महत्वाच्या बातम्या
-
Ganesh Chaturthi 2021 | गणेश चतुर्थी निमित्त जाणून घ्या गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त
यावर्षी गणेश चतुर्थी 2021 चा उत्सव आजपासून म्हणजेच 10 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. या दिवशी लोक आपल्या घरात गणपती बाप्पाला स्थापन करतात. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापनेचा शुभ मुहूर्त काय आणि कुठल्या मंत्रांचा जप केल्याने बाप्पा प्रसन्न होतील ते जाणून घ्या;
3 वर्षांपूर्वी -
वाद पेटणार? | पूरग्रस्तांना सर्व मदत केंद्र सरकारनेच केली - राज्यपालांच वक्तव्य
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान येथे पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असताना पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत त्यांनी थेट राजकीय पवित्रा घेतला आणि केंद्रानेच ही मदत दिली आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. याच वेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारचे नावही घेतले नाही. त्यांच्या या भूमिकेने राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील दरी अधिकच रुंदावत असल्याची प्रचिती पुन्हा आली.
3 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर आंबेओहोळ प्रकल्प | चंद्रकांत पाटलांना लाज वाटली पाहिजे | हसन मुश्रीफ यांची टीका
आंबेओहोळ प्रकल्पाचे काम गेली दहा वर्ष रखडले होते. मी मंत्री असताना हा प्रकल्प मंजूर केला. मात्र, आज याचे कोणीतरी श्रेय घेत असल्याचे मी पाहिले. जे श्रेय घेत आहेत, तेच लोक घळ भरणीच्या वेळी न्यायालयात गेले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | पुणे महानगरपालिकेत 10 पदांची भरती | थेट मुलाखत
पुणे महानगरपालिका भरती 2021. पुणे महानगरपालिकेने 10 अभियंता, प्रशासक, विकासक आणि कर संकुल साठी भरतीची अधिसूचना आणि अर्ज आमंत्रित केले आहे. & Rel. पोस्ट. पात्र आणि इच्छुक उमेदवार पुणे एमसी भरती 2021 साठी 22 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचे अर्ज सादर करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | विमा लोकपाल परिषद 49 पदांची भरती | पगार ४० हजार
कौन्सिल फॉर इन्शुरन्स लोकपाल भरती 2021. विमा लोकपाल परिषदेने 49 विशेषज्ञ पदांसाठी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार CIO मुंबई भरतीला 17 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी योग्य चॅनेलद्वारे आपला अर्ज सादर करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेत (नागपुर) 339 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2021. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 339 प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार एसईसी रेल्वे भरती 2021 साठी 05 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
ED, CBI मार्फत दिलेला त्रास भाजपला भोगावा लागेल | मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
राज्यातील अनेक नेत्यांना ईडी आणि सीबीआय मागे लावून भारतीय जनता पार्टीने उद्योग सुरू केला. तुरुंगवासाच्या भीतीने अनेक जण भारतीय जनता पार्टीत गेले. परंतु, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे त्याला अपवाद ठरले. आरोप करणाऱ्यांनी यातून धडा घेतला पाहिजे. मात्र, भारतीय जनता पार्टीने दिलेला त्रास हा भाजपाला सहन करावा लागेल, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. न्यायालयाने छगन भुजबळ यांना क्लीनचिट दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया कोल्हापुरात दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार जगातील सर्वात उंच ‘भगवा ध्वज’ उभारणार
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जगातील सर्वात उंच ‘भगवा ध्वज’ उभारण्याचा निर्णय घेतला सून त्याच्या तयारीला ते लागले आहेत. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात देशातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. या स्वराज्य ध्वजाची दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 15 ऑक्टोबरला प्रतिष्ठापना करणार आहे. तर आज कर्जतचे ग्रामदैवत गोधड महाराजांच्या मंदिरापासून देशातील विविध भागात ‘स्वराज्य ध्वज पूजन’ यात्रा निघाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
सातारा भाजप | शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे समर्थकांमध्ये सशस्त्र मारामारी | अनेकजण गंभीर जखमी
साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यातील वैर संपूर्ण राज्याला माहित आहे. मात्र शहरात पहिल्यांदाच त्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या सशस्त्र मारामारीमुळे शहरात खळबळ माजली. बुधवारी संध्याकाळी उदयनराजे समर्थक सनी भोसले यांनी शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिससमोर गाडी लावली आणि त्यातून भडका उडाला असे समजते. दरम्यान, दोन्ही गटांच्या तुफान हाणामारीतून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | SAMEER मुंबईत 42 पदांची भरती | शिक्षण १० वी पास
समीर मुंबई भर्ती 2021. सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आणि संशोधन, आयआयटी मुंबईने 42 आयटीआय अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी पदांसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार समीर भरती 2021 साठी 15 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
राज्यात एकाच दिवसात दिल्या 14 लाखांपेक्षा जास्त लसी | 1 कोटी 79 लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा
संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्या लाटेची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लसीकरण मोहिमेला गती दिली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत बुधवारी (दि.८सप्टेंबर) रोजी रात्री आठ वाजेपर्यंत १४ लाख ३९ हजार ८०९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ६ कोटी ५५ लाखांवर गेली आहे. दरम्यान, देशात सर्वाधिक १ कोटी ७९ लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देऊन महाराष्ट्राने देशात विक्रम केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता
महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता.
3 वर्षांपूर्वी -
कागदपत्रं लीक करून ED तपासयंत्रणा केवळ माध्यमांद्वारे खळबळ निर्माण करू पाहतंय | सुनावणी सुरु
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यामागे मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणी ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. परंतु आता देशमुखांनी ईडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असून समन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. तपासयंत्रणा केवळ खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महत्वाची कागदपत्रं लीक केली जात असल्याचा आरोपही अनिल देशमुखांकडून करण्यात आला आहे. कोर्टाने याप्रकरणी सोमवारपर्यंत निकाल राखीव ठेवला आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यातील कीर्तनकारांना बाप्पा पावला | कोरोना काळात राज्य सरकार महिन्याला 5 हजार रुपये मानधन देणार
उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील कीर्तनकारांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. राज्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, यांना 5 हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
पुण्यात उद्यापासून संचारबंदी लागू | 19 सप्टेंबर 2021 पर्यंत कलम 144 लागू असेल
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी पुण्यात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात 10 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021 पर्यंत कलम 144 लागू असेल. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी 7 हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
जमीन खरेदीत गैरव्यवहार | हा गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते | ED कोर्टाचं निरीक्षण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिकदृष्ट्या पाहता एकनाथ खडसेंनी पुणे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय, असं स्पष्ट निरीक्षण ईडी कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे खडसेंचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Job Alert | मोरेश्वर महाविद्यालय जालनात 59 पदांची भरती
मोरेश्वर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय भारती. मोरेश्वर आर्स्ट, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, भोकरदन जि. जालना यांनी 59 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 22 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी मोरेश्वर महाविद्यालय भरतीकडे अर्ज सादर करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Job Alert | संगमनेर नगरपालिका महाविद्यालयात 48 जागा | थेट मुलाखत
संगमनेर नगरपालिका विज्ञान महाविद्यालय भरती 2021. संगमनेर नगरपालिका कला, डी.जे. मालपाणी कॉमर्स आणि बी.एन. सारडा सायन्स कॉलेजने लहान भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 48 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी येऊ शकतात, मुलाखत 13 सप्टेंबर 2021 रोजी एसएनएससी भरती 2021 रोजी घेतली जाईल.
3 वर्षांपूर्वी -
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या मुसक्या आवळा | स्वाभिमानीचे गृहमंत्र्यांना पत्र
दोन दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यातील तांबवे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकिरण माने यांना त्यांच्या घरी जात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांच्यासह साथीदारांनी मारहाण व शिविगाळ केली. यामुळे स्वाभिमानी आणि खोत यांच्यात वाद उफाळला आहे.
3 वर्षांपूर्वी -
देशमुखांवर आरोप केल्याने भाजपकडून परमबीरसिंग यांना जीवदान | म्हणून NIA च्या चार्जशीटमध्ये ते आरोपी नाहीत - राष्ट्रवादी
अँटिलिया प्रकरणात एनआयएने सादर केलेल्या चार्जशीटवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत आहोत परामबीर सिंहला वाचवलं जात आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदावर असताना सिंह हे मुख्यमंत्री आणि राज्य सरकारची दिशाभूल करत होते. सिंह यांना वाचवण्यासाठी भाजपने गृहमंत्र्यांवर आरोप केले. मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे परमबीर सिंह हा या सर्व घटनेचा मास्टरमाईंड आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Poco X7 5G | 32MP फ्रंट कॅमेरा, Poco X7 5G स्मार्टफोन लवकरच लाँच होतोय, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनला तोड नाही