महत्वाच्या बातम्या
-
चंद्रकांतदादांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात गडकरींच्या कारखाण्याचीही तक्रार | भाजपमध्ये अंतर्गत कलह?
राज्यातील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आमदारांसह नेतेमंडळी सभागृहात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी नितीन गडकरी यांच्या कारखान्यावरील कारवाईच्या मागणीवरुन भारतीय जनता पक्षाला टोला लागवला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं ते म्हणाले. तसेच भारतीय जनता पक्षामधील एका गटाकडून गडकरींना लक्ष्य केलं जातंय, असा आरोपही त्यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Monsoon session | २ दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार | काय असतील महत्वाचे मुद्दे?
सोमवारपासून सुुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात प्रस्ताव मांडण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला अाहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथिगृहावर मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यामध्ये वादळी चर्चा होऊन केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात ठराव मंजूर करण्याचा निर्णय झाला. यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. परिणामी, नाराज मुख्यमंत्र्यांनी प्रथेप्रमाणे प्रसारमाध्यमांना सामोरे न जाता निघून जाणे पसंत केले.
4 वर्षांपूर्वी -
मराठी कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरण | एकाला अटक, ५ जणांवर गुन्हा दाखल
कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी राजेश साप्ते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर, कलाविश्वासात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी सोनाली राजेश साप्ते यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ही कारवाई केली.
4 वर्षांपूर्वी -
सेव्हन इलेव्हन क्लब प्रकरणी फडणवीस अडचणीत | समर्थकाला अतिरिक्त चटईक्षेत्र मंजुरी | कोर्टात याचिका
विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील काही काळापासून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेल्या आर्थिक गैव्यवहारावरून आधीच नागपुरातील वकिलाने गंभीर आरोप करतांना न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे राज्य सरकारने देखील जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहारावरून एसआयटी नेमली आहे आणि त्यामुळे देखील भविष्यात फडणवीस अडचणीत येऊ शकतात. मात्र आता त्यात अजून एक भर पडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | सुप्रीम कोर्टाकडून भूमिका स्पष्ट तरी भाजप नेते केंद्राची जवाबदारी झटकून राज्याला इशारे देण्यात व्यस्त
आता मराठा आक्रोश मोर्चा काढताना तारीख देणार नाही, थेट अॅटॅक करू, असा इशारा देतानाच मराठा समाजाला आरक्षण द्या. त्यांना नक्षलवादी होऊ देऊ नका, असं आवाहन मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक नरेंद्र पाटील यांनी सरकारला केलं. धक्कादायक म्हणजे यापूर्वी विनायक मेटे यांनी देखील खात्री न पटलेल्या नक्षलींच्या त्या पत्रावरून समर्थन करत राज्य सरकारला इशारा दिला होता आणि आज नरेन्द्र पाटील यांनी त्याचीच पुनरावृत्ती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | माजगाव डॉक'मध्ये 1388 पदांची भरती | शेवटचा दिवस, ऑनलाईन अर्ज करा
मुंबई, ०४ जुलै | मॅझॅगॉन डॉक शिपबिल्डर भरती २०२१. मॅझागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबईने 1388 बिन-कार्यकारी पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार माझॅगन डॉक भरती 2021 साठी 04 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी खाली लिंक दिल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करु शकतात.
4 वर्षांपूर्वी -
MPSC मायाजाल आहे यामध्ये पडू नका | सुसाईड नोट लिहीत MPSC उत्तीर्ण तरुणाची आत्महत्या
पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने नैराश्यातून स्वप्निलने गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाने केलेल्या आत्महत्येमुळे राज्यात आता खळबळ उडाली आहे. आपल्या आत्महत्येपूर्वी स्वप्नीलने लिहिलेली सुसाईड नोट मन हेलावून टाकणारी आहे. स्वप्निलने या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, “मी घाबरलो, खचलो मुळीच नाही.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती रोखल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवड पावसाळी अधिवेशनातही टळणार? | आघाडीचे प्रत्युत्तर
मागील चार महिने रखडलेली विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे. राज्यपाल आणि भारतीय जनता पक्ष यांच्या दबावाला सरकार भीक घालत नसल्याचे दाखवण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय आघाडीच्या समन्वय समितीत झाला असल्याचे वृत्त आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जशी विधान परिषदेच्या १२ सदस्यांची शिफारस प्रलंबित ठेवली आहे, तसे आम्हीसुद्धा विधानसभा अध्यक्षपद प्रलंबित ठेवू शकतो, हे आघाडीला दाखवायचे आहे.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटील मराठा-OBC आरक्षण, केंद्राकडील राज्याचे ३० हजार कोटी संदर्भात शहांना पत्र लिहीत नाहीत
राज्य महाविकास आघाडी सरकार आल्यापासून राज्यातील अनेक संस्था भाजपच्या हातून निसटल्या आहेत. विशेष करून कोल्हापूर स्वतःच्या मुठीत घेण्याचा चंद्रकांत दादांचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे आणि आता कोल्हापुरात सरपंच देखील निवडून आणण्याची त्यांच्यात राजकीय शक्ती उरलेली नाही हे देखील पाहायला मिळतंय. संपूर्ण सत्ताकाळात त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात स्वतःचं राजकीय साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न केला, मात्र महाविकास आघाडी सरकार आलं आणि पुढच्या वेळी ते पुण्यातून निवडून येतील का यावरही प्रश्न चिन्ह उपस्थित झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. महाराष्ट्रापासून अनेक सत्ता केंद्र भाजपच्या हातून सुटताच चंद्रकांतदादा साखर कारखान्यांविरोधात आक्रमक? - सविस्तर वृत्त
राज्य महाविकास आघाडी सरकार आल्यापासून राज्यातील अनेक संस्था भाजपच्या हातून निसटल्या आहेत. विशेष करून कोल्हापूर स्वतःच्या मुठीत घेण्याचा चंद्रकांत दादांचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे आणि आता कोल्हापुरात सरपंच देखील निवडून आणण्याची त्यांच्यात राजकीय शक्ती उरलेली नाही हे देखील पाहायला मिळतंय. संपूर्ण सत्ताकाळात त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात स्वतःचं राजकीय साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न केला, मात्र महाविकास आघाडी सरकार आलं आणि पुढच्या वेळी ते पुण्यातून निवडून येतील का यावरही प्रश्न चिन्ह उपस्थित झालं आहे. परिणामी चंद्रकांतदादा सध्या द्वेशाच्या राजकरणात उतरल्याचे पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
कुणालाही भेटलो नाही, अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील - संजय राऊत
भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांना भेटल्याच्या वृत्ताचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी इन्कार केला आहे. मी काल कुणालाही भेटलो नाही. या सर्व अफवा आहेत. अशा अफवांनी राजकारण हलत नाही. अफवा पसरवण्याचे कारखाने सुरू आहेत. ते दिवाळखोरीत निघतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Yojana | पीक विमा योजना 2021 ऑनलाईन अर्ज | शेवटची तारीख जवळ - संपूर्ण प्रक्रिया
महाराष्ट्रात यंदा वेळे अगोदर मान्सून दाखल झाला. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांच्या दृष्टीनं तयारी सुरु केली. सन 2021 च्या खरिप हंगामासाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागनं शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Yojana | शरद पवार ग्रामसमृध्दी योजना अनुदान योजना अर्ज - संपूर्ण प्रक्रिया
गाय व म्हैस यांकरिता पक्का गोठा बांधणे, जनावरांसाठी गोठ्यांची जागा हि ओबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असते तसेच ती अस्वच्छ असल्याने जनावरांना विविध आजार होतात. गाई आणि म्हशींची कास निकामी होउन शरीरावर खालच्या बाजूस जखमा होतात. याठिकाणी मौल्यवान मूत्र व शेण साठवता न आल्याने वाया जाते. यासाठी या ठिकाणी चार आणि खाद्यासाठी चांगली गव्हाण बांधणे तसेच मूत्र संचय टाके बांधण्यात येतील. स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील. एका गोठयासाठी ७७,१८८ रुपये खर्च येईल. यासाठी ६ गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करून २ गुरे ते ६ गुरे याकरिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरूपेक्षा जात गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील.
4 वर्षांपूर्वी -
अरे? पेट्रोल पण पोहचले की 105, बहुधा आता तिथंच थांबेल ते ही | रोहिणी खडसेंचं खोचक ट्विट
इंधनाचे दर सातत्याने वाढतच असल्याने त्याचा परिणाम थैट दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तूंच्या किंमतींवरही होताना दिसत आहे. पेट्रोलने शंभरील पार केल्यानंतर देशभरातून मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. मात्र, आता पेट्रोलने चक्क १०५ चा आकडा गाठला आहे. त्यावरुन, रोहिणी खडसेंनी भाजपला लक्ष्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
नोकरीच्या शोधात आहात? मग आधी सरकारच्या 'महाजॉब्स' पोर्टलवर करा नोंदणी - वाचा सविस्तर
डिग्री, कौशल्य शिक्षण असून देखील नोकरी नसलेल्या तरुणांची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे. सरकारी नोकरीच्या अनेक संधी कधी येऊन जातात हे अनेकदा तरुणांना कळत नाही. सध्या करोनाच्या पार्श्वभुमीवर तरुणांच्या नोकऱ्या गेल्या असून हजारो तरुण बेरोजगार झाले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने बेरोजगारांसाठी ‘महाजॉब्स’ पोर्टल (Mahajobs Portal) चालविण्यात येते. यामध्ये नोकऱ्यांसदर्भात अपडेट येत असतात. यातील तुमच्या शिक्षण आणि अनुभवानुसार असलेली नोकरी तुम्ही निवडू शकता.
4 वर्षांपूर्वी -
नवीन शेततळेसाठी 100 टक्के अनुदान | शेततळे अस्तरीकरण अनुदान योजना - नक्की वाचा
आज एक नवीन अपडेट आपण घेऊन आलो आहे ती म्हणजे शेततळे प्लॅस्टिक अस्तारीकरण अनुदान 06 एप्रिल 2021 रोजी शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी अनुदान संबंधित एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे आपण जर पाहिलं तर सहा प्रकारच्या शेततळ्यांसाठी 100 टक्के अनुदान दिल जाते परंतु शेततळ्यांच्या प्लॅस्टिक अस्तारीकरणासाठी शेतकर्यांना विविध प्रकारच्या योजनेतून लाभ घ्यावा लागतो आणि आता ही बाब लक्षात घेता 06 एप्रिल 2021रोजी शासन निर्णय घेऊन प्लॅस्टिकचा कागद आहे प्लास्टिक अस्तरीकरण आहे हे शेततळ्याचे अस्तरीकरण ही बाब मनरेगाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोणताही हप्ता नाही । गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना । कसा लाभ घ्याल? - नक्की वाचा
शेतात अपघात किंवा मृत्यू आणि अपंगत्व या साठी शेतकर्यांना मदत म्हणून आपघात विमा योजना ही 2006 पासून सुरू आहे परंतु आता या योजनेचे नाव बदलून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही कंपनी मध्ये विमा भरण्याची गरज नाही , ही निशुल्क विमा योजना आहे. यासाठी शासन रक्कम भरते .ही योजना सन 2021-2022 मध्ये राबवण्यासाठी 8 मार्च 2021 रोजी शासन निर्णय घेऊन मंजूरी मिळाली आहे . ही योजना राबवण्यासाठी निधि रक्कम ही विमा कंपनीस एका वर्षासाठी सुपूर्द करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवेंचं नगरसेवक पद रद्द । मनसे उमेदवाराच्या न्यायालयीन लढ्याला यश
पुणे महापालिकेच्या हद्दीत एक महत्वाची घटना घडली आहे. पुण्यातील लोहियानगर कासेवाडी प्रभागातील कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. तसे आदेश लघुवाद न्यायालयाने दिले आहेत. अनधिकृत बांधकाम प्रकरणी पुणे न्यायालयाने काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचं नगरसेवक पद रद्द केलं आहे. या प्रकरणी मनसेचे उमेदवार राहिलेले भूपेंद्र शेंडगे यांनी बागवे यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. या दाव्यावर निकाल देताना पुणे कोर्टाने बागवे यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण रस्त्यावर उतरून नव्हे तर राष्ट्रपतींच्या सहमतीनेच मिळणार - छत्रपती संभाजी
भाजपचे आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची पुर्नविचार याचिका फेटाळली असली तरी राज्य सरकारचे अधिकार अबाधित असल्याविषयी केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी हे मत मांडले. आशिष शेलार वकील असतील मात्र मला 102 व्या घटना दुरुस्ती वरून न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत जेवढे समजते, त्यावरून मराठा आरक्षण हा विषय आता रस्त्यावरील नसून न्यायालयातील आहे असे संभाजीराजे यांनी सांगितले. यासाठी दोनच मार्ग आपल्या समोर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, महापौरांची माहिती
राज्यात कोरोनाचा कहर वाढत होताच. पुण्यातही कोरोनाची स्थिती चिंताजनक होती. मात्र, आता हळूहळू कोरोना रुग्ण संख्या पुण्यातील कमी होत चालली आहे. पुण्यात पॉझिटीव्हीटी रेट वाढत आहे. यामुळे सोमवारपासून पुण्यात नवीन नियम लागू करण्यात आले होते. नवीन नियमावली नुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सगळं बंद राहील. पुण्याचा दर मागच्या तुलनेत वाढत असल्याचं म्हणत 4.6 पॉझिटिव्हिटी रेट होता आता 5.3 झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील नियमावली सुरू ठेवायचा निर्णय घेण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL