महत्वाच्या बातम्या
-
केंद्राकडील तयार इंपिरिकल डाटा ताबडतोब मिळू शकतो | पण भाजप तो मिळू देत नाही - छगन भुजबळ
पोटनिवडणूका पुढे ढकलाव्यात अशी आमची मागणी आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाने ओबीसी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचे आम्ही स्वागत करतो मात्र भारतीय जनता पक्षवाले जे आरोप करत आहेत ते अत्यंत दुर्दैवी आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्य सरकार असतानाच केंद्राने त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली.
3 वर्षांपूर्वी -
शिवसैनिकांसमोर आवाज न करता शांत बसलेले मेटे शिवसैनिक गेल्यावर पत्रकार परिषदेत गरजले.... काय म्हणाले?
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे बैठक सुरु होती. मात्र, या बैठकीत अचानक गदारोळ सुरु झाला. काही तरुण अचानक बैठकीत आले. त्यांनी जोरजोरात आरडाओरड करायला सुरुवात केली. ते विनायक मेटे यांच्याजवळ आले. भाजप सरकार असताना प्रश्न का सोडवला नाही? असा सवाल या तरुणांनी केला. या तरुणांनी ही बैठक उधळून लावली.
3 वर्षांपूर्वी -
आ. निलेश लंकेचा लंडनमध्ये डंका | वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
राज्यातील कोरोना परिस्थिती ही दिवसेंदिवस गंभीर होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके त्यांनी उभारलेल्या कोरोना कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची काळजी घेत असल्याचं पाहायला मिळालं होतं. “माझं काय व्हायचं ते होऊ द्या मात्र जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. त्यामुळे मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी लोक सुरक्षित असली पाहिजेत, हे शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे होते. मतदारसंघातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्य सेवेचा निर्धार त्यांनी केला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही त्यांनी कोविड केअर सेंटरची उभारणी केली.
3 वर्षांपूर्वी -
दहावीच्या परीक्षेत 90% गुण प्राप्त केलेल्या 'या' विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाखांचे अनुदान - मंत्री धनंजय मुंडे
अनुसूचित जातीतील 10 वीच्या परीक्षेत 90% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्री असताना मोठा भ्रष्टाचार केल्याने त्यांना तिकीटच दिलं नाही - प्रतापराव जाधव
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी बावनकुळे यांनी थेट शिवसेनेला संपविण्यावर भाष्य केलं होतं. चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी खामगावमध्ये बोलताना शिवसेनेवर जोरदार टीका केली होती.
3 वर्षांपूर्वी -
भाजपचे सरकार असताना प्रश्न का सोडवला नाही? | संतप्त शिवसैनिकांचा मेटेंच्या शिवसंग्रामच्या बैठकीत राडा
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे बैठक सुरु होती. मात्र, या बैठकीत अचानक गदारोळ सुरु झाला. काही तरुण अचानक बैठकीत आले. त्यांनी जोरजोरात आरडाओरड करायला सुरुवात केली. ते विनायक मेटे यांच्याजवळ आले. भाजप सरकार असताना प्रश्न का सोडवला नाही? असा सवाल या तरुणांनी केला. या तरुणांनी ही बैठक उधळून लावली.
3 वर्षांपूर्वी -
पावसाळी अधिवेशन तोंडावर तरी विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित नाही | नाना पटोले तातडीने दिल्लीला
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्याचा दौरा अर्धवट सोडून नाना पटोले दिल्लीला रवाना होणार आहे. नवी दिल्लीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत येण्याचे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले आहे. नाना पटोले ३ दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
सरकार कोसळत नसल्याने भाजप हतबल? | दिल्लीच्या आदेशावर भाजपच्या बैठकीत अजित पवारांच्या CBI चौकशीचा प्रस्ताव मंजूर?
प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर जेलिटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्यापासून सुरु झालेल्या सचिन वाझे प्रकरणाला रोज नवे वळण मिळत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझेनेच आणखी एका पत्रातून स्फोट केला. त्यामध्ये, शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनीही खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. त्यावरुन आता भाजपा आक्रमक पवित्रा घेत असल्याचे दिसून येते.
3 वर्षांपूर्वी -
12 वीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करा | 10 दिवसांत अंतर्गत मूल्यांकन योजना बनवा - सुप्रीम कोर्ट
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी केली. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना 31 जूलैपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच 10 दिवसांत अंर्तगत मूल्यांकन योजना तयार करण्यासदेखील सांगितले आहे.
3 वर्षांपूर्वी -
ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना भाजपचा हा कळवळा कुठे गेला होता? | रोहिणी खडसेंचा थेट हल्लाबोल
जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचाच सरकारचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप फक्त ओबीसी उमेदवारच देईल, मग विजय किंवा पराजय जे होईल ते आम्ही पाहून घेऊ, असा आक्रमक पवित्रा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी प्रतिसवाल केलाय. ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?, असा प्रश्न त्यांनी फडणवीसांना केलाय.
3 वर्षांपूर्वी -
...तर दहावी, बारावीच्या शाळा सुरू होऊ शकतील - राज्यमंत्री बच्चू कडू
राज्यात सध्या कोरोनाची रुग्ण संख्या ही कमालीची घटली आहे. लॉकडाऊनमध्येही शिथिलता मिळाली आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. कोरोनाची अशीच परिस्थिती राहिली तर शाळा सुरू करायला हरकत नाही. जर पुन्हा कोरोनाचा प्रभाव वाढला तर शाळा बंद देखील कराव्या लागतील. अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री मंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
ती तांत्रिक बाब, शिवरायांचं नाव आमची मागणी नाही | नवीन विमानतळाला दि बा पाटील यांचंच नाव दिलं जावं - आ. राजू पाटील
नवी मुंबईतील सिडको भवनाला आंदोलक आज घेराव घालणार आहेत. विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्त नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीने जोर धरला असून, बेलापूर येथील सिडकोच्या मुख्यालयाला हजारोच्या संख्येने घेराव घालण्यासाठी प्रकल्पग्रस्त आणि इतर राजकीय पक्षांतील कार्यकर्ते सकाळपासून सिडको कार्यालयाकडे रवाना होत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
पुणे आंबिल ओढा | भाजप सरकारची भर पावसाळ्यात गरिबांवर कठोर कारवाई | लहान मुलं, स्त्रियांकडून आक्रोश
बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप करत पुण्यात स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध केला. घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर आंबिल ओढ्यातील नागरिकांनी विरोध केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. काही जणांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आंबिल ओढ्यात 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
वाद पेटला | पुण्याच्या आंबिल ओढ्यात राडा, घरं पाडण्यास स्थानिकांचा विरोध
बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप करत पुण्यात स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध केला. घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर आंबिल ओढ्यातील नागरिकांनी विरोध केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. काही जणांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आंबिल ओढ्यात 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईतील सिडको भवनाला आज घेराव | दि बा पाटील यांच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
नवी मुंबईतील सिडको भवनाला आंदोलक आज (२४ जून) घेराव घालणार आहेत. विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्त नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीने जोर धरला असून, बेलापूर येथील सिडकोच्या मुख्यालयाला हजारोच्या संख्येने घेराव घालण्यासाठी प्रकल्पग्रस्त आणि इतर राजकीय पक्षांतील कार्यकर्ते सकाळपासून सिडको कार्यालयाकडे रवाना होत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
पीडित पुरुष | पुढच्या जन्मी अशी बायको नको रे बाबा | पुरुषांनी चक्क पिंपळाच्या झाडाची केली पूजा
बायकोच्या जाचाला कंटाळलेल्या पुरुषांनी, माझ्या बायकोसोबत आणखी जन्म देऊ नको, अशी प्रार्थना केली. बुधवार (दि 23) वाळूज परिसरातील पत्नी पीडित पुरुष आश्रमात, संघटनेच्या वतीने पिंपळाच्या झाडाचे पूजन करत महिलांप्रमाणे पुरुषांसाठी देखील कायदे करण्याची मागणी करण्यात आली.
3 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र सरकारकडून महिला बचत गटांना मिळणार २ लाख रुपये कर्ज | असा करा अर्ज
केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकरी व महिला बचत गटांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करत असते, यासाठी अनेक योजना ही राबवत असते, महिला सक्षमीकरण करणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई सिद्धार्थनगर पत्राचाळ पुनर्विकासाला मंजुरी | 672 मूळ रहिवाशांना 2 वर्षांत घरे मिळणार
महाराष्ट्र राज्य सरकारच्या कॅबिनेटची बैठक आज पार पडली या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील हातवन बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पास 297 कोटींची प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता देणे. प्रधानमंत्री कृषी सिंचन आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत केंद्रीय अर्थसहाय्य व राज्य हिश्यापोटी नाबार्डकडून प्राप्त कर्जाची रक्कम राज्य शासनाच्या निधीत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
3 वर्षांपूर्वी -
झेडपी, पंचायत समिती पोटनिवडणूक | निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार निवडणूक आयोगाला विनंती करणार?
OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तडीस जात नाही तोवर राज्यात एकही निवडणूक होऊ देणार नसल्याची भूमिका भाजप नेत्यांसह सत्ताधारी महाविकास आघाडीतील मंत्र्यांनीही घेतला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने नमती भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
सातारा | अनुदानावर १० शेळ्या-एक बोकड, दोन गाई म्हशी आणि मिल्किंग मशीनच वाटप | करा अर्ज
जिल्हा परिषद योजना 2021 अंतर्गत जिल्हा परिषद सातारा पशुसंवर्धन विभागाकडून ७५ टक्के अनुदानावर १० शेळ्या व एक बोकड वाटप. ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे गट वाटप ( दोन गाई म्हशी) व मिल्किंग मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी शेवट दिनांकाच्या आत विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करावा.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News