महत्वाच्या बातम्या
-
पु. ल. देशपांडेंबद्दल बोलण्याएवढा मी मोठा नाही: राज ठाकरे
संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे याच्या जीवनावर आधारित चित्रपट सध्या दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. पु. ल. देशपांडे याच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे नाव ‘भाई-व्यक्ती की वल्ली’ असं करण्यात आलं असून, त्याच चित्रपटाचा काल राज ठाकरे यांच्या हस्ते पोस्टर लाँच करण्यात आला त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
7 वर्षांपूर्वी -
दत्तक नाशिकमध्ये भाजपसाठी भविष्यात धोक्याची घंटा ?
सत्ताधारी भाजपचा सध्या जरी नाशिकमध्ये २ खासदार, ४ आमदार, महापालिकेत सत्ता, जिल्हा परिषद, नगरपालिकांत बहुसंख्य भाजपचे सदस्य अशी ताकद आहे. परंतु नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ती ताकद केवळ कागदावरच असल्याचं सिद्ध झालं आहे. भाजपची नाशिकमधील लॉबी खुद्द मुख्यमंत्र्यांचे आदेश धुडकावून आपल्याच उमेदवाराला धूळ चारत असल्याचे चित्र समोर आलं होत.
7 वर्षांपूर्वी -
पवारांचं ‘पगडी’नाटय़ ठरवून व विशिष्ट समाजाला संदेश देण्यासाठीच
सध्या निवडणुकीच्या तोंडावर नवनवीन जातीय समीकरण आखण्याचा प्रयत्नं अनेक राजकीय पक्षांकडून होताना दिसेल. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यात हल्लाबोल यात्रेचा समारोप झाला. त्याला छगन भुजबळ हजर राहिले होते. त्यावेळी झालेल्या सत्कार कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पेशवेकालीन पगडी बाजूला सारुन यापुढे फुले पगडी वापरण्याचा सल्ला दिल्यानंतर अनेक जणांना आश्चर्याचा धक्का बसला.
7 वर्षांपूर्वी -
स्वत:वर गोळी झाडून भय्यूजी महाराजांची आत्महत्या
स्वत:वर गोळी झाडून भय्यूजी महाराजांनी जीवन संपवलं असलं तरी अद्याप आत्महत्येचं कारण अस्पष्ट असल्याचं समजतं. इंदूरमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
7 वर्षांपूर्वी -
तो VIDEO वायरल: उद्धव ठाकरेंनी स्वतःला २५ कोटींचा गंडा बांधून घेतला - शिशिर शिंदें
शिशिर शिंदे यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर खूप वायरल होत आहे. त्यात मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे जे सध्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असल्याच्या बातम्या सर्वच प्रसार माध्यमांमध्ये आल्या आहेत. या व्हिडिओ मध्ये त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राज्यसभेच्या उमेदवारीवरून खूप गंभीर आरोप केले होते.
7 वर्षांपूर्वी -
१०० मतं कमी असताना भाजपचा उमेदवार ७४ मतांनी विजय ? 'लक्ष्मीदर्शना'ची चर्चा रंगली
लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीच्या निकालात भाजप उमेदवार सुरेश धस यांनी बाजी मारली असून ते तब्बल ७४ मतांनी विजयी झाले आहेत. परंतु हा विजय म्हणजे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना दिलेला जोरदार झटका समजला जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
बाजीप्रभू, तानाजी मालुसरेंच्या चरणांची धूळ व्हावी असं कोणी आहे का? निवडणुकीच राजकारण?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी आणि रयतेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या कोणत्याही मावळ्याशी एखाद्याची तुलना करावी हे तर लांबच, पण त्यांच्या चरणांची धूळ व्हावी इतकी लायकी असलेलं तरी कोणी उरलं आहे का ? केवळ निवडणुकीची आकडेवारी, जातीय समीकरण आणि विशिष्ठ समाजाच्या मतांना डोंळ्यासमोर ठेऊन, कोणत्याही व्यक्तीची तुलना ही स्वराज्यासाठी लढून स्वतःच रक्त आठवणाऱ्या महाराज्यांच्या कोणत्याही मावळ्यांशी करण कितपत स्वीकारावं ? कारण असाच प्रकार घडला आहे शिवसेनेकडून.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेना सरकारच्या मुंबई विकास आराखड्यात कोळीवाड्यांना स्थान नाही
मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाण यांची हद्दच अजून निश्चित नसल्याने भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने आखलेल्या मुंबईच्या नवीन विकास आराखड्यात मुंबईमधील एकाही कोळीवाड्याचा समावेश करण्यात आलेला नाही. एकूणच परिस्थिती अशी आहे की वरळी कोळीवाड्यानंतर आता सायन कोळीवाड्याला सुद्धा झोपडपट्टी घोषित करण्याच्या हालचाली सुरु आहेत असं चित्र आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेला धक्का, २ नगरसेवक, पदाधिकारी व युवासेनेचे कार्यकर्ते भाजपात
मुरबाडमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या दोन नगरसेविका, शहर पदाधिकारी आणि युवासेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेत सुद्धा गळती सुरु झाली असून पुढे सुद्धा शिवसेनेला मोठे धक्के दिले जातील असा विश्वास स्थानिक नेत्यांनी बोलून दाखवला.
7 वर्षांपूर्वी -
भिडेंचं अजब विज्ञान ! माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना मुलं होतात
शिवकालीन इतिहासाची दाखले देऊन सध्याच्या राजकीय परिस्थीवर भाष्य करणाऱ्या संभाजी भिडेंनी एक अजब दावा केला आहे. शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी हे विधान नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत केलं आहे ज्यामुळे त्यांच्यावर खूप टीका होताना दिसत आहे.
7 वर्षांपूर्वी -
ओबीसींच्या आरक्षणासाठी मी शिवसेना सोडली, शिवसेना अडचणीत?
पुण्यातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना छगन भुजबळ यांनी भाषणा दरम्यान एक धक्का दायक खुलासा केला. भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठीच मी शिवसेना सोडली. परंतु भुजबळांचा हा दावा शिवसेनेला निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणू शकतो अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे. कारण त्याचा दुसरा अर्थ शिवसेनेचा ओबीसी आरक्षणाला विरोध होता का अशी कुजबुज उपस्थितांमध्ये सुरु होती.
7 वर्षांपूर्वी -
बाहेर तर आलो आता खायचं काय? बघतो तर खात्यात १५ लाख जमा: भुजबळ
काल पुण्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप झाला. त्याला माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच हल्लाबोल यात्रेत कार्यकर्त्यांना संबोधीत केलं. मोदी सरकारच्या फसव्या घोषनांची भुजबळांनी चांगलीच खिल्ली उडविली.
7 वर्षांपूर्वी -
आज राष्ट्रवादीच्याच व्यासपीठावर भुजबळांची तोफ धडाडणार
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ जवळजवळ दोन वर्षानंतर जामिनावर बाहेर आल्यावर ते नक्की काय भूमिका घेणार किंव्हा राष्ट्रवादीतच राहणार की दुसरा विचार करणार असे एक ना अनेक राजकीय तर्क राजकीय विश्लेषक लढवत होते. त्या तर्कवितर्कांना अखेर स्वतः छगन भुजबळ यांनीच उत्तर दिल आहे.
7 वर्षांपूर्वी -
एस.टि. महामंडळ कर्मचाऱ्यांची व्यथा...
एस.टि. महामंडळ कर्मचाऱ्यांची व्यथा…
7 वर्षांपूर्वी -
शरद पवार व राज ठाकरे का एकमेकांना खंजीर खुपसतील? राजकीय संदर्भ नसलेले हे कॉपी-पेस्ट व्यंगचित्रकार कोण ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्राला एक राजकीय आणि वस्तुस्थितीवर आधारित संदर्भ असतो हा अनुभव आहे. त्यांनी त्या त्या परिस्थितीशी सांगड घालणारी व्यंगचित्र नेहमीच प्रसिद्ध केली आहेत. अगदी राष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे असो की त्यांचाच व्यंगचित्रकारितेचा वारसा अधिक प्रगल्भतेने पुढे घेऊन वर्तमानावर बोट ठेवण्याची नेमकी कला या दोन्ही व्यंचित्रकारांनी नेहमीच जोपासली.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने आपलाच उमेदवार पळवून आपल्याच विरुद्ध उभा केला
ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधीत करताना मुख्यमंत्री म्हणाले की, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मित्रपक्षाने आपलाच उमेदवार पळवून आपल्यासमोरच उभा केला. तरी आपण पोटनिवडणूक जिंकली, परंतु येत्या निवडणुकीत शिवसेनेपासून सावध राहण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला.
7 वर्षांपूर्वी -
रावतेंवर प्रवाशी आणि एसटी कर्मचारी दोघेही नाराज
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एकबाजूनेच विचार करून जाहीर केलेली पगारवाढ एसटी संघटनांना मान्य नाही. तसेच एसटीच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ घोषित केली. परंतु ज्या कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांनी एसटी महामंडळाकडे ९ जूनपर्यंत लेखी स्वरूपात अर्ज करावा आणि कहर म्हणजे हे अर्ज स्वीकारताना संबंधित कर्मचाऱ्यांचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याने सर्व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावते याच्या विरोधात एक खदखद आहे.
7 वर्षांपूर्वी -
मास्तर म्हणाले तू नापास होणार, पोरग पास झालं, मग काय मिरवणूक काढून थेट मास्तराला ठस्सन
एका खासगी क्लासच्या मास्तरांनी त्याच्या पठ्याला तू दहावीला काय पास होणार नाही म्हणून सांगितलं होत. मास्तर रोज हिणवायचे प्रगती बघून. पण मुलगा पण मोठा जिद्दी निघाला आणि ठासून अभ्यास केला आणि चक्क ५१ टक्के मिळवून दहावीला पास पण झाला. पठ्याला मेरिट मध्ये आल्याचा आनंद तर झालाच, पण मित्र पण जाम खुश झाले आपल्या दोस्तांवर आणि ठरलं तर मग थेट मिरवणूक काढून मास्तरांनाच ठस्सन दिली पठ्यानं.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा नाणार प्रकल्पाविरोधात विराट मोर्चा
नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वात विराट मोर्चा काढला. यात नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध असलेले सर्व स्थानिक लोक सहभागी झाले होते.
7 वर्षांपूर्वी -
कदमांनी मला पाडण्याचा व संपविण्याचा विडा उचलला होता: अनंत गीते
शिवसेनेतील जुनी खदखद चव्हाट्यावर आली आहे. औरंगाबाद येथे औरंगाबाद शाखेच्या वर्धापन कार्यक्रमात आणि व्यासपीठावर औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार आणि महिला अध्यक्ष मनीषा कायंदे उपस्थित असताना केंद्रीय मंत्री वसंत गीते यांनी ही जुनी आठवण करून दिली.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL