महत्वाच्या बातम्या
-
त्या बाटल्या दीड-दोन वर्षांपूर्वीच्या असल्याचं समजलं, म्हणजे त्यांच्या काळातल्या | वर्षभर तर मंत्रालय बंद होतं - संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या मंत्रालयात सापडलेल्या दारुच्या बाटल्यांच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाला फैलावर घेतलं आहे. त्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात. भाजपने या बाटल्या लॅबमध्ये नेऊन तपासाव्यात. त्या किती जुन्या आहेत याचा शोध घ्यावा, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला फटकारले.
3 वर्षांपूर्वी -
आरक्षण ५० टक्क्यांची मर्यादा | राज्यातल्या भाजप खासदार, दानवे, नारायण राणेंनी तोंडच उघडली नाही? - संजय राऊत
लोकसभेत मंगळवारी इतर मागासवर्गाशी (ओबीसी) संबंधित दुरुस्ती विधेयक एकमताने मंजूर झाले. सत्तारूढ आणि विरोधी पक्षांच्या सर्व सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा दिला. १२७ वी घटनादुरुस्ती-२०२१ विधेयकावर चर्चेनंतर मतदान घेण्यात आले. त्याच्या समर्थनार्थ ३८५ मते पडले, विरोधात एकही मत पडले नाही. आता बुधवारी हे विधेयक राज्यसभेत मांडले जाईल. सत्तारुढ आणि विरोधी पक्षांचा पाठिंबा असल्याने राज्यसभेतही चर्चेनंतर हे विधेयक मंजूर होणे निश्चित आहे.
3 वर्षांपूर्वी -
Crime Patrol | रिक्षाचालकाने पेट्रोल टाकून दोन महिलांना जाळले | महिलांची प्रकृती चिंताजनक
रिक्षाचालकाने पेट्रोल टाकून फ्लॅट पेटवून दिल्याने दोन महिला जळून गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना मखमलाबाद रोडवरील शिंदे नगर येथील भाविक इमारतीत घडली. सुखदेव गुलाब माचेवाल उर्फ कुमावत असे पेट्रोलने दोन महिलांना जाळणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या दोन्ही महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत एक वयोवृद्ध आणि दोन लहान मुले बचावली, मात्र घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या आहेत. याबाबत पंचवटी पोलीस पुढील तपास करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीबाबत राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांशी चर्चा, ते म्हणाले 'ठिक है' - चंद्रकांत पाटील
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत भेट झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचा प्रश्न लटकल्याची जोरदार चर्चा होती. परंतु, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमुख जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीबाबतची त्यांना माहिती दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.
3 वर्षांपूर्वी -
५० टक्क्यांची मर्यादा? | केंद्र सरकार राज्यांना अधिकार देतंय की राज्यांच्या अडचणी वाढवतंय? | केंद्राचा हेतू काय? - सविस्तर वृत्त
संसदेत 127 वे घटनादुरूस्ती विधेयक सोमवारी लोकसभेमध्ये सादर केल्यानंतर भाजपने आपल्या सर्व खासदारांना 10 आणि 11 ऑगस्ट रोजी लोकसभा आणि राज्यसभेत हजर राहण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे. 127 व्या घटनादुरूस्ती विधेयकावर 10 तारखेला (आज) लोकसभेत चर्चा होऊन विधेयक बहुमताने मंजूर झालं आहे.
3 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात शाळा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना | तर पंजाबमध्ये २० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा विषाणूनं डोकं वर काढलं आहे. आज महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना व त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. १७ ऑगस्टपासून शहरी भागातील इयत्ता आठवी ते दहावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीची शाळा सुरू करणेबाबत या सूचना आहेत.
3 वर्षांपूर्वी -
युपी निवडणूक | चंद्रकांतदादांना राज भेट नडली? | दिल्लीत ४ दिवस असूनही मोदी-शहांनी भेट दिली नाही
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीत आहेत. रविवारी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक देखील झाली. दरम्यान, चार दिवसापासून दिल्लीत असणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मात्र अमित शहा यांनी भेट टाळल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज्य पदाधिकाऱ्यांसह चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र त्यांना वेळ दिली गेली नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
3 वर्षांपूर्वी -
नगर-पारनेर | आ. निलेश लंके आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष भेटीनंतर राजकीय चर्चा सुरु | लंके काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आ.निलेश लंके यांची मी पारनेर परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी गेलो असता माझ्या सहकाऱ्यां समवेत सदिच्छा भेट घेतली होती. ही भेट राजकीय स्वरूपाची नसून सदिच्छा भेट होती. या भेटीबाबत अनेक राजकीय स्वरूपाची चर्चा समाज माध्यमांमधून आणि इतर व्यासपीठांवरून सुरू आहे. या भेटीचा विपर्यास यातून झाल्याचे दिसते. आ. लंके यांना त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामासाठी यावेळी शुभेच्छा दिल्या एवढेच या भेटीत घडले असा खुलासा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
समुद्र सीमा ओलांडणार? | मुंबईसह देशातील ही १२ शहरं ३ फूट पाण्यात जाणार - आयपीसीसी अहवाल
जागतिक हवामान बदलाबाबत आयपीसीसीनं आशिया खंडातील देशांना गंभीर इशारे दिले आहेत. तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढण्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. आशियातील समुद्राची पातळी जागतिक दरापेक्षा वेगाने वाढत आहे, असं अहवालात सूचित करण्यात आलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | FYJC प्रवेशासाठीची CET मुंबई हायकोर्टाकडून रद्द
अकरावी प्रवेशासाठीची CET हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. 28 मे चा यासंदर्भातला अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे हायकोर्टाने सांगितले आहे. राज्य सरकारनं निकालाला स्थगिती देण्याची याचिका केली होती. ही याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. मुंबई हायकोर्टात राज्य सरकारतर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली.
3 वर्षांपूर्वी -
आ. प्रताप सरनाईकांना अडचणीत आणणाऱ्यांनो, त्यांच्या कामाशी स्पर्धा करून दाखवावी - मुख्यमंत्री
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठराखण केली. जे कोणी प्रताप सरनाईकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी प्रताप यांच्या लोकोपयोगी कामाशी स्पर्धा करून दाखवावी, असं आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं.
3 वर्षांपूर्वी -
केंद्राने OBC एम्पिरिकल डेटा द्यावा | सुप्रिया सुळेंची संसदेत मागणी | भाजप नेत्यानं म्हटलं टाईमपास...
दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सध्या संसदेत आरक्षण आणि घटनादुरुस्तीवरून दावे प्रतिदावे सुरु झाले आहेत. त्यालाच अनुसरून राज्यातील मराठा आरक्षण आणि ओबीसी राजकीय आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
रायगड | रोहा येथे दुर्मीळ उडता सोनसर्प आढळला | सर्पमित्रांमध्ये आनंद
जिल्ह्यातील रोहा येथे दुर्मीळ उडता सोनसर्प आढळून आला आहे. जिल्ह्यात प्रथमतःच आढळून आलेल्या या सापामुळे सर्पमित्रांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. या सापाबाबत अधिक अभ्यास करून, अशा दुर्मीळ सापांना संरक्षण देण्यात यावे, अशी सर्पमित्रांनी यावेळी मागणी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
युवासेनेच्या ‘त्या’ निष्ठावान जिल्हाध्यक्षाच्या नाराजीवर सरदेसाईंनी दाखवलं नैतृत्व कौशल्य | नेमकं काय घडलं?
जवळपास सर्वच पक्षांमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते असतात पण प्रत्येकाला न्याय मिळतोच असे नाही. अनेकदा नवख्या आणि पब्लिसिटी तसेच समाज माध्यमांवर स्टन्ट करणारे पदाधिकारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांमार्फत वशिल्याने पद मिळवून जुन्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय करतात. पक्ष बांधणी करणारे पदाधिकारी अनेकदा चमकोगिरी पदाधिकाऱ्यांमुळे पक्षश्रेष्ठींच्या समोर येतं नाहीत. मात्र शिवसेनेची युवा शाखा असलेल्या युवासेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई मात्र निष्ठावंत कार्यकर्त्याला विसरले नाहीत.
3 वर्षांपूर्वी -
‘त्या’ २७ नगरसेवकांना कोणते गाजर दिले ते लवकरच कळेल - गिरीश महाजन
सरकारच्या तिजोरीत खडखडाट असून गेल्या वर्षभरात कोणत्याही योजनेसाठी पैसे देण्यात आलेले नाही. सरकार स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेनेने भाजपाला जोरदार धक्का देताना तब्बल २७ नगरसेवकांचा प्रवेश घडवून आणला होता. त्यावर गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमुळे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना मनसेसोबतच्या युतीवर चर्चाही नको - सविस्तर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजप आणि मनसे यांच्यातील युतीबाबतच्या चर्चांनी जोर धरला. परंतु, दिल्ली दौऱ्यावर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांची याबाबत कुठेच वाच्यता झाली नसल्याचं समोर आलं आहे. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मौन बाळगणंच पसंत केलं आहे. इतकंच नाही तर सध्या ही भेट टाळता आली असती अशी केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची धारणा असल्याची माहिती समोर आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
केंद्राने खाऊचा डबा दिला, पण डबा रिकामाच आहे | घटना दुरुस्ती विधेयकावरून राऊतांची टीका
१०२ व्या घटनादुरुस्तीमुळे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) निर्माण करण्याचे अधिकार पुन्हा राज्यांना बहाल करण्यासंदर्भात संसदेत विधेयक मांडले गेले आहे. मात्र केंद्र सरकारला उघडे पाडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कंबर कसली आहे. हे एसईबीसी प्रवर्ग तयार करूनही मराठा आरक्षण देण्यात अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन आता घटनेत नमूद असलेल्या आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याचे विधेयक अथवा प्रस्ताव मांडावा यासाठी आघाडी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
सर्वच राज्यांची कोंडी | आरक्षणाची 50% मर्यादा उठवणं गरजेचं | SEBC प्रवर्ग ठरवला तरीही इंद्रा साहनी निकालाची अडचण
१०२ व्या घटनादुरुस्तीमुळे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) निर्माण करण्याचे अधिकार पुन्हा राज्यांना बहाल करण्यासंदर्भात संसदेत विधेयक मांडले गेले आहे. मात्र केंद्र सरकारला उघडे पाडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कंबर कसली आहे. हे एसईबीसी प्रवर्ग तयार करूनही मराठा आरक्षण देण्यात अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन आता घटनेत नमूद असलेल्या आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याचे विधेयक अथवा प्रस्ताव मांडावा यासाठी आघाडी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
भाजपकडून OBC आ. संजय कुंटेंना पुढे करून पंकजा मुंडेंच्या राजकारणाला धक्का देण्याची खेळी? - सविस्तर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील बडे नेते दिल्लीत असून महाराष्ट्रातील नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीवर सध्या खलबते सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेले जळगाव-जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. संजय कुटे हे फ्रंटलाइन नेते नसले तरी ते मागील चार टर्म आमदार म्हणून निवडून येत आहेत. ते मूळचे बुलडाण्यातील आहेत. काही वर्षांपासून ते देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Bank Job Alert | पुणे जिल्हा बँकेत 356 क्लार्क पदांसाठी भरती | असा ऑनलाईन अर्ज करा
पुणे जिल्ह्यातील अग्रणी बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांच्याकडून बँकेसाठी लेखनिक पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेतर्फे एकूण 356 जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना 16 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करतायेणार आहेत. सरळसेवा पद्धतीनं ही भरती प्रक्रिया होणार आहे. (PDCC Bank Recruitment 2021 Free Job Alert)
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER