महत्वाच्या बातम्या
-
रामदास कदमांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या मार्फत अनिल परब यांच्याबाबतची माहिती सोमैयांना दिली - वैभव खेडेकर
भाजपचे नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. तसेच्या त्या संदर्भात त्यांनी ईडीकडे कागदपत्रेही सोपवली आहेत. राज्याचे परिवहवन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या संदर्भातही किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. आता या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यानेही हात घालताना शिवसेना नेत्यासंदर्भातच एक दावा केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
लवकरच भाजपाला मोठं राजकीय खिंडार पडणार | भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश करणार?
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण, भारतीय जनता पक्षातील अनेक आमदार हे सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे काही आमदार हे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
3 वर्षांपूर्वी -
कर्जत-जामखेड | राम शिंदे समर्थक नामदेव राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून रोहित पवार आमदार झाले आणि स्थानिक पातळीवर राम शिंदे यांच्या एकूण राजकारणाला उतरती कळा लागली आहे. त्यात राम शिंदे यांना अजून एक राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण कर्जत नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष आणि नगरसेवक नामदेव राऊत यांनी प्राथमिक आणि सक्रीय सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
सहकारी बँकामधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात न्यायालयात जाणार - उपमुख्यमंत्री
मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत केंद्र सरकारने बरेच बदल केले आहेत. जिल्ह्याचा अशा बँका चालवण्याचा अधिकार केंद्राने काढून घेतला आहे. अध्यक्ष व संचालक निवडीमध्ये देखील केंद्राचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बारामती येथे शनिवारी (दि. १८) एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
Sambhaji Bhide Meet Eknath Shinde | उदयनराजेंच्या पाठोपाठ संभाजी भिडेगुरुजी एकनाथ शिंदेंच्या भेटीला
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेगुरुजी यांनी शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब या गावी जाऊन भेट घेतली. भाजप खासदार उदयनराजेंच्या भेटीनंतर लगेच भिडेगुरुजींनी मंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांनी भुवया उंचावल्या आहेत. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतीची भिडेगुरुजी यांनी पहाणी केली. शिंदे यांच्या शेतात गुरुजींच्या हस्ते फणसाचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
3 वर्षांपूर्वी -
तत्कालीन फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजनेत ठेकेदारांचा समावेश केल्यामुळे मोठा भ्रष्टाचार - जलतज्ञ राजेंद्र सिंह राणा
राज्यातील नद्यांना जलयुक्त शिवारामुळे संजीवनी मिळणार होती. राज्यातील नद्यांच्या मृतक साठ्यातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार होती. मात्र, तत्कालीन फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजनेमध्ये ठेकेदारांचा समावेश केल्याने या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जलतज्ञ राजेंद्र सिंह राणा यांनी केला आहे. जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा हे पंढरपुरात खासगी कामासाठी आले होते.
3 वर्षांपूर्वी -
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आपल्याच नेतृत्वात | पुण्यातील अनेक भाजप नगरसेवक संपर्कात - अजित पवार
आगामी महापालिका निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आपल्याच नेतृत्वात लढली जाणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर पुण्यातील काही भाजप नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावाही अजित पवार यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपचा ताणतणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलंय ‘ते’ वक्तव्य - नाना पटोले
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर होते. आज एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आजी, माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी, असे विधान केले. यावेळी रावसाहेब दानवे देखील मंचावर होते. त्यावरून आता तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यावरच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपाने शिवसेनेला युतीत भरपूर त्रास दिला | त्यामुळे पुढची २५ वर्षे शिवसेना युती करणार नाही - आ. अमोल मिटकरी
सत्ता न मिळाल्याने भाजपामध्ये अस्वस्थता आहे. आपले आमदार फुटू नयेत म्हणून नारायण राणेंपासून चंद्रकांतदादांपर्यंत सत्ताबदलाची भविष्यवाणी व्यक्त करत आहेत. मूळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेले भावी सहकार्यांचे वक्तव्य हे भाजपासाठी नसून इतर एखाद्या जुन्या सहकार्याबद्दल होते, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी दिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
गणेशविसर्जनाच्या दिवशी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कॅंटोन्मेंट परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार - अजित पवार
राज्यात कोरोनाचे सावट असून यंदादेखील होत असलेल्या गणेश उत्सवासाठी पोलिसांकडे नियमावली लागू करण्यात आली आहे. प्रतिष्ठापना आणि विसर्जन सोहळ्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकां यंदाही परवानगी देण्यात आलेली नाही. तर अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जनाच्या दिवशी पुणे पिंपरी-चिंचवड आणि कॅंटोन्मेंट परिसरातील सर्व च्या सर्व दुकाने बंद राहणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | MMRDA (मुंबई) मध्ये 05 पदांची भरती | पगार १ लाख ३२ हजार
एमएमआरडीए मुंबई भरती 2021. एमएमआरडीए, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 05 मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अग्निशमन अधिकारी पदांसाठी अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 16 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचे अर्ज एमएमआरडीए भरती 2021 वर ईमेलद्वारे पाठवू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
माजी मंत्री म्हणू नका? | चंद्रकांतदादा तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार आहेत - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा खरोखर वादळी ठरला. मराठवाडा मुक्तीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या, विरोध करणाऱ्या एमआयएमला उत्तर दिलं, तर चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर जोरदार टोला लगावला. मला कळलंय की चंद्रकांत पाटील तिन्ही पक्षापैकी एका पक्षात प्रवेश करतायत, असं ते म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
माजी बोलायचं होतं पण चुकून भावी बोलून गेले? | मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने आज औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमांना उपस्थित आहेत. आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
3 वर्षांपूर्वी -
ED Vs Anil Deshmukh | ED'कडून भ्रष्टाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल | अनिल देशमुखांचं नाव वगळलं?
मनी लॉड्रिंगप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळाले. ईडीने अनिल देशमुखांशी संबंधित मालमत्तांवर छापेही टाकले. ईडीने अनेकदा समन्स बजावूनही अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. आता ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये सचिन वाझेसह १४ जणांविरोधात आरोप लावण्यात आलेत. विशेष म्हणजे या आरोपपत्रात अनिल देशमुख यांचे नाव नसल्याची माहिती मिळाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Marathwada Mukti Sangram | मुख्यमंत्र्यांच्या मराठवाड्यासाठी 24 मोठ्या घोषणा - सविस्तर माहिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबादेत आहेत. त्यांनी औरंगाबाद दौऱ्यात मराठवाड्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन त्यांनी केले. यावेळी भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी संतपीठ स्थापन करण्याची घोषणा केली. यासोबतच निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी 24 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Kusum Solar Pump Yojana | कुसुम सोलर पंप योजना सुरु | प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
कुसुम सोलर पंप योजना सुरु झालेली आहे अशा आशयाची बातमी शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवर पब्लिश करण्यात आलेली आहे. https://www.mahaurja.com/ या वेबसाईटवर या कुसुम सोलर पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप घेण्याची इच्छा आहे त्यांनी वरील लिंकवर क्लिक करून अर्ज सादर करायचे आहेत. ( ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करू शकता.)
3 वर्षांपूर्वी -
राज्याच्या कर लावण्याच्या अधिकारावर गदा आल्यास स्पष्ट भूमिका मांडू – उपमुख्यमंत्री
केंद्र सरकारने केंद्राचे टॅक्स लावायचे काम करावे पण राज्याला जो अधिकार दिला गेला आहे त्या अधिकारावर गदा आणता कामा नये. हे अधिकार कमी करता कामा नये. राज्य सरकारचा टॅक्स लावण्याचा अधिकार कमी करण्याबद्दल एखादी गोष्ट जीएसटी कौन्सिलमध्ये आली तर तिथे मात्र स्पष्ट भूमिका मांडू असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
3 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकरांचा चंद्रपूरात शिवसेनेला धक्का | सेनेच्या ७ नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
चंद्रपूरमध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता. कारण शिवसेनेचे ७ नगरसेवक काँग्रेसनं फोडले आहेत. वरोरा नगरपरिषदेतल्या ७ नगरसेवकांनी शिवबंधन सोडून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.
3 वर्षांपूर्वी -
डोंबिवलीत भाजप नगरसेवकाविरोधात विनयभंगाची तक्रार | भाजपकडून अजून अधिकृत प्रतिक्रिया नाही
कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि माजी भाजप नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यात आली आहे. कल्याणमधीलच एका समाजसेविका महिलेनं ही तक्रार केली आहे. या प्रकरणी भाजपच्या वरिष्ठांकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्रा. (MHADA) मध्ये 565 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज
म्हाडा भरती 2021. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 565 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार 17 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत म्हाडा भरती 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- IRB Vs IREDA Share Price | IRB आणि IREDA सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: IRB
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER