महत्वाच्या बातम्या
-
राज्याच्या कर लावण्याच्या अधिकारावर गदा आल्यास स्पष्ट भूमिका मांडू – उपमुख्यमंत्री
केंद्र सरकारने केंद्राचे टॅक्स लावायचे काम करावे पण राज्याला जो अधिकार दिला गेला आहे त्या अधिकारावर गदा आणता कामा नये. हे अधिकार कमी करता कामा नये. राज्य सरकारचा टॅक्स लावण्याचा अधिकार कमी करण्याबद्दल एखादी गोष्ट जीएसटी कौन्सिलमध्ये आली तर तिथे मात्र स्पष्ट भूमिका मांडू असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
3 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकरांचा चंद्रपूरात शिवसेनेला धक्का | सेनेच्या ७ नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
चंद्रपूरमध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता. कारण शिवसेनेचे ७ नगरसेवक काँग्रेसनं फोडले आहेत. वरोरा नगरपरिषदेतल्या ७ नगरसेवकांनी शिवबंधन सोडून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.
3 वर्षांपूर्वी -
डोंबिवलीत भाजप नगरसेवकाविरोधात विनयभंगाची तक्रार | भाजपकडून अजून अधिकृत प्रतिक्रिया नाही
कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि माजी भाजप नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यात आली आहे. कल्याणमधीलच एका समाजसेविका महिलेनं ही तक्रार केली आहे. या प्रकरणी भाजपच्या वरिष्ठांकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्रा. (MHADA) मध्ये 565 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज
म्हाडा भरती 2021. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 565 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार 17 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत म्हाडा भरती 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
CM Uddhav Thackeray Aurangabad Tour | मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला मनसेही विरोध करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण, मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला आता विरोध वाढताना दिसतोय. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह आता मनसेनंही विरोध केलाय. मनसेनं आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना दौऱ्याला विरोध करणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दौऱ्याला आता विरोध वाढताना दिसतोय.
3 वर्षांपूर्वी -
संभाजी ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकरांची भाजपशी युतीसंदर्भात भूमिका | खेडेकरांच्या पत्नी भाजपच्या माजी आमदार
पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी काळात राजकीय वाटचाल करताना भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याची भूमिका मांडली. मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकामध्ये संपादकीय लेख लिहिला आहे. या लेखामध्ये भाजपसोबतच्या युतीची भूमिका मांडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधी भूमिकेसाठी आग्रही असलेले मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, यांच्या लेखाने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हं आहेत.
3 वर्षांपूर्वी -
MLA Gopichand Padalkar | आ. पडळकरांचे वक्तव्य बेजबाबदार, राजकीय आकसापोटी केलेले - श्री. मार्तंड देवस्थान
देवस्थानाच्या जमिनी बाबत सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरून भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. पडळकरांच्या या आरोपावरुन आता श्री. मार्तंड देवस्थानाने आपले मत मांडले आहे. जेजुरी येथील श्री. मार्तंड देवस्थानाच्या मालकीच्या जमिनीत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप किंवा ताबा नसून कृपया देवस्थानाच्या कामामध्ये कोणीही राजकारण करू नये, अशा शब्दात श्री. मार्तंड देवस्थानने या जमिनींवर राजकीय ताबा असण्याच्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केलीय.
3 वर्षांपूर्वी -
Pune Shivajirao Bhosale Co Operative Bank Scam | राष्ट्रवादीच्या आमदाराविरुद्ध 8 हजार पानांचं आरोपपत्र
राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले, त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह 16 जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत 71 कोटी 78 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ऑडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती.
3 वर्षांपूर्वी -
कोरोना काळात औद्योगिक वीज वापरात घट | तर घरगुती-कृषी वापर वाढल्याने महावितरणला 7,500 कोटी रुपयांचा फटका
कोविड काळात एका बाजूला महागडी वीज खरेदी करणाऱ्या औद्योगिक-वाणिज्यिक ग्राहकांच्या (सबसिडायजिंग ग्राहक) अपेक्षित वीज वापरात राज्यात मोठी घट झाली, तर दुसऱ्या बाजूला कमी दराने वीज खरेदी करणाऱ्या घरगुती आणि कृषी ग्राहकांच्या (अनुदानित ग्राहक) वीज वापरात मोठी वाढ हाेती. परिणामी सन २०२०-२१ कोविड काळात महावितरण कंपनीला तब्बल ७ हजार ५०० कोटींचा फटका बसल्याची माहिती पुढे आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
राजकीय हेतू साध्य करण्यासाठी न्यायालयाचा वापर होऊ नये | अनिल परब यांचे म्हणणे सुद्धा ऐकू - हायकोर्ट
परब यांच्यासह परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार होत आहे, असा आरोप करून सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका निलंबित आरटीओ अधिकारी गजेंद्र पाटील यांनी ॲड. व्ही. पी. राणे यांच्यामार्फत काही महिन्यांपूर्वी केली. याविषयी बुधवारी प्राथमिक सुनावणी झाली.
3 वर्षांपूर्वी -
Tirumala Tirupati Devasthanams | शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लाडके आणि शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांना आता एक मोठी जबाबदारी मिळाली आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केली. या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यपदी नियुक्ती व्हावी यासाठी देशभरातून मोठी चढाओढ असते. मात्र प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून ही नियुक्ती सुचवत असतात.आणि याच पार्श्वभूमिवर देशातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते.
3 वर्षांपूर्वी -
व्हाटसऍप युनिव्हर्सिटीच्या या टॉपर ताईं | दहशतवादी पकडले दिल्लीत अन महाराष्ट्रात पकडल्याचं बरळत आहेत - रुपाली चाकणकर
एकही दहशतवादी मुंबईत आला नाही, त्यांचा कुणी साथीदारही आला नाही, महाराष्ट्रात कोणतेही स्फोटक सापडलेले नाहीत, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख विनित अग्रवाल यांनी दिले. मुंबईतील धारावीचा रहिवासी असलेला समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याचे 20 वर्ष जुने दाऊद कनेक्शन उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले. एटीएस प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोकण तौत्के, निसर्गवादळ आणि अतिवृष्टी | कोकणला 3 हजार कोटी | राज्य सरकारचा मोठा निर्णय
तौत्के, निसर्गवादळ तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांचे प्राण गेले. ही बाब लक्षात घेता राज्य सरकारने मोठा निर्ण घेतला आहे. राज्य सरकारने चक्रीवादळांचा बंदोबस्त तसेच कायमस्वरुपी उपायोजना करण्यासाठी 3 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या निधीच्या मदतीने पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीशी सामना करण्यासाठी कायमस्वरुपी उपायोजना करण्यात येणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार | मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडणार नाही. तामिळनाडू आणि इतर राज्यांच्या धर्तीवर हे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भुजबळ म्हणाले. न्यायालयात आव्हान दिले तर अध्यादेश टिकेल, असेही त्यांनी सांगितले.
3 वर्षांपूर्वी -
दरेकरांना महिलांचा सन्मान करता येत नसेल तर करु नका | पण महिलांची अवहेलना करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? - सुरेखा पुणेकर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर काल शिरुर दौऱ्यावर होते. राजे उमाजी नाईक यांच्या 230व्या जयंती निमित्ताने जय मल्हार क्रांती संघटनेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी दरेकर यांनी हे विधान केलं होते. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
3 वर्षांपूर्वी -
Delhi Terrorist Arrest | महाराष्ट्र ATS प्रमुखांची सविस्तर माहिती | आशिष शेलार यांचा उतावळेपणा देखील उघड?
एकही दहशतवादी मुंबईत आला नाही, त्यांचा कुणी साथीदारही आला नाही, महाराष्ट्रात कोणतेही स्फोटक सापडलेले नाहीत, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख विनित अग्रवाल यांनी दिले. मुंबईतील धारावीचा रहिवासी असलेला समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याचे 20 वर्ष जुने दाऊद कनेक्शन उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले. एटीएस प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
सोमय्यांकडे भाजपचे प्रतिनिधी एवढंच पद आहे | भाजपने त्यांना ईडीचे प्रवक्ते पद तरी द्यावं - आ. रोहित पवार
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी आघाडीतील नेत्यांना टार्गेट करून त्यांचे भ्रष्टाचार काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक नेत्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोमय्या यांना टोला लगावला आहे. भारतीय जनता पक्षाने किरीट सोमय्या यांना ईडीचं प्रवक्तेपद द्यावं, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काढला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Terror Plan Politics | दहशतवाद्यांचं लक्ष दिल्ली, महाराष्ट्र आणि युपी | शेलारांना योगी सरकारच्या ATS'चा विसर?
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईत येऊन जान मोहम्मद शेख याला अटक केल्यानंतर या मुद्द्यावरून वातावरण तापू लागलं आहे. एकीकडे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली असताना दुसरीकडे आता भाजपाकडून या प्रकरणी तीव्र टीका केली जाऊ लागली आहे. “हे दहशतवादी महाराष्ट्रात, मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचं एटीएस झोपलं होतं का? या दहशतवाद्यांच्या बाबतीत राज्यातले पोलीस काय करत होते?” असा सवाल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | ओबीसी नेतृत्व संपुष्टात आणण्याचे पाप भाजपाचे | सत्तेत असताना झोपा काढल्या, आता आंदोलन - नाना पटोले
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. ओबीसी राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच सण उत्सवाच्या दिवसात कोरोना रुग्णांची वाढती संख्या याबाबत देखील चर्चा होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Magnetic Maharashtra | राज्यात 35 हजार 500 कोटींची गुंतवणूक | 1879 हेक्टरचा पवनऊर्जा प्रकल्प, 5 हजार रोजगार
देशातील ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य उद्योग समूह जेएसडब्ल्यू एनर्जी राज्यात सुमारे ३५,५०० कोटींची गुंतवणूक करणार असून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे दीड हजार मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प तर उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात ५ हजार मेगावॅट क्षमतेेचे पवनऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल