महत्वाच्या बातम्या
-
MLA Ravi Rana | आ. रवी राणांविरुद्धच्या कलम १०-ए अंतर्गत कारवाईचे काय झाले? | हायकोर्टाची निवडणूक आयोगाला विचारणा
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मर्यादेच्या बाहेर खर्च केल्यामुळे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १०-ए अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कारवाईचे काय झाले? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारतीय निवडणूक आयोगाला केली आहे, तसेच यावर उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून दोन आठवडे वेळ वाढवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
एकाच दिवशी दोन परीक्षा? | पण आरोग्य विभाग आणि TET दोन्ही परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार झालाय का?
आरोग्य विभागाची भरती परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने मोठा गदारोळ झाला. अखेर आरोग्य विभागाकडून गट ‘क’ साठी २४ तर गट ‘ड’ साठी ३१ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र त्याच दिवशी राज्य परीक्षा परिषदेची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण (Health Department exam and TET exam) निर्माण झाले आहे. परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण संचालकांशी आपण बोलून मार्ग काढणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, धीर सोडू नका | तातडीच्या मदतीचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी (Heavy rain in Marathwada) आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला.
3 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये गेलेल्या लोकांना CBI, ED आणि आयकर विभागाचं संरक्षण आहे का? | आम्ही भाजप नेत्यांची यादी देतो - जयंत पाटील
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Pune & Pimpri Chinchwad SRA | पुणे, पिंपरी-चिंचवड मधील झोपडीधारकांना ३०० चौ.फुटांचा फ्लॅट मिळणार | पालकमंत्र्यांची घोषणा
राज्य सरकारने पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील झोपडीधारकांना ३०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या प्रारूप सुधारित नियमावलीत ही तरतूद करण्यात आली होती. आता मुंबई मध्ये पुणे आणि पिंपरीतील झोपडपट्टीधारकांना ३०० चौरस फुटांचे घर मिळणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
MH-CET Entrance Exam | काळजी नको, अतिवृष्टीमुळे CET परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी - राज्य सरकार
राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्त्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
3 वर्षांपूर्वी -
Sakinaka Rape Case | साकीनाका बलात्कार प्रकरणात मुंबई पोलिसांकडून 346 पानांचे आरोपपत्र दाखल
मुंबईसह देशभरात खळबळ उडववणाऱ्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 18 दिवसांत तपास पूर्ण करत आरोपपत्र दाखल केले आहे. 346 पानांच्या या आरोपपत्रात 77 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी हे आरोपपत्र दिंडोशी न्यायालयात दाखल केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
जनसामान्यांत प्रतिमा मलिन करण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीविरोधात भाजपचं २०१३ मधील '२G स्पेक्ट्रम' तंत्र? - सविस्तर वृत्त
साधारण ४ वर्षांपूर्वी २-जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्यामध्ये ए राजा आणि कनिमोळी या दोघा मोठ्या राजकारण्याचाही समावेश होता. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ही प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, ‘या निकालातून भाजपने केलेला अपप्रचार आणि दृष्ट हेतूने उचलेला मुद्दा हा केवळ युपीए-2 च्या खोट्या बदनामीसाठीच उचलून धरला होता हे या निकालातून स्पष्ट झालं असल्याचे म्हटले होते.
3 वर्षांपूर्वी -
MP Bhavana Gawali Vs ED | शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचं समन्स
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी भावना गवळींच्या कंपनीच्या संचालकाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. आता भावना गवळींना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
City Co-operative Bank | रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ED आनंदराव अडसूळांची चौकशी करणार
ईडीच्या चौकशीवेळी अत्यवस्थ झालेल्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची चौकशी (City Co operative Bank) काही दिवसांसाठी टळली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून प्रकृती पूर्ववत झाल्यावर त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे एक अधिकारी वगळता ईडीचे पथक रुग्णालयातून माघारी परतले आहे. अधिकाऱ्याला अडसूळ यांच्यावर नजर ठेवण्याची सूचना करण्यात आली असल्याचे समजते.
3 वर्षांपूर्वी -
Heavy Rain | मराठवाड्यात अतिवृष्टी | मांजराचे 18, कुंडलिकाचे 5, माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले
मराठवाड्यात (Heavy Rain in Marathwada) सोमवारी मध्यरात्री सुरू झालेल्या व मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली. एकाच दिवशी आठही जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून बहुतांश जिल्ह्यांतील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातल्या त्यात बीड, नांदेड व परभणी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. येथे जनजीवन विस्कळीत झाले होते.
3 वर्षांपूर्वी -
पुणे महानगरपालिका निवडणूक | युतीच्या गप्पा सोडून स्वबळाच्या तयारीला लागा | राज ठाकरे यांचा संदेश
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पुण्यात भाजपसोबत युती करायची की नाही, याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही तसेच त्यासाठी भाजपाही इच्छुक असेल असे मनसे अध्यक्षांना वाटत नाही. .दुसरीकडे या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपशी युती करावी, असा संदेश मनसेच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे. परंतु , आता हि चर्चा थांबवावी असा संदेश राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील मनसेच्या नेत्यांना धाडल्याचे वृत्त आहे. तसेच पुण्यातही स्वबळाची तयारी करा असं देखील आवर्जून सांगितलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
ऑर्डर निघाल्यावर कंपनीला १ पैसा अदा केलेला नाही | मग १५०० कोटी घोटाळ्याचा जावईशोध कुठून? - मुश्रीफ
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज कोहापूरला जात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्याचबरोबर त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर तिसरा मोठा आरोप केलाय. मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने तब्बल १५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय. सोमय्या यांच्या या आरोपानंतर आता हसन मुश्रीफांनीही पत्रकार परिषद घेत सोमय्यांना जोरदार (Minister Hasan Mushrif reply to Kirit Somaiya) प्रत्युत्तर दिलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कारखान्यांची यादी साखर आयुक्तालयाकडून जाहीर | भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचेही कारखाने
इतिहासात पाहिलांदाच साखर कारखानदारीवर जाहीर आणि ठोस भूमिका साखर आयुक्तालयाकडून घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कारखान्यांची थेट यादी साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच साखर आयुक्तालयाकडून अशी यादी काढण्यात आली आहे. राज्यातील एकूण 44 कारखाने हे रेड झोनमध्ये म्हणजे एफआरपी वेळेत न देणारे कारखाने म्हणून घोषित केले आहे. एवढ्यावरच साखर आयुक्त थांबले नसून शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याना घालताना ही यादी लक्षात घेऊन ऊस कोणत्या कारखान्याला घालावा, असे आवाहनही केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Main Exam 2019 Result | राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकाल जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल (MPSC Main Exam 2019 Result) जाहीर केला आहे. एमपीएससीनं या सदंर्भात परिपत्रक जारी केलं आहे. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. एमपीएससी 413 पदांचा निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा होती. अखेर निकाल अखेर जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jalyukt Shivar Yojana Scam | फडणवीस सरकारच्या काळातील 'जलयुक्त शिवार योजने'ची चौकशी सुरू | फडणवीस अडचणीत
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी (Jalyukt Shivar Yojana) सुरू केली आहे. यात राज्यातील एकूण 924 कामांचा समावेश असून, अमरावती परीक्षेत्रातील एकूण 198 कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे 2014 ते 2019 मधील आहेत. अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबतचे आदेश प्राप्त झाले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Cyclone Gulab | मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता | पुढील ४८ तास महत्त्वाचे
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ (Cyclone Gulab) निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात पुढील ४८ तासांत गुलाब चक्रिवादळाच्या राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे. तसेच येत्या २४ तासात मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
BJP MP Gopal Shetty | भाजप खासदार गोपाळ शेट्टींच्या राजीनामा देण्याचा इशाऱ्यानंतर फडणवीस पोहोचले भेटीला
सन 2022 पर्यंत प्रत्येक देशवासीयांना घरे हे तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न आहे. गरीबांना हक्काचे पक्के घर देणे हाच भाजपाचा ध्यास आहे,” असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 27) केले.
3 वर्षांपूर्वी -
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाशी संबंधित प्रकरणांच्या मीडिया रिपोर्टिंगवर बंदी | मुंबई हायकोर्टाचे आदेश
मुंबई उच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाशी संबंधित प्रकरणांच्या मीडिया रिपोर्टिंगवर बंदी घातली आहे. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने अशा प्रकरणांच्या मीडिया रिपोर्टिंगमध्ये संस्थेचे नाव प्रकाशित आणि प्रसारित न करण्याचे निर्देशही जारी केले आहेत. दरम्यान, अशा प्रकरणांमध्ये सतत अतिशयोक्तीपूर्ण अहवाल येत असून यामुळे आरोपी आणि पीडित पक्षाच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra Deglur By Poll | राज्यातील देगलूर मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर | सेनेची भूमिका महत्वाची
निवडणूक आयोगाने देशभरातील तीन लोकसभा मतदारसंघ आणि विविध राज्यांतील 30 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका मतदार संघाचा समावेश आहे. ही निवडणूक 30 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदार (Deglur by Poll Election) संघाचा समावेश आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Loan EMI Alert | कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल