महत्वाच्या बातम्या
-
स्वप्निल लोणकर कुटुंबीयांच्या 19.96 लाखांच्या थकित कर्जाची भाजपकडून परतफेड | धनादेश सुपूर्द
एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला.
4 वर्षांपूर्वी -
पालकांनो | तुमच्या मुलाला मिळणारं शालेय पोषण आहार अनुदान रक्कम थेट तुमच्या खात्यात
शेतकरी बंधुंनो शालेय पोषण आहार अनुदान रक्कम थेट पालकांच्या खात्यात जमा होणार आहे. तुमचा मुलगा शाळेत जात असेल आणि तो इयत्ता पहिली ते आठवीमध्ये असेल तर हा खास लेख तुमच्यासाठी आहे कारण आता इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पोषण आहार न देता आल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पोषण आहाराच्या बदल्यात पैसे जमा करण्यात येणार असून राष्ट्रीयकृत बँकेत खते उघडण्याची अट शिथिल करण्यात आलेली आहे.
4 वर्षांपूर्वी -
CET Online Application | विद्यार्थ्यांनो... वेबसाईट सुरळीत होताच ११'वी प्रवेशासाठी असा ऑनलाईन अर्ज करा - स्टेप बाय स्टेप
21 ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी http://cet.mh-ssc.ac.in/ हे संकेतस्थळ ज्यावर विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरत होते ते तांत्रिक कारणास्तव बंद ठेवण्यात आले असून अर्ज भरण्याची ऑनलाइन सुविधा पूर्ववत सुरू झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख यांची सीबीआयच्या FIR विरोधातली याचिका हायकोर्टाने फेटाळली
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. त्यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. सीबीआयने अनिल देशमुखप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात महाराष्ट्र सरकारला दिलासा मिळालेला नाही. एफआयआरमधील आक्षेपार्ह भाग वगळण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला असून अद्याप सुनावणी सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | मुंबई माझगाव डॉकमध्ये 425 पदांची भरती | शिक्षण १० वी पास | ऑनलाइन अर्ज
माझगाव डॉक शिपबिल्डर भरती २०२१. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबईने 425 ट्रेड अॅप्रेंटिस पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 10 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी माझगाव डॉक भरती 2021 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
बेजबाबदार पत्रकारिता | राज कुंद्रा प्रकरणातील आरोप उमेश कामत दुसराच | बदनामी आपल्या उमेश कामतची
सध्याची पत्रकारिता सुद्धा वास्तवापेक्षा गुगल भरोसे झाली आहे असं म्हणावं लागेल. त्यात कोणतीही खातरजमा न करता कोणाचाही फोटो केवळ नावात साम्य असल्याने गुगल सर्च मध्ये मिळतो आणि तोच फोटो उचलून थेट वृत्त प्रसिद्ध केली जातात. असे प्रकार हिंदी माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचं यापूर्वी देखील अनेकदा पाहायला मिळालं आहे. मात्र देशभरात गाजणाऱ्या एखाद्या किळसवाण्या प्रकरणात काहीच संबंध नसणाऱ्या व्यक्तीची नाहक बदनामी केली जाते हे अत्यंत भीषण आहे.
4 वर्षांपूर्वी -
केस मागे घेण्यासाठी बिल्डरकडून 15 कोटीची खंडणी मागितली | परमबीर सिंह यांच्या विरोधात अजून एक FIR दाखल
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. परमबीर यांच्या शिवाय, मुंबई पोलिसातील इतर काही पोलीस अधिकाऱ्यांची नावेही एफआयआरमध्ये आहेत. ही एफआयआर एका बिल्डरच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आली आहे. यात 15 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोकणात तुफान पावसाने नद्यांचं पाणी बाजारपेठेत | खेड्यापाड्यांमध्ये ५ फुटांपर्यंत पाणी
कोकणात मुसळधार पावसाने नद्या ओसंडून वाहू लागल्या असून आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरलं आहे. परिणामी जनजीवन पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्रं आहे. अगदी बाजारपेठांना देखील नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय. स्थानिक प्रशासनाला मदत कार्यात देखील प्रचंड अडचणींना तोंड द्यावं लागतंय.
4 वर्षांपूर्वी -
जलयुक्त शिवार योजना | 1 हजार कामांतील भ्रष्टाचार रडारवर | ई-टेंडर शिवाय अनेक भाजप कार्यकर्त्यांना ठेकेदारी
फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत अनियमितता झालेल्या १००० कामांची भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी होणार आहे. विजयकुमार समितीने आपल्या अहवालात ही शिफारस केली असून उर्वरित १२८ कामांची विभागीय चौकशी करावी, असेही समितीने राज्य सरकारला सुचवले आहे. अनेक कामे ई-टेंडर न काढता करण्यात आली. काम न करता देयके अदा केली.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रसला राज्यात नंबर एकचा पक्ष बनवायचा आहे | आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत - नाना पटोले
आघाडी सरकारमध्ये एकत्र असले तरीही काँग्रेस महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याविषयी घोषणा करत होते. आता त्यांच्या या घोषणांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पाठबळ दिले आहे अशी माहिती पटोले यांनी बुधवारी दिली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असूनही काँग्रेस स्थानिक निवडणुका एकट्यानेच लढवणार असल्याचे पटोलेंनी सांगितले आहे. मंगळवारी कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्यासमवेत नाना पटोले यांनी राहुल गांधींची भेट घेऊन पक्षाच्या रणनीतीविषयी चर्चा केली होती.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकार आल्यापासूनच पॉर्न फिल्मचं शुटिंग सुरू होतं | ठाकरे सरकारने हाणून पाडलं - नाना पटोले
अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पोलिसांनी पॉर्न फिल्म शूटिंग करण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. मुंबई अशाप्रकारे पॉर्न फिल्म शूटिंग होत असल्याच्या बातमीनंतर संपूर्ण बॉलीवूडसह राज्यभरात खळबळ माजली आहे. मात्र पॉर्न फिल्मची शूटिंग ही राज्यात तात्कालीन देवेंद्र फडणीस सरकार आल्यापासून सुरू होतं, असा धक्कादायक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस रडारवर? | कॅगने ठपका ठेवलेल्या जलयुक्त शिवार योजनेची ACB मार्फत चौकशीची शिफारस
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील महत्वकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची ACB मार्फत सखोल चौकशी केली जावी, अशी शिफारस करण्यात आल्याचे वृत्त आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांणा उधान आलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही बातमी काहीसी धक्कादायक असण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्याघरी बनवा चटपटीत गोबी धपाटे - वाचा रेसिपी
अनेकांना फ्लॉवर आणि गोबीचे भाजी जेवणामध्ये खाण्यास पसंत नसते. परंतु हे दोन्ही घटक पोषकतत्वांसाठी महत्वाचे आहेत. म्हणून याचे पराठे बनवून तुम्ही हे कुटुंबियांना खायला देऊ शकता. यामुळे गोबी, फ्लॉवरमधील पोषक तत्वे शरीरात जाण्यात मदत होईल. मी बोलत आहे ते गोबी धपाटे किंवा पराठे याविषयी. ही एक सोपी आणि पोषकतत्वाची रेसिपी आहे. जी तुम्ही तुमच्या फावल्या वेळात कधीही बनवू शकता. शिवाय ही घरीच उपलब्ध असलेल्या घटकांपासून तयार होते.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो! फलोत्पादन योजना अंतर्गत अनुदान योजना सन 2020-21 | असा ऑनलाईन अर्ज करा
फलोत्पादन योजना अंतर्गत सन 2020-21 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. भरपूर दिवसापासून वाट बघत असलेली फलोत्पादन योजना चालू झाली आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घ्यावा.
4 वर्षांपूर्वी -
नियम पाळू, पण दहीहंडी साजरी करणारच | मनसेचा निश्चय
गेल्या वर्षी 31ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दहीहंडीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात मागील वर्षी शुकशुकाट पाहायला मिळाला. तर आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचं ठरवलं होतं. मनसेने देखील हा सण रद्द करून ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नौपाडा येथील त्यांच्या कार्यालयात गोकुळ अष्टमीचा जन्म उत्सव पूजा अर्चाकरून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
4 वर्षांपूर्वी -
High Alert | मुंबईकरांसाठी हवामान खात्याकडून रेडअलर्ट | पुढील ३-४ तास धोक्याचे
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगराच्या परिसरात वेगवान वाऱ्यांसह पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमधील सततच्या पावसामुळे मिठी नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. अशातच बुधवारी सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस सुरुच राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा जलमय होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
OBC आरक्षण | केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या लोकसभेतील लिखित उत्तराने राज्य भाजपच्या राजकारणाची पोलखोल
अनुसुचीत जाती आणि जमाती सोडून कुठल्याही जातीची जातीनुसार जनगणना होणार नाही, केंद्राकडे असेलला डाटाही देणार नाही’, असं लेखी उत्तर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॅाय यांनी काल दिलं आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण देण्याची केंद्राची भूमिका नाही, हे कालच्या उत्तरातून स्पष्ट झालंय, असा घणाघात ओबीसी नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी -
पंकजांच्या नाराजी अस्त्राकडे प्रदेश पातळीवर दुर्लक्ष | बीडमध्ये पक्षांतर्गत पंकजा मुंडे विरोधी हालचाली सुरु - सविस्तर वृत्त
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डाॅ. प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यापासून मुंडे परिवार नाराज असल्याची चर्चा आहे. बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे देऊन आपली खदखद दाखवून दिली, तर पंकजा मुंडे यांनी मुंबईत समर्थकांचा मेळावा घेत सूचक विधाने केली हाेती. पाठाेपाठ साेमवारी भाजप ओबीसी माेर्चाच्या मुंबईत झालेल्या बैठकीसही पंकजा अनुपस्थित असल्याने त्याची अधिकच चर्चा झाली.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | महाविकास आघाडीतील नेते संसदेत आरक्षणाचा मुद्दा उचलणार - अशोक चव्हाण दिल्लीत
राज्यातील काही प्रमुख नेते अचानक दिल्लीत गेले की राजकीय वर्तृळात जोरदार चर्चा सुरु होतात. दरम्यान, कॉंग्रेसचे नेते आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आज (२१ जुलै) दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्या मालकीच्या जमिनीची सरकारी किम्मत तुम्ही मोबाइलवर पाहू शकता | कशी त्यासाठी वाचा
जमीन खरेदी विक्री असे भरपूर व्यवहार नेहमी होत असतात. तर मग त्यसाठी आपली जमिनीची किम्मत किती आहे कसे जाणून घ्यायचे व जमीन कुठल्या भावात द्यायची याची किम्मत किती सरकारी किम्मत किती हे जाणून घेऊया मोबाइलच्या सहाय्याने. आता आपल्या जमिनीची सरकारी किम्मत किती आहे हे बघा आपल्या मोबाइलवर . जमिनीची सरकारी किम्मत पहाण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल हे बघूया;
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today