महत्वाच्या बातम्या
-
वाघ आडनावाने कोणी वाघ होत नाही | डायलॅाग बाजी सोडा, नवऱ्यावर कार्यवाही झाली तेव्हा कुणाच सरकार होत ते सांगा
राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर काल नगरमध्ये बोचरी टीका केली होती. ‘लाचखोर नवऱ्याची बायको’, असा चित्रा वाघ यांचा उल्लेख आपल्या भाषणात शेख यांनी केला होता. याच टीकेला आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी वाघ आहे वाघ…, माझ्यावर कोल्हे कुत्रे भुंकत आहेत. पण मी कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही”, अशा शब्दात त्यांनी महेबूब शेख यांच्यावर पलटवार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा पोलिसांना संशय | सखोल चौकशी सुरु
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या करुणा मुंडे परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी करुणा यांना ताब्यात घेतले आहे. चौकशी चालू असल्याचे समजते आहे.
4 वर्षांपूर्वी -
समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या सोबतच्यांना आणि आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं - देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री काय बोलले याच्यावर मी काहीही बोलणार नाही. समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या सोबतच्यांना आणि आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं. मग आम्हाला सांगावं”, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ते नागपुरात बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याच्या मुद्दयावरून भाजपला फटकारले होते. अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख यांच्या विरोधात 'ईडी'कडून लूकआऊट नोटीस
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने लुकआऊट नोटीस जारी केल्याची माहिती ज्येष्ठ वकील जयश्री पाटील यांनी दिली आहे. जयश्री पाटील यांनीच सुरुवातीला अनिल देशमुख यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. त्यानंतर 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात कारवाई केली होती.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी बांधवांनो | रब्बी बियाणे अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करा, तुमच्या मोबाईलवरून - वाचा प्रक्रिया
शेतकरी बंधुंनो रब्बी बियाणे अनुदान योजना संदर्भातील ऑनलाईन अर्ज आता मोबाईलवरून देखील भरता येणार आहे या संदर्भातील माहिती जाणून घेवूयात. शेतकरी बांधव आता रब्बी बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि शासकीय अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. प्रमाणित बियाणांची वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी अवजारे, सिंचन सुविधा यासाठी ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे दिनांक 30 ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२१ पर्यंत महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल | मुख्यमंत्र्यांकडून राजू शेट्टींना बैठकीचे निमंत्रण
राजू शेट्टींच्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजू शेट्टी यांना उद्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. राजू शेट्टी नृसिं यांना नृसिंहवाडीत प्रांताधिकाऱ्यांनी प्रस्तावाचं पत्र दिले आहे. दरम्यान, या वारंवार येणाऱ्या पुरावर कायमस्वरुपी उपाययोजना करने गरजेची असल्याचं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
चिपी विमानतळाला अजूनही डीजीएसएची परवानगी नाही | कागदाचं विमान उडवणार का? - आ. नितेश राणे
चिपी विमानतळासाठी अजूनही डीजीएसएची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ही 7 तारीख कोठून आणली आहे. हे काय कागदाचं विमान उडवणार आहेत का ? असा खोचक सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांना केला. तसेच आम्हाला एक बुद्धू खासदार मिळाला आहे, अशी बोचरी टीकादेखील राणे यांनी राऊत यांच्यावर केली.
4 वर्षांपूर्वी -
Alert | येत्या चार दिवसांत महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार-पाच दिवसांत राज्यात अनेक भागांत विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसींचा विषय पुढे करून सगळ्या महापालिकांवर प्रशासक नेमून, त्या महापालिका सरकारच चालवणार - राज ठाकरे
लॉकडाऊन लावून सरकारचं बरं चाललं आहे. मोर्चे नाही, आंदोलने नाहीत, कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, असं सांगतानाच सरकारलाच आता निवडणुका नको आहोत, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
12 सदस्यांमध्ये राजू शेट्टींचं नाव | मी दिलेला शब्द पाळला आहे - शरद पवार
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा जोरात सुरु आहे. त्याबाबत राजू शेट्टी यांनीही आक्रमक भूमिका मांडली आहे. या बाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंच्या अडचणीत वाढ | ईडीकडून एक हजार पानी आरोपपत्र दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. ईडीनं एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी -
महागाई-गॅस उच्चांकावर | राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या भेट
एनसीपी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण राज्यात महागाई विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईचा निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या गिफ्ट म्हणून पाठवल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पालघरच्या मच्छीमारची घोळ माशामुळे लॉटरी | एका दिवसात एवढ्या कोटींचा लिलाव
महाराष्ट्रातील पालघरमध्ये एक मच्छीमार एका झटक्यात करोडपती झाला आहे. पालघरमध्ये फिशिंग टेकल म्हणून काम करणारे चंद्रकांत तरे आपल्या 7 साथीदारांसह नेहमीप्रमाणे समुद्रात मासेमारीला गेले. मात्र, यावेळी जाळ्यात अडकलेल्या माशांची किंमत कोट्यवधी होती आणि नशिबच पालटलं. यावेळी ‘सी गोल्ड’ नावाचे दुर्मिळ मासे (Sea Gold fish) त्यांच्या जाळ्यात अडकले. आणि लॉटरीच लागली.
4 वर्षांपूर्वी -
पडळकर अज्ञानी बालक | ते आता-आता उगवलेलं गवत आहे - विजय वडेट्टीवार
भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं आहे. त्यात हरवलेल्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचा शोध घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करा, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. त्यावर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घणाघाती टीका केली आहे. पडळकर हे अज्ञानी बालक आहेत. ते आता आता उगवलेलं गवत आहे. त्यांना काय माहीत आहे?, अशी जहरी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांसाठी अलर्ट | मुंबईत डेंग्यू, मलेरिया रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
कोरोनाचं संकट कमी होतं ना होतं तोच आता मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाची साथ आली आहे. मुंबईत ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळले असून त्यामुळे पालिकेतील रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला | गणेशोत्सवानिमित्त गणेश वंदनेतून सामाजिक संदेश
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खास गणेशोत्सवानिमित्त अमृता फडणवीस यांनी हे गाणे गायले आहे . गाण्याचे नाव गणेश वंदना, असे आहे.
4 वर्षांपूर्वी -
ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करणे हा भाजपचा डाव - जयंत पाटील
ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून विरोधकांवर दबाव आणणे, त्यांना धमकावणे आणि त्यांची कोणत्याही प्रकारची चूक नसताना त्यांची बदनामी करण्याचे काम सध्या भाजपकडून सुरू आहे, हे आता सर्वांना माहिती झाले आहे, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. ते चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी जयंत पाटील आज चाळीसगावच्या दौर्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
भाजपामध्ये महिलांचा सन्मान होत नाही | मला कोणाला घाबरायची गरज नाही - आमदार मंदा म्हात्रे
भारतीय जनता पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यापुढेच मंदा म्हात्रे यांनी ही खंत बोलून दाखवली आहे. दोनदा विधानसभेवर निवडून आल्यानंतरही पक्षाकडून डावललं जात असल्याचा आरोप यावेळी मंदा म्हात्रे यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आता महाराष्ट्रातील व्यापारी मार्गावरही अदानी समूहाचा ताबा
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापाठोपाठ आता राज्यातील व्यापारी मार्गावरही अदानी समूहाच्या ताब्यात गेला आहे. महाराष्ट्राच्या सहा राज्यांशी लागून असलेल्या सीमेवरील तपासणी नाक्यांच्या प्रकल्पांचा कारभार आता अदानी समूहकाडे असेल.
4 वर्षांपूर्वी -
शासनाने ठरवून दिलेल्या नियमात राहूनच गणेशोत्सव साजरा करा | आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
शासनाने ठरवून दिलेल्या नियमात राहूनच गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. यावर्षी गणेश मंडळांनी संख्या न वाढवता जुन्याच गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना करावी, असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB