महत्वाच्या बातम्या
-
उत्तर भारतीय मतांसाठी योगी आदित्यनाथ नालासोपाऱ्यात: पालघर
येत्या २३ तारखेला म्हणजे बुधवारी वसई, विरार आणि नालासोपारा भागातील उत्तर भारतीय मतदारांची लोकसंख्या लक्ष्यात घेता भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने नालासोपारा येथे जाहीर सभेचे आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सुद्धा पालघर मध्ये त्याच दिवशी जाहीर सभा होत आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या सरकारमुळे गिरगांवकर रस्त्यावर: मेट्रो-रेल्वे प्रकल्प
मुंबईतील मेट्रो रेल्वेचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु असून त्याला सुरवातीला गिरगावकरांचे सहकार्य लाभले होते. कारण या मार्गातील केवळ २ इमारती पाडाव्या लागतील असं आधी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आलं होत. परंतु भाजप-सेनेच्या सरकारने अक्षरशः त्या विषयावर यू-टर्न घेतल्याचे चित्र समोर आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठी फेरीवाल्याच्या नोटा फाडणारे सोमय्या 'नॉट रिचेबल'
मुलुंडचे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी जनसंपर्क अभियानादरम्यान एका मराठी फेरीवाल्याशी झालेल्या वादात चिडून त्यांनी त्या मराठी फेरीवाल्याला धक्काबुक्की केली तसेच त्याच्या हातातील ५० रुपयांच्या नोटा फाडून टाकल्याला आणि त्याच्याच तोंडावर फेकून मारल्याचा प्रकार घडला आहे.
7 वर्षांपूर्वी -
पालघर, भाजपच्या प्रचार साहित्यांवर चिंतामण वनगांचे फोटो
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या निवडणूक प्रचार साहित्यावर सर्व ठिकाणी दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या फोटोचा तसेच नावाचा भाजपच्या उमेद्वाराकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत जयश्री वनगा यांनी भाजप विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
तर शिवसेनेच्या भविष्यात अडचणी वाढतील
२०१९ मधील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना डॉ. मनमोहन सिंग हेच टक्कर देऊ शकतात. कारण राहुल गांधी यांना अजून बरंच राजकीय शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राहुल गांधी गांधी हे मोदींना टक्कर देऊ शकणार नाहीत असं परखड मत व्यक्त केलं आहे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी. तर दुसरीकडे शिवसेनेने जर निर्णय वेळीच घेतला नाही तर त्यांच्यासमोर भविष्यात अडचणी वाढण्याची शक्यता आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं.
7 वर्षांपूर्वी -
नाहीतर सेनेचे आमदार-खासदार फुटण्याची शक्यता
शिवसेनेने २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जर भाजपसोबत युती केली नाही तर शिवसेना पक्षात उभी फूट पडून शिवसेनेचे अनेक आमदार आणि खासदार बाहेर पडतील असं मत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. या विधानाने शिवसेना आणि रामदास आठवले यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या शपथेची घाई करायला नको होती - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी येडियुरप्पा यांच्या अडीच दिवसाच्या कार्यकाळावर आपले मत व्यक्त केले. त्यांच्या माते भाजपने सत्ता स्थापनेची घाई करायला नको होती, उलटअर्थी काँग्रेसने पहिल्या दिवसापासून सय्यम ठेवला होता.
7 वर्षांपूर्वी -
पालघर निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना बुलेट-ट्रेनच्या विरोधात ?
सध्या पालघर जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीची लगबग असून त्याचाच मेळ साधून शिवसेनेने बुलेट ट्रेनला विरोध दर्शविला आहे. पालघर पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने बुलेट ट्रेनविरोधी कृती समितीने आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. तसेच शिवसेना या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सूचित केले आहे. बुलेट ट्रेनला विरोध असण्यापेक्षा या मागील खरं कारण लोकसभा पोटनिवडणुक असल्याचं राजकीय विश्लेषक बोलत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
गुजरातमधील शेतकऱ्यांचा सुद्धा बुलेट-ट्रेनला विरोध
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सरकारकडून जमिन अधिग्रहण सुरु होताच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबरोबरच गुजरात राज्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा जमिन अधिग्रहणाला तीव्र विरोध दर्शविल्याने नरेन्द्र मोदींचा हा महत्वकांक्षी प्रकल्प वादात अडकण्याची चिन्हं आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राज्यात नोकर भरती, पण सरकारची 'अट' लागू ?
