5 November 2024 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

पंढरपूर | समाधान आवताडेंच्या चुलत भावाचं बंड तर नगराध्यक्षाचे पती देखील भाजप विरोधात

Pandharpur Mangalvedha, Samadhan Avtade, Siddheshwar Avtade, BJP

पंढरपूर, ३१ मार्च: पंढरपूरच्या रिंगणात भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना मैदानात उतरवलं आहे. तर अन्य उमेदवार मिळून तब्बल 39 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अशा स्थितीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांना बंडाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या उमेदवारीला घरातूनच विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय. समाधान आवताडे यांचे चुलत भाऊ सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पंढरपूरच्या भारतीय जनता पक्ष पुरस्कृत नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनीही भाजप विरोधात दंड थोपटले आहेत. भोसले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या दोन उमेदवारांमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते हे पक्षांतर्गत बंड कसं थंड करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाधील लढाईमुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत दररोज नवनवे ट्विस्ट येत आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेससाठी शिवसेनेने आपल्याच पक्षातील नेत्याची हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका शैला गोडसे यांनी या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचे उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे महाविकासआघाडीत बिघाडी होण्याची शक्यता होती. त्यामुळे शिवसेनेने शैला गोडसे यांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

 

News English Summary: The Bharatiya Janata Party has fielded Samadhan Avtade in the Pandharpur arena. Samadhan Avtade’s cousin Siddheshwar Avtade has filed his independent candidature. Nagesh Bhosale, husband of Pandharpur Bharatiya Janata Party-sponsored mayor Sadhana Bhosale, has also slapped fines against the BJP.

News English Title: Pandharpur Mangalvedha by poll BJP candidate Samadhan Avtade’s cousin Siddheshwar Avtade’s candidature application news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x