महत्वाच्या बातम्या
-
आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेची महत्वाची बैठक
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची आज शिवसेना भवनमध्ये महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. स्वतः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली असून सर्व नेतेमंडळींना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ व्हायरल: भाजप आमदार राम कदमांच्या रक्षाबंधन कार्यक्रमात रेशनकार्ड, नंतर शिक्का व टिकमार्क?
मुंबई : भाजपचे स्वयंघोषित डॅशिंग आमदार तसेच प्रवक्ते राम कदम रोज नवनवीन वादात अडकताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रजा फाउंडेशन’कडून लोकप्रनिधींच्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्यात आलं होत, तसेच लोकप्रनिधींच ते रिपोर्ट कार्ड सामान्य जनतेसाठी खुलं करण्यात आलं होतं. त्यात भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांचा सुद्धा क्रमांक आला होता. परंतु तो क्रमांक खालून पहिला होता. त्याआधी मोदींचा फेक व्हिडिओ शेअर करण्याचा पराक्रम सुद्धा करून झाला आणि त्यात सुद्धा खरा व्हिडिओ समोर आल्याने ते तोंडघशी पडले होते. आता ते मतदार संघात रक्षाबंधनाच्या नावाने अजून भलत्याच वादात अडकण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
'ते' अटक करण्यात आलेले आमचे साधक नाहीत, सनातन संस्थेने हात वर केले
मागील काही दिवसांपासून नालासोपारा येथून करण्यात आलेल्या धरपकडी नंतर राज्यभर अनेक ठिकाणी एटीएस’कडून अटक सत्र सुरु झालं होतं. त्यातील अटक करण्यात आलेले सर्वजण हे सनातन संस्थेशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वैभव राऊतसह इतर आरोपी हे सनातन संस्थेचे साधक नसल्याचा दावा केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अटलजींचे निधन नक्की कोणत्या तारखेला? संजय राऊतांना तारखेबद्दल शंका
मुंबई : माजी पंतप्रधान दिवंगते अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन १६ ऑगस्टलाच झाले होते की, त्या दिवशी त्यांच्या निधनाची केवळ घोषणा करण्यात आली होती, अशी शंका शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अटलजींचा श्वास साधारण १२-१३ ऑगस्टपासून मंदावला होता.
6 वर्षांपूर्वी -
मराठी नाटकांची 'फोर्ब्ज' या जगप्रसिद्ध मासिकाने सुद्धा दखल घेतली
मराठी नाट्य श्रुष्टीसाठी एक अभिमानास्पद गोष्ट घडली आहे. कारण मराठी नाटकांची ‘फोर्ब्ज’ या जगप्रसिद्ध मासिकाने सुद्धा दखल घेतली असून त्यात भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मराठी नाटकांची नावं ‘फोर्ब्ज’च्या यादीत झळकली आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय जनता पक्षात बुजुर्ग नेत्यांना नव्हे तर त्यांच्या अस्थींना महत्व: उद्धव ठाकरे
माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश यात्रेवरून शिवसेनेने सामना मुखपत्रातून भाजपला खडे बोल सुनावले आहेत. स्वर्गीय. अटलजींच्या अस्थिकलश यात्रेवरून उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडताना म्हटलं की, अटलजींचा अस्थिकलश हाती घेऊन लोक खदाखदा हसत होते तर काहींनी अटलजींच्या अस्थिकलशासोबत सेल्फी काढण्याचा पराक्रम केला.
6 वर्षांपूर्वी -
राज्यातील शिव स्मारक पहिल्या विटेच्या प्रतीक्षेत, तर सरदार पटेलांचा १९८९ कोटीचा पुतळा येत्या ३० दिवसांनी पूर्ण होणार
गुजरात राज्यात नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच आणि तब्बल १९८९ कोटी रुपये खर्चून भव्य असा पुतळा येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल असं लिखित निवेदन खुद्द गुजरात सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी करण्याची घोषणा गुजरात सरकारने केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची मुंबईमध्ये महत्वाची बैठक
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईमध्ये महत्वाची बैठक आयोजित केली आहे. स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच नालासोपाऱ्यात एटीएस’ने हस्तगत केलेल्या स्फोटकाप्रकरणी सुद्धा या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
भाजप कार्यकर्त्यांचं वर्तन व चारित्र्य अटलजींसारखं आहे का? गडकरींचा कार्यकर्त्यांना रोखठोक सवाल
सध्या भाजप कार्यकर्त्यांचं वर्तन आणि चारित्र्य अटलजींसारखं आहे का? असा रोखठोक सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भाजप कार्यकर्त्यांना केला. पक्षाच्या कार्यक्रमात मला फक्त चहाच दिला-बिस्किट दिले नाही अशा मुद्द्यांवर पक्षात खडाजंगी होते, असा सणसणीत टोला त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना लगावत सत्य परिस्थितीवर बोट ठेवलं.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंपुढे Jio नरमली, आम्ही केबल चालकांना एकत्र घेऊन काम करायला तयार असल्याची हमी
काही दिवसांपूर्वी अनेक केबल संघटनांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेऊन जिओ केबलमुळे होणाऱ्या नुकसानाची तसेच अडचणींचा पाढा राज ठाकरे यांच्यासमोर वाचला होता. जिओमुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुराड येणार असल्याचे राज ठाकरेंच्या निदर्शनास आणले होते. त्यानंतर मनसेने थेट जिओ कंपनी सोबत पत्रव्यवहार करून त्यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती.
6 वर्षांपूर्वी -
दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत अमित ठाकरेंचा रक्षाबंधन साजरा
दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत अमित ठाकरेंचा रक्षाबंधन साजरा
6 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटीलसाहेब, खड्ड्यांबद्दल आदित्य ठाकरेंना १००० रुपयांचं बक्षीस पाठवा: धनंजय मुंडे
राज्याचे महसूल तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी ‘खड्डे दाखवा आणि हजार रुपये बक्षीस मिळवा’ अशी घोषणा केली होती. त्याचाच संदर्भ घेऊन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून एक खोचक ट्विट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ खड्ड्यांमुळे आदित्य ठाकरेंच्या आलिशान गाडीचे टायर फुटले
सध्या युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या आलिशान गाडीला मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ खड्ड्यांमुळे फटका बसला असून त्यांच्या रेंजरोव्हर गाडीचे टायर फुटले. गुरुवारी मध्य रात्री ही घटना घडल्याचे समजत.
6 वर्षांपूर्वी -
सेनेच्या १२ मंत्र्यांनी काहीच कामं केली नाही, त्यांचा राज्याला काहीच फायदा नाही: सेना आमदार बाळू धानोरकर
शिवसेनेचे वरोरा भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर यांनी काल नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या विभागीय मेळाव्यात शिवसेनेच्या मंत्र्यांची अक्षरशः धिंडवडे काढले आहेत आणि पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींना सभागृहात सेनेच्या खासदारांनी नमस्कार केल्यास ते पाहतसुद्धा नाहीत: खासदार कीर्तीकर
पंतप्रधान मोदींना सभागृहात सेनेच्या खासदारांनी नमस्कार केल्यास ते पाहतसुद्धा नाहीत असा थेट आरोप शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी मोदींच नाव घेऊन केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांना नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते हे शिवसेनेचे नेते सुद्धा उघड बोलू लागले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
दाभोलकरांच्या हत्येपूर्वीच आघाडी सरकारने ‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव केंद्राला दिला होता
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येपूर्वीच आघाडी सरकारने ‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव केंद्राला दिला होता असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन
ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होत. मागील अनेक दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते.
6 वर्षांपूर्वी -
कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन'साठी महाराष्ट्राचा 'ज्युनिअर मिल्खा सिंग' साईश्वर गुंटूक'ची निवड
तब्बल २१ किलोमीटरच्या कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन’साठी महाराष्ट्रातील सोलापूरचा सात वर्षीय ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ म्हणजे साईश्वर गुंटूक’ची निवड झाली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा उणे ६ अंश सेल्सियस इतक्या कमी तापमानात आणि अतिशय दुर्गम भागात पार पडणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
पप्पू पुन्हा नापास झाला, मनसेकडून आमदार राम कदमां'च्या अभिनंदनाच पोश्टर
काही दिवसांपूर्वी प्रजा फाउंडेशन’कडून लोकप्रनिधींच्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्यात आलं होत, तसेच लोकप्रनिधींच ते रिपोर्ट कार्ड सामान्य जनतेसाठी खुलं करण्यात आलं होतं. त्यात भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांचा सुद्धा क्रमांक आला होता. परंतु तो क्रमांक खालून पहिला होता. त्याचाच धागा पकडून मनसेने घाटकोपर पश्चिमेला आमदार राम कदम यांच अभिनंदन करणारा पोश्टर लावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी मोदी ओरडलात, पण शेवटी काय झाले ? : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पुण्यातील जैन समाजातील मंडळींची भेट घेतली. त्यावेळी उपस्थित जैन समाजातील लोकांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, धोनी धोनी प्रमाणे मोदी मोदी ओरडलात, पण शेवटी काय झाले, मोदींनी पहिली कुऱ्हाड व्यापाऱ्यांवरच मारली ना, असा प्रश्न उपस्थित जैन समाजातील लोकांपुढे करून मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today