ईश्वर हा सर्वत्र आहे | त्यामुळे धार्मिक स्थळांबाबत थोडी सबुरी बाळगू - आरोग्यमंत्री
मुंबई, १८ ऑगस्ट : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळं बंद आहेत. पण राज्य अनलॉकच्या टप्प्यात असताना मंदिरं का उघडण्यात आली नाही? असा सवाल थेट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितीत केला. त्यानंतर आता मशिदी पुन्हा उघडण्याच्या मागणीसाठी पालकमंत्री अस्लम शेख हे पुढे आहेत. मुंबईतील धार्मिक स्थळं पुन्हा सुरू करण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करीत असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
मुंबईतील मशीदींच्या विश्वस्तांच्या शिष्टमंडळासोबत शेख यांच्या दालनात सोमवारी पार पडलेल्या बैठकीनंतर अस्लम शेख बोलत होते. या बैठकीला मिनारा मशिदीचे विश्वस्त मोहद असिफ मेमन, अब्दुल वहाब लतिफ, जामा मशिदीचे चेअरमन शोहेब खातिब, जामा मशिदीचे विश्वस्त नाजिर तुंगेकर, साबिर निरमन आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारतर्फे धार्मिक स्थळं उघडण्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. राजेश टोपे म्हणाले की, धार्मिक स्थळांबाबत लोक भावनिक असतात. त्यामुळे तिथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणार नाही. जर काटेकोरपणे पालन केले तर धार्मिक स्थळं सुरू करण्यास कोणी विरोध करणार नाही. मात्र ईश्वर हा सर्वत्र आहे. त्यामुळे थोडी सबुरी बाळगू, वेळ लागला तरी हरकत नाही, असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.
यापूर्वी भाजपाने देखील मंदिरे उघडण्यासाठी थेट राज्यपालांना निवेदन दिले होते. तर अलीकडेच राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनीही मंदिरे उघडण्याची भूमिका मांडली होती. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मात्र सबुरीचा इशारा दिला आहे. मंदिरे उघडल्यावर संक्रमण वाढल्यावर पुन्हा दोष तुम्ही सरकारला देणार. त्यामुळे मंदिरे उघडण्याची मागणी करणाऱ्यांनी थोडा संयम बाळगावा, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.
News English Summary: Rajesh Tope said that people are emotional about religious places. Therefore, social discrimination will not be observed there. If strictly observed, no one will oppose the commencement of religious places. But God is everywhere.
News English Title: People are emotional about religious places said Health Minister Rajesh Tope News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा