8 January 2025 11:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स
x

दडपशाही व भ्रष्टाचाराचे आरोप करत कर्मचारी ज्योती देवरेंविरोधात संपावर | चित्र वाघ यांचा देवरेंना 'राजकीय' पाठिंबा?

Tahasildar Jyoti Devore

पारनेर, २६ ऑगस्ट | पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कालच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ज्योती देवरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. चित्र वाघ त्यांचा केवळ राजकीय फायद्यासाठी याविषयात त्यांना अनेक आरोप असतानाही समर्थन देत असल्याचं कर्मचारी देखील ऑफ कॅमेरा सांगत आहेत. मागील काही दिवसांपासून त्या स्वतःची चौकशी होणार असल्याने भावनिक वातावरण करून सहानुभूती मिळवून स्वतःचा बचाव करत असल्याचं म्हटलं जातंय.

दडपशाही व भ्रष्टाचाराचे आरोप करत कर्मचारी ज्योती देवरेंविरोधात संपावर | चित्र वाघ यांचा देवरेंना ‘राजकीय’ पाठिंबा? – Parner Tehsil office workers strike against Tehasildar Jyoti Devore :

दरम्यान या प्रकरणावरून वेगवेगळे पडसाद उमटत असताना आज देवरे यांच्या समवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात काम बंद आंदोलन पुकारले आहे. पारनेर तालुका महसूल कर्मचारी व तलाठी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत असून तहसीलदार देवरे यांच्यावर दडपशाही व भ्रष्टाचाराचे आरोप करत चार दिवसांपूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना व मुख्य सचिवांना निवेदन दिले होते. सोबतच दोन दिवसांपूर्वी संघटनेने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले होते. या निवेदनात तहसीलदार देवरे यांची बदली करा अन्यथा आमची बदली करा अशी मागणी करण्यात आली होती.

दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचारी व पारनेर तालुक्यातील तहसीलदार मंडलाधिकाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील महसूलचा कारभार सध्या ठप्प झाला आहे. तहसील कार्यालयाच्या दारातच हे काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधी गेले असता त्या भावुक होऊन सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जातंय. अजूनपर्यंत माझ्याकडे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे निवेदन आलेले नाही तोपर्यंत त्यावर मी भाष्य करणार नाही असं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Parner Tehsil office workers strike against Tahasildar Jyoti Devore news updates.

हॅशटॅग्स

#NileshLanke(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x