15 November 2024 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News
x

काय म्हणावं याला? पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर १ आमदार वाढताच फडणवीसांना पुन्हा सत्तांतराची स्वप्नं

Pandharpur Mangalvedha by poll

पंढरपूर, ०२ मे | पंढरपूर पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर फडणवीसांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून ‘बुडत्याला काठीचा आधार’ असाच निष्कर्ष काढता येऊ शकतो. मागील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पराभव आणि भाजपाला सोडून महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्यांमुळे राज्य भाजप कंटाळला होता. विशेष म्हणजे २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या १०५ अतृप्त आमदारांचा आकडा १०५ वरून १०६ झाला आहे एवढाच तो फरक म्हणावा लागेल. मात्र त्यावरून फडणवीसांना सत्तांतराची पुन्हा स्वप्नं पडू लागल्याने अनेकांनी याला हास्यास्पद म्हटलंय. त्यात एखाद्या पोटनिवडणुकीनंतर सत्तांतराची स्वप्नं केवळ फडणवीसांना पडू शकतात अशी टीका समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. त्यात भगीरथ भालके यांचं डिपॉझिट जप्त झालं असं देखील नाही, कारण अवघ्या 3700 मतांनी त्यांचा पराभव झाल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, मी करेक्ट कार्यक्रम करतो, असं बोललो होतो. आजही मी त्या वक्तव्यावर ठाम आहे. योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करायचाच आहे. पण आता कोरोनाशी लढायचं आहे. ही वेळ नाही. आता आम्ही आमचे श्रम कोरोनासाठी वळविले आहे”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशभरातील पाच राज्यांसह, पंढरपूर-मंदळवेढा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. पंढरपुरात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथी भालके यांचा 3700 मतांनी पराभव केला. या निकालानंतर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका केली

भाजपवर जनतेनं विश्वास दाखवला. त्यामुळे मी पंढरपूरच्या जनतेचं मनापासून आभार मानतो. गेल्या दीड वर्षातील महाविकास आघाडीच्या गैरप्रकाराला, भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला एकप्रकारे आरसा दाखवण्याचं काम पंढरपुरच्या जनतेना केलाय. हे सरकार आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत राज्य सरकारचे तीन पक्ष उतरले. साम-दाम-दंड-भेद अशा सगळ्या पद्धती अवलंबले. त्यांनी प्रशासनाचा गैर उपयोग केला. मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरउपयोग केला. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

News English Summary: After the Pandharpur by-election results were announced, Fadnavis held a public press conference. From his statement at this time, the same conclusion can be drawn as ‘the basis of the sinking stick’. The state BJP was fed up with the defeat in the previous teacher and graduate constituency elections and the leaders who left the BJP and joined a party in the Mahavikas Alliance. It is noteworthy that after the results of the Assembly elections in 2019, the number of dissatisfied BJP MLAs has increased from 105 to 106.

News English Title: Pandharpur Mangalvedha by poll election 2021 result BJP Samadhan Avtade victory news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x