22 January 2025 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771
x

अजित पवार आणि अनिल परबांविरुद्ध CBI चौकशी करण्याची मागणी | कोर्टात याचिका दाखल

Sachin Vaze

मुंबई, १६ जुलै | निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची नावे आपल्या जबाबात घेतली असून या दोघांवर गुन्हा दाखल करून, CBI कडे चौकशी करण्याची मागणी अ‍ॅड. रत्नाकर डावरे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

काय होता वाझेंच जबाबात ?
आपल्याला अजित पवार यांच्यावतीने दर्शन घोडावत यांनी महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. राज्यात बेकायदेशीर गुटखा व्यवसाय सुरू आहे. यातल्या ५० बेकायदेशीर गुटखा व्यावसायिक यांच्याकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये प्रमाणे महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते”, असं म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचप्रमाणे परिवहन मंत्री अनिल परब यांनीही आपल्याला त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावून त्यांनीही महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करून आणून देण्याचे आदेश दिले होते, असा दावा वाझेने केला आहे.

मुंबई महानगरपालिकेत ५० ब्लॅक लिस्टटेड कंत्राटदार आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी २ कोटी प्रमाणे महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करून आणून द्यावेत असे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे सैफी बुर्हानी इंप्रूव्हमेंट ट्रस्टची चौकशी सुरू आहे. या ट्रस्टच्या ट्रस्टीची भेट घ्यावी आणि त्यांच्याकडून चौकशी थांबवण्यासाठी ५० कोटी रुपये माझ्यासाठी मागवेत असे सांगितलं होतं, असं सचिन वाझे याने आपल्या निवेदनात म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Petition file in Mumbai High court against Ajit Pawar and Anil Parab demand CBI probe in Sachin Vaze case news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x