महत्वाच्या बातम्या
-
Mumbai Crime | महाराष्ट्राची राजधानी हादरली! सरकारी वसतिगृहात 19 वर्षाच्या विद्यार्थीनीवर अत्याचार आणि विवस्त्र करून हत्या
Mumbai Crime | चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका 19 वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. संबंधित मृत तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला होता. यानंतर वसतिगृहात कार्यरत असलेल्या संशयित सुरक्षा रक्षकाचा मृतदेह रात्री उशीरा चर्नीरोड- ग्रान्डरोड स्थानकांच्या दरम्यान आढळला. या घटनेने संपूर्ण शिंदे-फडणवीस सरकार विरोधात समाज माध्यमांवर संतापाची लाट उसळळी आहे. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
10 वर्षात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची एक वीटही भाजपने रचली नाही, आता ठाकरे सरकारच्या काळातील विकास कामांचं 'नामकरण' सुरु
CM Eknath Shinde | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच प्रतापगड प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आणि शिवसृष्टीसाठी 350 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
2 वर्षांपूर्वी -
Rain Alert | महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट! कोकणासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी पाऊस पडणार, पाऊस शनिवार-रविवारही गाजवणार
Rain Alert | मान्सूनची वाटचाल सकारात्मक वेगानं सुरु असतानाच आता महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यामध्ये काही भागांत मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमानात, कमालीचे चढ- उतार पाहायला मिळाले. तर, काही भागांमध्ये हवेतील आर्द्रतेमुळं उकाडा अपेक्षेहून जास्त असल्याचं भासत होतं.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे गट धोक्यात! आज निवडणूक झाल्यास शिंदे यांच्या शिवसेना गटाला केवळ 5.5% मते मिळतील, मनसे सर्वेतही शिक्कल नाही - सर्वेक्षण रिपोर्ट
Eknath Shinde Camp in Danger Zone | महाराष्ट्रात पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पाश्वभूमीवर सकाळ माध्यम समूहाने एनडीए सरकारविषयी सर्वसामान्यांच्या भावनांवर एक सर्वेक्षण केले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत महाराष्ट्रातील मतदारांचे काय मत आहे, हेही या सर्वेक्षणात जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. २०२४ च्या निवडणुकीत मतदान करताना कोणत्या पक्षाची निवड कराल, असा प्रश्नही ‘सकाळ’च्या सर्वेक्षणात विचारण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिंदेंची ठाण्यात घराणेशाही! ठाकरेंच्या कृपेने एकनाथ शिंदे मंत्री, मुलगा खासदार आणि भाऊ नगरसेवक, मात्र घराणेशाहीची टीका ठाकरेंवर
CM Eknath Shinde | देशात आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जंयतीनिमित्त नव्या संसद भवनाचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले आहे. या नव्या संसद भवनावरून आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जंयतीवरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या विरोधकांवर टीकेची तोफ डागली आहे. नव्या संसद भवनाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमावर काही लोक आक्षेप घेतात,हे दुदैव असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जंयतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते.
2 वर्षांपूर्वी -
Shah Rukh Khan | आरोपीच्या कुटुंबीयांशी केलेले बोलणे हे सेवा नियमांचे उल्लंघन? व्हाट्सअँप चॅट लीकवरून हायकोर्टात हेतूवर प्रश्न उपस्थित
Shah Rukh Khan | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खंडणीचा आरोप असलेल्या समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील चॅट मीडियात लीक झाल्याबद्दलही कोर्टाने प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. त्या चॅट्स प्रसारमाध्यमांना लीक करणारे आपणच आहात का, अशी विचारणा न्यायालयाने वानखेडे यांना केली.
2 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणुकांसाठीच भाजपने 2 हजाराच्या नोटा बंद केल्या, राज्यातील 48 जागा जिंकण्यासाठी ते काहीही करू शकतात - प्रकाश आंबेडकर
Praksh Ambedkar | एकाबाजूला आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. तीन दिवसांपूर्वी पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपचे राज्यातील सर्व संघटनेतील पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | तो रस्त्यावर निवांत झोपला होता, पाठून बिबट्या अलगत पावलाने येतं होता, पुढे असं काही घडलं... व्हिडिओ व्हायरल
Viral Video | बिबट्यांचा अधिवास हे जंगल आहे, पण मानवाने हळूहळू त्यांची जंगले तोडून स्वतःच्या निवासी क्षेत्रात त्याचं रूपांतर केले. त्यामुळे अनेकदा बिबटे रहिवासी भागात येऊन कधी माणसांवर तर कधी जनावरांवर हल्ले करतात. गेल्या काही वर्षांत अशा घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. नुकतीच अशीच एक घटना महाराष्ट्रात उघडकीस आली आहे, ज्यामध्ये एका तरुणाच्या मागे झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला आणि तोंडात दाबून पळवून नेला.
2 वर्षांपूर्वी -
Monsoon Alert | खुशखबर! अंदमानात मान्सून धडकला, महाराष्ट्रात 'या' दिवशी आगमन होणार
Monsoon Alert | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, अखेर मान्सून अंदमानात धडकला आहे. अंदमान- निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर मान्सूननं हजेरी लावली आहे. अंदमानात मोसमी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. दरवर्षी मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच मान्सून अंदमानमधील काही भागांमध्ये दाखल झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
मनसे नंतर भाजपात मग शिवसेनेत मग शिंदे गटात जाणाऱ्या पलटूराम खासदार सदाशिव लोखंडेंचा पत्ता कट? आठवले शिर्डीतून लोकसभा लढवणार
Ramdas Athawale to Contest Loksabha Elections 2024 from Shirdi | आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यात रिपाई आठवले गटाची पत्रकार परिषद पार पडली, याच पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. 28 मे रोजी रिपाई आठवले पक्षाचं शिर्डीत राज्य अधिवेशन पार पडणार आहे. रिपाई आठवले पक्षाची नोंदणी झाल्यानंतर पहिलं अधिवेशन हे शिर्डीत घेणार असल्याची माहिती राज्य सह संघटक अशोक नागदेवे यांनी दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष, पण नागपूरचा 'तो' प्रकल्प इतरत्र हलविण्यासाठी नागपूरचे नेते एकत्र
Union Minister Nitin Gadkari | देशात विकासाशी संबंधित अनेक प्रकल्प सुरू आहेत. दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे मंत्रालयही लोकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने चांगले काम करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात गडकरी यांनी प्रस्तावित २ बाय ६६० मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प नागपुरातील कोराडी येथून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याची विनंती केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shinde Camp in Tension | शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक, सुप्रीम कोर्टाच्या निकालाने ठाकरेंना बळ
Shinde Camp in Tension | शिंदे गटाच्या 16 आमदारांना पात्र किंवा अपात्र ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयानं विधान सभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे माध्यमांचं लक्ष लागलंय. त्यालाच अनुसरून आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब विधान सभा सचिवांची भेट घेणार आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अपात्र आमदारांसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा मागणीचं निवेदन ते सचिवांना देण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
BMC Election 2023 | मुंबई कोस्टल रोड या आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टचं 'नामकरणातून' क्रेडिट घेण्याचा शिंदे सरकारचा प्रयत्न? वास्तव जाणून घ्या
BMC Election 2020 | छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून आपल्या सगळ्यांना प्रेरणा, एक आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांचं बलिदान आहे हे कोणी विसरू शकणार नाही. त्यामुळे मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार असल्याची घोषणा मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. काल मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.यानिमित्त मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
2 वर्षांपूर्वी -
7-12 Utara Updates | गाव-खेड्यात तुमची कौटुंबिक जमीन आहे? राज्य शासनाने 7/12 उताऱ्यात ‘हे’ 11 बदल केले, जागृत रहा अन्यथा..
राज्य सरकारने महसूल विभागाच्या सुधारीत 7/12 उताऱ्यात असणारे जवळपास 11 नवीन बदल करण्यात आले आहे. तर यासंदर्भातला शासन निर्णय पत्रक 2 सप्टेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. हा बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. जमीन अधिनियम कायद्यानुसार तलाठी दप्तराचे 21 प्रकारचे नमुने असतात. यामध्ये 2 प्रकार आहेत, ते म्हणजे कलम 7 आणि कलम 12 असे असतात.
2 वर्षांपूर्वी -
ते CJI चंद्रचूड आहेत, ठाकरेंच्या डोक्यावर 'भारतीय घटना आणि कायद्याचा' लिखित हात ठेवून सगळ्यांचा राजकीय खेळ खल्लास केलाय, समजून घ्या कसं
CJI Chandrachud | सुप्रीम कोर्टाने शिवसेना वादावर महत्वपूर्ण निकाल जाहीर केला. मात्र या निकालानंतर संपूर्ण लेखी निकाल हातात येण्यापूर्वीच माध्यमांवर सुद्धा चुकीची आणि अर्धवट माहिती प्रसिद्ध होताना अनेक चुकिचे तथ्यहीन मेजेस गेले. या निकाल आला आणि शिंदे सरकार वाचलं अशी चुकीची माहिती प्रसिद्ध झाली. तसेच उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का बसला असा अर्थ लावला गेला. व्हाट्सअँप युनिव्हर्सिटीतही CJI चंद्रचूड यांच्या बाबतीत अत्यंत चुकीचे विनोद याच निर्णयानंतर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे गटाच्या आमदारांची आमदारकी जाणार? सुप्रीम कोर्टाच्या निकालात प्रतोद आणि शिंदेंच्या गटनेतेपदाची निवड ही बेकायदेशीर असा स्पष्ट लेखी उल्लेख
Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला. ज्यामध्ये कोर्टाने शिंदे सरकार हे केवळ थोडक्यात बचावल्याचं समोर आलंय, परंतु सुप्रीम कोर्टाने निकालात बेकायदेशीर असा स्पष्ट लेखी उल्लेख करून शिंदे गटाला चक्रव्यूहात अडकल्याचे कायदेतज्ज्ञ अंतिम निकालाची प्रत उपलब्ध झाल्यानंतर सांगत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
स्पीकरचा निर्णय चुकीचा, प्रतोद बेकायदेशीर, व्हीप बेकायदेशीर, राज्यपालांनी घटनेचं पालन केलं नाही, एवढं होऊनही शिंदे खुर्ची सोडणार नाहीत?
Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टामध्ये राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाचं वाचन पूर्ण झालं आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ४ मोठे धक्के देताना महत्वाच्या टिपण्या केल्या आहेत. शिंदे गटाचे भरत गोगावले यांची मुख्य प्रतोतपदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट म्हटलं आहे. याचबरोबर आम्हीच खरी शिवसेना असा दावा कोणीही करू शकत नाही असंही यावेळी सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. हा एकनाथ शिंदेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र कायदा आणि घटनेचं उल्लंघन असे सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढूनही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर खिळून बसणार का याची चर्चा सुरु झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
काल म्हणाले, पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष कोण? दुसरीकडे मनसेत राजकीय भवितव्य नाही हे समजल्याने मनसे नेत्यांचे दुसऱ्या पक्षात प्रवेश
MNS Chief Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धाराशिवमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. प्रशांत नवगिरे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीमध्ये भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे धाराशिवमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठी पोकळी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. नवगिरे यांनी काही काळ महाराष्ट्र नवनिर्माण एसटी कामगार सेनेच्या उपाध्यक्षपदाची देखील जबाबदारी सांभाळली होती.
2 वर्षांपूर्वी -
आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटातील मंत्री पराभूत होणार? मालेगाव बाजार समितीत ठाकरेंच्या शिलेदाराने दादा भुसेंच्या पॅनलचा धुव्वा उडवला
Malegaon Bajar Samiti NIvadnuk | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडून आला. त्यानंतरही अनेक घडामोडी घडल्या आहेत. या दरम्यानच्या काळात अनेकांना मंत्रिपदाची स्वप्न पडली. याशिवाय राज्यात आणखी एका मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले जात आहेत. अर्थात हे संकेत कितपत खरे ठरतात ते आगामी काळात स्पष्ट होईलच.
2 वर्षांपूर्वी -
बारसूमध्ये आंदोलक कोकणी माणसाविरोधात शिंदे-फडणवीस सरकारची दडपशाही, कोकणी महिलांवरही लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर
Lathi Charge at Barsu | कोकणात शिंदे-फडणवीस सरकारची प्रचंड दडपशाही सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. शिंदे सरकारमधील शिंदे समर्थक कोकणातील मंत्र्यांना तर कोकणी लोकांच्या जीवाशी आणि निर्सार्गाशी काहीही देणं घेणंच नसल्याचं पाहायला मिळतंय. आज पुन्हा शिंदे सरकारच्या पोलिसांनी कोकणी आंदोलक जनतेवर लाठीचार्ज केल्याचं समोर आलं आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर रेल्वे कंपनी शेअर 6 महिन्यात 33% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: RVNL