22 January 2025 1:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

बिहार निवडणुकीसाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं उदात्त कार्य...

NCP MLA Rohit Pawar, BJP, Sushant Singh Rajput, CBI inquiry, Aaditya Thackeray

पुणे, २० ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले. याआधी मुंबई पोलीस हा तपास करत असताना भाजपकडून मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार टीका सुरु होती. त्यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका करत खडेबोल सुनावले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’ असं म्हणत त्यांनी ‘अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.’ अशा शब्दात टीका केली आहे.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर असून सुशांत सिंहला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. तसंच या प्रकरणात राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीचा मला आदर असून माझा या संस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं रोहित पवार म्हणाले. तसंच सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं हे बरं झालं. पण यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’, म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

तसेच शबरीमला मंदिर प्रवेशाच्या निकालावेळी भाजपाचे मोठे नेते सर्वोच्च न्यायालयावर टीका करत होते. याचा आज सर्वोच्च न्यायालयावरून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजप नेत्यांना कदाचित विसर पडलेला दिसतो. पूरक भूमिका नसेल तर एखाद्या संस्थेवर टीका करण्याचे राजकीय संस्कार आमचे नाहीत, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पार्थ पवार यांनी सत्यमेव जयते ट्विट केले यावर रोहित पवार म्हणाले की, पार्थनं काय ट्विट केले ते माहिती नाही, हे प्रकरण कोर्टात होतं, सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्णय घेतला आहे. याबाबत पुढे काय भूमिका घ्यायची हा राज्य सरकारचा विषय आहे अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना रोहित यांनी दिली आहे. मात्र पार्थ यांची भूमिका राष्ट्रवादीच्या विरोधातली असल्याचीही चर्चा आहे.

 

News English Summary: The Supreme Court has directed the CBI to probe actor Sushant Singh Rajput’s suicide case. Earlier, while the Mumbai Police was investigating, the BJP had started criticizing the Mumbai Police and the Maharashtra government. That is why NCP MLA Rohit Pawar has criticized BJP and uttered harsh words.

News English Title: People will not forgive you NCP MLA Rohit Pawar warn BJP on Sushant Singh Rajput CBI inquiry News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x