22 January 2025 10:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक | भगीरथ भालकेंचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे - जयंत पाटील

Pandharpur Mangalvedha, MahaVikas Aghadi, Bhagirath Bharat Bhalke

पंढरपूर, ०४ एप्रिल: पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्या प्रचाराचा आज रांजणी, पंढरपूर येथे शुभारंभ करण्यात आला. भगीरथ यांंना विजयी करण्यासाठी संपूर्ण मतदारसंघाने मेहनत घेत आहे. मला खात्री आहे की रात्रीचा दिवस करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा विजय मिळवेल,असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की,आज भारतीय जनता पक्षाने इथे उमेदवार दिला आहे. भारतनाना विरोधी पक्षाचे आमदार होते तेव्हा भाजप सरकारने या मतदारसंघाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं. ३५ गावांचा प्रश्न असेल किंवा मतदारसंघातील इतर प्रश्न असतील, नानांनी प्रत्येक वेळी भारतीय जनता पक्षाशी संघर्ष केला.

महाविकास आघाडी सरकार कसं अडचणीत येईल यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत आहे, काही घटनांचा आमच्या हातात जर तपास असता तर तात्काळ या घटनांमागे कोण आहे हे हुडकून काढलं असतं मात्र तपास एनआयएकडे आहे. हा तपास संथगतीने सुरू आहे का असा प्रश्न आता पडतोय. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर लागावा अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार असल्या कोणत्याही प्रकरणात अडकणार नाही, ना आमच्या सरकारमध्ये असल्या गोष्टी खपवून घेतल्या जातील,असा सज्जड दम आज त्यांनी विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाला दिला आहे.

सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे मंगळवेढ्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करत आहेच पण अजित दादांनी आज सांगितले आहे. संपूर्ण सरकार भगिरथच्या मागे उभे राहणार आणि मंगळवेढ्याच्या विकासात तसूभर गोष्टीही कमी पडू देणार नाही. आज राज्यावर कोरोनाच संकट आहे, राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. आम्ही तिघेही एकदिलाने या संकटाचा सामना करत आहे. या मतदारसंघातही आम्ही एकदिलाने लढतो आहे त्यामुळे भगीरथचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे,असा निर्धारही त्यंनी बोलून दाखवला आहे.

 

News English Summary: The campaign of Bhagirath Bharat Bhalke, the official candidate of Mahavikas Aghadi for Pandharpur-Mangalvedha by election was launched at Ranjani, Pandharpur today. The entire constituency is working hard to win Bhagirath. I am sure that the NCP will win day and night, said NCP state president Jayant Patil.

News English Title: Pandharpur Mangalvedha by election MahaVikas Aghadi candidate Bhagirath Bharat Bhalke election campaign news updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x