21 November 2024 7:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News
x

पवारांचं पत्रं आणि केंद्रीय मंत्र्यांना फोन | खतांच्या किमती कमी झाल्या | शेतकऱ्यांना पावरफूल दिलासा

Sharad Pawar

नवी दिल्ली, २० मे | देशामध्ये रासायनिक खतांच्या किमती वाढवण्यात आल्याने मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात होता. खतांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहीले होते. पवारांना केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी फोन करून लवकरच रासायनिक खतांच्या दरवाढीचा पुनर्विचार करण्याचे आश्वासन पवारांना दिले होते.

कोरोना संकट काळात रासायनिक खतांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याने देशभरातील शेतकरी अडचणीत सापडला. रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवारांनी पत्राद्वारे केली होती. केंद्रीय खत व रसायन मंत्री श्री. डी. व्ही. सदानंद गौडा यांना या प्रकरणी वैयक्तिकरीत्या लक्ष घालण्याची आणि किमतीतील वाढ लवकरात लवकर मागे घेण्याची विनंती पवारांनी मंगळवारी एका पत्राद्वारे मंत्री महोदयांना केली होती. या पत्राची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी पवारांशी फोनवर चर्चा केली होती. पत्रातील सूचनांचा अभ्यास करून पुढील दोन दिवसांत दरवाढ मागे घेण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे त्यांनी पवारांना आश्वासित केले होते.

त्यानंतर केंद्र सरकारने १४,७७५ कोटी रुपयांच्या अनुदानाचा अतिरिक्त बोजा शेतकऱ्यांवर न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षीच्या दराने डीएपी रासायनिक खत उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे पवारांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

केंद्र सरकारने यासंदर्भात डाय अमोनियम फास्फेट (डीएपी) खतावरील सब्सिडी 140 टक्क्यांनी वाढवली असल्याचेही एका निवेदनात म्हणण्यात आले आहे. निवेदनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी खतांच्या किंमतीसंदर्भात एक उच्च स्तरीय बैठक घेतली. यावेळी जागतिक स्तरावर खतांच्या किंमती वाढल्या असल्या तरी, शेतकऱ्यांना जुन्या दरातच खत मिळायला हवे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

 

News English Summary: Since then, the central government has decided not to impose an additional burden of Rs 14,775 crore on farmers. DAP chemical fertilizer will be made available at the same rate as last year. Therefore, Pawar’s pursuit has given great relief to the farmers.

News English Title: Pawar’s pursuit has given great relief to the farmers over fertilizers rates news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x