22 January 2025 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

बदनामीसाठी चाईनीज फंडिंग घेत असल्याचा फडणवीसांचा माध्यमांवर आरोप | PM केअरने चायनीस फंडिंग घेतल्याचा विसर?

Pegasus spyware attack

मुंबई, २० जुलै | फोन टॅपिंगच्या मु्द्दयावरून विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत. पण केंद्र सरकारने कुणाचेही फोन टॅप केले नाहीत. विरोधकांचे आरोप दिशाभूल करणारे आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंग यांच्याच काळात झाल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पेगसास स्पायवेअरद्वारे राजकीय नेते आणि पत्रकारांचे फोन टॅप केल्याच्या बातम्या आल्याने देशभर खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन फोन टॅपिंगवरून तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवरच आरोप केले. तसेच काँग्रेसच्या काळात आणि विविध राज्यांमध्ये विविध सरकारांच्या काळात फोन टॅप कसे केले गेले, याची माहितीही दिली. भारतीय संसदेच अधिवेशन डिरेल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून होतोय. मंत्रिमंडळाचा विस्तार करून सर्व जातीधर्माच्या लोकांना मोदींनी संधी दिली. त्यामुळे अधिवेशन डिरेल करण्याच्या उद्देशान अधिवेशनाच कामकाज डिस्टर्ब केल जात आहे, असं सांगतानाच पॅगसेसच्या बातमीला कोणताही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अश्या कोणत्याही पद्धतीची हॅकींग करत नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

आपल्याकडील टेलिग्राफ ॲक्टनुसार आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. त्यामुळ असं काही करण्याची गरज नाही. सबंधित विभागानं अश्या बातम्या देणाऱ्यांना नोटीस दिली असून सत्य काय ते समोर येईलच, असं त्यांनी सांगितलं.

केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांनी काय म्हटलं?
केंद्र सरकारने फोन हॅक झाल्याचा दावा स्पष्ट शब्दांत फेटाळला. ‘द वायर’ वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखातील दाव्यांना कोणताही वस्तुनिष्ठ आधार नाही. या दाव्यामागे भारताच्या लोकशाही व्यवस्थेला बदनाम करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हेतू आहे, असा आरोप केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी लोकसभेत केला. भारतात संस्थात्मक संरचना अस्तित्वात असून तिच्याशी संबंधित कायद्यांची चौकट पाळली जाते. नियमांच्या आधारे पाळत ठेवली जाते. कोणत्या नियमांच्या आधारे हेरगिरी केली जाते, हे आता विरोधी बाकांवर बसणाऱ्या पण, कधीकाळी सत्तेत असणाऱ्या पक्षांना माहिती आहे. त्यामुळे देशात बेकायदा हेरगिरी केली जात नाही याची जाणीव विरोधी पक्षांनाही आहे, असे वैष्णव म्हणाले.

चायनीस फंडिंग:
पेगाससमध्ये 45 देशांचा उल्लेख आहे. पण फक्त भारताची चर्चा होत आहे. जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतून हे होत आहे, असा दावाही त्यांनी केला. एक-दोन मीडिया हाऊसला चाईनीज फंडिंग मिळत असून त्यातू एक बदनामीचा अजेंडा राबवला जात आहे. भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. अशा बदनामीचा आम्ही निषेध करतो असं सांगतानाच बरोबर अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी हा रिपोर्ट कसा छापून येतो?, असा सवालही त्यांनी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Pegasus spyware attack Devendra Fadnavis hits out at Manmohan Singh and congress news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x