महत्वाच्या बातम्या
-
मुंबई हायकोर्टाची टीप्पणी, पोलीस प्रशासन प्रमुखही तितकाच जबाबदार | परमबीर सिंग स्वतःच अडकणार?
मुंबईचे पोलीस माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बुधवारी मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीनंतर परमबीर सिंग यांच्यावरही CBI चौकशीची टांगती तलवार असणार आहे. तसेच राज्य सरकारच्या तपास यंत्रणा देखील त्यांना अटक करू शकण्याच्या शंकेने केंद्रीय तपास यंत्रणा देखील आधीच कार्यरत झाल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
जळगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या ललिता पाटील बिनविरोध
जळगाव येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या ललिता पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे जळगाव गाव पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. शासनाच्या विविध विकासाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा असा सल्ला देत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा दिल्या.
4 वर्षांपूर्वी -
BHR घोटाळा | जितेंद्र कंडारेच्या पोलीस कोठडीत वाढ | अजून काही संशयित रडारवर
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारेची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोरमधून अटक केली होती. याप्रकरणात अनेक संशयितांना अटक झाली होती. परंतु मुख्य संशयित असलेला सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र खंडारे हा फरार होता.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील निवडणुका स्थगित करणे हा तर आयोगाचा निर्णय | सरकारचे यश नव्हे - बावनकुळे
कोरोनाची स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाचे राज्याचे माजी ऊर्जा मंत्री तथा भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वागत केले आहे. या निवडणुका स्थगित झाल्याचे यश राज्य सरकारचे नसून निवडणूक आयोगाने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मिळालेली ही संधी आहे. यात राज्याचे ओबीसी नेते छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन इंपेरिकल डेटा तयार करावा, तो डेटा उच्च न्यायालयात सादर करावा.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारमधील फोन टॅपिंग प्रकरण | त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन
फोन टॅपिंग करणे हा गंभीर प्रकार असून अशा प्रकरणात रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु तशी प्रक्रिया या प्रकरणात पार पाडल्याचे दिसत नाही. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याची माहिती घेऊ, असे आश्वासन वळसे पाटील यांनी सभागृहाला दिले होते.
4 वर्षांपूर्वी -
अमित भाईंकडे काही गोष्टी गेल्यानंतर अनेकांना कापरे भरते - देवेंद्र फडणवीस
अमित शाह हे राजकारणात येण्याआधी सहकारात होते. ते कार्यकर्ते म्हणून सहकारातून तयार झाले. त्यानंतर ते राजकारणात आले. त्यामुळे सहकार त्यांना पूर्णपणे माहीत आहे. गुजरात मधल्या सहकारातील प्रमुख नाव अमित शाह होते. त्यामुळे त्यांच्याकडे सहकार मंत्रालय देण्यात आले असावे. अमितभाईकडे काही गोष्टी गेल्यानंतर काही लोकांना कापरे भरते, त्याला आपण काही करू शकत नाही. असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित
राज्यात कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने महाराष्ट्रातील पाच जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
4 वर्षांपूर्वी -
मनसेचा एकमेव आमदार गळाला लावण्यासाठी भाजपाकडून दबावतंत्राचा वापर? | भाजपाची योजना काय? काय म्हणतात तज्ज्ञ?
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सध्या अनेक दिग्गज नेत्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर भाजपाकडून पाटील यांना गळाला लावण्याच्या हालचाली सुरू झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी बांधवांनो पीक विम्याची तक्रार कोठे करायची माहित आहे? जाणून घ्या प्रक्रिया
पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात 2016च्या खरीप हंगामापासून राबवण्यात येत आहे. मात्र, आधी ती कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक होती. आता गेल्यावर्षीपासून सरकारने कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग नोंदविण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांची इच्छा असेल तरच ते सहभाग नोंदवू शकतात. पण, पीक विमा काढल्यानंतर तो मंजूर झाला की हे कुठे बघायचं? तसेच पीकविम्यासंबंधी काही तक्रारी असतील तर त्या नेमक्या कुठं नोंदवायच्या?
4 वर्षांपूर्वी -
रोजगार हमी योजनेतून विहीर काढायचीय? | अर्ज कुठे आणि कसा करायचा? - नक्की वाचा
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार पंचायत समितीच्या गटविकासअधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक सिंचन विहिरींचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी रोहयोतून सिंचन विहीर काढण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा हे माहिती असणं आवश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी | हेल्थ बुलेटीन द्वारे माहिती
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली आहे. त्यामुळेच ते तीन महिने विश्रांती घेणार असून या दरम्यान कोणत्याही राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या आईचा खून करून काळीज काढणाऱ्या नराधमास फाशी
दारूसाठी पैसे दिले नाहीत या रागाच्या भरात जन्मदात्या आईला ठार मारून तिचे काळीज काढणाऱ्या निर्दयी नराधमास गुरुवारी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. सुनील कुचकोरवी असे आरोपीचे नाव आहे. ही घटना कोल्हापुरात कावळा नाका परिसरातील माकडवाला वसाहतीत २८ ऑगस्ट २०१७ रोजी घडली होती. यल्लव्वा रामा कुचकोरवी असे मृत वृद्धेचे नाव होते. हल्लेखोर मुलगा सुनीलला याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. जन्मदात्या आईला क्रूरपणे मारणाऱ्या कुचकोरवी खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
4 वर्षांपूर्वी -
टीम देवेंद्र वगैरे माहिती नाही | पण कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे - पंकजा मुंडे
टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, मी मी असं चालत नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. नवीन चेहरे आले, त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार, असं पक्षाच्या श्रेष्ठींना वाटत असेल, तर माझा त्यावर विश्वास आहे. पक्षाची ताकद वाढली, तर हा निर्णय योग्य ठरेल, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
4 वर्षांपूर्वी -
विजय औटींना महिला सरपंचानी झापले | आमदार निलेश लंकेविरोधातील टिकेवरून जोरदार निशाणा
संकटाचा सामना करायचा का संकटाला भिऊन घरात बसायचं ? म्हणजे चुकीचं वागा असा याचा अर्थ नाही. मुख्यमंत्री पदोपदी सांगतात मास्क वापरा, हात धुवा, सामाजिक अंतर पाळा. मुख्यमंत्र्यांच्या सुचना पाळायला का अडचण आहे आपल्याला ? नाही ? ‘त्यांच्यातच जाउन झोपन !’ कोणत्याही गोष्टीला एक सिमा असावी. माणसाने वागावं कसं ? तुम्ही अधिक कडक केले असते, प्रशासनाच्या मागे अधिक मजबुतपणे उभे राहिले असता तर काही जिव नक्कीच वाचले असते. मी तपशिलात जाणार नाही. त्यासाठी योग्य वेळ येऊ द्या. मी आमदार असतो तर ५० टक्के जिव नक्कीच वाचविले असते असा दावा करीत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मा. आ. विजय औटी यांनी आमदार नीलेश लंके यांच्यावर पुन्हा निशाणा साधला.
4 वर्षांपूर्वी -
मी आमदार असतो तर ५० टक्के जिव नक्कीच वाचविले असते | विजय औटींचा निलेश लंकेवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदोपदी सांगतात मास्क वापरा, हात धुवा, सामाजिक अंतर पाळा. मुख्यमंत्र्यांच्या सुचना पाळायला का अडचण आहे आपल्याला ? नाही ? प्रशासनाच्या मागे अधिक मजबुतपणे उभे राहिले असता तर काही जिव नक्कीच वाचले असते.
4 वर्षांपूर्वी -
जळगावात कुछ बडा होने वाला है नंतर, मी नाथाभाऊ समर्थक कॅम्पेन जोरात
BHR प्रकरणाची सूत्रे जोरात फिरू लागताच आ.गिरीश महाजन गटाकडून ‘कुछ बडा होनेवाला हैं’ असे संदेश समाज माध्यमांवर फिरत होते. आठवडाभरात एकनाथराव खडसेंच्या मागे ईडी लागली आणि खडसे समर्थक मैदानात उतरले. खडसे समर्थकांकडून जोरदार सोशल मिडिया कॅम्पेन केले जात असून ‘मी नाथाभाऊ समर्थक’चे वॉलपेपर व्हायरल केले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांचा जबाब नोंदवला जाणार
भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाला आणि निरपराध व्यक्तींना त्यात गुंतवण्यात आले, असा आरोप शरद पवार यांनी यापूर्वी केला होता. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ला देण्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
घरबसल्या वय, राष्ट्रीयत्व आणि डोमासाईल प्रमाणपत्र ऑनलाईन कसं काढायचं? - असा करा अर्ज
महाराष्ट्रात किंवा देशातील कोणत्याही राज्यामध्ये शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल. सरकारी नोकरीसाठी किंवा सैन्यातील नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर महत्वाचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक असते ते म्हणजे वय,राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र होय. या प्रमाणपत्राला डोमासईल प्रमाणपत्र म्हणून देखील ओळखलं जाते. हे प्रमाणपत्र महाविद्यालीन विद्यार्थी, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आवश्यक असते.
4 वर्षांपूर्वी -
चिंता मिटली | परीक्षा न देता उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला 11वीत प्रवेश मिळेल
कोरोना लाटेमुळे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्यामुळे यंदा अकरावीच्या वर्गात जागा कमी पडतील, ही भीती चुकीची ठरणार आहे. कारण राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध विद्यार्थ्यांपेक्षा ३५ टक्के जागा अधिक आहेत. यामुळे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले तरी प्रत्येकाला अकरावीत हमखास प्रवेश मिळेल. पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी मात्र सीईटीचे मार्क महत्त्वाचे ठरतील. यंदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे अकरावीत प्रवेश मिळेल की नाही, याची चिंता पालकांना सतावते आहे.
4 वर्षांपूर्वी -
राफेलच्या चौकशीची आग लागली फ्रांसमध्ये आणि धूर दिल्लीच्या CBI कार्यालयातून, कुछ तो गडबड है - रुपाली चाकणकर
भारत आणि फ्रान्समधील जागतिक पातळीवरील बहुचर्चित ठरलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून आता फ्रान्समध्ये खळबळ उडाली असून चौकशीसाठी एका न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रान्सने राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज की फाइनेंशियल क्राइम ब्रांचने हे आदेश दिले आहेत. यामुळे पुन्हा राफेलची फाईल उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL