महत्वाच्या बातम्या
-
ED प्रकरण | राज्यपाल नियुक्त आमदारकीला आढकाठी होण्याची शक्यता?
राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या 12 आमदारांचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या विषयावरून राज्याचे राजकीय वर्तुळ चांगलेच ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे सध्या याच विषयामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. भाजपमधून ते नुकतेच राष्ट्रवादीमध्ये आले आहेत. त्यानंतर त्यांचे राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादीकडून नाव देण्यात आले आहे. विधानपरिषदेमार्गे त्यांना आमदार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत खडसेंचे नाव दिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
नागपूरमध्ये आली कोरोनाची तिसरी लाट | नवीन नियमावली जाहीर
कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा सुरू करण्यात आला आहे. पण, आता ज्याची भिती व्यक्त केली जात होती, ती कोरोनाची तिसरी लाट नागपूरमध्ये पाऊल टाकले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे नागपूरमध्ये पुन्हा विकेंड लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपा आमदार जय कुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर ईडी कार्यालयात
भाजपा आमदार जय कुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. मात्र काही वेळातच ईडी कार्यालयात कागदपत्र देऊन गोरे आणि निंबाळकर हे बाहेर पडले आहे. बाहेर पडताना त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. नेमकं कोणत्या कारणासाठी ते ईडी कार्यालयात आले होते, याची अद्यापही माहिती मिळू शकली नाही.
3 वर्षांपूर्वी -
प्रविण दरेकर हे कुणाची भाटगिरी करत आहेत? | राजू शेट्टी यांनी झापलं
प्रविण दरेकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलं आहे. राजू शेट्टी हे बिनबुडाचा लोटा आहे, अशी जहरी टीका दरेकर यांनी केली होती. त्याला शेट्टी यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. प्रविण दरेकर कुणाची भाटगिरी करत आहेत?, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
खऱ्या बापाची औलाद असेल तर हे आरोप सिद्ध करुन दाखवा | वडेट्टीवारांचे गोपीचंद पडळकरांना आव्हान
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांकडून करण्यात आला होता. आता पडळकरांच्या या आरोपावर वडेट्टीवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तु जर बेछूट आरोप करत असशील, तु खऱ्या बापाची औलाद असशील तर वाटेल तसे आरोप करण्यापेक्षा हे आरोप सिद्ध करुन दाखव.
3 वर्षांपूर्वी -
मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही | संजय राऊतांची संतप्त टीका
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. बेळगावात भाजपचा विजय झाला आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
अनिल परबांच्या अडचणींमध्ये वाढ | निकटवर्तीय बजरंग खरमाटे यांना ईडीची नोटीस
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सध्या ईडीकडून चौकशांचे सत्र सुरू आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर अनिल परबांच्या मागे देखील ईडीची पिडा लागली आहे. दरम्यान अनिल परब यांचे निगटवर्तीय मानले जाणार बजरंग खरमाटे यांच्या देखील ईडीकडून नोटीस बजावण्यता आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
फोन टॅपिंग प्रकरण | रश्मी शुक्ला आरोपी नाहीत - राज्य सरकार
फोन टॅपिंग प्रकरण आणि पोलीस बदल्यांशी निगडीत दस्ताऐवज लिक करण्याच्या प्रकरणात सीनियर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आरोपी नाहीत. त्यामुळे त्या एफआयआर रद्द करण्याची याचिका करू शकत नाहीत’, असा युक्तिवाद राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.
3 वर्षांपूर्वी -
करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी | आंबाजोगाई कोर्टाने शिक्षा सुनावली
जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
3 वर्षांपूर्वी -
वाघ आडनावाने कोणी वाघ होत नाही | डायलॅाग बाजी सोडा, नवऱ्यावर कार्यवाही झाली तेव्हा कुणाच सरकार होत ते सांगा
राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर काल नगरमध्ये बोचरी टीका केली होती. ‘लाचखोर नवऱ्याची बायको’, असा चित्रा वाघ यांचा उल्लेख आपल्या भाषणात शेख यांनी केला होता. याच टीकेला आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी वाघ आहे वाघ…, माझ्यावर कोल्हे कुत्रे भुंकत आहेत. पण मी कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही”, अशा शब्दात त्यांनी महेबूब शेख यांच्यावर पलटवार केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा पोलिसांना संशय | सखोल चौकशी सुरु
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या करुणा मुंडे परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी करुणा यांना ताब्यात घेतले आहे. चौकशी चालू असल्याचे समजते आहे.
3 वर्षांपूर्वी -
समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या सोबतच्यांना आणि आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं - देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री काय बोलले याच्यावर मी काहीही बोलणार नाही. समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या सोबतच्यांना आणि आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं. मग आम्हाला सांगावं”, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ते नागपुरात बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याच्या मुद्दयावरून भाजपला फटकारले होते. अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा.
3 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख यांच्या विरोधात 'ईडी'कडून लूकआऊट नोटीस
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने लुकआऊट नोटीस जारी केल्याची माहिती ज्येष्ठ वकील जयश्री पाटील यांनी दिली आहे. जयश्री पाटील यांनीच सुरुवातीला अनिल देशमुख यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. त्यानंतर 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात कारवाई केली होती.
3 वर्षांपूर्वी -
शेतकरी बांधवांनो | रब्बी बियाणे अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करा, तुमच्या मोबाईलवरून - वाचा प्रक्रिया
शेतकरी बंधुंनो रब्बी बियाणे अनुदान योजना संदर्भातील ऑनलाईन अर्ज आता मोबाईलवरून देखील भरता येणार आहे या संदर्भातील माहिती जाणून घेवूयात. शेतकरी बांधव आता रब्बी बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि शासकीय अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. प्रमाणित बियाणांची वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी अवजारे, सिंचन सुविधा यासाठी ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे दिनांक 30 ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२१ पर्यंत महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल | मुख्यमंत्र्यांकडून राजू शेट्टींना बैठकीचे निमंत्रण
राजू शेट्टींच्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजू शेट्टी यांना उद्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. राजू शेट्टी नृसिं यांना नृसिंहवाडीत प्रांताधिकाऱ्यांनी प्रस्तावाचं पत्र दिले आहे. दरम्यान, या वारंवार येणाऱ्या पुरावर कायमस्वरुपी उपाययोजना करने गरजेची असल्याचं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
चिपी विमानतळाला अजूनही डीजीएसएची परवानगी नाही | कागदाचं विमान उडवणार का? - आ. नितेश राणे
चिपी विमानतळासाठी अजूनही डीजीएसएची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ही 7 तारीख कोठून आणली आहे. हे काय कागदाचं विमान उडवणार आहेत का ? असा खोचक सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांना केला. तसेच आम्हाला एक बुद्धू खासदार मिळाला आहे, अशी बोचरी टीकादेखील राणे यांनी राऊत यांच्यावर केली.
3 वर्षांपूर्वी -
Alert | येत्या चार दिवसांत महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार-पाच दिवसांत राज्यात अनेक भागांत विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
ओबीसींचा विषय पुढे करून सगळ्या महापालिकांवर प्रशासक नेमून, त्या महापालिका सरकारच चालवणार - राज ठाकरे
लॉकडाऊन लावून सरकारचं बरं चाललं आहे. मोर्चे नाही, आंदोलने नाहीत, कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, असं सांगतानाच सरकारलाच आता निवडणुका नको आहोत, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
12 सदस्यांमध्ये राजू शेट्टींचं नाव | मी दिलेला शब्द पाळला आहे - शरद पवार
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा जोरात सुरु आहे. त्याबाबत राजू शेट्टी यांनीही आक्रमक भूमिका मांडली आहे. या बाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
खडसेंच्या अडचणीत वाढ | ईडीकडून एक हजार पानी आरोपपत्र दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. ईडीनं एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या