महत्वाच्या बातम्या
-
BJP Jan Ashirwad Yatra | नारायण राणे आज स्व. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार? | वाद पेटणार?
मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. देशासह महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित मंत्री जात आहेत. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आजपासून मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Jan Ashirwad Yatra | आगरी-कोळी पट्ट्यात शिवसेनेकडून कपिल पाटील यांचं स्वागत | भाजपची क्रॉस पॉलिटिक्सने कोंडी
केंद्रीय मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री जात आहेत, तेथील जनतेशी संवाद साधत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा बुधवारी बदलापूरमध्ये आली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी भाजपच्या मंचावर जाऊन त्यांचं स्वागत केलं. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. बदलापूरच्या घोरपडे चौकात भाजपनं कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी उभारलेल्या मंचावर शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कपिल पाटील यांचं स्वागत करत त्यांचा सत्कार केला.
4 वर्षांपूर्वी -
भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत एसीबीची धाड | नितीन लांडगेंना ताब्यात घेतलं | काँट्रॅक्टर्स धास्तावले
पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धाड मारली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीची आजची बैठक संपताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं स्थायी समिती कार्यालयाचा ताबा घेतला. दरम्यान ही कारवाई नेमकी कुणावर झाली? या कारवाईत किती रुपये ताब्यात घेतले गेले? याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही.
4 वर्षांपूर्वी -
मोदीजींच्या मंदिरात दानपेटी नाही | परंतु मंदिराच्या वर्गणीसाठी LPG गॅसच्या दरात २५ रुपयांची वाढ केली आहे - रुपाली चाकणकर
सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्यात. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केलीय. आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 859.5 रुपये झालाय. तर तो पूर्वी 834.50 रुपये मिळत होता. यापूर्वी 1 जुलै रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीला IOC ने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 73.5 रुपये प्रति सिलिंडर वाढवली होती. या काळात कंपनीने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्त्या रखडवण्यामागील राजकारण काय? | भाजपची नेमकी अडचण काय? | सविस्तर राजकीय ठोकताळा
विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा सध्या आजूण पण रखडलेला आपण पाहतोय. विधानपरिषद आमदार नियुक्ती या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडीचे नेते आमने-सामने आले आहेत. यावर अनेक चर्चादेखील झाल्या किंबहूना या आमदारांची नियुक्ती रखडण्यामागे भाजप चा हात असल्याची शक्यता देखील विरोधी पक्षांकडून वर्तवण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
समन्स बजावूनही अनिल देशमुख ED चौकशीला गैरहजर | वकिलांनी स्पष्ट केलं कारण
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि देशमुख यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आज पाचव्यांदा अनिल देशमुख अंमलबजावणी संचालनालयासमोर गैरहजर राहिले आहे. यापूर्वी चारीही वेळेस त्यांचे वकील इन्द्रपाल सिंह यांनी ईडी ऑफिसात हजेरी लावली होती. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी देशमुख यांना मोठा झटका दिला. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने देशमुख यांच्या वरील ईडीची चौकशी थांबवण्यास नकार दिला आहे. त्यानंतर देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनरयाचिका दाखल केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | CGHS मुंबईत 61 जागांसाठी भरती | शिक्षण १०वी - १२वी | पगार २५ हजार
केंद्र सरकारची आरोग्य योजना, मुंबई भरती. केंद्र सरकार आरोग्य योजना (CGHS मुंबई) ने 61 पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार CGHS भरती 2021 साठी 02 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
जनाशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण | भाजपवर टीकास्त्र
केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार जनाशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. जाणयात्रेवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. जन आशीर्वाद ही तर तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
आठवा महिना लागला, पाळणा कधी हालणार? | १२ आमदार नियुक्तीवरून शिवसेनेचा खोचक सवाल
राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांचा प्रश्नावरून सध्या चांगलेच राजकारण तापू लागले आहे. नुकतेच न्यायालयाने कान टोचल्यानंतर राज्यपालांनी सरकारकडून आग्रह धरला जात नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांचे वय झाले असल्याचा टोला लगावला होता. या प्रकरणात आता शिवसेनेनेही राज्यपालांवर बोचरा आणि उपरोधिक निशाणा साधला आहे. सरकारने 12 नावांची शिफारस करून आता आठवा महिना लागला. मात्र राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे? हे राजभवनातील सुईणीने एकदा स्पष्ट करावे, असा टोला शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामनाच्या संपादकीयमधून लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील सामाजिक सांस्कृतिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी नागपूर-गुजरातमधून राज ठाकरेंना पुढे केले जातंय - संभाजी ब्रिगेड
महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे. महाराष्ट्राचे सामाजिक सांस्कृतिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी नागपूर आणि गुजरातमधून राज ठाकरे यांना पुढे केले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे नक्की नातू कोणाचे, प्रबोधनकारांचे की पुरंदरेंचे? | संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्याचा धक्कादायक सवाल
महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे. आगामी निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडून हा प्रयत्न केला जात आहे. पण राज ठाकरे यांनी ठरवलं पाहिजे की इतिहासावर बोलत असताना आपण अभ्यास करून बोललं पाहिजे. त्यामुळे ते बाबासाहेब पुरंदरे यांचे नातू आहेत की प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे नातू आहेत? असा सवाल देखील संभाजी ब्रिगेड प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रबोधनकारांची पुस्तकं 'कुरियरने' पाठवणाऱ्या संभाजी ब्रिगेडचं राज ठाकरेंना 'ती' हिंमत दाखवण्याचं आव्हान
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन टीका केलीय. राज ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारसदार आहेत मात्र संभाजी ब्रिगेड ही वैचारिक वारसदार आहे, असा आरोप आखरे यांनी लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ई-पीक पाहणी ॲप | पिके आणि बांधावरील झाडांची सातबाऱ्यावर ऑनलाईन अशी नोंद करा - वाचा सविस्तर
शेतकरी बंधुंनो नमस्कार, ई पीक पाहणी ॲप चा उपयोग करून आपल्या शेतातील पिके त्याच बरोबर बांधावरील झाले यांची नोंद सातबारावर कशी करावी या संदर्भात आपण या व्हिडीओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधुनो एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या कि हि सर्व प्रोसेस करत असतांना तुम्हाला तुमच्या शेतात असणे गरजेचे आहे कारण जेंव्हा तुम्ही तुमच्या पिकांची माहिती या e peek pahani mobile application नोंदणी कराल त्यावेळी तुमच्या शेतातील मुख्य पिकांचा फोटो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाची जन आशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाव दुप्पट करायला आहे का? - नाना पटोले
भाजपाची जनआशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाववाढ दुप्पट करायला आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. भाजपाने लोकांना फसवले. आता कशाच्या बळावर तुम्ही जन आशीर्वाद यात्रा काढता, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला लगावला.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील बार, मॉल सुरू मग मंदिरे का बंद ? । देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका
राज्य सरकारकडून मंदिरे का बंद ठेवली जातात, हा प्रश्न आहे. राज्यातील बारमध्ये तसेच मॉलमध्ये जितकी गर्दी होते. त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सुरक्षित अंतर ठेवून मंदिर खुले होऊ शकतात, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
4 वर्षांपूर्वी -
आक्रमक?। संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते राज ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं 'कुरिअर' करणार। थेट जाऊन देणार नाहीत
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता. राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असं राज म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष, ४ दिवस दिल्लीत थांबूनही शहांनी भेट नाकारली । पवार साहेबांवर काय बोलावं
राज्यपाल यांचं वय झालं आणि शरद पवार साहेब यांचं वय झालं नाही का?, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर पलटवार करताना केला होता. त्याला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांतदादा, तुमचं जेवढं वय आहे तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द आहे, असा जोरदार टोलाराष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला [प्रदेशाध्य्क्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीच्या आरोपांनंतर गजानन काळे फरार | नवी मुंबई पोलिस पथकांकडून शोध सुरु
नवी मुंबई सारख्या महत्वाच्या महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. कारण घरगुती हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीचा आरोप असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेसाठी त्यांच्या पत्नीने आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याकडे धाव घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | पर्यावरण व हवामान बदल विभागात (मुंबई) 20 जागांसाठी भरती | ऑनलाइन अर्ज
पर्यावरण आणि हवामान बदल विभाग भरती 2021. पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने भरतीची अधिसूचना जारी केली आहे आणि 20 इंटर्नशिप प्रोग्राम पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार ईसीसीडी भरती 2021 साठी 31 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या महागाई, इंधनदर, घसरलेला GDP संदर्भातील आश्वासनांवर जन आशीर्वाद यात्रेतून उत्तर द्यावीत - भास्कर जाधव
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून सध्या राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. यावरून शिवसेनेचे प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांनी गडकरी यांना टोला लगावत काही सवाल उपस्थित केले आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Loan EMI Alert | कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल