आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-एनसीपी'ची आगामी निवडणुकी'बाबत महत्वाची बैठक
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपावरुन काँग्रेस-एनसीपी’ची महत्वाची बैठक राधाकृष्ण विखेपाटील यांच्या बंगल्यावर पार पडली. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सर्व जागांविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त असून आघाडी निश्चित असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
महागाईने जगणं मुश्किल केल्यानंतर, मोदींवरील 'चलो जिते है' लघुपटाचं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्क्रीनिंग?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावरील लघुपट ‘चलो जिते है’ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखविला जाणार आहे. राज्य शासनाने तशा प्रकारचे लेखी आदेश काढले नसले तरी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख तसेच शिक्षणाधिकाऱ्यांना व्हॉट्सअँपच्या माध्यमातून फर्मान सोडण्यात आल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्यशोधन समिती अहवाल; कोरेगाव-भीमा हिंसाचार पूर्वनियोजित
पुण्यातील कोरेगाव- भीमा हिंसाचार पूर्वनियोजित कट होता. तसेच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी हिंसा भडकण्यासाठी पूरक अशी परिस्थिती निर्माण केली होती आणि त्यातही स्थानिक पोलिसांच्या गाफिलपणामुळे हा हिंसाचार घडला असल्याचं सत्यशोधन समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण; मागासवर्ग समिती १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणार
महाराष्ट्रातील बहुचर्चित असलेला विषय म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा. मराठा समाजाच्या आर्थिक तसेच सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाचा प्रगती अहवाल सादर केला. मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
6 वर्षांपूर्वी -
भारत बंद : आंदोलनानंतर राज ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद
भारत बंद : आंदोलनानंतर राज ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद
6 वर्षांपूर्वी -
खरंच पेट्रोल-डीझेलचे दर आटोक्यात आणणं सरकारच्या हातात नाही? जाणून घ्या पूर्ण सत्य
खरंच पेट्रोल-डीझेलचे दर आटोक्यात आणणं सरकारच्या हातात नाही? जाणून घ्या पूर्ण सत्य
6 वर्षांपूर्वी -
महागाई आणि भारत बंद; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची संध्याकाळी पत्रकार परिषद
काँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या तसेच एकूणच वाढलेल्या महागाईविरोधात आज भारत बंद पुकारला आहे. आज सकाळ पासूनच प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक तसेच बसेस अडविण्यात आल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
जनता जागीच आहे, शिवसेनेची २०१४ मधील महागाईवरील जाहिरात व्हायरल
आज महागाई विरोधात विरोधकांनी भारत बंद’ची हाक दिली आहे. भर सणासुदीच्या दिवसात सामान्य लोकं महागाईने होरपळून निघाले आहेत. त्यात शिवसेना एका बाजूला सत्तेत सामील होऊन केवळ भाजपवर टीका करण्यात व्यस्त आहे. भाजपने देशवासियांना दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत आणि भाजप म्हणजे केवळ जाहिरातबाजीचे सरकार अशी टीका करण्यात व्यस्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुणे व्हिडिओ; मनसेच्या बदनामीसाठी जुनी रात्री पेट घेतलेली बस शेअर
पुण्यातील कोथरूड मध्ये रात्री पेट घेणारी एक बस शेअर होत असली तरी वास्तविक तो व्हिडिओ जुना असून त्या व्हिडिओचा भारत बंद आणि मनसे पक्षाशी काहीच संबंध नसल्याचं उघड झालं आहे. समाज माध्यमांवरील खोडसाळ पनाचं पुन्हा दर्शन घडताना दिसत आहे. राज्यात काँग्रेसपेक्षा मनसे अधिक कार्यरत झाल्याने आंदोलनाला धार येताच, मनसे विरुद्ध जुने व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करून जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
जुना व्हिडिओ - रात्री पेट घेणारी ती पीएमटी'ची बस मनसेच्या बदनामीसाठी
जुना व्हिडिओ – रात्री पेट घेणारी ती पीएमटी’ची बस मनसेच्या बदनामीसाठी
6 वर्षांपूर्वी -
वाढत्या महागाई विरोधात भांडूपमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा रेलरोको
काँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या तसेच एकूणच वाढलेल्या महागाईविरोधात आज भारत बंद पुकारला आहे. आज सकाळ पासूनच प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक तसेच बसेस अडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जवळपास देशभरातील एकूण ३१ पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला असला तरी महाराष्ट्रात मनसेने सक्रिय पाठिंबा दिल्याने राज्यात मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ज्यांच्यावर आगपाखड, त्यांचा मातोश्रीवर फोन येताच स्वतः बॅकफूटवर आणि 'भारत बंद'वरून विरोधकांची खिल्ली?
काँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या तसेच एकूणच वाढलेल्या महागाईविरोधात आज भारत बंद पुकारला आहे. आज सकाळ पासूनच प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक तसेच बसेस अडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जवळपास देशभरातील एकूण ३१ पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला असला तरी महाराष्ट्रात मनसेने सक्रिय पाठिंबा दिल्याने राज्यात मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
'भारत बंद', महागाईविरोधात उद्या मनसेसुद्धा रस्त्यावर, सामान्यांना सहकार्याचे आवाहन
काँग्रेसने उद्या पुकारलेल्या भारत बंद पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि महागाईविरोधात प्रतिदास मिळतो काय अशी शंका उपस्थित होऊ लागली होती. परंतु त्यात आक्रमक मनसेने सुद्धा उडी घेतल्याने उद्या मोदी सरकारविरोधात सर्व रोष रस्त्यावर पाहायला मिळू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांसोबत मनसे महिला आघाडी सुद्धा सक्रिय पणे रस्त्यावर उतरतील अशी शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा