महत्वाच्या बातम्या
-
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कारखान्यांची यादी साखर आयुक्तालयाकडून जाहीर | भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचेही कारखाने
इतिहासात पाहिलांदाच साखर कारखानदारीवर जाहीर आणि ठोस भूमिका साखर आयुक्तालयाकडून घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कारखान्यांची थेट यादी साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच साखर आयुक्तालयाकडून अशी यादी काढण्यात आली आहे. राज्यातील एकूण 44 कारखाने हे रेड झोनमध्ये म्हणजे एफआरपी वेळेत न देणारे कारखाने म्हणून घोषित केले आहे. एवढ्यावरच साखर आयुक्त थांबले नसून शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याना घालताना ही यादी लक्षात घेऊन ऊस कोणत्या कारखान्याला घालावा, असे आवाहनही केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC Main Exam 2019 Result | राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकाल जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल (MPSC Main Exam 2019 Result) जाहीर केला आहे. एमपीएससीनं या सदंर्भात परिपत्रक जारी केलं आहे. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. एमपीएससी 413 पदांचा निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा होती. अखेर निकाल अखेर जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Jalyukt Shivar Yojana Scam | फडणवीस सरकारच्या काळातील 'जलयुक्त शिवार योजने'ची चौकशी सुरू | फडणवीस अडचणीत
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी (Jalyukt Shivar Yojana) सुरू केली आहे. यात राज्यातील एकूण 924 कामांचा समावेश असून, अमरावती परीक्षेत्रातील एकूण 198 कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे 2014 ते 2019 मधील आहेत. अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबतचे आदेश प्राप्त झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Cyclone Gulab | मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता | पुढील ४८ तास महत्त्वाचे
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ (Cyclone Gulab) निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात पुढील ४८ तासांत गुलाब चक्रिवादळाच्या राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे. तसेच येत्या २४ तासात मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
BJP MP Gopal Shetty | भाजप खासदार गोपाळ शेट्टींच्या राजीनामा देण्याचा इशाऱ्यानंतर फडणवीस पोहोचले भेटीला
सन 2022 पर्यंत प्रत्येक देशवासीयांना घरे हे तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न आहे. गरीबांना हक्काचे पक्के घर देणे हाच भाजपाचा ध्यास आहे,” असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 27) केले.
4 वर्षांपूर्वी -
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाशी संबंधित प्रकरणांच्या मीडिया रिपोर्टिंगवर बंदी | मुंबई हायकोर्टाचे आदेश
मुंबई उच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाशी संबंधित प्रकरणांच्या मीडिया रिपोर्टिंगवर बंदी घातली आहे. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने अशा प्रकरणांच्या मीडिया रिपोर्टिंगमध्ये संस्थेचे नाव प्रकाशित आणि प्रसारित न करण्याचे निर्देशही जारी केले आहेत. दरम्यान, अशा प्रकरणांमध्ये सतत अतिशयोक्तीपूर्ण अहवाल येत असून यामुळे आरोपी आणि पीडित पक्षाच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Deglur By Poll | राज्यातील देगलूर मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर | सेनेची भूमिका महत्वाची
निवडणूक आयोगाने देशभरातील तीन लोकसभा मतदारसंघ आणि विविध राज्यांतील 30 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका मतदार संघाचा समावेश आहे. ही निवडणूक 30 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदार (Deglur by Poll Election) संघाचा समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर आरोप पर्यटन दौरा | भेटीतील मूळ काम सोडून मीडियाला बाईट देण्यावर सोमय्यांचा अधिक भर?
मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारवर सातत्याने टीका आणि गैरव्यवहाराचे आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ST Bus | यवतमाळमध्ये ड्रायव्हरच्या चुकीने नदीत वाहून गेली एसटी बस | बचावकार्य सुरू
मरखेड येथील दहागावातील पुलावरून हिरकणी एसटी बस (एमएच १४ बीटी ५०१८) पाण्यात वाहून गेली आहे. पुलावरून पाणी जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना गावकऱ्याच्या मदतीने बाहेर काढन्याचे काम सुरू आहे. या बसमध्ये 15 ते 20 प्रवाशी प्रवास करत होते. नांदेड-नागपूर ही बस असून नांदेडवरून नागपूरला पुसद मार्गे जात होती. घटनास्थळी प्रशासनाचे अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
नवनीत राणा आणि अडसूळ यांच्यातील जात प्रमाणपत्र वाद वाढल्याने अडसूळ रडारवर? | काय आहे प्रकरण
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात मागील सात वर्षांपासून राजकीय द्वंद सुरू आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला या दोन राजकीय नेत्यांमधील हा संघर्ष अजूनही कायम आहे. दरम्यान मुंबईतील सिटी बँक प्रकरणी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मुंबईस्थित निवासस्थानी ईडीचे पथक सोमवारी गेले व पथकाने अडसुळांची चौकशी केली. त्यानंतर अडसूळ यांना प्रकृती अस्वस्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाला सुध्दा राणा आणि अडसूळ यांच्यातील राजकिय संघर्षाची किनार असल्याची जोरदार चर्चा सर्वसामान्यांमध्ये आज पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Minister Anil Parab Vs ED | मी काही चुकीचं केलेलं नसल्याने ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे - अनिल परब
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीचं शपथ घेऊन मी मागेच सांगितलं होतं की मी काही चुकीचं केलेलं नाही. आताही तेच सांगत आहे. मी काहीच चुकीचं काम केलं नाही. मला दुसरं समन्स आल्याने मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचा भाजपाला जोरदार धक्का | भाजपचे ज्येष्ठ नेते व वैद्यनाथ कारखान्याच्या व्हाईस चेअरमनसह 5 संचालक राष्ट्रवादीत
लोकांचे प्रेम बघता पुढील दहा निवडणुकादेखील धनंजय मुंडे यांना कोणी थांबवू शकत नाही, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील परळीत बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव आघाव यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील यांचं परळीत जंगी स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवारांनी ईडीचा सामना केला | भाजपचं काम ED करतंय - जयंत पाटील
लोकांचे प्रेम बघता पुढील दहा निवडणुकादेखील धनंजय मुंडे यांना कोणी थांबवू शकत नाही, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील परळीत बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव आघाव यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
4 वर्षांपूर्वी -
Parambir Singh | परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ | खंडणी प्रकरणाचा तपास CID'कडे वर्ग
ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्या अज्ञातवासात असलेले परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्यावर एकामागे एक गुन्हे दाखल होत आहेत. परमबीर सिंह यांच्याविरोधात कोट्यवधी रुपयांच्या खंडणीचा गुन्हा कोपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. याचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण तपास यंत्रणा म्हणजेच, सीआयडी करणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Congress Rally | शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे, वाढती बेरोजगारी, महागाई विरोधात अकोल्यात काँग्रेसचा निषेध मोर्चा
अकोल्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, कामगारविरोधी धोरण, बेरोजगारांच्या विरोधातील धोरण, गरिबांच्याविरोधातील धोरणांना विरोध करण्यासाठी ही लढाई आहे. सामान्य जनतेला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहिल’,
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Health Department Exam 2021 | आरोग्य विभाग परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर
आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. आज दुपारी 2 ते 3 तास बैठक झाली त्यामध्ये 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या दोन्ही दिवशी रविवार असल्यानं शाळा उपलब्ध होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती 1 ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर आरोप पर्यटन दौरा | कोणीही रोखत नसताना सोमैयांच्या 'मला रोखून दाखवा, मला रोखून दाखवा चिथावण्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा कोल्हापूर दौऱ्यावर निघाले आहेत. त्यापूर्वी त्यांना मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराच्या बाहेरुनच सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच मी नोटीस दिली की हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, अशा शब्दात सोमय्या यांनी पवार आणि ठाकरेंना एकप्रकारे चॅलेंज केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Pune Municipal Corporation Election | पुण्यात मनसेला हवी आहे भाजप सोबत युती | शहराध्यक्षांची प्रतिक्रिया
पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासोबत युती करावी, असा आग्रह धरला आहे. दरम्यान, पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी यावर प्रसार माध्यमांकडे भाष्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Bharat Bandh | जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर | दुकाने बंद करण्याचं आवाहन
केंद्र सरकारने गेल्या वर्षी पारित केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांच्या विरोधात आज काँग्रेससह सर्वच समविचारी पक्षांनी भारत बंद आंदोलनाची हाक दिली आहे. जळगावात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला. सकाळ सत्रात बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू झाल्याने बंदचा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणवत नव्हता. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी व्यापाऱ्यांना सक्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले.
4 वर्षांपूर्वी -
अमित शाह गजनी, पण उद्धवजी मात्र रामशास्त्री बाण्याचं काम करणारे नेतृत्व - अरविंद सावंत
शिवसेना खासदार अरविंद सावंत (Shiv Sena MP Arvind Sawant) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाला ‘गजनी’सारखा झटका येतो आणि अमित शाह हे गजनी आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले. ते रायगडमध्ये बोलत होते. अरविंद सावंत यांनी अमित शाहांवरच निशाणा साधल्यामुळे, शिवसेना-भाजप युतीबाबत सुरु असलेल्या चर्चा पुन्हा थांबल्या.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL