महत्वाच्या बातम्या
-
मुंबई महापालिका निवडणुक स्वबळावरच, मनसेबरोबर युती नाही - आ. आशिष शेलार
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील काही घटक पक्षांनी येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय जनता पक्षानेही स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार अॅड. आशिष शेलार यांनीही मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचं सुतोवाच केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेने बरोबर युती करणार नाही, असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना-भाजप युती होणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीत - विनायक मेटे
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या विषयी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या कि ‘ आम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, निवडून आलेल्यांना आम्ही शुभेच्छा देतो’, मात्र अद्यापही प्रीतम मुंडे कुठेही समोर आलेल्या नाहीत. या नंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त असून ७७ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपकडूनच सरकार अस्थिर करण्यासाठी मनगढत कहाण्या पेरल्या जात आहेत - नाना पटोले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं आज उत्तर दिलं आहे. ‘पटोले यांनी योग्य माहिती अभावी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी आधी व्यवस्थेची माहिती करून घ्यावी,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हाणला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सहकारी पक्ष भडकले | पटोले स्पष्टीकरण देताना म्हणाले, ते वक्तव्य केंद्राबाबत होतं, राज्याबाबत नव्हे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं आज उत्तर दिलं आहे. ‘पटोले यांनी योग्य माहिती अभावी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी आधी व्यवस्थेची माहिती करून घ्यावी,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हाणला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सध्या 12 आमदारांच्या यादीवर मी तोंडावर मास्क ठेवलेलं बरं आहे - उर्मिला मातोंडकर
पावसाळी अधिवेशन संपले तरीही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीचा प्रश्न काही सुटला नाही. शिवसेनेकडून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना आमदारकी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे नाव राज्यपालांकडे पाठवले आहे. ’12 आमदारांच्या यादीवर मी तोंडावर मास्क ठेवलेलाच बरं आहे, पण आमदारकी मिळाली तर आनंदच आहे’, असं म्हणत ऊर्मिला यांनी आपली इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारला लक्ष करताना 'कसाई' ऐवजी 'खाटीक' असा शब्द वापरला | टीका होताच भातखळकरांचा माफीनामा
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या शहरातून गाय चोरीच्या घटना समोर आली होती. बकरी ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच या गाय चोरीच्या घटना घडताना समोर आल्याने राजकारणही करण्यात आलं. त्यामुळे विरोधकांनी भिवंडीतील कत्तलखाने पुन्हा सक्रिय झाल्येत का? असा सवाल उपस्थित केला होता.
4 वर्षांपूर्वी -
एरंडोल नगरपालिकेत सफाई कामगार पदाची भरती | पगार १५ ते ४७ हजार | शिक्षण ७वी उत्तीर्ण
एरंडोल नगरपालिकाअंतर्गत सफाई कामगार या पदाकरिता भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०२१ आहे.
4 वर्षांपूर्वी -
Alert | पावसाने जोर पकडला, राज्यातील या भागात अतिवृष्टीचा इशारा - वाचा सविस्तर
मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनने चांगला जोर पकडला आहे. सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे १२ ते १५ जुलैदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात अतिवृष्टी होईल, तर मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. रविवारी मुंबईसह लगतच्या परिसरात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना संकटात ६ महिने बिळात लपून बसणाऱ्यावर काय बोलायचं? | लंकेंचा विजय औटींना टोला
शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यावाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. विजय औटींच्या टीकेला निलेश लंके यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिल्याने विजय औटींचा पुन्हा त्रागा होण्याची शक्यता आहे. मी बाप नव्हे तर जनतेचा सेवक आहे.समाजकारणात, राजकारणात आल्यापासून मी माझे जीवन जनतेसाठी अर्पण केले आहे.ज्या दिवशी मी स्वतःला आमदार समजेल त्यावेळी माझी जनतेसोबत असलेली नाळ तुटेल असे खणखणीत प्रतीउत्तर आमदार नीलेश लंके यांनी माजी आमदार विजय औटी यांना दिले.
4 वर्षांपूर्वी -
मुंडे समर्थक 77 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे | प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही पत्रं
पंकजा समर्थक आणि बीडचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे तब्बल ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन थेट मुंबईला रवाना झाले आहेत. उद्या मंगळवारी ते पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे उद्या पंकजा मुंडे यांनी समर्थकांच्या बोलावलेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसे प्रमुख राज ठाकरे ३ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर जाणार | संघटनात्मक विषयांवर जोर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काल पुण्यात आले होते. यानंतर आता पुण्यापाठोपाठ राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्वाचा मानला जात आहे. राज ठाकरे हे १६ ते १८ जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे नाशिक महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. नाशिक हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जुना बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना नाशिक दौरा महत्वाचा मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
महत्वाची माहिती | जमीन NA (बिगर शेती) कशी करायची? | समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया
सध्या विकासासाठी, राहण्यासाठी, उद्योग व्यवसायासाठी मोठया प्रमाणावर जागेची मागणी वाढत आहे. परंतु शेतजमिनीत या गोष्टी करता येत नाहीत. त्यासाठी शेत जमिनीचे अकृषी म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल (एनए) करावे लागते. अनेक सामान्य लोकांना ही प्रक्रिया माहित नसते. तर काहींना ती माहित असली तरी त्याचे पूर्ण ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे एनए करण्यासाठीची प्रक्रिया नेमकी काय आहे, ती कशी करावी लागते हे पाहणे गरजेचे आहे. महाराष्ट्र जमीन महसूल ( कृषी जमिनीचे अकृषी जमिनीत रूपांतर करणे) अधिनियम १९६९ नुसार शेतजमिनीचा वापर इतर कोणत्याच विकास कामाकरिता करता येत नाही. तो करायचा असेल तर त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते.
4 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला | राज्यातील पक्षांतर्गत विरोधकांची चिंता वाढली
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे अचानक दिल्लीत आल्या. त्यांनतर त्या आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यांच्यासोबत जेपी नड्डाही आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीत वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? | माहिती जाणून घ्या
विविध शासकीय योजनांसाठी दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला खूप महत्वाचा आहे. आपण या लेखामध्ये दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील माध्यमांनी केंद्रीय सहकार खात्यामुळे इथल्या सहकार चळवळीवर परिणाम होईल असे भासवले - शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. यावेळी नव्याने सहकार खातेही तयार करण्यात आले आहे. अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वेगळे खाते निर्माण केल्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्रातील प्रकरणे बाहेर काढले जातील अशा चर्चा होत्या. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा ? कसा करायचा अर्ज? - वाचा माहिती
शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र कुठे काढायचं. शेतकरी प्रमाणपत्राचा फायदा नेमका काय हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. कृषी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना शेतकरी असल्याचा दाखला सादर केल्यास फायदा होतो. जमीन खरेदी करत असताना देखील अनेकदा शेतकरी प्रमाणपत्र सादर करावं लागते.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही त्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही | नाना पटोलेंकडून खिल्ली
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला काहीही म्हटले तरी चालेल. पण आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही. ती आमची संस्कृती नाही, असा टोला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. राज्यातील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते सैरभेर झालेले आहेत. केंद्राच्या मदतीने राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे सगळे प्रयत्न विफल झाल्याने आता त्यांचा तोल ढासळला आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकवणे इतकाच नेत्यांचा उद्देश आहे का? - राज ठाकरे
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांना केला.
4 वर्षांपूर्वी -
OBC आणि मराठा आरक्षण | एकदा या सर्वांना एका व्यासपीठावर आणा आणि विचारा - राज ठाकरे
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांना केला.
4 वर्षांपूर्वी -
मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतायत, याची वाट पाहतोय - राज ठाकरे
भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकल्यानंतर राष्ट्र्वादीत जाहीर प्रवेश करताना माझ्यामागे ‘ईडी’ लावली तर मी CD बाहेर काढेन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. त्यामुळे मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट पाहत असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Poco X7 5G | 32MP फ्रंट कॅमेरा, Poco X7 5G स्मार्टफोन लवकरच लाँच होतोय, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनला तोड नाही
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती