24 December 2024 9:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाज्मा दान करावा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Patients recovered corona, donate plasma, CM Uddhav Thackeray

मुंबई, २८ जून : ३० जूनला लॉकडाउनची मुदत संपते आहे. पुढे काय हा प्रश्न तुमच्या मनात असेल. ३० जून नंतर लॉकडाउन उठणार का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच हे सगळं असंच सुरु राहणार का? तर त्याचंही उत्तर नाही असंच आहे. सध्या आपली अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. आपण अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी सुरु करतो आहोत. सगळं सुरु केलं म्हणून परिस्थिती सुरळीत झाली असं समजू नका नाहीतर करोन आ वासून बसला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

प्लाझ्मा थेरपीबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?
चहुबाजूला आपली नजर आहे. कोणत्या देशात नेमकं काय सुरू आहे? प्लाझ्मा थेरपी आपण मार्चपासून करत आहोत. कोरोना संकटाचा सामना करताना अनेक नवनव्या औषधांची नावं पुढे येत आहेत. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, रेमडेसिवीर अशा औषधांचा वापर जगभरात होत आहे. यामध्ये महाराष्ट्र कुठेही मागे नाही. कोरोना रुग्णांसाठी सध्या जगभरात प्लाज्मा पद्धती वापरण्यात येत आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाज्माच्या मदतीनं ९० टक्के कोरोना रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी पुढे यावं आणि प्लाज्मा दान करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

आपलं सरकार काळजीवाहू नाही. हे सरकार महाराष्ट्राची काळजी घेणार आहे. धोक्यापासून सावध करण्यासाठी हे सरकार आहे. लोकल रेल्वे सुरू करण्याची मागणी केली. तर ती अत्यावश्यक सेवेकरता त्या सुरू केल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये सगळं थांबल असताना शेतकरी मित्र मात्र थांबला नाही. पण या शेतकऱ्यांना आता बोगस बियाणं मिळत असल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू नका. हे सरकार तुमचं आहे. कायद्याच्या कचाट्यातून शेतकऱ्यांना फसवणारे सुटणार नाही. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार.

 

News English Summary: Ninety percent of corona patients recover with the help of blood plasma. Therefore, the patients who have recovered from the corona should come forward and donate plasma, appealed the Chief Minister.

News English Title: Patients who have recovered from the corona should come forward and donate plasma appealed the Chief Minister Uddhav Thackeray News Latest updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x