23 February 2025 10:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

भगीरथ भालकेंचा विचार व्हावा असं गटाचं मत | तर दुसरा गट पार्थ पवारांसाठी आग्रही

Pandharpur constituency, Parth Pawar, Bhagirath Bhalke

पंढरपूर, २७ डिसेंबर: माजी आमदार औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी पंढरपूरचा रखडलेला विकास साधायचा असेल तर पार्थ पवार यांना उमेदवार द्या, अशी मागणी केली आहे. तसं पत्रच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. असं असलं तरी पंढरपुरातील तरुण मंडळींमध्ये मात्र पार्थ यांना उमेदवारी देण्याबाबत विरोध असल्याचं सांगितलं जात आहे.

दुसरीकडे पंढरपूरची जनता स्थानिक उमेदवाराच्याच पाठिशी उभी राहतो. बाहेरचा उमेदवार दिल्यास त्याला पराभवाला समोरं जावं लागतं, हा पंढरपूर मतदारसंघाचा इतिहास आहे. यापूर्वी तत्कालीन राजकारणातील मोठं प्रस्थ असलेल्या विजयसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली होती. पण मोहिते-पाटील यांना मोठा पराभव स्वीकारवा लागला होता. मोहिते-पाटलांचा पराभव केल्यानंतर भालके यांना जायंट किलर म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

राजकीय विचार करता पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाल्यास विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक विरोधात जाणार नाहीत. त्यामुळे पार्थ यांच्यासाठी निवडणूक सोपी असेल, असा एक मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे. पार्थ यांना पोटनिवडणुकीत संधी दिली जावी आणि त्यानंतर पुढे होणाऱ्या निवडणुकीत दिवंगत भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालकेंचा विचार व्हावा, असं या गटाला वाटतं. भारत भालकेंच्या निधनानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे.

दरम्यान आमदार भारत भालके यांनी अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदत केली होती. सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारा आमदार अशी त्यांची ओळख होती. त्यांचे अपुरे काम त्यांचे पुत्र भगीरथ भालके हे निश्‍चित पूर्ण करतील. त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे आणि त्यांना पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाचे आमदार म्हणून बिनविरोध विजयी करावे, अशा भावना अनेकांनी शोकसभेच्या दिवशी व्यक्त केली होती.

 

News English Summary: If Parth Pawar gets the nomination for political reasons, the MLAs of the Legislative Council will not go against Prashant Paricharak. Therefore, there is a current of opinion among the NCP that the election will be easy for Parth. The group believes that Parth should be given a chance in the by-elections and that Bhagirath Bhalke, son of the late Bharat Bhalke, should be considered in the next elections. After the death of Bharat Bhalke, Bhagirath Bhalke has been elected unopposed as the Chairman of Vitthal Sahakari Sugar Factory in Pandharpur.

News English Title: Pandharpur assembly constituency for Parth Pawar or Bhagirath Bhalke news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x