राज्य सरकारच्या सरकारी नोकर भरतीचा आकडा बघून तरुण भारावले खरे, पण त्यासाठी फडणवीस सरकारची ‘अट’ समजल्यास तुमचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण तुमची निवड झाली तरी तुम्हाला तब्बल ५ वर्ष शिक्षण सेवकाच्या धर्तीवर केवळ मानधनावर काम करावं लागेल. त्यानंतर सुद्धा कायम स्वरूपाची खात्री नसेल, कारण त्यानंतर सुद्धा तुमची पात्रता व कामगिरी बघूनच ती नोकरी नियमित केली जाईल.
7 वर्षांपूर्वी -
सहकार मंत्र्यांच्या कंपनीवर सेबीची कारवाई
भाजपचे आमदार आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अॅग्रो लिमिटेड या कंपनीवर ‘सेबी’ने टाच आणली आहे. सहकार मंत्री आणि त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांच्यासह इतर तब्बल १० संचालकांवर ‘सेबी’ने भांडवली बाजारात व्यवहार करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख अडचणीत येण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
सोलापूर महापालिकेत मलईदार पदांसाठी सेना-भाजपचं मिलन
सोलापूर महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेचे एकमेकांशी जरा सुद्धा पटत नसताना ते महापालिकेच्या ७ विषय समिती सभापती निवडणुकीसाठी व मलईदार पदांसाठी एकत्र आले व आपसातील रुसवे फुगवे बाजूला ठेवले. विशेष म्हणजे विरोधकांना अंधारात ठेवून शिवसेनेचं आणि भाजपचं मनोमिलन झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
आप व शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच 'डिपॉझिट' जप्त
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष तर काँग्रेस आणि जेडीएस हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. परंतु बाकी सर्व पक्ष म्हणजे आप आणि शिवसेनेच्या पक्षाच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवारच २०१९ मध्ये देशाचे चित्र पालटवू शकतात
देशात लवकरच येऊ घातलेल्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी सर्व विरोधी पक्षांचे नैतृत्व केल्यास मला नक्कीच आनंद होईल. तसेच शरद पवार हेच २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत देशाचे राजकीय चित्र पालटवू शकतात असं विश्वास माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नारायण राणे पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध प्रचारात
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपसाठी प्रचारात उतणार असल्याचे वृत्त आहे. पालघर मध्ये मोठया प्रमाणावर कोकणी मतदार तसेच भंडारी समाजाचे लोक आहेत. त्याचाच फायदा भाजपच्या उमेदवाराला व्हावा या उद्देशानेच खुद्द मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंना प्रचारासाठी विनंती केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिशिर शिंदे शिवसेनेत जाणार, पण मनसेला फायदा की सेनेला नुकसान ? सविस्तर
मनसेचे भांडुप विधानसभा मतदार संघातील माजी आमदार शिशिर शिंदे हे लवकरच शिवसेनेत जाणार असल्याचे वृत्त आहे. तस असलं तरी त्याने मनसेला काही फरक पडणार नसल्याचे एकूणच चित्र आहे असं दिसतं. मागील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनेक स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे शिशिर शिंदे यांच्या विरुद्ध पक्ष विरोधी कारवाई केल्याबद्दल हरकती नोंदविल्या होत्या.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची महाडच्या चवदार तळ्याला भेट : कोंकण दौरा
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पक्षविस्तार, कार्यकर्त्यांचे मेळावे तसेच महाराष्ट्र सैनिकांच्या भेटी साठी कोंकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान महाड मधील वास्तव्यात त्यांना चवदार तळ्याला भेट देण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी थेट चवदार तळ्याला भेट दिली जेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता.
7 वर्षांपूर्वी -
भाजपची सत्ता गेली की त्यांची सुद्धा चौकशी होणार: राज ठाकरे
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून सर्वच पक्षाकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने थेट राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप केला असून भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
7 वर्षांपूर्वी -
रमेश कराडांची सुरेश धस यांच्या घरी 'चाय पे चर्चा'
लातूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्यावर नाराज असलेले भाजप नेते रमेश कराड यांनी धनंजय मुंडे यांच्या मार्फत राष्ट्रवादीत प्रवेश करून राष्ट्रवादीकडून थेट लातूर विधान परिषद निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे भंडाऱ्याचे नाराज जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले भाजपात
लोकसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे भंडाऱ्याचे नाराज जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्याआधी त्यांनी शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा